माझी मानवी... 37

A story about love, friendship, kindness and relationships

मानवी अजूनही रस्त्यावर राहुलच्या डोक्यावर तिची सॅक पकडून बसली होती.. राहुल चा श्वास तर आता नॉर्मल झाला होता पण तरी तो आता हळुवार पुटपुटत त्याला सगळं ठीक होईल असं म्हणणाऱ्या मानवी ला बघत होता.. मानवी आता त्याच्या कडे न बघता येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या कडे बघत होती.. त्यामुळे तिच्या लक्षात नाही आलं पण राहुल आता तिच्या कडे बघत होता.. त्याच्याही नकळत त्याचा हात तिच्या चेहऱ्याकडे गेला आणि तो म्हणाला "मानवी.." त्याच्या हाताचा तिच्या गालाला झालेल्या स्पर्शाने मानवी ने त्याच्या कडे पाहिले आणि त्याच्या तोंडून तिचे नाव ऐकल्यावर मात्र तिला कळायचंच बंद झालं.. पण इतक्यात एका मोटोरसायकल वाल्याने त्यांच्या जवळ येऊन जोरात हॉर्न वाजवला तशी ती भानावर आली.. राहुल ची नजर आता सुद्धा हतबल झाल्या सारखीच होती.. त्याला तिची ओळख पटलीये असं काही तिला वाटलं नाही पण त्याला आता असं कितीवेळ भिजत रस्त्यावर ठेवायचं म्हणून तिने त्याला तिथून आधार देऊन उठवलं आणि एका बस स्टॉप च्या बाकड्यावर नेऊन बसवलं.. त्याची गाडी पण तिने रोड च्या साईड ला नेऊन लावली.. मागून लोक भरपूर शिव्या घालत होते, तिथल्याच हवालदाराला पण बोलावून आणलं होत लोकांनी पण मानवीने सगळी परिस्थिती समजवून सांगितल्यावर मात्र तो घोळ निस्तरला गेला.. हे सगळं होत होते तरी राहुल मानवी त्याला जशी बसवून गेली होती तसाच बसला होता.. त्याचे कपडे पाण्याने निथळत होते.. इतका तो भिजला होता.. मानवीने येऊन त्याच्या कडे बघितलं.. आणि तिला लहानपणीचा तो incident झाल्यावर चा प्रसंग आठवला..

त्या दिवशी छोट्या राहुल ला सोडून घरी आल्यावर तिने आईला सांगितलं होत कि राहुल ची पावसात कशी अवस्था झाली होती ते.. आणि तिच्या आईने प्रसंगाची गंभीरता ओळखून राहुलच्या बाबांशी सगळं share पण केलं होत.. त्या नंतर राहुल च्या बाबांनी तिला जवळ घेऊन खूप वेळा थँक्यू म्हटलं होत.. त्यांच्या डोळ्यातलं पाणी तेव्हा सुद्धा त्यांना लपवता आलं न्हवत.. नंतर तिच्या आईने तिला थोडक्यात समजावून सांगितलेलं कि राहुल ला डॉक्टर काकांची ट्रीटमेंट चालू आहे त्याला पावसात जसा त्रास झाला तसा होऊ नये म्हणून, पण तू त्याच्या नेहमी बरोबर राहा आणि तुलाही पावसात भिजायला आवडत नाही तसेच त्याला पण नाही आवडत एवढंच लक्षात ठेव.. पण तिने त्याच्या बाबांचं आणि आईच बोलणं चोरून ऐकलं होत त्यामुळे तिला माहिती होत कि राहुल ला हे येतात ते पॅनिक अटॅक आहेत आणि ते येऊ नयेत म्हणून त्याला मानसोपचार तज्ज्ञांची ट्रीटमेंट चालू आहे.. तिने हे चुकूनही कुणाला कळून दिल न्हवत कि तिला हि गोष्ट माहिती आहे ते.. अगदी राहुल ला सुद्धा नाही.. आत्ता राहुल कडे बघून तिला हे सगळं आठवत होत.. त्याच्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली..

"सर? आपण हॉस्पिटल ला जाऊयात का? तुम्ही थरथर कापताय.. "

"नको.. मला घरी जायचंय.. "

"सर प्लीज एकदा डॉक्टरांना बघू दे तुम्हाला. मी येते तुम्हाला घरी सोडायला.. "

"नको इंटर्न.. प्लीज.. "

हे सगळं बोलत असताना त्याने एकदा हि मान वर करून मानवी कडे पाहिलं न्हवत.. त्याला बोलायला पण त्रास होत होता.. मे बी त्याची औषध घरी असतील तर ठीके हा घरी गेला तर असं वाटून तिने पण काही हरकत घेतली नाही..

"ठीके सर मी तुम्हाला सोडायला येते.. मी तिथून बस ने जाईन मग घरी.. चला.. "

"नको.. मी जातो माझा मी.. "

"नको सर.. तसे एकटे नका जाऊ.. " तिला असं वाटत होत खड्ड्यात गेलं यार हे सीक्रेट.. त्याला गरज आहे आत्ता आपली.. त्याला घरी नीट पोहोचवून खाऊ घालून औषध देऊन झोपवायला हवे आपण..

"प्लीज इंटर्न.. मला एकटं राहायचंय आत्ता.. " त्याने काकुळतीने तिच्या कडे बघितलं..पण त्याची ती नजर बघून तिने काही तरी ठरवलं आणि एक टॅक्सी थांबवली.. एक काकांच्या वयाचेच टॅक्सी चालवत होते त्यांना तिने राहुलचा पत्ता सांगितला आणि सूचना दिल्या कि त्याच्या सोसायटी मधल्या watchman काकांना सांगून मग च तुम्ही जावा.. त्याला ते त्याच्या घरी सोडतील.. तिने त्यांना आधीच पैसे पण दिले.. तिची धडपड बघून त्यांना कळालं कि ह्या मुलाला खरच मदतीची गरज आहे.. मानवी हे सगळं करत होती मात्र राहुल जिथे बसला होता त्या जागेवरून हलला पण न्हवता.. त्या टॅक्सी वाल्या काकांनी हॉस्पिटल ला न्यायचय का ते सुद्धा विचारलं.. पण राहुल नि नकारार्थी मान हलवल्यावर त्यांनी आधार देऊन त्याला उठवलं आणि मानवीच्या मदतीने त्याला टॅक्सी मध्ये बसवलं.. तिला म्हटले सुद्धा कि "ताई तू काळजी करू नकोस.. २० मिनिटात त्याला घरी पोहोचवतो मी.. " त्याला टॅक्सीतुन जाताना बघून मानवीने पुन्हा एकदा त्याची कार व्यवस्थित लॉक आहे ना ते पाहिलं आणि बस नि घरी आली.. घरी येताना तिने मेडिकल मधून सर्दी तापावरच्या गोळ्या पण घेतल्या.. आणि घरी आल्यावर गरम गरम पातळसर मुगाची खिचडी आणि नाचणीचा पापड असा बेत करून हे सगळं राहुल ला नेऊन द्यायचं ठरवलं.. टॅक्सी मध्ये त्याला बसवताना तिला त्याच अंग गरम लागलं होत.. आणि त्याच्या घरातल्या फ्रिज मध्ये पाण्याच्या बाटल्यांच्या शिवाय दुसरं काही न्हवत हेही तिला माहिती होत त्यामुळे तिने काहीतरी खायला बनवायचा घाट घातला होता.. भिजली तर ती पण होती आणि थोडी कणकण अंगात आहे हे तिला पण जाणवत होती पण तिला आत्ता तरी महत्वाचं वाटत न्हवत.. तिने  नाचणीचा पापड तळून खिचडी करायला घेतली.. पण जशी खिचडी तिने शिजवायला ठेवली तास तिला प्रश्न पडायला लागला कि आपण गेलो आणि राहुल का आलीस म्हणून भडकला तर?

*****

इकडे स्नेहल आणि रवी राहुलची वाट पाहून ठाकले होते.. त्यांच्या ३ कॉफी आणि २ सँडविचेस संपवून झाले होते तरी तो आला न्हवता.. स्नेहल उठून त्याला कॉल करायला गेली.. तिच्या ८व्या कॉल ला त्याने उत्तर दिले.. त्याने finally कॉल उचलल्यावर स्नेहल नि डायरेक्ट विचारले..

"हां राहुल तू अजून का नाही आलास?" पण त्याचा फोन खूप वेळा वाजत होता त्यामुळे त्या टॅक्सितल्या काकांनी उचलला होता.. त्यांनी सांगितले..

"हॅलो मॅडम? मी ड्राईव्हर आहे त्यांनी टॅक्सी केलीये त्याचा.. त्यांना बरं वाटत नाहीये.. मी त्यांना घरी घेऊन चाललोय.. "

"काय?" स्नेहल ला हे कळल्यावर तिने घाई घाई ने फोन ठेवला आणि पळत रवी कडे आली आणि म्हणाली..

"सर सॉरी.. मला निघावं लागतंय.. मी तुम्हाला नंतर सगळं explain करेन आत्ता मात्र मला जायला हवं..सॉरी सॉरी.. "

"ओह.. ओके ओके.." तिला घाईत तिची पर्स वगैरे घेताना बघून तो म्हणाला.. स्नेहल एवढंच बोलून राहुलच्या कडे जायला निघाली सुद्धा.. तिला तस धावत जाताना बघून रवी स्वतःशीच म्हणाला.. "हिच्या साठी एवढा चांगला तयार झालो ऑफिस मधून येऊन सुद्धा.. असो.. सेल्फी च काढूया त्या निमित्ताने.. "

*****

स्नेहल त्याच्या अपार्टमेंट मध्ये पोहोचली पण त्याच घर तिला माहितीच न्हवत.. मग तिला ज्या दिवशी ती त्याला जिम मधून सोडायला आली होती त्यावेळची गोष्ट आठवली जेव्हा ते म्हातारे watchman काका तिला त्याची गर्लफ्रेंड म्हणाले होते.. तेव्हा त्यांनी त्याचा फ्लॅट नंबर ५०२ सांगितला होता.. ते आठवून ती बरोबर त्याच्या घरी गेली.. तिने त्याच्या फ्लॅट ची डोअर बेल  दाबली आणि त्याने दार उघडायची वाट बघू लागली.. बराच वेळ झाला तिने बऱ्याचदा डोअर बेल पण वाजवली तरी दार उघडलं नाही.. तिने आता तो घरी आलाय कि नाही हे बघायला त्याच्या फोन वर कॉल केला.. इतक्यात दार उघडलं गेलं आणि लटपटत्या पायाने राहुल तिच्या समोर कसाबसा दार धरून उभा राहिला.. पण असं झालं होत कि त्याला कि काही अंगात शक्तीच नाहीये.. आणि त्यामुळेच त्याचा तोल गेला तस पटकन स्नेहल नि त्याला सावरलं आणि त्याला आत घेऊन गेली..

"राहुल अरे कसला तापला आहेस आणि हे कपडे? हे ओले कपडे का ठेवलेत तू अंगात अजून?" त्याला आत नेताना ती विचारत होती.. पण त्याच्या कडून कसलंच उत्तर नाही आलं.. तिने त्याला कसबस नेऊन सोफ्यावर बसवलं.. आत मध्ये बेडरूम मध्ये जाऊन तिने त्याचे घरातले कपडे शोधून आणले.. त्याला जमेल का कपडे बदलायला विचारलं तर त्याने हातानेच मी करतो माझं मी असं खुणावलं.. तिने तो कपडे बदलतोय तोवर त्याच्या किचन मध्ये जाऊन पाहिलं कि काही आहे का खायला.. राहुल नि कपडे बदलले आणि सोफ्यावर येऊन आडवा झाला.. त्याच्या अंगात त्राण च न्हवते शिल्लक.. तो तसा येऊन बसलाय हे बघून स्नेहल ने अजून एकदा त्याचा ताप चेक केला.. त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून ती पुन्हा किचन मध्ये गेली.. राहुल ला स्वयंपाक यायचा पण तो जास्त करून वेस्टर्न च गोष्टी करायचा.. ज्यात त्याला फार काही करायला लागणार नाही आणि एकदा बेक करायला ठेवलं कि तासाभरात जेवण तयार होईल.. तिने पाहिलं कि त्याच्या कडे पास्ता होता आणि बाकी बरेच spices होत्या.. तिने मानवी ला बनवताना तर खूप वेळा पाहिलं होत पण स्वतः काही करायच्या नावाने बोंब च होती मॅडमची.. तिने एकवेळ बाहेरून मागवावे का असा विचार पण केला पण ती स्वतः हॉटेल बिझिनेस मध्ये असल्यामुळे तिला स्वतःलाच ते रास्त वाटेना.. शेवटी तिने सूप करायचं ठरवलं.. इंटरनेट वर बघून रेसिपी नुसार सगळे पदार्थ बाहेर काढून तिने करायला सुरुवात केली.. तिचा किचन मधल्या खाटखूट करण्याने राहुलला झोप लागलेली ती मोडली.. तिच्या जवळ येत त्याने तिला हाक मारली.. तशी ती जवळ येत त्याच्या कपाळाला हात लावत म्हणाली..

"अरे कशाला उठल्यास? ताप आहे अजूनही अंगात तुझ्या.. "

"नको ग काळजी करुस.. आहे आता मी ठीक.. पण तू इथे कशी काय आलीस?"

"मी कॉल केला तर त्या टॅक्सी ड्राईव्हर ने उचलला.. त्यांनी च सांगितलं कि तुझी तब्येत बारी नाहीये त्यामुळे मी आले.. "

"हम्म.. सॉरी मी आज तुला भेटायला येऊ शकलो नाही.. "

"ठीके रे.. सूप होत च आलंय.. जा सोफ्यावर पड थोड्यावेळ.. मी आणतेच हे.. "

"तू खूप वेळ वाट पाहिलीस ना ग ? सॉरी मी असा अचानक आजारी पडलो..पण तू कशासाठी बोलावलेलं आज मला? " तो हे सगळं बोलत होता तरी त्याच्या अंगात त्राण नाहीयेत हे तिला कळत होत.. शेवटी तिनेच त्याच्या हाताला धरून त्याला सोफ्यावर नेऊन बसवलं आणि झोपवलं  आणि म्हणाली..

"ठीके म्हणाले ना मी.. झोप बरं तू थोड्यावेळ.. आणि तू मला त्या दिवशी दिलेलं जॅकेट मला परत द्यायचं होत म्हणून मी बोलावलेलं.. " प्रत्यक्षात स्नेहल ने हे जॅकेट त्याला शेवटचं भेटून द्यायचं आणि पुन्हा काही कारण काढून भेटायची वेळ च येऊ नये म्हणून रवी ची भेट घालून देताना बरोबर आणलं होत.. आत्ता घाईघाईत ते ती तिच्या बरोबर घेऊन आली होती.. आता तिला तेच कारण बरं झालं होत सांगायला.. त्याची एवढी बिघडलेली तब्येत बघून तो विषय आत्ता काढणं बरोबर नाही असच तिला वाटलं.. तीच शेवटचं वाक्य ऐकून तो हसून म्हणाला..

"त्या एका जॅकेट शिवाय माझं काही अडलं न्हवत ग.. मी तुला तेव्हाच म्हणालेलो ना कि निवांत दे म्हणून.. " त्याच्या डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवत ती म्हणाली..

"पण दुसऱ्याची उसनी घेतलेली वस्तू मी इतके दिवस कधीच स्वतः जवळ ठेवली नाही ना.. त्यामुळे.. " तीच वाक्य ऐकून तिला स्वतःलाच असं वाटलं कि मानवी चा हक्क आहे याच्यावर माझा नाही.. पण तिचा तसं उत्तर ऐकून राहुल मात्र क्षीण हसला आणि त्याने डोळे मिटले.. आणि स्नेहल पुन्हा सूप बनवायला किचन मध्ये गेली..

*****

इकडे मानवी ने खिचडी बनवून पॅक करून पण ठेवली होती पण तीच अजून सुद्धा जावं कि नाही यावरच गोंधळ चालू होता.. ती स्वतःशीच बोलत होती..

"त्याला नक्की थंडी तर वाजून आली होती.. त्याने औषध घेतलं असेल का? पण मी हे सगळं घेऊन त्याच्या फ्लॅट वर जाण म्हणजे जरा अतीच होईल, नाही का? मग असं करू का खाली गार्ड ना सांगेन कि डबा पोहोचून द्या म्हणून.. पण असं केलं आणि त्याने दारच नाही उघडलं तर तो गार्ड च खाईल डबा.. नाहीतर मग असं करते.. dunzo सारखी कुठली ऍप सर्विस आहे का बघते.. ते नेऊन देतील.. " तीच हे असलं विचार मंथन चालू होत इतक्यात तिचा फोन वाजला..

"हॅलो.. रवी सर बोला.. "

"सर काय ग? ऑफिस सुटलं ना आपलं? आता मी भाऊ आहे ना ऑफिस च्या बाहेर?" रवी त्याच्या हॉटेल रूम मध्ये खिडकीत बसून तिच्याशी फोनवर बोलत होता.. "माझी धाकटी बहीण काय करतीये हे विचारायला फोन केला मी.. मस्त पाऊस पडतोय तर manchow soup आणि तुला आवडत असेल तर चिकन लॉलीपॉप खायला जाऊया का हे विचारायला फोन केला ग तुझ्या दादानि.. "

"पण मला आत्ता एका गोष्टीची काळजी लागून राहिलीये.. I have to take care of it.." एकदम १ कल्पना तिला सुचली आणि ती म्हणाली.. "ओह.. दादा.. मी तुम्हाला १ विचारू का ? मला १ favor.. नाही.. काही नाही.. "

"ए असं काय आहे कि तू सांगता सांगता थांबलीस अशी? माझ्याशी काय नाही share करू शकत तू??सांग ना.. काही काम आहे का?"

"ते actually राहुल पावसात खूप वेळ मघाशी भिजला तर त्याला मी केलेली खिचडीही आणि औषध नेऊन द्यायची होती.. " तिचं बोलणं ऐकलं आणि रवी ला हसू आवरलं नाही.. आणि त्याच अचानक हसणं ऐकून तिला आलं लक्षात कि ह्याला आता हिची चेष्टा सुचतिये.. तशी तीच पुढे म्हणाली..

"मी काय म्हणत होते ते विसरून जा.. माझी मी जाईन.. " तिने एवढं बोलून कॉल कट केला..

तसा खिडकीतून उठत रवी फोन कडे बघत स्वतःशीच म्हणाला.. "आली मोठी त्याला डबा आणि औषध नेऊन देणारी.. समोर आला तो तर बोलता तर येत नाही हिला.. पहिलं प्रेम म्हणे..ती तिथे गेली तरी काही चांगलं बोलेल तो तिच्याशी असं मला वाटत नाही.. माझ्याबरोबर चायनीज खायला आली असती तर किती छान झालं असत.. " तिने गोड बोलून कॉल कट केला असला तरी तिला राग आला असणार हे त्याला माहिती होत.. त्याला पण १ आयडिया सुचली.. तिला पुन्हा फोन लावून तो म्हणाला..

"हॅलो.. "

"हॅलो वगैरे सोड.. तुला हि माहितीये कि मी काय डिलिव्हरी बॉय नाही आणि कुठल्या पेशन्ट ची काळजी घ्यायला पण मला आवडत नाही पण मला आज request कुणी केली हे सगळं करायची? माझ्या बहिणीने.. तर मी विचार करत होतो कि तुझ्या साठी मी खिचडी घेऊन जाऊ शकतो राहुल कडे.. "

"काय? खरंच ?थँक्यू रवी सर.. I mean दादा.. "

"जर का तू एवढीच ग्रेटफूल असशील तर तू दादा साठी काय करणार मग मी हे काम केल्या बद्दल?"

मानवीच्या चेहऱ्यावर जी आनंदाची स्माईल आली होती ती गेली.. तिने विचार केला.. बरोबर आहे मला वाटलंच कसं कि हा फुकट काम करून देईल काही म्हणून.. "काय?"

"काय काय काय? give and take असतं माझ्या कडे.. मी हे काम केलं तर तुला माझ्या ३ requests future मध्ये पूर्ण कराव्या लागतील.. डील?"

"काय? पण ३ का करायच्या मी? तुम्ही तर माझी हि १ च request पूर्ण करताय.. "

"तुला नको असेल तर राहूदे.. माझी काही हरकत नाही.. मी ठेवतो मग फोन ओके?"

"ओके ओके ओके.. डील.. मी तुमच्या ३ requests future मध्ये पूर्ण करेन काही झालं तरी.. आता तर ठीके?"

"हे तू आत्ता म्हणशील पण त्या दिवशी तू मला वडापाव वर कटवलस तसं केलंस तर? ते काही नाही.. माझ्या मागे म्हण.. 'मी मानवी कुलकर्णी, रवी ला प्रॉमिस करते कि मी त्याच्या ३ requests पूर्ण करेन काही झालं तरी.. " आणि त्याने कॉल रेकॉर्ड च बटन दाबलं..

"हे काय सर प्रतिज्ञा घेतल्या सारखं म्हणायला लावताय तुम्ही..?!" तिला त्याच्या बालिशपणाचं थोडं हसू पण यायला लागलं होत.. तीच तसं हसून बोललेलं ऐकून तो पण खोट खोटं हसला आणि म्हणाला "मी ठेवतो मग.. " तशी ती पटकन म्हणाली.. "मी मानवी कुलकर्णी, रवी ला प्रॉमिस करते कि मी त्याच्या ३ requests पूर्ण करेन काही झालं तरी.. खुश आता?"

"खूप खुश.. चल मग खिचडी पॅक करून तयार ठेव मी येतोच घ्यायला.. ऍड्रेस पाठव आणि मला तुझा.. " तो हसून म्हटला..

************

क्रमशः

************

🎭 Series Post

View all