Oct 24, 2021
कथामालिका

माझी मानवी... 31

Read Later
माझी मानवी... 31

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मानवी आणि स्नेहल गेल्यावर मानवीच्या आईने स्नेहल च्या आईला मेसेज केला.. स्नेहल, मानवी, मेधा असा तिघींचा फोटो त्यांनी काढला होता.. तो पण मेसेज मध्ये पाठवत त्यांनी लिहिले..

"स्नेहल अजून सुंदर झालीये ना? तुझी लेक शोभते बघ अगदी.. कधी कधी तर ती इतकी तुझ्या सारखी दिसते कि मी सुद्धा फसते.. तू कशी आहेस? ठीक आहेस ना? I miss you.. मी तुला कळवत राहेनच.."

त्यांनी मेसेज सेंड केल्यावर त्या बऱ्याच वेळ आपल्या लेकींचे फोटो पाहत बसल्या होत्या..

 

******

 

मानवी वर गेली तिने तिचा PC चालू केला आणि रिया च्या डेस्क वरून पेन ड्राईव्ह घेऊन त्यातल्या फाइल्स तिने तिला ई-मेल केल्या.. तिने तिला फाइल्स पाठवल्या आहे म्हणून फोन केला मात्र काम झालंय हे बघून रिया ने थँक्यू पण न म्हणता कॉल ठेवून दिला.. मानवी तिच्या फोन कडे पाहत म्हणाली.. "हि मुलगी मला आवडतच नाही.. "

ती उठली मात्र तिला राहुल च्या केबिन मधली light चालूच दिसली.. "ओह.. त्या दिवशी घाईघाईत लाईट तशीच चालू ठेवून गेला कि काय हा? किती absent minded असावं एखादयाने.. " असं स्वतःशीच बोलत ती त्याच्या केबिन मधली लाईट बंद करायला गेली..

ती लाईट बंद करणार इतक्यात तिला त्याच्या टेबल वर तो छोटासा रिमोट दिसला.. तो बघून ती त्याच्या टेबल वरून तो रिमोट घेऊन स्वतःशीच बोलली..

"हाच रिमोट घेऊन तो हि काच ट्रान्स्परन्ट आणि वाटेल तेव्हा व्हाईट करतो ना?" तिने रिमोट च ते बटन दाबून पाहिलं आणि ती काच व्हाईट झाली आणि बाहेर च दिसायचं बंद झालं.. तिला मजा वाटली तिने पुन्हा २-३ वेळा ते चालू बंद केलं.. "wow.. so cool.. " तिने रिमोट ठेवला आणि टेबल वर तिला त्याच डिजिटल क्लॉक दिसलं.. तस तिला आता अजून थोडं खेळायचा मोह आवरला नाही.. त्याच्या खुर्चीवर बसत तिने ते डिजिटल क्लॉक टेबल वर तो आपटतो तस आपटलं आणि म्हणाली.. "हे काम ४ मिनिटांच्या आत झालं पाहिजे.. I don't like wasting my time on useless things.." खुर्चीवर मागे रेलून बसत ती म्हणाली.. "ओह.. कुशन पण कसलं छान आहे या खुर्चीच.. माकड कुठचा.. पण खरंच.. He did become successful.." मानवी हसली आणि खुर्ची वरून उभी राहिली.. तिला कोपऱ्यात उभे करून ठेवलेलं १ Mannequin दिसलं.. त्या Mannequinचे हात वर खाली हलतायेत हे बघून तिला मजा वाटली.. "हे पण आहे याच्या ऑफिस मध्ये?" अचानक तिला शोले मधला dialogआठवला.. तसे त्या Mannequin चे हात हातात घेऊन ती म्हणायला लागली..

"ये हात मुझे दे दे ठाकूर.. नाय.. ये हात मुझे दे दे..  नाय.. ओह शीट.. " एक हात खरच तिच्या हातात आला.. तिने तस इकडे तिकडे बघत ते पुन्हा आत बसतंय का हे पाहत होती इतक्यात तिला राहुल चा फोन वर बोलायचा आवाज ऐकू आला..

 

****

 

मानवी वर ऑफिस मध्ये गेली तोवर स्नेहल तिच्या फोन मध्ये आज काढलेले फोटो पाहत गाडीत बसली होती.. इतक्यात तिला राहुल समोरून रोड क्रॉस करून येताना दिसला.. त्याला पाहून स्नेहलने पटकन डोकं steering व्हील च्या वर ठेवलं जेणेकरून त्याला ती दिसू नये.. पण राहुल च लक्ष च न्हवत.. त्याच्या हातात कॉफी होती आणि तो ऑफिस कडे गेला.. त्याचा फॉर्मल ऑउटफिट बघून स्नेहल च्या लक्षात आलं हा आजही काम करतोय ते.. पण तिच्या हे हि लक्षात आलं कि मानवी बराच वेळ झाला वर गेलीये.. ती यायला आणि हा आत जायला एकच गाठ नको पडायला.. नाहीतर गडबड करेल पुन्हा ती.. स्नेहल ने कार थोडी लांब नेऊन लावायची ठरवली.. जिथून गाडी पण पटकन कुणाच्या नजरेत येणार नाही.. गाडी चालवताना मात्र १ च विचार होता तिच्या डोक्यात..

"त्या दिवशी पार्क मध्ये मला खेळायला घेऊन गेला राहुल पण आज सुट्टीच्या दिवशी पण काम करायला आलाय.. अक्ख्या ऑफिस मध्ये इतक्या रात्री पर्यंत कोण काम करत असणारे? खरच याचे कुणी फ्रेंड्स नाहीत का मानवी शिवाय इकडे भारतात? इतका एकटा आहे का हा?"

 

*****

 

राहुल फोन वर बोलत बोलत आत आला.. तोवर मानवी घाबरून त्याच्या डेस्क च्या शेजारी १ कपाट होत त्यात लपून बसली त्या Mannequin चा हात पण ती आत मध्ये घेऊन बसली..घाबरून तिने दातावर दात आपटून आवाज करायला सुरुवात केली होती.. राहुल फोन वर बोलत होता..

"येस.. speaking.. yes i understand..  absolutely not.. I will do everything to reach that score.. Face India will not be a ceasing publication after 3 months..yes, alright.."

मानवी तोंडावर हात ठेवून त्याच बोलणं ऐकत होती.. इकडे राहुल डोकं हातात धरून बसला.. त्याने १ उसासा सोडला.. आणि कपाट उघडून त्याने त्यातलं त्याच जॅकेट हँगर वरून काढून घेतलं.. कपाटाच्या मध्ये पार्टीशन होत आणि पलीकडच्या साईड ला मानवी लपून बसली होती. त्याने जॅकेट काढलं आणि दार बंद केलं.. त्याने दार बंद केलं तसा मानवीचा जीव भांड्यात पडला.. त्याने जॅकेट घातलं आणि तिच्या साईड च दार एकदम उघडलं.. तशी घाबरून मानवी ओरडली.. आणि तिच्या हातातला Mannequin चा हात तिने त्याच्या कडे फेकला.. त्याने तो catch केला.. मानवीचा हात तोंडावर होता.. त्याने तिच्या कडे पाहिलं.. आणि म्हणाला..

"आता तुला बरंच काही सांगायचं असेल? speak.. "

"सर.. ते मी.. मी आले होते to get some work done..पण इथली light चालू होती.. मला तुम्ही ऑफिस मध्ये होता तेच माहित न्हवत.. आणि मी ते Mannequin.. आह.. द्या सर मी ते Mannequin  चा हात बसवते.." तिने तो हात त्याच्या हातातून घेऊन बसवू लागली.. पण तिला काय ते जमेना.. तिचा गोंधळ पाहून ते तिच्या हातातून काढून घेतलं आणि म्हणाला..

"Never mind.. तू माझ्या.. मी फोन वर जे बोललो त्यातलं तू किती ऐकलं? किती समजलं तुला?"

"ओह.. ते.. फेस बंद पडू शकत ते का?" राहुल नि १ उसासा सोडला आणि तिच्या जवळ येत म्हणाला..

"इंटर्न आता मी जे बोलतोय ते नीट लक्ष देऊन ऐक.. जर का टीम मधल्या कुणालाही हि गोष्ट कळाली तर मी समजेन कि ती तुझ्या कडूनच कळाली आहे.. मी तुला responsible पकडेन.. "

"काय? का?"

"जर का तू कुणाला सांगत सुटली नाहीस तर तस काही होणार नाही.. सो.. to put it simply, keep your mouth shut..understand?"

" yes sir..understood.." असं म्हणून ती तिथून पळून गेली.. तिला जाताना बघून राहुल तिला पळताना बघत होता.. ती तशी घाईगडबडीत पळून जाताना तिने घातलेल्या हुडीच्या खिशातून १ गोष्ट पडली.. ज्याच्यावर राहुल चे लक्ष गेले तर तिथेच तिचे भांडे फुटणार होते.. तो पझल चा पीस..

 

*****

 

ज्या पद्धतीने मानवी पळत बाहेर आली त्यावरूनच स्नेहल ला समजलं कि काहीतरी राहुल बोललेला दिसतोय.. स्नेहल ने विचारलं पण कि काय झालं.. पण मानवी फक्त म्हणाली, "काही नाही ग.. राहुल आखडू नि पुन्हा रविवारची का आलीस म्हणून झापलं.. " पण actually मानवी आता विचार करत होती कि राहुल एवढा स्ट्रेस मध्ये असतो.. त्याला हेच कारण असावं.. एवढी मोठी गोष्ट कुणाला सांगायची नाही म्हटल्यावर जबाबदारीच ओझं तर येणारच ना.. हा रविवारी पण येऊन काम करत होता.. या स्ट्रेस मुळेच त्याची चिडचिड पण होत असणारे.. पण तरी हा पुन्हा अमेरिकेला जाऊ शकतोच ना.. याला tension घ्यायची काय गरज आहे एवढी.. ती असाच विचार करत होती.. तिला विचारात एवढं गढलेलं बघून स्नेहल म्हणाली..

"बायको मी तुला घरी सोडून जिम ला जाते.. मला कॅलरीज च्या भीतीने नाहीतर झोप लागायची नाही.. तस पण जेवून १ तास होऊन गेलाय.. आता जिम ला जायला हरकत नाही.. " तशी मानवी म्हणाली..

"जायलाच हवं का आज? १ दिवस ब्रेक घे ना.. " पण पुन्हा स्नेहल चा चेहरा बघून ती म्हणाली..

"ठीके जा.. पण आता मला सोडायला येऊ नको.. मी इथून बस ने जाते.."

"ए तस नको.. मी सोडते तुला घरी.. "

"अग उलट पुन्हा कशाला इकडे येतेस? मी जाते ना.. तस पण मी थोडी चालत जैन म्हणजे माझं पण पचेल.. "

"बरं ठीके.. " शेवटी मानवी बस नि गेली आणि स्नेहल जिम ला गेली.. जिम च्या तिथल्या लॉकर मध्ये पण स्नेहल ने जिम चा १ कपड्यांचा सेट ठेवला होता.. तिने जाऊन चेंज केला आणि तिचं workout करायला गेली.. आज आपण खूप खाल्लंय एवढंच घोकत मॅडम नि इतका व्यायाम केला कि तिच्या पोटात दुखायला लागलं.. तस तिथल्या एका बेंच वर बसत ती स्वतःलाच म्हणाली.. "i think i overdid it " ती बसून पाणी पीत च होती इतक्यात राहुल आला.. तिला असं साईड ला बसलेलं बघून तो म्हणाला..

"ओह.. मानवी? hi.. " त्याला तिथे बघून ती गडबडली.. हा तर काम करत होता.. इतका उशिरा पर्यंत काम करून हा पुन्हा इथे जिम ला पण आलाय? तिने हळू आवाजात म्हटलं..

"hi.. "

"तुझी झाली एक्सरसाईझ करून? मला माहिती असत तर मी तुझ्या वेळात आलो असतो.. " तसा थोडा विचार करून स्नेहल म्हणाली..

"नाही रे.. अगदी वेळेत भेटलास तू.. मी फक्त stretching च करत होते.. मी पण जस्ट आलीये.. चल करूयात एकत्रच workout.. "

"ओह.. ग्रेट.. " असं म्हणून राहुल आत गेला आणि स्नेहल पाय ओढत त्याच्या मागे गेली.. त्या नंतर चा १ तास स्नेहल बिचारी जीव खाऊन व्यायाम करत राहिली.. ट्रेड मिल वरून सायकल वर ते झालं कि अजून दुसऱ्या equipment वर.. राहुल बरोबर ती पण त्याच्या मागे जाऊन करत होती.. पण आता मात्र तिची हालत खराब झाली होती.. आधीच तिने जास्त केला होता व्यायाम त्यात हा डबल करावा लागलेला.. त्यामुळे ती अगदी थकून गेली होती.. तिला खरतर राहुल सुट्टीच्या दिवशी पण काम करतोय, न जेवता कॉफी वर रात्री पण काम करतोय आणि कशाहीपेक्षा तो एकटा आहे हे तिला जाणवले होते त्यामुळे तासाभराची का होईना त्याला आपण कंपनी देऊया असा विचार करून ती थांबली होती.. तिच्या एकटेपणात त्याने साथ दिलेली होती तर आपण पण अशी परतफेड करू असं वाटून तिने हा मार्ग अवलंबला पण आता तर तिच्याच्याने पाय उचलला जात न्हवता.. जिम झाल्यावर फ्रेश होऊन कपडे चेंज करून ते बाहेर पडले तसा राहुल न राहून म्हणालाच..

"तू खूप दमलेली दिसतियेस आज.. वीकएंड ला आराम नाही केलास का काही?"

"असं काही नाही रे.. उलट exercising नंतर फ्रेश वाटतंय मला.. " ती तशी म्हणाली पण तिने जांभई दिली.. ते पाहून त्याला हसू आवरलं नाही.. तिनेच तरी विचारलं.. "तू गाडी कुठे पार्क केलीस?"

"अग मी गाडी घरी ठेवून आलो?"

"म्हणजे? तू इतक्या लांब कसा आला?" तिला माहिती होत कि हा ऑफिस मधून आलाय पण घरातून ऑफिस ला हा गाडी शिवाय कसा काय आला ते कळालं नाही.. पण ते तिला डायरेक्ट विचारता येणार न्हवत.. म्हणून तिने असं विचारलं..

"टॅक्सी नि.. आज गाडी क्लीन करायला दिलेली, बरेच दिवस न्हवती दिली ना.. "

"ओह.. मग चल मी तुला सोडते.. "

"काही गरज नाही.. आज राहूदे.. खूप दमलेली दिसतियेस आज.. "

"आता हे काय रे नवीन? मी संगतीये ना मी नाही दामले म्हणून.. चल मी सोडते.. इथून किती लांब आहे?"

"मला किलोमीटर मध्ये माहिती नाही किती लांब आहे.. "

"मुंबई मध्ये किलोमीटर नाही वेळेत सांगायचं असत किती लांब आहे ते.. किती वेळात पोहोचतो तू?" राहुल हसून म्हणाला..

"असं का आजीबाई.. १५ मिनटात पोहोचतो मी.. "

"चल मग.. इतक्या जवळ आहे ते तर.. "

ती निघणार इतक्यात राहुल तिला थांबवून म्हणाला.. "१ मिनिट.. तुझ्या गालावर.. इथे १ पापणी पडलीये.. "

"इथे?" स्नेहल डोळ्याच्या आजू बाजूने हाताने झटकत विचारत होती.. " नाही थोडं अजून बाजूला.. " "इकडे?" तसा तो हसून म्हणाला.. "असं तर नाही सापडणार मी काढू?" स्नेहल नि होकारार्थी मान हलवली तसे त्याने ती पापणी काढली.. तो जवळ येऊन पापणी काढत असताना स्नेहल ची नजर नकळत खाली झुकली.. तिला कळेना कि एवढं धडधडण्यासारखं काय झालंय.. राहुल नि ती पापणी हातात घेत विचारलं..

"तुझी काही विश आहे?" "विश ?" तिने नकळून विचारले..

"तू जर का काही तुझी इच्छा मनापासून मागितली आणि पापणी अशी पालथ्या मनगटावर ठेवून फुंकली तर ती इच्छा पूर्ण होते.. i know it a superstition.. आणि आपण लहानपणी असं करायचो पण हे जरी childish असलं तरी.. You have nothing to lose.. Don't you have a wish?"

"well, I can't say.."

"ठीके मग मी करतो.. " असं म्हणून त्याने विश मागून पापणी फुंकली.. त्याला तस करताना स्नेहल नुसती पाहत होती.. तिला तस पाहताना पाहून तो हसून म्हणाला.. "माझी इच्छा पूर्ण झाली तर मी तुला ट्रीट देईन.. ओके? तू मला तुझी पापणी उधार दिलीस तर मी एवढं तर करूच शकतो नाही का?"

स्नेहल त्यावर नुसती हसली..

विशाल त्याच्या सायकल वरून तिथूनच पास होत होता.. त्याने राहुल आणि स्नेहल ला तसे एकमेकांच्या बरोबर हसताना पाहिले आणि तो स्वतःशीच म्हणाला..

"wow.. राहुल सरांची girlfriend दिसतीये.. कसली सुंदर आहे.. अगदी मॉडेल ला लाजवेल अशीच दिसतीये.. "

राहुल आणि स्नेहल पार्किंग लॉट कडे निघून गेले.. 

 

 

************

क्रमशः

 

************

 

मी तुम्हा सर्व वाचक वर्गाची मनापासून माफी मागते.. ऑफिस च्या डेडलाईन गाठताना लिखाण माझं पूर्णच मागे पडले.. पुढचा पार्ट लिहायला मला वेळ च मिळाला नाही.. त्यामुळे पोस्ट करायला उशीर झाला.. खूप जण माझ्या वर नाराज आहेत आणि खूप जणांना वाटले मी कथा लिहायची बंद च केली कि काय.. पण ऑफिस च्या कामामुळे घराकडे दुर्लक्ष झालं ओघाने सोशल मीडिया कडे पण.. त्यामुळे तुम्हा सगळ्यांशी संवाद साधावा तर खूप वाटत होता पण वेळ नाही मिळाला.. आजचा पार्ट म्हणून च लिहिला कि लगेच पोस्ट करतीये.. रोज लिहेन असं प्रॉमिस नाही करत आता पण रेग्युलरली पोस्ट करेन.. आजचा पार्ट आवडला कि नाही नक्की कळवा..

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..