माझी मानवी... 39

A story about love, friendship, kindness and relationships

राहुल मानवीच्या मागून चालत होता आणि त्याला तिने काल त्याच्या डोक्यावर सॅक धरली होती ते आठवलं.. पण त्याच बरोबर लहानपणी त्याच्या मानवीने जसे "मी नेहमी तुझ्या बरोबर असेल राहुल.. तू घाबरू नको हां.." असे म्हटले होते तसेच त्याला या इंटर्न मानवी च्या "You are safe with me.. ठीके.. सगळं ठीके.. तिकडे नका बघू.." असं बोलल्याने वाटले होते.. आणि काही झालं तरी त्याला ती भावना झटकता येत न्हवती.. आणि त्याला आता आठवलं कि आपण काल हिच्या गालाला हात लावून "मानवी" असं म्हणालो होतो.. ते आठवलं आणि त्याने स्वतःच अस्वस्थ होऊन घसा खाकरला.. त्याच्या आवाजाने मानवीने मागे वळून पाहिलं.. आणि "गुड मॉर्निंग सर" असं म्हटलं.. त्याला मात्र तिला फेस कसं करावं तेच कळत न्हवते.. तो इकडे तिकडे अवघडून बघत होता इतक्यात तिनेच पुढे विचारले..  

"तुम्हाला बरं वाटतंय ना आता सर?"

"हो.. आता.. आहे बरं.. " त्याच उत्तर ऐकल्यावर मानवी आत जायला निघाली तशी त्याने मागून हाक मारली..

"ए इंटर्न.. " तस मानवीने वळून त्याच्या कडे पाहत विचारलं..

"येस सर?"

"तू त्या रवी सरांना का सांगितलंस माझी काळजी घ्यायला? किती त्रास दिलाय त्यांनी मला सकाळपासून  माहितीये का तुला? त्या माणसामुळे माझा फ्लॅट म्हणजे कचरापेटी झालीये.." तो अशी तक्रार करत होता पण मानवीला आता जोरात शिंक येणार असं वाटायला लागलं होत.. ती त्याच ऐकत १-१ पाऊल मागे जात होती आणि राहुल ला वाटत होत कि मी बोलतोय आणि हि पळून चाललीये.. "इंटर्न इथे थांबून ऐक मी काय म्हणतोय ते.. " तो असं म्हटला मात्र मानवीच्या डोळ्यात पाणी जमा झालं होत.. त्याला कळेना इतकं रडायला येण्या सारखं काय झालंय.. तो पुढे काही बोलणार इतक्यात मानवी जोरात डोकं खाली घालून शिंकली.. आता त्याला कळालं कि तिला सर्दी झालीये कालच्या पावसाने.. तो फक्त "ब्लेस यू " म्हणाला.. त्याच्या कडे एकदा बघत मानवी आत मध्ये पळाली.. तिला तस पळत जाताना राहुल बघत होता इतक्यात रवी हळूच आवाज न करता त्याच्या मागे येऊन उभा राहिला.. तो पण राहुल कडे मानवीला आत पळत जाताना पाहत होता.. एकदम हळू आवाजात तो त्याच्या मागे उभा राहून म्हणाला.. "तुम्ही वर येण्यासाठी घाईत वर आला मग आत का नाही गेला अजून? तुम्ही मी यायची वाट पाहत थांबला होता का? "

तसा राहुल ने दचकून त्याच्याकडे पाहिलं आणि एकदम थंडपणे म्हणाला "ते कधीच श्यक्य नाही.. "

त्याला घाईनी आत जाताना बघून रवी स्वतःशीच खुश होऊन हसला आणि म्हणाला.. "जाम मजा येते राव याला पण पिडायला.. "

ऑफिस मध्ये सुरुवातीला तर मानवीला काही फार त्रास नाही झाला.. पण हळू हळू तिच्या शिंका वाढायला लागल्या तस विजय सरांनी जवळ येऊन विचारलं..

"मानवी सर्दी पडसं झालं काय तुला?" तिनी काही उत्तर द्यायच्या आत तिला जोरात शिंक आली तसे ते एकदम लांब गेले.. आणि बाकीच्यांना पण त्यांनी सांगितलं कि सगळ्यांनी मानवीचं viral infection होऊ त्यांना न द्यायची काळजी घ्या.. त्यांची ती reaction बघून रवी म्हणाला.. "सर तुम्ही पण जरा जास्तच सिरिअसली घेताय एवढं काय त्यात.. " पण जेव्हा मानवी त्याला एक फाईल नेऊन देताना शिंकली तसा तो पण म्हणाला.. "ए लांबून दे बाई.. इन्फेकशन नको व्हायला.. "तसे विजय सर हसून त्याला म्हणाले "आता का?" तसा तो सारवा सारव करत म्हणाला "ते मी USA मध्ये होतो ना आधी.. त्यामुळे मला थोडा जर्म फोबिया आहे.. " त्याच्या तशा बोलण्यावर कुत्सित पणे रिया म्हणाली.. "हो.. फक्त गाडयांवरच आणि टपरी वरच खायच्या वेळी नसतो तो फोबिया.. नाही का?"

त्या दोघांची तुतु मेंमें व्हायच्या आत विजय सर मध्ये पडून म्हणाले..

"मानवी personally घेऊ नको हां तू.. आपली डेड लाईन जवळ आलीये ना.. जर का तुझ्या मुळे चुकून जरी कुणी आजारी पडलं तर सुट्टी पण नाही घेता येणार कुणाला आणि सगळेच आजारी पडतील आणि आपल्याला महागात पडेल ते.. तर तू रुमाल नाहीतर काहीतरी बांध हां तोंडाला.."

त्यांचा उद्देश कळाला तशी मानवीने होकारार्थी मान हलवली आणि १ रुमाल घडी करून तोंडाला बांधला.. ती काम करत होती पण कुणाला काही नेऊन द्यायचं झालं कि सगळे त्या वस्तूवर अँटिबॅक्टरीअल स्प्रे मारत होते.. राहुल हा सगळा गोंधळ त्याच्या केबिन मधून बघत होता.. सगळे मानवी पासून लांब पळत होते त्याला मात्र आपल्यामुळे ती आजारी पडली याचीच guilt जास्त वाटत होती.. शेवटी सगळे ऑफिस मध्ये च होते तरी तो मेडिसिन्स घेऊन आला.. पण तिला द्यायचे कसे हा त्याला प्रश्न पडला होता.. तो तिच्या डेस्क वर नुसती औषध ठेवून जायचा विचार करत होता.. इतक्यात रवीने त्याची खुर्ची मागे ढकलून मानवीच्या डेस्क वर औषध ठेवली आणि म्हणाला.. "छोटी.. हि औषध घे वेळेवर.. ओके? आणि हा सर्जिकल मास्क पण लाव.. थांब.. मीच लावून देतो.. "असं म्हणून त्याने २ मास्क एकावर एक लावून दिले.. मानवीने विचारलं.. "हा मास्क कशा साठी ? मी रुमाल बांधला होता ना.. "

"शांत बसायचं आणि दादा च ऐकायचं कळालं? स्वतःला बरं वाटत नसताना तू दुसऱ्याची काळजी कशी घेणार?"

"ओके.. थँक्यू दादा.. " मानविला माहिती न्हवत पण बाहेरच्या मास्क वर रवीने मार्कर नि मिशा आणि मांजराचं नाक draw केलेला.. मानवी आता खूप फनि  दिसत होती.. पण हे सगळ्यांच्यासाठीच बेटर होत त्यामुळे कुणी तिला सांगायला गेलं नाही.. रवी आणि मानवीची हि सगळी बातचीत राहुल लांबून बघत होता.. त्याने तिच्यासाठी घेतलेली औषध त्याच्या हातातच राहिली..

रवीला तिची अशी काळजी घेताना बघून मानवी स्वतःशीच म्हणाली.. "जेव्हा पासून मी त्याला मोठा भाऊ मानलंय तेव्हापासून तो खरंच धाकट्या बहिणी सारखी माझी काळजी घेतो.."

राहुलने ती औषध त्याच्या केबिन मध्ये नेऊन ड्रॉवर मध्ये नेऊन ठेवली.. त्याला काही कामानिमित्ताने बाहेर जायचं होत.. तो निघाला होता इतक्यात त्याला स्नेहल चा फोन आला.. त्याने हसून फोन घेतला..

"हॅलो मानवी.. बोल ग.. "

"आता तुला बरं वाटतंय?"

"thanks to you.. हो.. खूप बरं आहे मला आता.. आणि कालच्या साठी सॉरी.. मी तुला वेळ देऊन भेटलो नाही.. उलट तुलाच माझी काळजी घ्यावी लागली.."

"आह.. सोड ते.. मी या साठी कॉल केला होता कि तुला तुमच्या तिथल्या सिग्नल च्या इथे १ रेस्टॉरंट आहे सूप स्टेशन म्हणून.. तुला माहितीये ते? तुला वेळ असेल तर लंच ला तिथे भेटूयात? मी जेव्हा केव्हा तिथे खाल्लंय माझी सर्दी पडसे अगदी पळून गेलंय बघ.. ट्राय करायचं तुला पण?" स्नेहल ला एव्हाना कळालं होत कि राहुल कामाच्या नादात खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो.. त्याला बरं नसताना तरी आपल्या नादाने तो खाईल असं वाटून तिने हा प्लॅन केला होता.. राहुल मानवीला नाही म्हणणं श्यक्यच न्हवतं.. तो पण लगेच म्हणाला..

"हो का? मग आज लंच ला भेटूयात तिथे.. तू मला खिचडी बनवली होतीस त्यामुळे हे जेवण माझ्याकडून.. ओके? मी येतो तुला घ्यायला लंच साठी.. " तशी जोरात स्नेहल ओरडून म्हणाली..

"नाही नाही.. नको.. नको म्हणजे तू माझ्या कामाच्या ठिकाणी येणं मला जरा.. You know what I mean.. "

"ओह.. if you insist.. नाही येत पण मग कसं करूया?"

"तिथेच भेटूयात डायरेक्ट?"

"हो चालेल.. "

"मग भेटू लंच ला.. बाय.. "

"बाय.. " म्हणून स्नेहल ने फोन ठेवला.. आणि इतक्या वेळ रोखून धरलेला तिचा श्वास सुटला.. कितीही नाही म्हटलं तरी तिला या लपवा लपवी चा त्रास तर होत होताच..

*****

स्नेहलला गाडी पार्क करायला जागा लांब मिळाली होती.. त्यामुळे ती चालतच त्या रेस्टॉरंट कडे चालली होती.. इतक्यात पावसाची जोरात सर आली म्हणून एका बिल्डिंग च्या एंट्रन्स ला इतर लोकांच्या सारखी आडोशाला ती थांबली.. आज आजूबाजूला सारे काही कालच्या पावसाने धुवून निघाल्याने स्वच्छ होते आणि जी काही झाडे होती ती पण हिरवीगार दिसत होती.. ते बघून तिला तीच लहानपण आठवलं.. जेव्हा तिची आई त्यांच्या बरोबर राहत होती..तेव्हा ती आणि तिची आई पावसात खूप मस्ती करायच्या.. तिच्या आईने तिला भिजायला कधीच अडवलं नाही कारण त्यांना स्वतःलाच इतकं आवडायचं भिजायला.. दोघी खूप भिजयच्या आणि नंतर तिची आई आणि ती गरम गरम भजी आणि आल्याचा चहा प्यायच्या.. तिला त्या आठवणींनी अजूनही हसायला आलं.. तिच्या नकळत ती तिचा हात पावसात नेऊन तो झेलत होती..

ती ज्या बिल्डिंग च्या आडोशाला थांबली होती, त्याच बिल्डिंग मध्ये राहुल च काम होत.. ते संपवून आता तो पण त्या रेस्टॉरंट ला जायला बाहेर पडला आणि त्याला पावसात खुश होऊन हात भिजवणारी  स्नेहल दिसली.. तो थोडा आश्चर्यचकित होऊन तिच्या कडे पाहत तिच्या जवळ आला.. आणि त्याने तिला hi केलं..

"ओह हाय मानवी.. "

"अरे तू इकडे?"

"हो.. माझं काम होत थोडं इथे.. " तो पावसाकडे बघत थोडा तक्रारीच्या सुरात म्हणाला..

"आज पण अचानक कसा काय पाऊस सुरु झाला..?"

"एवढं काय रे.. एखाद्या सरीने काय होत तेव्हा?" अजूनही तिचा हात पावसात भिजवत खुशीत ती म्हणाली.. आता त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आलं होत.. ते बघून तिनेच विचारलं.. "काय झालं? कसला विचार करतोयस?"

"नाही ग तस काही.. पण.. तुला तर पाऊस अजिबात आवडायचा नाही ना? You used to hate the rain.." त्याच्या प्रश्नावर स्नेहल ला कळालं तो काय म्हणतोय ते.. ती तिचा हात पावसातून काढून म्हणाली..

"अरे हो.. म्हणजे.. पूर्वी.. पूर्वी नाही आवडायचं मला पावसात भिजायला.. पण आता ठीके.. It's fine I guess.." त्याने पण समजल्या सारखी मान हलवली.. तशी तीच पुढे म्हणाली.. "निघुयात का आपण तुला काही प्रॉब्लेम नसला तर? तिथे पुन्हा गर्दी असेल लंच hour ची.. पाऊस थांबला तर नाहीये पण कमी आलाय.. तिकडे रोड क्रॉस करून जावं लागेल.. " त्याच्या डोक्यातले विचार झटकत तो म्हणाला..

"हो.. ठीके चल.. "

इतक्यात त्यांना जो रोड क्रॉस करायचा होता तिथला सिग्नल पण त्यांच्यासाठी ग्रीन झाला.. ते बघून स्नेहल म्हटली..

"ओह.. ते बघ ग्रीन झाला सिग्नल.. " तिची पर्स डोक्यावर घेऊन तिकडे पळत स्नेहल म्हटली.. मात्र राहुल अजूनही त्याच्या जागेवर खिळून तिच्या कडे बघत होता.. आणि त्याच्या डोक्यात तो लहान असताना मानवी बरोबर जे बोलला होता तेच घोळत होते..

 "तू नेहमी ग्रीन सिग्नल झाला कि गेट सेट गो का म्हणतेस?"

"ग्रीन म्हणजे गो ना.. म्हणून गेट सेट गो.. "

"मग रेड सिग्नल ला काय म्हणते?"

"काही नाही.. तिथे तर आपण उभे असतो ना!"

"पण.. it's a little weird.. असं नाही वाटत तुला?"

"माझी फॅमिली अशीच म्हणते.. सगळेच आम्ही असं म्हणतो.. मला आजवर त्यामुळे असं काही वाटलं नाही पण आता तू म्हटल्यावर जाणवलं.. actually थोडं weird आहे.. "

त्याला हि समोरची मानवी इतकी कशी बदलली हेच कळत न्हवते.. या मानवीला पावसापासून काही प्रॉब्लेम नाही.. ना हि ग्रीन सिग्नल ला गेट सेट गो म्हणाली.. इतक्या वर्षात माणूस बदलू शकतो पण इतका? तो आहे त्याच ठिकाणी तिला पळत जाताना पाहत होता.. तो आपल्याबरोबर नाही हे थोडं पुढं गेल्यावर स्नेहल ला कळालं तसं तिने मागे वळून त्याला विचारलं..

"येतोस ना?"

"हो हो.. " म्हणत राहुल पण तिच्या मागे रोड क्रॉस करायला धावला..

************

क्रमशः

*************

🎭 Series Post

View all