माझी मानवी... 35

A story about love, friendship, kindness and relationships

दुसऱ्या दिवशी तिच्या हॉटेल मधल्या cleaning स्टाफ ला नवे कोरे घेतलेले शूज त्या ब्रँडेड बॉक्स सकट कचऱ्याच्या पिशवीत सापडले.. तेव्हा चुकून कुणी टाकून दिले असतील कि काय असं वाटून त्यांनी कुणी मागायला आलं तर देता येतील असा विचार करून बाजूला नीट ठेवून दिले..रवी ऑफिस ला जायला हॉटेल मधून बाहेर पडतच होता इतक्यात त्याला धावत येऊन स्नेहल ने गाठले.. आणि म्हणाली..

"हॅलो.. गुड मॉर्निंग सर.. "

"ओह.. हाय.. मॉर्निंग.. "

"सर तुम्ही त्या दिवशी मला म्हणाला होतात कि कधी काही लागलं तर तुम्ही मला पण मदत कराल.. did you really mean it?"

"ओह.. हो.. त्या दिवशी ना.. हो म्हणालो होतो ना.. " स्नेहल चा सिरीयस झालेला चेहरा बघून तो म्हणाला.. "And I was serious.. काही काम आहे का?"

"हो.. महत्वाचं आहे.. i need a big favor from you.. कराल तुम्ही मदत? म्हणजे मी माझ्या साठी बनलेलं नाही त्याची हाव करणार नाही.. आणि उगाच रक्तबंबाळ होणार नाही.. "

"तरी काय करायचं आहे मी मदत म्हणून?" रवीने उत्सुकतेने विचारले..

"एका मुलाला भेटायचंय माझा होणारा नवरा म्हणून.. " तीच उत्तर ऐकून रवीचे डोळे विस्फारले तशी ती म्हणाली..

"तो त्रास देत नाहीये मला.. पण मला वाटतंय कि मी त्याच्यात गुंतत चाललीये.. म्हणून.. प्लीज काही प्रश्न विचारू नका.. माझ्या साठी हे खूप इम्पॉर्टन्ट आहे.. कराल मदत?" तिचा काकुळतीला आलेला चेहरा बघून तो म्हणाला..

"नक्की करेन.. हा माझा नंबर आहे.. save करून घ्या.. कॉल करा.. मी नक्की येईन सोबत.. " त्याचा नंबर घेत स्नेहल मनापासून म्हणाली..

"थँक्यू सो मच.. "

*****

ऑफिस मध्ये लंच आवर झाला होता.. सगळेच खाण्यासाठी एकत्र उठले.. एकदा हि वेळ टळून गेली कि नंतर कुणाला तसा वेळ मिळायचा नाही कामाच्या नादात खायला.. त्यामुळे जे ऑफिस मध्ये आहेत आणि जेवायला येऊ शकतात ते सगळेच लंच साठी एकत्र जायचे.. नाहीतर मग रवी सारखं कप नूडल्स नाहीतर सँडविच वर भागवायचे.. या टीम मध्ये काम करून मानवीला बरेच दिवस झाले होते पण त्यांच्या या लंच ला राहुल एकदाही आला न्हवता.. जी लोक कामानिमित्ताने बाहेर जायची ती पण कधी ना कधी लंच साठी तिच्या बरोबर जेवली होती.. पण राहुल कधीच नाही.. आज पण विजय सरांनी "चला जेवायला जाऊयात " म्हटलं कि सगळे एकत्र उठले.. सीमा मॅम ना खूप काम होत त्यामुळे त्या म्हणाल्या "मानवी येताना मला सँडविच घेऊन येशील?" "हो मॅम.. " म्हणत मानवीने राहुलच्या केबिन कडे पाहिलं.. त्याने काच त्याच्या केबिन ची व्हाईट केली होती.. नक्कीच कुठल्या तरी महत्वाच्या कॉल मध्ये असेल.. तरी आज ऑफिस मध्ये आहे तर विचारावं का म्हणून तिने बाकीच्यांच्या कडे पाहून विचारलं..

"सर.. ते.. राहुल सरांना पण बोलवायचं का?"

तशी रिया म्हणाली.. "कशाला ते? सुखाने तिथे तरी ४ घास खाऊ देत कि ग.. " तीच ऐकून विजय सर पण म्हणाले..

"मग नाहीतर काय.. त्यांचं डिजिटल क्लॉक आपटून तिथे पण म्हणायचे नाहीतर.. ४ मिनिटांच्यात आटपा.. उगाच अवघडून कशाला खायचं.. ?"

सगळ्यांचा तसा कल बघून मानवीचा चेहरा पडला.. तसं रवीने ओळखून तिला खुणावलं "असुदे ग.. चल.. " असं..

ते सगळे कॅन्टीन मध्ये गेले.. त्यांच्या टीम साठी त्यांनी आधीच १ भला मोठा लांबडा टेबल राखीव ठेवला होता.. जिथे बसून त्यांना जेवत जेवत एकमेकांशी गप्पा मारता यायच्या.. सगळे आपापलं डिश घेऊन आले.. रिया ने विशाल च्या शेजारची जागा पटकावली होती.. आणि तिच्या शेजारी रवी बसलेला.. रवीच्या समोर मानवी बसलेली..

सगळे काहीतरी कॅन्टीन मधून घेऊन खात होते तरी ज्यांनी डबा आणला होता त्यांचा पण सगळी कडे तो फिरत होता.. रिया विशाल च्या शेजारी बसून त्याला मशरूम च काहीतरी खायचा आग्रह करत होती आणि तो तिला मला नको असं म्हणत होता.. शेवटी हे बराच वेळ चाललेलं बघून विजय सर म्हणाले..

"त्याला नकोय तर मला दे.. "

"हो.. विजय सरांना दे.. मी मशरूम खात नाही.. "

रिया ने वैतागून विजय सरांना दिले.. पण तिचा चेहरा बघून ते म्हणाले.. "तुझी इच्छा न्हवती मला द्यायची कळालं मला.. पण तरी थँक्यू बरं का.. "

कसला निर्लज्ज माणूस आहे.. कळतंय तरी खातोय.. असा रिया विचार करत होती आणि विशाल ला दुसरं काही आणू का तुला खायला म्हणून विचारत होती.. त्या दोघांचा गोंधळ सगळे बघत गालात हसत होते.. एव्हाना सगळ्यांना थोडं फार तरी लक्षात आलंच होत कि रिया विशालच्या मागे लागलीये.. तरी कुणी काही त्यांना बोलत आणि चिडवत न्हवत.. हे सगळं चालू होत पण रवीच लक्ष मात्र मानवी कडे होत.. तिने पुलाव घेतला होता पण तीच खाण्याकडे लक्ष न्हवत.. तिच्या डोक्यात विचार चालू होते.. "राहुल नीट जेवत असा नाहीच नई? लंच च ठीके पण रात्री तरी जेवत असेल का? इथे त्याचे कुणी मित्र पण नाहीत कि कुणी त्याला जेवायला बरोबर चल म्हणेल.. कुणी बरोबर असेल खायला तर २ घास जास्त जातात.. "

फॅशन टीम मधली १ जण म्हणाली.. "आपलं फोटोशूट साठी आऊटडोअर च लोकेशन फिक्स झालं का हो विजय सर?"

"नाही.. राहुल सरांनी लोकेशन शोधायचं म्हणून सांगितलंय.."

"ओह.. आपण नेहमी जवळच्या कुठल्या तरी रिसॉर्ट वर च केलंय आऊटडोअर शूट म्हणून च विचारलं.. मग त्याच schedule कसं असणारे?"

"सीमा मॅम करतायेत ते search.. एकदा फिक्स झालं कि त्या सांगतील.. पण मोस्टली पुढच्या आठवड्यात जावं लागेल.. " विशाल नि सांगितलं.. आणि एकदम काही तरी आठवलं त्याला तसं तो म्हणाला.. "अरे.. तुम्हाला मी ब्रेकिंग न्यूज सांगितलीच नाही ना?"

"काय रे?" विशाल च्या न्युज नेहमी ब्रेकिंग च असायच्या आणि खूप प्रमाणात खऱ्या पण निघायच्या त्यामुळे सगळ्यांनीच कान टवकारले..

"राहुल सरांची गर्लफ्रेंड आहे हे तुम्हा कुणाला माहिती होत?"

"कसं माहिती होणार ते आपल्याला?" विजय सर म्हणाले..

"काय सांगतोस काय?" १ जण आश्चर्याने म्हणाली..

"इतक्या खडूस माणसाला कुणी डेट करायला तयार कसं झालं?" रिया कुत्सित हसून म्हणाली.. तसा विशाल म्हणाला..

"ते नाही माहिती.. पण खूप सुंदर होती.. एकदम हिरोईन च वाटत होती.."

इतका वेळ मानवी खात होती ते थांबली आणि सगळ्यांचं बोलणं ऐकू लागली.. तिला खाताना थांबलेल बघून रवी सगळ्यांना म्हणाला..

"काय करत होते ते ?"

"ती आपल्या ऑफिस शेजारीच health सेंटर आहे ना.. तिथे बाहेर बोलत उभे होते रविवारी.. बरीच रात्र झाली होती.. मी सायकलिंग करत जात होतो तेव्हा.. " विशालच बोलणं मध्ये तोडत रवी म्हणाला..

"बोलत उभे होते दोघे तर तू लगेच त्यांना गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड केलं होय? (शेजारी बसलेल्या रिया च्या जवळ सरकत पुढे तो म्हणाला) आता मी असा हिच्या जवळ सरकलो तर आम्ही काय कपल झालो का?" रिया वैतागत त्याला लांब ढकलत म्हणाली..

"तुम्ही मला कशाला use करताय example म्हणून?"

"तू कशाला सिरीयस होतियेस मग?" रवी म्हणाला..  

त्यावर विजय सर म्हणाले.. "तुम्ही दोघे एकत्र छान दिसता  हां.. दोघे पण थोडे वेडेच आहात.." मघाशी रिया ने मशरूम देताना केलेला चेहरा न विसरून विजय सर मुद्दाम तिला चिडवायला म्हणाले.. रवी नुसता हसला आणि रिया नि त्याला वर खाली बघत डोळे फिरवले.. आता मात्र विशाल पण हसत होता.. तो विजय सरांना म्हणाला.. "तुम्ही तर कुणा  बरोबर पण छान दिसाल सर.. " त्याची मस्का मारायची style बघून सगळे हसले..

पण ह्या सगळ्या मध्ये मानवीचा मूड न्हवता.. तिने एकदाही कशा मध्ये इंटरेस्ट दाखवला नाही.. तिच्या कडे फक्त रवी च लक्ष होत.. रवीने रिया बरोबर केलेली चेष्टा मात्र कामी आली होती.. मानवी पुन्हा जेवत होती.. पण तिचा चेहरा अजूनही विचारात पडलेलाच दिसत होता..

*****

राहुल ऑफिस च्या लायब्ररी मध्ये कॉफी घेऊन काही काम करत होता.. इतक्यात त्याचा फोन व्हायब्रेट झाला.. कॉलर आयडी वरचं नाव बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली..  त्याने बाहेर जाऊन कॉल घेतला..

"हां.. मानवी बोल ग.. कशी आठवण काढलीस?"

"तुला आज रात्री वेळ आहे?"

"उम्म्म.. आज?"

"नसला वेळ तर आज माझ्या साठी वेळ काढशील प्लीज?"

"ओह.. हो.. ठीके.. मी तुला थोड्या वेळाने कॉल करून सांगतो वेळ.. चालेल?"

"हो.. चालेल.. "

*****

मानवीने तीच जेवण झाल्यावर कॅन्टीन मध्ये पाहिलं तर सँडविच आज available न्हवत.. सीमा मॅम साठी सँडविच घ्यायला ती जवळच्या subway मध्ये गेली.. आणि काहीतरी ठरवून तिने २ मिल ऑफ द डे ऑर्डर केले..  ऑफिस मध्ये आल्यावर तिने सीमा मॅम ना १ मिल दिले आणि दुसरे ती राहुलच्या केबिन मध्ये त्याच्या डेस्क वर व्यवस्थित मांडून आली.. त्या मिल मधलं ड्रिंक मध्ये बर्फ होता तर ती त्याच्या खाली कोस्टर ठेवून तो चिडणार नाही असं सगळं ट्रे मध्ये ठेवून आली.. २ मिनिटांच्या साठी तिला वाटलं कि त्याला नोट लिहावी कि प्लीज खा हे म्हणून पण पुन्हा तिने लिहिलीये हे कळालं तर खाणार नाही असं वाटून तिने फक्त तो ट्रे ठेवला आणि तिच्या जागेवर येऊन काम करू लागली..

*****

रिया तिच्या मैत्रिणीशी लिफ्ट च्या तिथल्या पॅसेज मध्ये फोनवर बोलत उभी होती..

"आपल्या शाळेचं reunion आहे? हम्म.. मला नाही ग जमणार.. खूप काम आहे.. " तिची मैत्रीण खूपच आग्रह करत होती तसे तिनी विचारले.. "तुला अर्णव येणारे हे माहितीये का ग? खरंच ? ओह.. तरीच तू इतकी excited आहेस? ओके मग मी नक्की येते.. काम? आग आमच्या ऑफिस मध्ये १ इंटर्न लागलीये कामाला.. ती मी १ फोन केला तरी रविवारी पण ऑफिस मध्ये येऊन माझं काम करून गेलेली.. तिच्याच गळ्यात मारणार मी हे पण काम.. हो ना.. मग भेटूया reunion मध्ये.. ओके.. बाय.. "

तीन फोन ठेवून ऑफिस मध्ये गेली पण तिला हे माहिती न्हवतं कि राहुल लायब्ररी मधून आलेला तेव्हा तिथेच कॉर्नर ला उभा राहून तीच सगळं बोलणं ऐकत होता.. तो पण तिच्या पाठोपाठ ऑफिस मध्ये आला.. रिया तिच्या जागेवर बसून कामाला लागली होती.. त्याने  तिच्या कडे १ नजर टाकली.. आणि मानवीच्या जागेवर त्याची नजर गेली.. मात्र मानवी तिच्या जागी न्हवती.. ती त्याच्या केबिन मधूनच बाहेर पडत होती.. तीच त्याच्या कडे लक्ष न्हवतं.. ती तिच्या जागेवर जाऊन बसली तसा राहुल त्याच्या केबिन मध्ये गेला.. आणि त्याच्या नजरेला टेबल वर व्यवस्थित मांडून ठेवलेलं सँडविच, कूकी आणि १ ड्रिंक ठेवलेलं दिसलं.. तो त्याच्या जागेवर जाऊन बसला.. त्याने न मागता सुद्धा त्याच्या काळजीने सगळं व्यवस्थित मांडून ठेवलेलं ते पाहून त्याची नजर त्याच्या केबिन च्या काचेतून मानवी कडे गेली.. हे तिनेच आणलं असणार हे त्याला का कुणास ठाऊक पण खात्रीने वाटलं..

रिया आता मानवीच्या  जवळ येऊन म्हणाली..

"मानवी मी तुला मेल केलेत काही.. त्याच categorization करायचंय.. आणि ते सगळं आजच complete करून हवंय.. तुला थोडं फास्ट करावं लागेल काम हे सांगायला आले मी.."

"ओह.. आजच करायचं हे सगळं?" मेल ओपन करत मानवीने विचारलं..

"हो.. एन्ड ऑफ द डे पूर्ण करायचंय.. "

"ओह.. ओके.. करते.. "

मानवीने पुन्हा तिच्या कामात डोकं घातलं, रिया ने ठरवल्या प्रमाणे मानवीच्या गळ्यात काम मारलेलं.. हे सगळं राहुल त्याच्या केबिन मधून पाहत होता.. त्याच्या केबिन च्या समोरची काचेची भिंत मानवीच्या डेस्क समोरच होती.. आज त्याच्या नजरेसमोर हि गोष्ट आली होती.. मानवीने सांगितले न्हवते पण रविवारी तिला कुणी ऑफिस मध्ये पाठवलेले हे पण त्याला कळाले.. तो या सगळ्याचा विचार करत मानवी कडे बघत होता.. आणि इतक्यात मानवीने तो केबिन मध्ये आलाय कि नाही हे बघायला डोकं वर केलं.. त्या दोघांची अचानक नजरानजर झाली तशी राहुल नि रिमोट च बटन दाबून घाबरून पटकन काच पांढरी केली.. त्याची ती reaction बघून मानवी स्वतःशीच म्हणाली.. "बरं मी काही नोट लिहून नाही आले जेवणाबरोबर.. नाहीतर खाणारच नाही.." आणि पुन्हा ती तिच्या कामाला लागली..

************

क्रमशः ..

************

🎭 Series Post

View all