Oct 24, 2021
कथामालिका

माझी मानवी... 38

Read Later
माझी मानवी... 38

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

स्नेहल ने सूप रेडी झाल्यावर एका मोठ्या बाउल मध्ये काढून घेतलं आणि बाकीची सगळं आवरून त्याला उठवायला म्हणून हाक मारली.. पण तो गाढ झोपला होता.. त्याच्या कपाळावर एकदा हात ठेवून तिने चेक केलं तर अजूनही थोडा ताप होता पण आता त्याला झोपेतून उठवणं तिला बरोबर वाटलं नाही.. त्याला औषध घ्यायच्या आधी खाल्लं तर पाहिजे.. मग तिने शेवटी सगळं एका ट्रे मध्ये झाकून डाईनिंग टेबल वर ठेवून दिलं आणि घरी जायला निघाली..

इकडे रवी पण मानवी कडून डबा आणि औषध घेऊन राहुलच्या अपार्टमेंट मध्ये आला.. त्याने लिफ्ट च कॉल बटन दाबलं.. लिफ्ट च दार उघडलं तर समोर स्नेहल होती.. दोघे पण एकमेकांच्या कडे बघून आश्चर्यचकित झाले..

"सर तुम्ही इकडे कसे?" स्नेहल नि विचारलं..

"मी माझ्या बॉस ला हे द्यायला आलोय.. पण मला मघाशी तिथे सोडून आलात तुम्ही मॅडम झालं काय होत ?" पिशवी कडे बोट दाखवत तो म्हणाला..

"सो सो सो सॉरी सर.. मी तुम्हाला सगळं निवांत हॉटेल वर भेटलो कि एक्सप्लेन करेन.. "

"ओके.. हॉटेल वर भेटू मग.. "

"ओके.. बाय.. "

"बाय.. " म्हणून त्याने लिफ्ट मध्ये दार बंद होऊ नये म्हणून १ पाय घालून उभा होता ते आत गेला.. राहुलच्या फ्लॅट वर जाऊन दारावर knock करत होता.. पण राहुल दार उघडत न्हवता.. बराच वेळ झाला होता त्याने हाका मारून पण पहिल्या.. आता हातातल्या डब्याच्या पिशवीकडे बघत रवी विचारात पडला.. त्याला काय करावं ते सुचत न्हवत, इतक्यात त्याला आठवलं कि ज्या दिवशी राहुल ला चढली होती तेव्हा त्याची किल्ली रवीच्याच कडे राहिली होती ती त्याने परत दिलीच न्हवती.. त्याने त्याच्या लेदर जॅकेट चा खिसा चेक केला तर त्याला राहुलच्या घराची किल्ली सापडली.. त्या किल्ली ने दार उघडताना तो विचार करत होता.. "काय माणूस आहे हा.. ह्याने एकदाही विचारलं नाही कि किल्ली कुणा जवळ आहे म्हणून ऑफिस मध्ये.. मानवी ला विचारलं असतं तर तिने नक्की सांगितलं असत मला.. ह्याच्या कडे नक्की  किल्ल्या किती आहेत कि याने विचारायची तसदी पण घेतली नाही.. "

रवी दार उघडून आत आला आणि त्याने हाक मारली.. "राहुल सर?" पण काही रिस्पॉन्स नाही बघून तो हॉल मध्ये आला.. हॉल मध्ये बघतो तर राहुल सोफ्यावर निपचित पडला होता.. त्याने खिचडीच्या डब्ब्याची पिशवी डाईनिंग टेबल वर ठेवली आणि त्याच्या जवळ गेला.. तो २ मिनटं त्याच्या शेजारी बसला इतक्यात त्याला समोर काचेच्या बरणीत पझल चे तुकडे भरून ठेवलेले दिसले.. ते बघून तो स्वतःशीच म्हणाला.. "ओह.. हे ते पझल होते ज्यातला तुकडा मानवी कडे आहे.. " झोपलेल्या राहुल कडे बघत तो म्हणाला.. "ओ राहुल सर.. हे बघा.. तुमचा खिचडीचा डब्बा टेबल वर ठेवलाय.. त्यात औषध पण आहेत ती घ्या.. " आणि जायला उठला.. पण राहुल ला तसं निपचित पडलेलं बघून त्याला पण बरोबर वाटेना तसेच जायला.. तो पुन्हा डाईनिंग टेबल कडे गेला आणि खिचडीचा डब्बा उघडून ते टेबल वर काढून ठेवू लागला.. इतक्यात त्याचे लक्ष स्नेहल ने करून ठेवलेल्या सूप कडे गेले.. तसा तो स्वतःशीच म्हणाला.."ह्या बाबाने काय सूप ऑर्डर केलं होत कि काय स्वतः साठी.." असं बोलत त्याने त्या बाउल वरच झाकण काढलं आणि कसल्याशा घाणेरडा वास त्याच्या नाकात शिरला.. तसा तोंड दाबत तो बाउल घेऊन तो बेसिन कडे पळाला..त्याला उलटी आल्या सारखं होत होत त्या वासाने.. तो स्वतःशीच म्हणाला.."शी.. किती दिवसांच्या पूर्वीच सूप आहे हे.. वासाने मला उलटी आली.. हे खाल्ल्याने डबल आजारी पडेल एखादा.. " त्याने ते सगळं सूप फेकून दिलं..  तो बाउल घासून त्यात मानवीने केलेली खिचडी त्याने भरून घेतली.. आणि चमचा घेऊन तो बाउल झाकून तो सोफ्याच्या इथल्या टीपॉय वर घेऊन आला.. राहुलच्या शेजारी बसून त्याने त्याच्या साईड ला तो ठेवून दिला आणि म्हणाला.."i guess उठल्यावर खाऊन घेईल हे आता.. " त्याच लक्ष राहुल कडे गेलं तर राहुल ची कपाळावर आलेली केस घामाने चिकटली होती.. त्याच्या कपाळावर हात ठेवत रवी ने चेक केलं तर त्याला त्याच अंग खूपच गरम लागलं.. त्याने पुन्हा एकदा कन्फर्म करायला स्वतःच्या कपाळाला हात लावला आणि राहुल च temperature चेक केलं तर त्याला खरंच खूप गरम लागलं.. आता त्याने स्नेहल ने आधी गार पाण्याच्या पट्ट्या केलेल्या त्याकडे मोर्चा वळवला.. त्याने पाणी चेंज करून त्यात फ्रिज मधला बर्फ टाकून घेऊन आला.. आणि त्याने त्याच्या कपाळावर पट्ट्या ठेवायला सुरुवात केली.. तो एवढं सगळं त्याच्या घरात हालचाल करत होता तरी राहुल निपचित पडला होता.. बराच वेळ पट्ट्या ठेवल्या तरी ताप कमी येईना म्हटल्यावर त्यानं लहानपणी आई जशी गोळी चमच्यात विरघळून पाजते मुलांना तशी १ तापाची गोळी विरघळून राहुल ला पाजली.. कडू चवीने राहुल ची जरा झोप चाळवली पण थोडंसं पाणी पिऊन तो पुन्हा झोपी गेला.. आपल्याला कुणी तरी पाजलं पाणी हे हि त्याला कळालं नाही.. रवी आता स्वतःशीच म्हणाला.. "मी जरा जास्तच चांगला नाहीये का ? याची सेवा करत बसलोय इथे ते.. "

सकाळ झाली.. सोफ्यावर झोपल्यामुळे राहुलचं अंग दुखत होत.. त्याला एकदम आठवलं कि मानवी घरी आली होती.. त्याने मागे वळून बघितलं मात्र तो घाबरून सोफ्यावर पुन्हा चढून बसला.. तो जोरात ओरडला.. "घाबरलो ना मी.. "

"गुड मॉर्निंग सर.. " रवी हसून म्हणाला..

"गुड मॉर्निंग? रवी सर तुम्ही माझ्या घरात काय करताय?"

"मी खात्री करून घ्यायला आलेलो कि तुम्ही जिवंत आहेत ते..मी ऐकलं कि तुम्ही पावसात खूप भिजला काल.. " त्याच्या उत्तराने राहुलच्या डोक्यात ट्यूब पेटली.. तो स्वतःशीच पुटपुटत म्हणाला "हि इंटर्न तर ना..नको तिथे लुडबुड करते..  "

"पण रवी सर तुम्ही इथे का झोपलात?"

"मग कुठं झोपणार होतो मी? रातकिड्यांचा आवाज ऐकत तुमच्या दाराबाहेर झोपलो असतो तर मला वेडा म्हणून हाकलून दिल असत ना तुमच्या गार्ड नि.. किती पाऊस पडला काल त्यात.."

"पण.. तुम्ही माझा बाथ रोब का घातलाय?" तो काय बोलतोय त्याच्या कडे लक्ष न देता तो म्हणाला.. "आणि.. आणि ती.. ती माझी पॅंटी आहे? ती माझी आहे!!.. " तसा रवी जोरात हसून म्ह्टला.. "ओह.. हो.. तुमचीच आहे.. मी इतका घाईत आलो काल कि मी कपडे माझे पॅक च न्हवते केले.."

"पण म्हणून माझी घातली तुम्ही?"

"हो मग? माझी धुवून वाळत घातली ना मी बाथरूम मध्ये.. "

राहुल ला कळायचं बंद झालं होत.. "पण तरी दुसऱ्या कुणाची तरी पॅंटी घालणं बरोबर नाहीये ना.."

"मग काढून देऊ का?"

"ewww.. नको नको.. तुम्हालाच ठेवा ती आता..  "

"अरे मग तर बेस्ट च.. १ चड्डी फ्री मिळाली मला.. आणि काय हो सर.. पॅंटी पॅंटी करताय.. चड्डी म्हणा कि.. फारच इंग्लिश झाला बाबा तुम्ही अमेरिकेत राहून.. बरं तुम्ही आवरून घ्या म्हणजे आपण ऑफिस ला जाऊयात ब्रेकफास्ट करून.. "

राहुल ला कळायचं बंद झालं होत.. त्याने घराकडे एक नजर टाकली आणि स्वतःशीच म्हणाला "ह्याने रात्रभर पार्टी केली कि काय.. सगळीकडे पसारा पडलाय.."

कारण खरच सगळीकडे रवीने पसारा करून ठेवला होता.. त्याच जॅकेट एकीकडे.. शर्ट पॅन्ट एकीकडे.. मानवीने दिलेली पिशवी एकीकडे.. सोफ्यावरची उशी खाली पडली होती.. खिचडी संपलेला बाउल डाईनिंग टेबल वर तसाच उष्टा ठेवला होता.. पण पिझ्झा चे बॉक्स पण संपलेले दिसत होते टेबल वर.. त्याची नजर किचन मध्ये गेली तर रवी गॅस वर काहीतरी बनवत गाणं गुणगुणत मस्त डान्स करत होता.. त्याने मागे वळून राहुल कडे नको इतक्या प्रेमाने बघितले आणि एखादी बायको नवऱ्याला लाडाने म्हणेल तसा म्हणाला.. "अहो जा ना आवरून घ्या.. " राहुल नि उसासा सोडून त्याच्या कडे बघितलं.. आपण जास्त चिडलो तर हा जास्त करेल हे ओळखून तो त्याच आवरायला गेला..

 

******

 

इकडे सकाळ झाली आणि मानवी सटा सटा शिंकत होती.. तिची अशी हालत खराब बघून स्नेहल ने विचारले.. "सर्दी झाली का ग तुला पण ?"

"हो मे बी.. काल पर्यंत तर ठीक होते मी.. पण अजून कुणाला झाली सर्दी ते तू तुला पण म्हणालीस?" मानवी ने सहज विचारले.. तशी गडबडून स्नेहल म्हटली..

"नाही म्हणजे.. माझ्या हॉटेल मधल्या पण काही लोकांना झालीये सर्दी अशी season नसताना.. (पण मानवी कडे बघून तिने टेबल शेजारीच त्या ठेवायच्या तो मेडिसिन बॉक्स जवळ घेतला आणि तो उघडून ती आत पाहत म्हणाली..) अरे.. आपल्या ताप सर्दी च्या गोळ्या संपल्यात ग.. थांब मी जाऊन आणते.. "

"ए माझी आई.. थांब थांब.. बस खाली.. आत्ता ते कोपर्यावरच मेडिकल शॉप उघडलं पण नसेल.."

"हो का? अजून वेळ नाही झाली का?"

"हम्म.."

"ओह.. मग मी तुला काही फ्रुटस कट करून देते.. आज ऑफिस मध्ये खा..तसा पण व्हिटॅमिन intake कमीच आहे तुझा.. " स्नेहल फ्रिज मधून apples काढत म्हणाली.. "आणि मी तुला येताना आमच्या हॉटेल मधलं  ते आवडत ते मुशरूम च सूप घेऊन येईन.. पण मला सांग आधी किती वाजता निघणारेस ते.. ते गरम च चांगलं लागत नाहीतर उशिरा येशील आणि ते गरम करून पिशील तर काही मजा नाही येणार.. " स्नेहल मानवीच्या मागे पुढे करत होती.. मानवी आपली नाक पुसत तिला अशी काळजी करताना बघत होती.. शेवटी ती म्हणालीच.. "एवढं ग काय काळजी करण्यासारखं आहे त्यात? मी होईन पण २ दिवसात बरी.. "

"तुझी सर्दी सुरू झाली कि लवकर संपत नाही आणि तू सुरुवातीला च काळजी घेतलीस तर ती वाढणार नाही.. आणि जर का तुला औषध घेतल्यावर पण बरं नाही वाटलं तर मला सांग आधी.. दवाखान्यात दाखवून घेऊ आपण.. अंगावर काढायची फार सवय आहे नाहीतर तुला.. " फळ कापून एका डब्यात भरत स्नेहल बोलत होती.. मानवी ने शहाण्या मुली सारखी मान हलवली.. इतक्यात मानवीच्या मोबाईल वर रवीचा मेसेज आला.. तिने ओपन करून वाचला..

"तुझ्या पहिल्या प्रेमाने सगळा बाउल संपवला खिचडीचा.. आणि औषध घेऊन अगदी खडखडीत बरा झालाय तो.. त्याच्या घरातून च हा रिपोर्ट देतोय तुला.. मिशन complete.. ओव्हर अँड आऊट.. "

त्याचा मेसेज वाचून मानवीला हसू आलं.. आणि तिला बरं पण वाटलं कि राहुलची रवी ने काळजी घेतली ते.. इतक्यात स्नेहल चा फोन पण वाजला.. तिने पाहिलं तर राहुल चा मेसेज होता..

"तू गेलीस तेव्हा मला नेमकी झोप लागली होती.. खिचडी साठी थँक्यू.. मी तुला नंतर कॉल करेन.. "

त्याचा मेसेज वाचून स्नेहल ला कळेना कि आपण तर सूप केलेलं.. मग ते आळून खिचडी सारखं झालं कि काय.. पण त्याला बरे वाटतंय हे कळाल्या मुळे तिला जरा हायस वाटलं.. 

*****

रवीला घेऊन राहुल ऑफिस मध्ये पोहोचला.. अजून ते खाली लॉबी मध्ये कार्ड च पंच करत होते तरी रवीची मस्ती थांबली न्हवती.. तो त्याला अजून त्याच्या चड्डी वरून चिडवत होता..

"सर.. तुम्ही अमेरिकेवरून आणली का हो हि चड्डी?"

"हो.. "

राहुल त्याला टाळत फास्ट चालायचा प्रयत्न करत होता.. तो कुणी ह्याला असं बोलताना बघत तर नाहीये ना हे बघत होता.. आणि तो त्रासलाय हे बघून रवीला अजून जोर येत होता.. "तरीच मी म्हणतोय या चड्डीच कापड खूप च सॉफ्ट आहे.. भारतात अशा चड्ड्या का नाही मिळत काय माहिती.. सर.. मी काय म्हणतो.. मला अजून २ अशा चड्ड्या देता का? इथे अशा चड्ड्या मिळत नाहीत ना म्हणून म्हटलो.. "

"काय लावलंय सकाळपासून चड्ड्या चड्ड्या चड्ड्या.. " राहुलचा वैतागून आवाज वाढला आणि त्याच्या त्या बोलण्याने एकदोघांनी त्यांच्या कडे वळून पाहिले.. पण त्यामुळे राहुलच वरमला.. रवी तसाच हसतमुखाने त्याच्या कडे बघत होता.. "प्लीज रवी सर.. आपण ऑफिस मध्ये आहोत तुम्ही वेड्या सारखे वागता पण इथे बाकीच्या डिपार्टमेंट ची पण लोक असतात.. आता तरी चड्ड्यांचा विषय सोडा.. आणि जरा लांब उभं राहू शकता का तुम्ही माझ्या पासून?" रवीने त्याला ऑफिस मध्ये मिठी मारली होती तेव्हा पासून राहुल जरा त्याच्या आजूबाजूला सावरूनच वागायचा.. फॅशन इंडस्ट्री मध्ये मुलाचं सुद्धा नाव जोडायला लोक वेळ लावत नाहीत हे त्याला माहिती होत म्हणून तो तसा म्हणाला.. त्यात हा रवी त्याच डोकं खात होता.. रवी त्याचा हात पकडून म्हणाला..

"तुम्ही सांगा ना मला द्याल कि नाही.. " त्याचा हात झटकत राहुल म्हणाला..

"जाऊ द्या बरं आता मला.. " तसा मोठ्याने रवी म्हटला..

"आपण एक रात्र बरोबर घालवली.. मी तुमची इतकी काळजी घेतली आणि आता तुम्ही मला असं टाळायला बघता का? हां ? हे बरोबर नाही ना राहुल सर?"

राहुल घाबरून इकडे तिकडे बघत त्याचा हात झटकत म्हणाला.. "मला जाऊ दे म्हटलं ना मी.. "

त्याला जाताना बघून रवी स्वतःशीच हसला आणि म्हणाला.. "मानवी ने बरं हे पण टार्गेट मिळवून दिलं मला.. याला पण आता छळायला जाम मजा येणारे.. चड्डी.." आणि मोठ्याने पुन्हा त्याच्या मागे लिफ्ट कडे जात तो म्हणाला.. "सर थांबा माझ्यासाठी पण.. तुमचा सेंट खूप छान आहे.. कोणता ब्रँड आहे? हा पण अमेरिकन आहे?" राहुल एका लिफ्ट च बटन दाबून दुसऱ्या लिफ्ट मध्ये शिरायला बघत होता.. पण रवी काही केल्या त्याचा पिच्छा सोडत न्हवता.. तरी राहुल ने त्याला चकवलंच आणि वेगळ्या लिफ्ट नि ऑफिस मध्ये गेला..

तो बाहेर आला आणि त्याला लिफ्टच्या पॅसेज मधून आत जाताना मानवी दिसली.. तो तिच्या मागून थोडं अंतर ठेवून चालू लागला..

 

************

 

क्रमशः ..

 

************

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..