Oct 24, 2021
कथामालिका

माझी मानवी... 42

Read Later
माझी मानवी... 42

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये त्यांच्या सकाळच्या मीटिंग ला सगळे जमले होते.. राहुल नेहमी प्रमाणे सगळ्यात पुढे बसला होता.. आणि मानवी पण तिच्या नेहमीच्या जागी, एकदम मीटिंग रूम च्या टेबल वर लास्ट ला बसली होती.. रवी आज मानवी च्या opposite साईड ला बसला होता.. आज राहुल त्याच्याच विचारात हरवलेला.. त्याच्या हे हि लक्षात नाही आलं कि या विचारांच्या तंद्रीत तो सरळ मानवी कडे बघत होता.. इतर लोक जे  टॉपिक मांडत होते त्याचे ती नेहमी प्रमाणे मिनिट्स ऑफ मिटिंग काढत होती.. तिची नजर तिच्या लॅपटॉप वर च होती त्यामुळे राहुल आज बराच वेळ तिच्या कडे बघतोय हे तिला माहिती च न्हवते.. मात्र रवीच्या नजरेतून हि गोष्ट सुटली न्हवती.. रवीने त्याची ती नजर बघून २-३ वेळा चेक केलं कि मानवीला कळालं आहे का कि हा तिच्या कडे बघत बसलाय पण मानवी मान खाली घालून तिच्या कामात होती.. आता सीमा मॅम त्यांच्या डायरी मध्ये बघून काही तरी महत्वाचं बोलत होत्या आणि मानवी आता त्यांच्या कडे बघून पूर्ण concentration ने लॅपटॉप मध्ये लिहीत होती.. त्यांचं बोलणं संपवत सीमा मॅम म्हणाल्या..

"राहुल सर फक्त तुम्ही एकदा हे सगळं चेक करा.. तुमचं approval मिळालं कि आपण पुढे जाऊ.. " आणि त्यांचं वाक्य संपल्यावर त्यांनी राहुल कडे पाहिलं पण तो विचारात हरवलेला मानवी कडे बघत होता.. त्याच लक्ष नाही हे बघून त्यांनी पुन्हा हाक मारायला आणि मानवीने डोकं वर करून राहुल कडे बघायला एकच गाठ पडली.. जशी राहुल ची आणि तिची नजरा नजर झाली तसे राहुल ने दचकून पटकन दुसरी कडे नजर वळवली.. मानवीच्या नजरेतून ती गोष्ट सुटली नाही.. तिनी चेहऱ्यावर काही न दाखवत परत मान खाली घातली आणि हे सगळं रवी बघत होता..त्याच्या कपाळावर १ छोटी आठी आली.. इकडे सीमा मॅम राहुल काहीच बोलत नाहीये हे बघून पुन्हा एकदा म्हणाल्या..

"राहुल सर?"

"काय? हम्म.. ठीके.. बघतो ते मी.. आपल्याला आऊटडोअर शूट ला  जायचंय.. त्याचं काय schedule आहे? कुठवर आलं ते? " त्याने सावरून घेत विचारलं..

"सध्या तरी एवढं फिक्स आहे कि आपण परवा दिवशी जाणार आहे.. १ रात्री चा स्टे करावा लागेल.. तर त्या दृष्टींनी मी सगळी बुकिंग्स केली आहेत.. तिथे आपण १ सी साईड लोकेशन पाहू शकतो आणि अजून १ तिथे जाऊन च पाहावे लागेल.. जिथे आपण थांबलोय ते हॉटेल च त्यांचा private beach शूटिंग साठी available करून देऊ शकतो.. तर ते पण आपण तिथे जाऊन चेक करू शकतो.. हॉटेल च्या बाबतीत लोला मॅम नि अजून एक ऑपशन तिथे available करून दिला आहे..  " त्या सगळं सांगत म्हणाल्या.. राहुल त्यांच्या कडे बघून सगळं ऐकत होता तेव्हा मानवी आता त्याच्या कडे हळूच नजर टाकत होती..

"ठीके.. कोण कोण येणारे मग?" राहुलने विचारल्यावर त्या म्हणाल्या..

"तुम्हीच बरेच निर्णय घेणार आहेत त्यामुळे तुम्हाला तर यावंच लागेल.. मी आणि रेणू.. आम्ही पण येऊ.. आपण असे तिघे जाऊ असा मी विचार करत होते.. "

त्या असं म्हणल्यावर फॅशन टीम ची रेणू म्हणाली..

"I am sorry mam.. पण तुम्ही मला काढता का?"

"का?"

"आपण १ स्टोरी कव्हर केली होती तिचे फोटोज मस्ट होते पण आता अशी श्यक्यता आहे कि ते फोटोज नाही available होऊ शकणार आपल्या time फ्रेम मध्ये.. तर मला १ बॅकअप साठी कव्हर स्टोरी करून ठेवावी लागणारे.. रिया तू जातेस माझ्या ऐवजी?" तिने तिथेच रिया ला विचारलं.. तशी रिया गडबडून म्हणाली..

"मी? पण मला आधीच खूप काम आहे.. मानवी नाही का जाऊ शकणार?" तिने मानवीचं नाव घेतलं तसा राहुल अपेक्षेने मानवी कडे बघायला लागला.. मानवीने त्याची नजर ओळखली आणि गडबडून ती म्हणाली.. "मी? माझा काय उपयोग होणार तिथे?" रवीने पण त्या दोघांची हि नजरा नजर बरोबर पकडली होती..  शेवटी सीमा मॅम च म्हणाल्या..

"आपल्या जाऊन साईट पण arrange करावी लागणारे तर विशाल ला च घेणं जास्त सोयीचं पडेल.. चालेल विशाल तुला?" विशाल हसून म्हणाला..

"हो.. " विशाल हो म्हणाला म्हटल्यावर रिया लगेच म्हणाली..

"मॅम मी पण जाते.. मानवी ला काहीच अनुभव नाहीये तर ती काय करेल तिकडे जाऊन? माझ्या ताटात आधीच खूप आहे पण हे पण गरजेचं आहे तर मी येते.. "

रिया च्या शेजारीच विशाल बसला होता त्याच्या कडे बघत तिने विचार केला.. "finally मला चान्स मिळेल.. मी परत येईन ते तुझी गर्लफ्रेंड बनूनच.. "

"ठीके मग.. मी, रिया, विशाल आणि राहुल सर तुम्ही.." असे त्या म्हणल्यावर मानवीने १ श्वास सोडला आणि ती visibly रिलॅक्स झाली.. मात्र राहुल चा चेहरा थोडा पडला होता.. 

 

******

 

स्नेहल तिचे ओले केस टॉवेल मध्ये पकडून मानवी च्या रूम मध्ये पळत आली.. तिचा हेअर ड्रायर मानवीने घेतलेला तो तसाच तिच्या रूम मध्ये राहिलेला.. तिने तिच्या बेड च्या साईड ला टेबल वर तो पहिला आणि प्लग सॉकेट मधून घेऊन तिने तो काढला.. आता ती घेऊन जाणार च होती इतक्यात तिचे लक्ष शेजारी गेले.. तोच पझल चा तुकडा तिथे ठेवला होता ज्याच्या बद्दल राहुल ने ते पहिल्यांदा भेटले होते तेव्हा विचारले होते..तिला तेव्हा घडलं होत ते आठवलं.. 

“तुला ते puzzle आठवतंय ? ते पण त्या बॉक्स मध्ये होतं पत्रांच्या बरोबर..  " राहुल थोडा excited होत म्हणाला होता..

मानवीनी तिथल्या tissue पेपर वर मोठ्या अक्षरात "लपलेल्या मुलीचं चित्र " असं मार्कर नि लिहून तिला दिसेल असं धरलं होत..

स्नेहल म्हणाली होती.. "ओह ते लपलेल्या मुलीचं चित्र?"

"मला पण प्रश्न पडलेला कि मी इतके दिवस तो बॉक्स आणि ते सगळंच एवढ का जपून ठेवलेलं.. पण.. ते puzzle पुन्हा जुळवताना  मला आपण एकत्र ते puzzle जोडायचो ते आठवलं.. आपण किती रमून जायचो त्यात… त्यामुळेच मी देवाचे आभार मानले कि तू माझ्या आयुष्यात होतीस.." राहुल हे बोलताना त्याचे ते innocent विचार आणि त्याची स्माईल पण तिला आठवली..

तिने काही विचार करून तो पझल चा तुकडा घेतला आणि तिच्या रूम मधून बाहेर गेली..

 

*****

मिसेस शांती एका मोठ्या हॉटेल च्या लॉबी मधून फोन वर बोलत आत येत होत्या.. "हो हो.. मी आलीये येतेच ५ मिनटात.. " त्या अशा बोलत होत्याच इतक्यात एका मुलाने एका मुलीला हाक मारली त्यामुळे त्यांनी वळून बघितलं..

"hi मानवी.. " राहुल नि हाक मारली होती..

"खूप वेळ वाट पाहावी लागली का रे तुला?" एक छोटीशी उडी मारून त्याच्या जवळ आनंदात पळत जाऊन उभी राहिलेली स्नेहल त्यांनी पाहिली आणि त्यांचा चेहरा जरा विचारात पडला, कि स्नेहल ला दुसऱ्या नावाने हाक मारून सुद्धा ती इतकी खुश कशी.. काय relation असावं या दोघांचं....

"नाही ग.. ५ च मिनिट्स झालेत.. चल जाऊयात आत.. " असं म्हणून ते तिथे असलेल्या रेस्टॉरंट मध्ये गेले..

स्नेहल आणि राहुल त्यांच्या टेबल वर सामोरा समोर बसले होते.. त्यांची ऑर्डर घेऊन वेटर गेल्यावर स्नेहल ने पर्स मधून तो पझलचा तुकडा काढून राहुल च्या समोर तिच्या तळहातावर ठेवला.. आणि म्हणाली..

"मला हे सापडलं.. " तिच्या हातातून ते उचलून घेत राहुल हसून म्हणाला.. "ओह.. हे तर तेच.. " पण बोलता बोलता तो थांबला आणि विचार करू लागला.. स्नेहल मात्र पुढे बोलत होती..

"खूप वर्ष झाली ना? मी पण sure न्हवते पण जेव्हा मी शोधलं तेव्हा हे सापडलं.. मला पण ते माझ्याकडे अजून आहे याच विशेष वाटलं.. Isn't it amazing?"

राहुल मात्र ते पझल पाहून बोलायचा बंद झाला होता.. कारण आता त्याच्या समोर प्रूफ होते कि हीच त्याची मानवी आहे.. त्याला का कुणास ठाऊक त्याच्या समोरची हि सुंदर मुलगी मानवी आहे हे कळून सुद्धा एक होप होती कि कदाचित आपल्याला जी वाटतीये तीच माझी मानवी असावी.. आता मात्र  सगळं स्पष्ट झालं होत.. आणि आपली ती होप केवळ एक आपल्या मनाने मांडलेला खेळ होता.. हे त्याला कळालं त्यामुळे त्याचा नाही म्हटलं तरी मूडच गेला होता.. त्याला भले वेगळं फीलिंग येत असेल पण खरं जे काही होत ते त्याच्या समोर होत.. आपल्या या आतल्या भावनेने आपण काही चुकीचे बोललो तर मानवी दुखावली जाईल हे जाणवून त्याने मूड ठीक केला.. त्या पझल च्या मागे त्याने काढलेली छत्री बघून तो म्हणाला..

"Yes.. it is amazing.. तेच पझल आहे हे जे मी तुला दिलेलं.. " तो एक एक शब्द हळू त्या पझल कडे बघत बोलत होता.. स्नेहल मात्र आपण मानवीची आयडेंटिटी चोरतोय या जाणिवेने थोडीशी अस्वस्थ होती..  "तेव्हाची ती तूच आहेस.. "राहुल ने हसून बोलणं पूर्ण केलं आणि त्याची ती स्माईल बघून स्नेहल च्या चेहऱ्यावर पण मोठी स्माईल आली..

थोड्या वेळाने स्नेहल वॉशरूम मध्ये गेली.. ती त्या रेस्टरूम च्या आरशात बघून तिची hairstyle नीट करत होती.. आरशात स्वतःचेच प्रतिबिंब बघताना तिला तिच्या नजरेला नजर मिळवता येत न्हवती.. पण तिचे लक्ष तिने तिच्या पायातल्या त्या हिल्स च्या शूज कडे नेले आणि तिच्या डोक्यातले विचार झटकून टाकायचा प्रयत्न केला.. इतक्यात मिसेस शांती आत आल्या.. आणि तिच्या शेजारच्या आरशासमोर उभे राहत त्या तिला म्हणाल्या..

"अरेच्चा.. अशा ठिकाणी आपली भेट झाली.. तू डिनर साठी आलीये का इथे?" स्नेहल ला आधीच guilty वाटत होते त्यात या तिच्या समोर आल्यावर तर तिचा मूड च गेला.. ती तिरसटून म्हणाली..

"रेस्टॉरंट मध्ये सगळेच जेवायला येतात.. मी तरी दुसऱ्या कशाला येणारे?" तिच्या बरोबर कोण आहे हे त्यांना माहिती नसेलच असं वाटून ती नेहमी जशी उद्धट उत्तरं द्यायची तशी बोलली.. आणि जायला निघाली.. त्या मात्र तिच्या कडे न बघत त्यांच्या पर्स मधून लिपस्टिक काढत म्हणाल्या..

"आता तुला हवा असलेला मुलगा मिळवायला तू तुझं नाव सुद्धा खोटं सांगायला लागलेली दिसतियेस.. हे तर तुझ्या आईला पण कधी जमलं नसत.. आई पेक्षा २ पावलं पुढची निघालीस कि तू.. " त्यांचं पहिलं वाक्य ऐकूनच स्नेहल ची पावलं जागेवर थांबली होती.. ती काहीच बोलत नाही हे बघून आणि तिचा घाबरलेला आणि पडलेला चेहरा बघून त्याच पुढे म्हणाल्या..

"आता तुला एका पेक्षा जास्त मुलांना डेट करायचं असेल तर तुला खोट बोलावं लागत असणार हे तर मी धरूनच चाललेले.. तुझ्या नावाव्यतिरिक्त अजून कशाबद्दल खोटं बोललीयेस का तू त्याच्याशी?" लिपस्टिक लावत सहज विचारल्या सारखं त्यांनी विचारलं.. स्नेहल त्यांना आपण घाबरलो आहे हे कळू न द्यायचा आटोकाट प्रयत्न करत, तिचा आवाज स्थिर ठेवायचा प्रयत्न करत म्हणाली..

"मला नाही वाटतं, it's any of your business.." तशा आरशातूनच तिच्या कडे पाहत त्या म्हणाल्या..

"I am just curious.. असं काय महत्व आहे या मुलाचं तुझ्या आयुष्यात कि तुला तुझं नाव सुद्धा खोटं सांगावं लागतंय त्याला.. तू त्याला माझी ओळख का नाही करून देत?" तिच्या नजरेत नजर मिळवत चेहऱ्यावर मोठं स्माईल आणत त्या म्हणाल्या.. आता स्नेहल खरंच घाबरली..

"मी असं खोटं बोलण्या मागे एक कारण आहे.. Please pretend you didn't see me here.."

"मी असं कशाला करेन? And if I am not wrong, aren't you the one who dates men for fun? तुला असं पाहणं हे सुद्धा माझ्या साठी नवीन आहे.. आणि आत्ता मला आठवलं तुझ्या त्या गरिबड्या  रूममेट च्या नावाने हाक मारली ना त्याने तुला? " तिच्या कडे वर खाली बघत त्या कुत्सितपणे हसून म्हणाल्या.. स्नेहल आता रडकुंडीला आली होती.. तीचा आवाज पण एकदम खोल गेला आणि ती धीर एकवटून पुटपुटली..

"Please.. I am begging you.." त्यांना ऐकू तर आलं पण तिला मुद्दम डिवचायला त्या विजयी स्वरात म्हणाल्या..

"तुझा आवाज खूपच खोल गेला ग.. काही ऐकू नाही आलं काय बोललीस ते.. पुन्हा बोलतेस एकदा प्लीज?" स्नेहल ची नजर आता जमिनीला खिळली होती.. तिच्या डोळ्यात आलेलं पाणी ती कशीबशी आडवून ठेवत होती.. तिने पुन्हा रडवेल्या आवाजात सांगितले..

"i am begging you.. please pretend you didn't see me.."

 

स्नेहल जवळपास धावत च राहुल पाशी आली.. आणि घाई घाईने म्हणाली..

"राहुल.. चल निघुयात.. " तिला घाई घाईने तिचा मोबाईल जो तिने टेबल वर ठेवलेला त्याला पर्स मध्ये ठेवताना आणि घाई करताना बघून राहुल ला कळेना एकदम काय झालं ते.. तो म्हणाला..

"एकदम काय झालं पण? तुला बरं वाटत नाहीये का?"

"आपण इथून निघूया फक्त आता पटकन.. चल प्लीज.. "

"मानवी सिरिअसली.. काय झालंय सांगशील का?" स्नेहल पर्स काढायचा प्रयत्न करत होती पण तिचा बेल्ट खुर्ची मध्ये कुठं तरी नेमका अडकला होता.. राहुल चे प्रश्न त्यात तो बेल्ट निघेना.. ती जोर लावून ओढत होती इतक्यात मिसेस शांती तिथे आल्या आणि डिरेक्टली राहुल ला म्हणाल्या..

"You two really seem to suit each other.." त्यांचा आवाज ऐकून जागेवर स्नेहल फ्रीझ झाली.. राहुल मात्र न कळून म्हणाला..

"pardon me?" त्याच्या बोलण्या कडे लक्ष न देता त्या पुढे म्हणाल्या..

"भेटू आपण पुन्हा.. (आणि स्नेहल कडे १ नजर टाकत आणि तिचा रडवेला चेहरा बघत तिला म्हणाल्या.. ) कॉल मी लेटर.. " त्या निघून गेल्या मात्र स्नेहल त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रडवेल्या नजरेने पाहत होती.. आणि राहुल तिच्या या अवस्थेकडे..

स्नेहल घाईघाईने तिथून बाहेर पडली.. राहुल बिल पे करून येईपर्यंत पण ती त्याच्या सोबत थांबली नाही.. त्या आधीच ती फास्ट चालत तिथून बाहेर पडली.. आज तिच्याच चुकी मुले तिने तिच्या आईबद्दल अपशब्द ऐकून घेतलेले.. तिनेच निवडलेल्या या रस्त्यावर तीच पुन्हा hurt झाली होती.. तिला आता रडू आवरत न्हवते.. ती आवाज न करता रडत होती.. राहुल बिल पे करून धावत च बाहेर आला..

"मानवी...  मानवी थांब .." त्याने धावत जाऊन तिला गाठलं आणि तिचा हात धरून तिला थांबवलं.. तिचे गाल रडून पूर्ण ओले झाले होते.. तिच्याकडे पाहत त्याने विचारले..

"What's wrong? कोण होत्या त्या काकू?" ती काहीच बोलत नाही हे बघून त्याने पुन्हा हळुवार हाक मारली.. "मानवी.. " तशी स्नेहल त्याच्या कडे न बघता.. मान खाली घालून म्हणाली..

"Please don't call me by that name.." तिच्या तोंडून ते वाक्य ऐकलं मात्र त्याने जबरदस्ती तिला आपल्या कडे वळवून समोर उभं केलं आणि म्हणाला..

"इकडे माझ्या कडे बघ.. हां? प्लीज माझ्या कडे बघ एकदा?" मात्र स्नेहल नि जी मान खाली घातली होती ती तिला वर करून त्याच्या नजरेला नजर द्यायचा धीर झाला नाही.. त्याच्या खांद्यावर तसेच रडत डोकं ठेवून ती म्हणाली..

"आज प्लीज काही विचारू नकोस.. आजच फक्त? आज मला तुझ्या कोणत्याच प्रश्नांची उत्तर देता येणार नाही.. " तिला तसं मूकपणे रडताना बघून राहुल ला पण आत्ता काही विचारणं बरोबर नाही हे कळालं.. त्याच्या डोक्यातल्या असंख्य प्रश्नांना थांबवत त्याने तिला न बोलता तिच्या डोक्यावर थोपटून तो आता काही विचारणार नाही हे सांगितलं..

 

************

क्रमशः

 

************

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..