Oct 24, 2021
कथामालिका

माझी मानवी... 43

Read Later
माझी मानवी... 43

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

स्नेहल ला थोडं शांत करून राहुल नि तिला तिच्या गाडीपर्यंत नेऊन सोडले.. त्याच्या मनातल्या प्रश्नांना आज तरी उत्तर मिळणार न्हवतेच.. स्नेहल आणि राहुल त्या हॉटेल च्या इथूनच आपापल्या गाडीतून थोड्यावेळात घरी गेले..

 

मानवी त्यांच्या हॉल मध्ये काहीतरी काम करत बसलेली.. काम करता करता तिच्या डोक्यात एकदम आज सकाळच्या मीटिंग च्या वेळ ची राहुल ची नजर आठवली.. ती हातात जे करत होती ते तसेच पकडून विचार करू लागली.. "पावसात त्याने पॅनिक अटॅक आला असताना मला मानवी हाक मारलेली आणि गालाला हात लावला होता तो योगायोग असावा असं वाटलं होत मला.. कारण पुन्हा बस स्टॉप वर तर मला इंटर्न च म्हणाला होता तो.. पण मग.. तो humidifier.. त्याच्या मुळे आजारी पडले असं वाटून त्याने मदत म्हणून घेतला असेल मला.. पण मग.. आज सकाळची ती नजर.. असं का पाहत होता माझ्याकडे.. आणि जर का काही मनात नसेल च त्याच्या तर असा दचकून नजर का चोरली त्याने.. " मानवीच्या डोक्यात हे असे विचार येतच होते कि latch कि ने दरवाजा उघडून स्नेहल आत आली.. ती आत आल्याचं बघून तिच्या विचारातून बाहेर येत मानवीने तिला विचारले..

"काय ग बायको.. आज उशीर झाला तुला.. डेट वर गेली होतीस का?" नेहमी तिला सगळं सांगितलं होत स्नेहल ने आणि आता लपवायचं आणि काहीच न सांगायचं.. तिच्या जीवावर येत होत.. पण काहीतरी उत्तर द्यायला हवं म्हणून ती म्हणाली..

"हम्म.. something like that.." मानवी तीच काम करत करत च म्हणाली..

"खाल्लं आहेस ना काही? कि काही बनवून देऊ पटकन?"

"खाल्लंय ग.. किती वाजलेत पाहिलंस का घड्याळात? इतक्या उशिरा पर्यंत न जेवता कशी थांबले असते.. जेवूनच आले.. " नको इतके स्पष्टीकरण स्नेहल देत होती.. ते बघून मानवीला हसायला आले तरी तिच्या कंमेंट कडे लक्ष न देता ती पुढे म्हणाली..

"अरे.. खरंच कि.. कामाच्या नादात पाहिलंच नाही घड्याळाकडे.. अरे बरं लक्षात आलं.. तुझी बेडशीट बदलली आहे मी.. झोपताना मेकअप काढून झोपत जा कि ग.. सगळी उशीच्या कव्हर चा रंग बदलला होता.. मी धुवून टाकली.."

"तू केलंस सगळं? थँक्यू ग.. " स्नेहल ला आता अजूनच अपराधी वाटायला लागलं होत.. ते तिच्या आवाजातून पण जाणवलं मानवीला.. पण स्नेहल च काम तिने केल्यामुळेच हा अपराधीपणा आहे असं वाटून ती पुढे म्हणाली..

"थँक्यू काय थँक्यू.. किती पसारा करून ठेवला आहेस आणि रूम मध्ये .. मला वाटलं तुझी रूम बघून चोर येऊन उपसा उपशी करून गेले कि काय.. पोलिसांना कॉल च करणार होते मी.. जरा रूम आवर ग आणि तुझी.. तुम्हा सुंदर माणसांचा काही रुल आहे का कि फक्त स्वतःची काळजी घ्यायची रूम ची नाही.. काही हरवलं तर सापडणार पण नाही तुला.. मी तुझी बायको आहे म्हणून.. पण उद्या तुला कुणाची बायको व्हायचं आहे.. तो तर बिचारा पाळूनच जाईल तुझा एवढा पसारा बघून.. " मानवी आपली चेष्टा करत तिला बोलत होती.. मात्र स्नेहल फक्त तिच्या कडे guilty नजरेने बघत होती.. मानवीचं हेच प्रेम तर होत ज्याने आजवर तिला तारलं होत.. तिला असं वाटत होत सगळं सांगून टाकावं तिला..

रात्री सगळं आवरून करून मानवी तिच्या रूम मध्ये आली, तिने दरवाजा नुसता ओढून घेतला.. आता ती तिचा चष्मा काढून बेड वर आडवी होणार इतक्यात स्नेहल तिच्या night dress मध्ये तिची उशी घेऊन आत आली.. आणि मानवीच्या आधी तिच्या बेड वर जाऊन झोपत म्हणाली..

"मी आज तुझ्या जवळ झोपणार.. "

"काय? तुझा बेड माझ्या बेड पेक्षा मोठा आहे.. माझ्या बेड वर कशाला मग.. ?" मानवी बोलत होती पण स्नेहल ने मस्त ताणून दिली होती.. तिला तस झोपलेलं बघून मानवी म्हणाली..

"ओ मॉडेल बाई.. तुमच्या एवढ्या height चा बेड नाही माझा.. मी तुझ्या शेजारी कसं झोपायचं ग?" तिने तस म्हटल्यावर स्नेहल नि तिचे पाय पोटात घेऊन एकदम बेड च्या कडेला झोपत, cutely तिला मस्का मारत म्हणाली..

"आता मी एकदम छोटीशी झाले.. आता झोपू मग मी तुझ्या जवळ?" तिला इतकं गोड बोलताना बघून मानवीला हसू आवरलं नाही ती हसत म्हणाली..

"ये बाई.. झोप पण इतकं गोड नको बोलू.. तू हॉट च ठीक आहेस.. cute पण वागायला लागलीस तर मुलांचं अवघड होईल.. " असं बोलत मानवी तिच्या शेजारी झोपली.. मानवीचा बेड मोठा न्हवता पण खूप लहान पण न्हवता.. त्या दोघी शेजारी शेजारी पाठ टेकवून झोपू शकत होत्या.. आता रूम मधली light बंद होती.. दोघी शेजारी शेजारी पोटावर हात ठेवून पडल्या होत्या पण झोप दोघींना पण लागत न्हवती.. आढ्या कडे बघत दोघी नुसत्या पडल्या होत्या.. शेवटी मानवीनेच विचारलं..

"आता सांगशील? काय झालंय ते?"

"कुठं काय?"

"तुला मला काहीतरी सांगायचंय.. हो ना?"

"हम्म.. (आत्ता च सगळं सांगावं आणि तिची माफी मागावी.. गरज पडली तर राहुल ची भीक मागावी.. असे खूप सारे विचार तिच्या डोक्यात पिंगा घालू लागले.. पण तिने स्वतःवर कंट्रोल करून आणि काही विचार करून सांगितलं ) सांगायचंय.. पण.. नंतर.. नंतर मी तुला सगळं काही सांगेन.. तोपर्यंत मी सांगायची वाट पाहशील?" आता मानवीने वळून तिच्या कडे पाहिलं.. हे या आधी कधी न्हवत झालं पण त्यांचं relation एवढं स्ट्रॉंग होत कि जर का ती एवढी hesitant आहे काही सांगायच्या साठी तर तिला नक्कीच वेळेची गरज आहे हे ओळखून मानवी तिच्या काळजीने म्हणाली..

 

"ओके.. मी वाट बघेन.. But are you going to be okay?"

"Being okay is...hard.." स्नेहल उसासा सोडून हळू आवाजात म्हणाली.. आता मानवीला काळजी वाटू लागली..

"स्नेहल.. असं काय.. " ती पुढे काही बोलणार इतक्यात स्नेहल ने तिच्या कडे वळत कूस बदलली आणि तिच्या कुशीत शिरत म्हणाली..

"तुझ्या कुशीत किती छान वाटत ग.. आपण इथून पुढे असच झोपत जाऊया का?" तिला नीट कुशीत घेत पांघरूण एकसारखं करत आता चेष्टेत ती पण म्हणाली..

"वाट बघ.. आजच्या पुरतं झोपू देतीये तुला.. उद्या गॅप मुकाट्याने तुझ्या बेड वर जाऊन झोपायचंय.. कळालं? केवढे लांब आहेत ग पाय तुझे.. माझं पांघरूण पुरेना तुला.. " तिच्या बोलण्यावर स्नेहल फक्त हसली.. थोडावेळ विचार करून मानवी च पुढे म्हणाली..

"I am not sure what's going on with you.. पण.. जे काही असेल त्यात खूप घोळ घालत बसू नको.. लवकर सॉर्ट आऊट कर.. आणि एक लक्षात ठेवशील कि तू एकटी नाहीयेस.. मी कायम आहे तुझ्या बरोबर..It's always WE against the world..  ओके?"

"हम्म.. ओके बायको.. " स्नेहल नि एकदम हळू आवाजात उत्तर दिल..

थोड्यावेळाने मानवीला झोप लागली.. स्नेहल मात्र तिच्या कडे बघत अजूनही जागीच होती.. ती झोपलेली असून सुद्धा ती तिला थोपटत तिच्या कडे बघत होती.. तिच्याकडे बघता बघता तिला खूप भरून आलं आणि कितीही कंट्रोल केलं तरी तिच्या डोळ्यातून पाणी बाहेर आलंच.. तशीच हुंदके दाबत ती झोपी गेली..

 

*****

 

आज रेस्टॉरंट मधून घरी आल्यावर राहुल ने, मानवीने त्याला ऑफिस च्या पार्टी मधून घरी आणून सोडले होते तेव्हा ते काचेच्या बॉक्स मधलं पझल  तोडले होते ते जोडायचे ठरवले.. त्याला स्नेहल ने दिलेला तो शेवटचा पझल चा तुकडा पण आता त्याच्या कडे होता.. त्याने ते जोडले आणि पुन्हा तो काचेचा बॉक्स बनवून हॉल मध्ये त्याने आधी ज्या छोट्या टेबल वर ठेवला होता तिथे ठेवले.. त्याने थोडे मागे सरकून त्या जोडलेल्या फ्रेम कडे पाहिले.. आणि त्याने  एक उसासा सोडला.. भले त्याला आता तो शेवटचा तुकडा सुद्धा मिळाला होता तरी त्याने अजूनही ती जागा तशीच रिकामी सोडली होती.. त्याच्याकडे आता ती जागा रिकामी सोडायचं कारण नाहीये हे कळत असूनही तो तुकडा त्याला तिथे जोडावासा वाटलं नाही.. त्याने आता बेडरूम मध्ये ठेवलेलं ते humidifier बघितले ज्यावर त्याने स्माईली फेस draw केला होता.. त्याने sanitizer घेतला.. त्यावर स्प्रे करून त्याने तो मार्कर ने draw केलेला स्माईली फेस पुसून टाकला आणि पुन्हा ते त्याच्या बेड साईड ला ठेवून दिलं.. आपले विचार सॉर्ट करायचे असेल तर हे करणं गरजेचं आहे असं वाटून तो आता झोपायला गेला..

 

*****

काही दिवसांनी त्यांचा business ट्रिप ला जायचा दिवस उजाडला.. ते सकाळी सगळे ऑफिस मध्येच भेटणार होते आणि तिथूनच राहुल च्या गाडीतून एकत्र जायचा त्यांचा प्लॅन होता.. राहुल ने सकाळी जेव्हा ऑफिस मध्ये एन्ट्री केली तेव्हा अल्मोस्ट सगळे आले होते आणि कामाला सुरुवात पण झाली होती.. त्याला पाहून सगळ्यांनी गुड मॉर्निंग म्हटल्यावर त्याने मात्र.. "मॉर्निंग ऑल.. business ट्रिप ला जे येणार आहेत त्यांनी शार्प ९ ला मला खाली माईन गेट वर भेटा.. मी तिथेच गाडी घेऊन येईन.. "

"येस सर.. " म्हणून सगळे जायच्या आधीच काम उरकत होते.. हे गेले काही दिवस राहुल ने श्यक्य तेवढं मानवी पासून डिस्टन्स ठेवलं होत.. आता सुद्धा त्याने तिच्या कडे बघून न बघितल्या सारखं केलं.. त्याच्या अशा वागण्याने आपल्याला भास च झाला असणार, त्याची नजर चुकून आपल्या कडे गेली असणार अशी समजूत मानवीने स्वतःची घालून घेतली होती.. आत्ता सुद्धा जायच्या आधीची कागदपत्रांची पूर्तता करण्यात आणि सीमा मॅम ना मदत करण्यात ती गुंतली होती.. काही कागद्पत्रांच्यावर लोला मॅम ची सही लागणार होती म्हणून मानवीला सीमा मॅम नि त्यांच्या कडे पाठवले.. लोला मॅम च्या पुढे ती उभी होती आणि त्या documents वर त्यांची sign करत तिला मधूनच वर खाली पाहणं चालू होत.. शेवटी तिच्या कडे फाईल देत त्या म्हणाल्या..

"इंटर्न इतर कामात तर तू हुशार झालीस.. पण तुझा गेटअप अजूनही तू बदलला नाहीस.. अजून किती दिवस मला वाट पाहायला लावणार आहेस त्या साठी?"

त्या असं म्हणल्यावर ती पुन्हा अस्वस्थ होऊन तिचे केस दाबून बसवू लागली.. तशा त्या म्हणाल्या..

"आता माझ्या कडे च बघ.. आज मी माझे पण केस कुरळे केलेत पण style आहे कि नाही काही यात? तुझे कपडे पण आणि तुझी style पण.. (तिच्या कडे वर खाली बघत त्या म्हणाल्या.. ) please change it.. तू फेस मध्ये काम करतेस.. "

"सॉरी मॅम.. I will work on it.." असं मानवी म्हणल्यावर त्यांनी तिला जायची खूण केली.. मानवी त्यांच्या केबिन मधून येऊन सीमा मॅम ना ते पेपर्स देऊन तिच्या जागेवर येऊन बसली.. ती बसल्या बसल्या रवी तिच्या कडे त्याची खुर्ची सरकवत म्हणाला..

"आज मी माझी फर्स्ट विश मागतो.. " नकलून मानवी म्हणाली..

"काय? कुठली विश ?"

तसा त्याने हसून मोबाईल काढला आणि त्यावर च रेकॉर्डिंग वाजवलं.. "मी मानवी कुलकर्णी, रवी ला प्रॉमिस करते कि मी त्याच्या ३ requests पूर्ण करेन काही झालं तरी.." ते ऐकल्यावर मानवीने आजूबाजूला पाहिलं तर तिच्या शेजारच्या cubicle मधले लोक हसत होते.. ती वैतागून म्हणाली..

"रवी सर तुम्ही हे रेकॉर्ड केले? हद्द झाली बाबा तुमची.. " तसा तो डोळे मोठे करून म्हणाला..

"आत्ता एक सेकंदापूर्वी म्हणाली तू कुठली विश? म्हणून.. मग? तू असं करणार माहिती होत त्यामुळे च रेकॉर्ड करून ठेवलं.. "

त्याने असं बोलल्यावर मानवीने डोक्याला हात मारला तसा तो पुढे म्हणाला..

"मी तुला खूप काही मागायचं ठरवलं होत पण मी किती दयाळू आहे हे तुला माहितीच आहे त्यामुळे I will go easy on you for the first wish.. मला आज डिनर हवाय तो सुद्धा KFC मध्ये.. नो लिमिट ऑन बजेट.. काय म्हणतेस?" मानवी ने ऐकून घेतलं आणि खांदे उडवून म्हणाली..

"KFC ना? ठीके.. चालेल.. जाऊयात.. " ती इतकी easily तयार झालेली बघून रवी खुश झाला आणि जोरात म्हणाला...

"येस्स्स्स.. KFC!!!" आणि त्याच्या जागेवर गेला.. त्याला तसं खुश झालेलं बघून मानवीला हसायला आलं..

इतक्यात कुणाशी तरी फोन वर बोलत सीमा त्यांच्या जागेवर आल्या.. त्यांनी राहुल च्या केबिन कडे नजर टाकली तर तो तिथे न्हवता.. त्यांनी काही विचार करून मानवी कडे नजर वळवली आणि म्हणाल्या..

"मानवी तुला business ट्रिप वर माझ्या ऐवजी जावं लागेल.. जाशील?"

त्यांचं बोलणं ऐकून मानवीचे डोळे मोठे झाले.. आणि ती घाबरून म्हणाली..

"मी? पण का मॅम ?"

 

 

************

क्रमशः

 

************

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..