Oct 18, 2021
कथामालिका

माझी मानवी... 41

Read Later
माझी मानवी... 41
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

मानवी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती तरी झोपेत पण थोडी खोकत होती.. कंडक्टर नि जेव्हा तिच्या स्टॉप च नाव घेतलं तशी ती खडबडून जागी झाली.. या स्टॉप वर कुणी उतरणार नाहीचे असं वाटून बस पुढे जाणार होती इतक्यात मानवी धडपडत तिच्या जागेवरून बाहेर आली.. "थांबा थांबा.. मला उतरायचंय" म्हणत.. बस थांबली आणि मानवी उतरून खाली गेली.. या गोंधळात तिने एकदाही शेजारच्या पॅसेंजर कडे पाहिलं नाही.. बऱ्याच वेळ मॅगझीन वर पकडून ठेवल्याने राहुल चा हात दुखत होता.. त्याने काचेतून मानवीला हळू हळू जाताना पाहिलं आणि स्वतःशीच म्हणाला.. "कुठंही झोपते हि मुलगी.. आता मला जाऊन माझी गाडी गाठली पाहिजे.. कुठंय पण मी आत्ता.." खिडकीतून बाहेर बघत तो विचार करत होता..  नेक्स्ट स्टॉप वर उतरून तो टॅक्सी करून पुन्हा त्याच्या गाडीच्या इथे गेला आणि मग गाडी घेऊन त्याच्या घरी गेला.. घरी जाऊन त्याच सगळं आवरे पर्यंत रात्रीचे ११ वाजत होते.. त्याने काही विचार करून १ इंटरनॅशनल कॉल लावला.. तो त्याने त्याच्या थेरपिस्ट ला लावला होता.. त्याला पावसात जो पॅनिक अटॅक आला होता त्या बद्दल आणि अजून काही गोष्टींच्या बद्दल त्याला clarification करून घ्यायचं होत.. त्याने कॉल केला तेव्हा तिकडे सकाळ होती.. पण थेरपिस्ट त्याच्या वडिलांच्या ओळखीचे असल्याने ते त्याचा कॉल कधीही अटेंड करायचे..

"हॅलो राहुल.. बोल रे.. कसा आहेस?"

"सॉरी डॉक्टर.. मी खूप सकाळी कॉल करतोय ना?"

"हो ना.. पण तू इंडिया मध्ये आहेस ना? तुझे वडील बोलले मला.. काय म्हणतंय इंडिया? उशीर झाला असेल ना तिथे? "

"हो.. मस्त आहे इकडे.. इकडे ११ वाजलेत.. "

"मग इतक्या उशिरा कसा काय कॉल केलास? एव्हरीथिंग गुड?" त्यांनी काळजीच्या स्वरात विचारलं..

"मला थोडं बोलायचं होत.. " असं म्हणून त्याने पावसात घडलेला सगळा प्रसंग सांगितला..

"हे बघ राहुल.. under extreme stress तुझा trauma परत येऊ शकतो.. त्यामुळे स्ट्रेस न होणं आणि झालं तरी त्या स्ट्रेस ची ताबडतोब काळजी घेणं हाच एकमेव उपाय आहे त्यावर.. It's best not to let yourself get bothered.."

"हम्म.. अजून १ विचारायच होत आणि.. "

"हां.. tell me.."

"उम्म्म.. someone who has nothing to do with me keeps overlapping with someone I knew from 15 years ago..पण असं का होतंय याच reason माझं मलाच कळत नाहीये.. आणि ज्या व्यक्तीला मी ओळखत होतो तीच मला आता unfamiliar वाटते.. I keep feeling as if ती व्यक्ती हि नाहीच आहे जिला मी ओळखत होतो.. "

"Hey man..It's a given that people change after 15 years.. १५ वर्षांच्या नंतर सुद्धा सेम च राहील तरी कसं कुणी ? तू तुझ्या पहिल्या प्रेमाबद्दल च बोलतोयस ना हे?"

"हो.. तुम्हांला कसं समजलं?"

"आता इतकी वर्ष आहेस तू माझ्या कडे थेरपी साठी.. एवढं तर माझ्या लक्षात राहणारच.. हे बघ राहुल.. तू तुझं पहिलं प्रेम विसरू शकला नाहीस त्याला कारण म्हणजे तुझ्यासाठी ती १ incomplete टास्क होती जी तुझ्या subconscious माईंड मध्ये कायम राहिलीये.. एकवेळ तुला मी मेडिकल टर्मिनॉलॉजि मध्ये explain करू शकेन.. पण.. तुमचा मधूनच कॉन्टॅक्ट तुटला होता त्यामुळे ते relation असं झालं कि तुला त्याचा शेवट कसा होणार किंवा झाला कि नाही..  ते सुद्धा माहिती न्हवत.. त्यामुळे तू तिला easily विसरू शकला नाहीस.. पण हे सगळं भूतकाळात घडलंय.. त्यामुळे मी तर म्हणेन कि तू त्या पास्ट लाईफ मधून बाहेर ये आणि प्रेझेन्ट मध्ये जग.. आणि २ व्यक्तींना compare करू नकोस.. तू उगाच स्वतःच्या डोक्यात गोंधळ घालून ठेवशील.."

  राहुल फोन ठेवल्यावर बराच वेळ ते जे बोलले त्यावर विचार करत होता..

 

*******

मानवी घरी न जाता त्यांच्या घर शेजारच्या बागेत येऊन बसली होती.. योगायोगाने स्नेहल पण आली आणि तिच्या शेजारी येऊन बसली..

"घरी का आली नाहीस ग?"

"अग औषध इतकी स्ट्रॉंग होती कि मी खूप पेंगत होते दिवसभर.. आता घरी जाऊन बेड वर पडले असते तर उद्याच उठले असते.. जरा रात्रीच्या वाऱ्यात बरं वाटतंय म्हणून बसले इथे.. "

"खाल्लंस की नाही काही अजून?"

"नाही ना.. तेच घरी गेल्यावर थोडासा सांजा करून खाऊया.. औषधा पुरता.. "

"वाटलंच होत मला तू असं काही तरी म्हणशील.. त्यामुळेच मी तुला आवडती ती राजस्थानी खिचडी घेऊन आले येतानाच.. microwave मध्ये गरम करून खाता येईल तुला.. "

"थँक्यू ग बायको.. " तिनी असं म्हटल्यावर मानवीच्या कपाळाला हात लावून ती म्हणाली..

"तरी बरं.. ताप नाहीये तुला काही.. जेव्हा पासून तू management डिपार्टमेंट सोडलंय तेव्हा पासून तुला जवळपास रोज च उशीर झालाय नाही का ग?"

"हम्म.. ठीके पण.. सवय झाली मला आता त्याची.. पण.. मी असं ऐकलंय कि फेस इंडिया मे बी discontinue  होऊ शकेल.. "

"discontinue ? म्हणजे? पूर्ण मॅगझीन च बंद होणार?" मानवीने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली..

"मी पण coincidentally ऐकलं.. ३ महिन्याचा वेळ आहे वाटतं.. नाही.. आता २ च महिने राहिले असतील बहुदा... ?! जर का सेल्स चे नंबर्स बूस्ट नाही करू शकलो तर या ३ महिन्याच्या वेळेत तर मला वाटतंय, तेव्हा discontinue करतील फेस इंडिया ला.. एडिटिंग टीम सगळी बरखास्त होणार हे नक्की.." तीच बोलणं ऐकून स्नेहल विचारात पडली.. तिने हळूच विचारलं..

"मग.. राहुल च काय होईल?"

" माहिती नाही ग.. इथे थांबायचं काही कारणच नसेल तर तो परत अमेरिकेला जाईल.. दुसरं काय होणार..? नाही का?"

"हम्म.. ऐक ना.. तू घरी जाऊन खाऊन घे.. मला १ urgent काम आठवलंय ते करून येते मी.. "

"उद्या नाही का करता येणार?"

"नाही.. नको.. मी आलेच जाऊन.. तू झोप.. मी माझ्या किल्लीने दरवाजा उघडेन.. बाय.. " असं म्हणून स्नेहल जवळपास पळत च पार्क मधून बाहेर निघाली..

राहुल ची न्यूज ऐकल्यापासून तिला काही सुचत न्हवत.. तिने तिच्या डोक्यातले विचार थोडे क्लिअर करायला म्हणून लॉंग ड्राईव्ह ला जायचे ठरवले.. पण गाडी चालवताना ती शेवटी तिच्याच हॉटेल मध्ये आली होती.. तिने गाडी पार्क केली आणि रेस्टॉरंट मध्ये गेली.. आणि तिची नजर रवी वर पडली.. रवीच्या समोर बिअर चा ग्लास होता आणि फक्त चिकन लॉलीपॉप होते.. एक पाय वर घेऊन तो २ लोकांच्या साठी असते त्या टेबल वर मोबाईल मध्ये डोकं घालून बसला होता..

रवी विचार च करत होता कि मानवीला फोन करून विचारावे का कि आता बरं वाटतंय का.. इतक्यात स्नेहल आली आणि तिने त्याच्या ग्लास मधली बिअर पिली.. तसा रवी मुद्दाम मोठ्याने बोलला.. "चोर चोर.. माझी बिअर.. " स्नेहल ने त्याच्या कडे रोखून पाहिलं तसं तो हसला आणि  म्हणाला.. "मी उष्टी केली होती ती.. म्हणून म्हटलो.. "

शेवटी स्नेहल ने पण तिच्या साठी १ बिअर ऑर्डर केली आणि रवी साठी अजून १ स्टार्टर ऑर्डर केलं.. दोघे मिळून बोलत खात पीत होते.. स्नेहल ने जेव्हा त्याला सांगितलं कि तिचा तो मित्र ज्याला ती त्याला भेटायला नेणार होती.. तो ३ महिन्यांनंतर पुन्हा तिच्या आयुष्यातून जाऊ शकतो.. त्यांच्यात अशा गप्पा झाल्यामुळे ते दोघे पण एकमेकांशी आता अरे तुरे करून बोलत होते.. तेव्हा रवी तिला म्हणाला..

"म्हणजे त्याच मुलामुळे तू इतकी अस्वस्थ आहेस? पण मला एक कळत नाही कि असा कोण आहे तो तुझ्यासाठी कि तू त्याला खोटं खोटं सांगायला तयार आहेस कि तुझं लग्न ठरलंय म्हणून?" स्नेहल त्याला बोलताना ऐकत होती पण ती डोकं हातात धरून तिच्या बिअर च्या ग्लास कडे बघत बसली होती.. "स्टॉकर आहे का तो?" ती काही बोलत नाही बघून रवीच म्हणाला.. काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून ती म्हणाली..

"तसं नाही.. पण मी त्याला भेटलं नाही पाहिजे.. कारण मी जितक्या वेळा त्याला भेटते तितक्या वेळा माझ्याही नकळत मी त्याच्या प्रेमात पडते.. जे कि चुकीचं आहे.. आणि मला जितका तो जास्त आवडतोय तितकीच मी uneasy होतीये.. असं सतत दडपणाखाली कधी राहिली नाहीये ना मी.. पण कशाही पेक्षा.. तो असा माणूस आहे ज्याच्या मी प्रेमात पडल च नाही पाहिजे.. "

रवी तिच्या कडे लक्ष देऊन बघत होता.. ती उत्तर तर देत होती पण तिची नजर अजूनही त्या बिअर च्या ग्लास वर च होती.. ती त्याच्याशी कमी आणि स्वतःशीच जास्त बोलत होती.. तिचा मूड जरा चांगला करायला त्याने एकदम आश्चर्यचकित व्हायची acting केली आणि म्हणाला..

"married आहे तो?" तशी स्नेहल सरळ बसत त्याच्या कडे बघून वैतागत जोरात म्हणाली..

"अजिबात नाही.. काहीही काय.. "

"तसं पण नाही? स्टॉकर पण नाही.. मग.. ओह.. म्हणजे minor आहे..? तसं काळजी च कारण नाही आजकालची मुलं फार लवकर मोठी होतात पण तरी.. minor म्हणजे जरा.. " आता त्याच्या अंगावर जोरात ओरडत ती म्हणाली..

"नाही.. असलं काही नाहीये.. तुम्ही समजता काय मला ते असली इमॅजिनेशन होते तुमची मला भेटून?" तो मानवीचा फोन आल्यावर तिने ‘बायको’ असं म्हटल्यावर पण असलंच काहीतरी बोललेला हे ती विसरली न्हवती.. पण तिची अशी reaction बघून आणि ती अरे तुरे वरून पुन्हा अहो जाहो वर आलेली बघून,  तो मात्र हसून म्हणाला..

"हे पण नाही? मग प्रॉब्लेम काय आहे?"

"it's just that..I should have stopped liking him sooner.. पण माझं मला जमेना तसं थांबायला म्हणून मी तुला विचारलं ना मदती साठी.." ती पुन्हा नॉर्मल ला आलेली बघून रवी एक एक पॉईंट मांडत म्हणाला..

"हे बघ.. तो married नाहीये, सायको स्टॉकर नाहीये आणि minor पण नाहीये.. तुझ्या बोलण्यावरून तर तो खूप चांगला माणूस वाटतो.. इतका चांगला माणूस तुला आवडत असेल तर आवडत राहू दे ना.. तू स्वतःला फोर्स कशाला करते थांबवायचा? भेटत राहा ना त्याला.. काय फरक पडतो.. ?"

"ते इतके सोपे नाहीये.. "

"प्रेम कधीच सोप्प नसतं आणि प्रेमात थोडा craziness तर valid आहे ना? या असल्या लाईन्स तर movies मध्ये पण वापरतात.. be crazy.. उगाच अवघडात शिरून त्याला तुझं लग्न ठरलंय असं सांगून गोष्टी complicate करण्यापेक्षा जस्ट लेट yourself crazy in love.. don't look back and regret, just go for it.."

रवी च बोलणं ऐकून स्नेहल चा या सगळ्या कडे बघायचा दृष्टिकोन च बदलला.. प्रेम तर ती करायला लागली होती.. त्यांचं खाऊन पिऊन झाल्यावर  तो त्याच्या रूम मध्ये गेला आणि काहीसं आठवून स्नेहल त्यांच्या हॉटेल चा कचरा गोळा करणाऱ्या cleaning स्टाफ च्या रूम मध्ये गेली.. कुणी चुकून तिने ते फेकून दिलेले हिल्स चे शूज ठेवलेत का हे पाहत होती.. तिला स्वतःलाच ती त्या शूज च्या दुकानात सेल्स assistant ला जे म्हणाली होते ते आठवले.. "I am the type of person that needs to get everything I set my heart on.." जिथे एका छोट्याशा वस्तू साठी आपण मागे पुढे न बघता, त्रास होतोय हे कळून सुद्धा ती मिळवली.. आता इथे तर हे आपलं प्रेम आहे.. इथे आपण थोडा स्वार्थ दाखवला तर बिघडलंच कुठे.. जे होईल ते बघू.. इतक्यात तिला तिथे शोधा शोध करताना एका स्टाफ मेंबर ने पाहिलं आणि तिला ते शूज चा बॉक्स देऊन म्हटले..

"एवढे सुंदर न वापरलेले शूज बघूनच आम्हाला वाटलं होत कि कुणीतरी चुकून कचऱ्यात टाकले कि काय म्हणून च आम्ही ते बाजूला काढून ठेवलेले.. " त्या शूज कडे बघत स्नेहल ने विचार केला..

"हे असे काहीतरी आहे जे माझ्या स्वत: च्या इच्छेची पर्वा न करता माझ्यासाठी जबरदस्तीने संपेल.. पण.. even if i get hurt, i want to try it..या रस्त्यावरून जितके लांब जाता येईल तितके मला जायचे आहे.. "

 

*****

 

इकडे मानवी घरी तिच्या बेड वर बसून हातात तो पझल चा तुकडा घेऊन विचार करत होती जे आज ऑफिस मध्ये घडलं होत त्यावर.. जेव्हा ऑफिस मध्ये तीच डोकं राहुल ने हातावर झेललं होत तेव्हाच १ फोन आला होता आणि त्या फोन च्या रिंग ने तिची झोपमोड झाली होती.. पण जेव्हा तिच्या लक्षात आलं कि तीच डोकं राहुल ने पकडलंय तेव्हा तिने पुन्हा डोळे बंद करून झोपायचं नाटक केलं होत.. तिला ते आठवलं आणि तिच्या छातीत धडधडायला लागलं.. आपण फारच विचार करतोय असं वाटून तिने डोकं झटकला आणि तीने तो पझल चा तुकडा तिच्या बेड च्या साईड ला असलेल्या टेबल वर ठेवला आणि झोपी गेली..

 

*****

राहुल ने १ humidifier मानवी साठी घेताना स्वतः साठी पण घेतले होते.. त्याच्या बेड च्या बाजूला त्याने ते ठेवले होते त्याच्या कडे बघून तो उठून मार्कर घेऊन आला.. आणि मानवीने त्याच्यावर जशी स्माईली फेस draw केला होता तसा त्याने पण केला.. आता त्या कडे बघून त्याच्या पण चेहऱ्यावर स्माईल आली..

 

 

वाचकहो आजही मानवीला हे माहितीच नाहीये कि राहुल बस मध्ये पण तिच्या सोबत होता.. राहुल ला ऑफिस मधली मानवी भयानक कुरळे केस आणि मोठ्या चष्म्या मध्ये दिसतीये तरीही त्याला तिची वाटणारी काळजी कमी नाही झाली.. म्हणजेच तिच्या दिसण्याचा फरक त्याला पडला असता असं आता वाटत नाही, हो ना?  ती अगदी सुरुवातीलाच अशीच भेटली असती तर स्नेहल आणि राहुल कधी भेटलेच नसते.. आणि भेटले असते तरी मानवीचा राहुल आहे असं म्हणून भेटले असते.. स्नेहल ने जरी राहुल ला डेट करायचा निर्णय घेतला असेल तरी आता राहुल तिच्यामध्ये त्याच्या आठवणीतल्या मानवीला शोधेल का? तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हळू हळू मिळतील.. असेच प्रेम करत राहा माझ्या मानवी वर..

 

************

 

क्रमशः

 

************

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..