Oct 24, 2021
कथामालिका

माझी मानवी... 44

Read Later
माझी मानवी... 44

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

सीमा मॅम फोन ठेवल्यावर स्वतःशीच म्हणाल्या.. "वेड लागायची पाळी आलीये आता तर.."

त्यांनी राहुल च्या केबिन कडे नजर टाकली तर तो तिथे न्हवता.. त्यांनी काही विचार करून मानवी कडे नजर वळवली आणि म्हणाल्या..

"मानवी तुला business ट्रिप वर माझ्या ऐवजी जावं लागेल.. जाशील?"

त्यांचं बोलणं ऐकून मानवीचे डोळे मोठे झाले.. आणि ती घाबरून म्हणाली..

"मी? पण का मॅम ?"

"सॉरी पण तुला जावंच लागेल माझ्या ऐवजी या business ट्रिप वर.."

"का?" ती तरी पण का म्हणून विचारतीये म्हटल्यावर त्यांनी सांगितलं..

"Mr. Taylor च्या सेक्रेटरी नि कॉल केला होता आत्ता त्या कॉलॅबोरेशन च्या संदर्भात.. तुला माहितीये ना ते किती मुश्किलीने तयार झालेले आहेत ते.. तूच तर गेलेली घेऊन राहुल सरांना एअरपोर्ट वर.. " मानवी मनात म्हणाली," ते तर मी कधीच विसरू शकणार नाही.." ती पुढे त्या काय बोलतायत ते ऐकू लागली..

"तर त्यांनी आत्ता कॉल करून सांगितलं कि आत्ता ते फर्स्ट draft पाठवतायेत आणि तो चेक करून मला आजच्या आज त्यांना द्यावा लागेल म्हणजे सोमवारी आपल्याला हातात काहीतरी येईल त्यांच्या कडून.. आता हे काम करण्यात माझा दिवस जाईल.. आणि हे महत्वाचं आहे, त्यामुळे दुसऱ्या कुणावर सोपवून मी जाऊ पण नाही शकत.. तू काळजी करू नकोस, तिथे तू एकटी नसणारे विशाल आणि रिया आहेत ना तुझ्या बरोबर.. " एव्हाना त्यांना पण कल्पना होतीच कि राहुल ला थोडी घाबरते मानवी ते.. त्यामुळे तिचा चेहरा बघूनच त्यांनी शेवटी तस सांगितलं.. मानावी अजूनही विचारात पडलेली आहे हे बघून त्या म्हणाल्या..

"९ वाजलेत मानवी.. तुला आत्ता लगेच खाली गेलं पाहिजे.. सगळे माझी वाट बघत खाली थांबले असतील.. जा पटकन जाऊन उभी राहा.. राहुल सरांना पण सांग.. "

"पण मॅम.. overnight स्टे आहे.. आणि मी तर काही कपडे पण नाही आणले.. " तशा त्यांची छोटी बॅग तिच्या हातात देत म्हणाल्या.. हि घे.. यात माझा १ टॉप आहे, १ nightdress आहे.. आणि नवीन undergarments आणि टूथब्रश पण आहे..तुझी माझी साईझ एकच आहे सो नो प्रॉब्लेम.. हे घे आणि निघ आता लगेच.. " तिला घाई करत त्या म्हणाल्या..

"पण मॅम.. "

"मानवी अग थांबलेत ते खाली.. जा पटकन.. गरज नसती इथे माझी तर असं एलेव्हन्थ आवर ला मी पण नसतंच सांगितलं ना तुला.. जा पटकन आता.. "

मानवी नाईलाजाने जायला निघाली.. ती पटकन तिच्या डेस्क कडे आली तिची सॅक घेतली आणि जायला निघाली.. हे सगळं रवी ने पण पाहिलं होत तरी ती जायला निघाल्यावर तो मागून "मानवी.. KFC.. " असं म्हणालाच.. तेव्हा वैतागून तिने डोळे फिरवले..

 

मानवीच्या आधीच रिया आणि तिच्या नंतर विशाल त्यांचं काम सॉर्ट आऊट करून ऑफिस मधून बाहेर पडले होते.. आज रिया तिची गाडी घेऊन आली होती.. जिथे राहुल त्याची गाडी घेऊन थांबणार होता तिथे ती आधीच येऊन थांबली.. विशाल ला येताना तिने पाहिलं आणि तिच्या खिडकीची काच खाली करून तिने त्याला हाक मारली आणि म्हणाली..

"विशाल इकडे ये.. " विशाल गोंधळून तिच्या जवळ गेला आणि म्हणाला..

"हि गाडी का?" तशी ती हसून म्हणाली..

"आपण दोघे या गाडीतून जाऊया.. "

"पण आपलं तर राहुल सरांच्या गाडीतून सगळ्यांनी जायचं ठरलं होत ना? ते म्हणाले पण मी यायच्या आधी कि मी निघतोच तू हो पुढं म्हणून.. येतील च ते आता गाडी घेऊन.." जिकडून पार्किंग मधून गाड्या बाहेर पडतात तिकडे बघत तो म्हणाला.. तसा पटकन विचार करत रिया म्हणाली..

"अरे आपल्या चौघांचे सामान जास्त होईल ना? प्रत्येकाची १ बॅग म्हणजे.. आणि जायचंय पण लांब आपल्याला तर २ गाड्या असलेलं बरं पडेल.. मी ऑलरेडी सीमा मॅम ना आणि राहुल सरांना सांगून ठेवलंय.. चल ना पटकन.. बस.. "ती हसून म्हणाली तसा थोडा विचार करत विशाल तिच्या गाडीत जाऊन बसला आणि म्हणाला..

"पण मला कुणीच सांगितलं नाही कि आपण separately प्रवास करणार आहोत ते.. "

"सांगितलं ना पण मी तुला जे ठरलं ते.. " असं म्हणत ती एकदम त्याच्या जवळ आली.. ती एकदम अशी त्याच्या चेहऱ्याच्या जवळ आलेली बघून विशाल सीट मध्येच अजून लांब सरकला.. आणि अवघडून म्हणाला.. "हे काय करतीयेस तू?" तशी हसून तिने त्याचा सीट बेल्ट ओढून घेत लावला आणि म्हणाली..

"सीट बेल्ट लावत होते.. तुला काय वाटलं?" त्याचा गोंधळलेला चेहरा बघून ती हसत म्हणाली..

"विशाल काहीही विचार करतोस हां तू.. " तो गडबडून म्हणाला..

"मी नाही काही विचार केला.." तशी अजूनच हसत आणि स्वतःचा सीट बेल्ट लावत ती म्हणाली.. "चेहरा बघ तुझा.. चल जाऊया.. " असं म्हणत तिने गाडी चालू केली आणि ते तिथून निघाले..

 

इकडे मानवी धावत खाली आली तेवढ्यात राहुल पण त्याची गाडी घेऊन आला होता.. तो गाडीतून उतरून पाहतच होता कि अजून आले का नाहीत सगळे.. इतक्यात मानवी त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली आणि म्हणाली..

"राहुल सर.. सीमा मॅम ना Mr. Taylor च्या सेक्रेटरी नि कॉल केला होता आत्ता त्या कॉलॅबोरेशन च्या संदर्भात आणि त्यांनी आत्ता कॉल करून सांगितलं कि आत्ता ते फर्स्ट draft पाठवतायेत त्यामुळे सीमा मॅम च्या ऐवजी मला जायला सांगितलं त्यांनी.. " तिने एका दमात सगळं सांगितलं.. तिला असं धावत येताना बघून तो थोडा गोंधळला होताच.. तीच स्पष्टीकरण ऐकल्यावर तो नुसता "हम्म.. ठीके.." म्हणाला.. आणि विशाल आणि रिया ची वाट बघू लागला.. मानवी आणि तो दोघे एकमेकांच्या कडे चोरून बघत होते आणि नजरा नजर झाली कि पुन्हा इकडे तिकडे बघत होते.. दोघांना वाट बघत २ मिनटे झाली.. मानवी ने तोवर सीमा मॅम नि दिलेली बॅग त्याच्या गाडीच्या डिकी मध्ये ठेवली.. तरी अजून त्या दोघांचं यायचं चिन्ह न्हवते हे बघून राहुल ने तिला विचारले..

"इंटर्न तू निघालेलीस तेव्हा ते होते का ऑफिस मध्ये.. "

"सर मी लोला मॅम च्या केबिन मध्ये होते इथे यायच्या आधी त्यामुळे येताना इकडे तर नाही दिसले.. दुसरीकडे कुठं कामानिमित्त असतील गेले तर नाही माहिती.." मानवी ने खरं काय ते सांगितलं..

"ओके.. " तिच्या कडे बघत तो म्हणाला.. नेहमी पेक्षा त्याची नजर जरा जास्त वेळ तिच्यावर राहिलेली बघून ती पुन्हा ऑफिस च्या entrance कडे बघत त्या दोघांची वाट पाहू लागली.. राहुल पण इकडे तिकडे बघत होता.. इतक्यात तिच्या नजरेत राहुल ने जे ब्लेझर घातले होते त्याचा कॉलर च्या इथे धागा निघालाय हे लक्षात आल..तिने तिचा हात त्याच्या कॉलर च्या जवळ नेला नसेल इतक्यात राहुल मागे सरकला आणि प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं तशी ती म्हणाली.. "ते धागा आहे तिथे.."

"मी करतो.. " असं म्हणत त्याने स्वतः च तो धागा काढला.. तो असा एकदम मागे सरकलेला तिच्या लक्षात आलं.. त्यामुळे आपण आपलं विशाल बरोबर च राहू, उगाच नको अजून काही चुका व्हायला आपल्याकडून असा विचार करून ती पुन्हा मागे वळून विशाल आणि रिया ची वाट बघू लागली..

 शेवटी राहुल ने त्याचा मोबाईल काढला आणि त्यांना कॉल च करूया म्हणून पाहिलं तर रिया चा मेसेज आला होता..

"राहुल सर.. मला आणि विशाल ला एक महत्वाचं काम उरकून यावं लागेल.. आम्हाला थोडा वेळ लागेल.. तुम्ही पुढे जावा.. आम्ही काम संपवून माझ्या गाडीने येऊ.. " राहुल नि मोठा उसासा सोडला तसं तिने विचारलं "काय झालं सर?" तसा त्याने त्याचा मोबाइल च तिच्या तोंडासमोर धरला.. आता रिया चा मेसेज वाचून मानवी गडबडली.. आता राहुल ला पण काय करावं ते कळेना.. शेवटी गाडी मध्ये तो जाऊन बसला आणि काही न बोलता मानवी पण त्याच्या शेजारच्या सीट वर जाऊन बसली.. पण आता हा पूर्ण प्रवास हे दोघेच एकत्र असणार हे जाणवून तिच्या पोटात आत्ताच गडबडायला लागलं होत..

दोघांचा प्रवास चालू झाला होता आणि गाडी मध्ये पिन ड्रॉप शांतता होती.. मानवी विचार करत होती.. "किती awkward silence आहे हा.. काही सुद्धा बोलत नाहीये हा.. मी माझ्या श्वासाचा पण आवाज ऐकू शकतीये.. " काही विचार करून तिने खिडकीची काच खाली केली.. आणि म्हणाली..

"wow.. आज किती छान हवा आहे.. " तसा राहुल रस्त्यावरून नजर न हटवता म्हणाला..

"काच बंद कर.. वाऱ्याचा आवाज येतोय.. "

"ओके सर.. " म्हणत तिने काच बंद केली.. झालं.. तेवढं च बोलणं.. पुन्हा तोच awkward silence.. इतक्यात तिला तिच्या समोर च्या डॅशबोर्ड वर त्याचे sunglasses दिसले.. ती त्याला हात लावणार इतक्यात तो म्हणाला.. "तुझ्या बोटांचे ठसे उमटतील.. " तसा तिने हात मागे घेतला.. तिने रस्त्यावर एक नजर टाकत म्हटले..

"आपण जिथे ब्रेक घेऊ तिथून मी गाडी चालवेन सर.. तुम्ही थोडा वेळ रेस्ट कराल.. "

"आपण नॉन स्टॉप जाणार आहोत.. "

"ओके सर.. गुड आयडिया.. "  पुन्हा थोड्यावेळ गाडीत शांतता पसरली.. न राहवून मानवीने रेडिओ लावायला हात पुढे केला तसा राहुल ने हातानेच नाही असं खुणावलं आणि वैतागून म्हणाला..

"आपण काय पिकनिक वर चाललोय का?"

"नाही.. " एकदम बारीक आवाजात ती म्हणाली.. तसा अजून थोडा कडक आवाज काढत तो म्हणाला..

"माझ्या डोक्यात बरेच विचार असतात इंटर्न.. शांततेत गेलो तर मला जरा बरं वाटेल.. जमेल गप्प बसायला? एक सुद्धा आवाज नकोय तुझ्या कडून मला.. "

त्याने असं म्हणायला आणि मानवीच्या पोटाततून गुडगुड आवाज यायला एकच गाठ पडली.. आज घाईघाईत तिने नाश्ताच केला न्हवता.. आता भुकेने पोट आवाज करायला लागले.. तसा तिच्या कडे बघून तो म्हणाला..

"समोरचा ग्लोव्ह बॉक्स उघड.. त्यात थोडे प्रोटीन बार आहेत ते खा तात्पुरते.. "

"ठीके सर.. नको.. " घरात स्नेहल पण निम्मा फ्रिज प्रोटीन बार नि भरून ठेवायची तेव्हा मानवी वैतागायची.. तीला अजिबात इच्छा व्हायची नाही पण राहुल नि आत्ता जो जळजळीत कटाक्ष टाकला तशी तीने पटकन त्यातला १ प्रोटीन बार काढून खायला सुरुवात केली.. मानवी खाता खाता विचार  होती.. "याला नक्की झालंय काय? पुन्हा हा आखडू सारखा वागायला लागला? असच वागायचं होत तर मला तो  humidifier का दिला? त्याची नजर मलाच वाटली होती कि काय वेगळी? काही समजत च नाही याचं.. "

प्रवासाला सुरुवात होऊन अजून तास पण उलटला न्हवता तरी हा रस्ता कधी संपणार असं तिला आत्ता च वाटू लागलं होत..

 

************

क्रमशः

 

************

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..