माझी मानवी... 15

A story about love, friendship, kindness and relationships

लोला मॅडम एका high end फॅशन बुटीक मध्ये शॉपिंग ला आल्या होत्या.. शॉपिंग करता करता त्यांचा त्यांच्या भाच्या बरोबर कॉल पण चालू होता.. त्यांचा तो कॉल अजून १ व्यक्ती ऐकत होती..

"आज माझ्या बरोबर डिनर ला असशील ना तू?"

"का म्हणून काय विचारतोयेस? मला माझ्या भाच्या बरोबर जेवावं वाटत असेल तर चुकीचं काय आहे त्यात?"

"आपण एका छताखाली राहतो पण भेटूच शकत नसेल तर काय उपयोग ? आणि तू मला ऑफिस मध्ये सुद्धा तुला ओळख दाखवायची नाही अशी ताकीद देऊन ठेवलीयेस.. याला काय अर्थय? "

"काय? बरं.. ठीके ठीके.. कळालं.. " एवढं बोलून त्यांनी कॉल कट केला..

लोला मॅडम त्या section मधून दुसरी कडे गेल्या आणि ब्युटी टीम मधली रिया ती लपून बसलेली तिथून बाहेर आली.. तिला या शॉप मधून काही items collect करायला पाठवलं होत.. आता ती विचार करायला लागली..

"ओह माय गॉड.. म्हणजे पटवर्धन ग्रुप चा वारस, त्यांचा मुलगा आमच्या ऑफिस मध्ये काम करतो? हि तर ब्रेकिंग न्युज आहे.. नाही नाही हि सोन्याची खाण आहे.. या बद्दल कुणाला कळायला नको.. नाहीतर ऑफिस मधल्या मुली त्याच्या मागे लागतील.. मलाच शोधून काढलं पाहिजे कोण आहे तो..  आधी शोधून काढते तो आहे तरी कोण नक्की.. " तिने असं ठरवलं आणि परत ऑफिस कडे यायला निघाली..

**********

सीमा मॅम नि मानवीला १ कुरिअर घ्यायला खाली पाठवलं होत.. तिने ते पार्सल घेतलं इतक्यात तिला सीमा मॅम चा फोन आला..

"मानवी मिळालं असेल पार्सल तर लगेच वर ये.. "

"हो हो मॅडम.. जस्ट मिळालं.. येतेच मी वरती आता.. " असं फोन वर बोलत आणि एका हातानी तो जड बॉक्स सांभाळत मानवी चालायला लागली आणि पायात पाय अडकून पडणार इतक्यात तिला मागून कुणी तरी खांद्याला पकडून उभं केलं..

"थँक यु.." तिने मागे वळून तिला वाचवणाऱ्याला म्हटलं.. आणि राहुल आहे हे बघून तिच्या हातातला तो बॉक्स खाली पडला..

"तुला कामातलं काही येत नाही हे तर कळालं होत मला.. आता सरळ चालता पण येत नाही का? काय येत मग तुला?" एवढं बोलून तो लिफ्ट च्या दिशेने चालायला लागला..

आता मात्र मानवी च डोकं सटकलं..

"काय म्हणाला हा मला आत्ता? मी केलंच काय होत असं बोलायला त्याने.. मी काही उलट उत्तर देत नाही म्हणजे मला काही बोलता येत नाही असं वाटलं काय याला? समजतो काय हा स्वतःला.. " स्वतःशीच काही ठरवत मानवी उठली आणि त्याला मागून हाक मारत तिने त्याला लिफ्ट च्या तिथे गाठलंच..

"राहुल सर.. एक मिनिट थांबा.. "

लिफ्ट च्या इथे थांबलेला राहुल म्हणाला, "काही बोलायचं होत का?"

मानवी ने विचार केला आता बोललं च पाहिजे असं ना तस.. जॉब तर सोडणार च आहे ना.. मग काय फरक पडतो.. मी rudely बोलत नाही ह्याचा अर्थ असा तर नाही कि मला वाट्टेल ते बोलेल आणि मी ऐकून घेईन.. मी या टीम मध्ये काय माझ्या मर्जीने आलेले का? माझी गरज आहे म्हणून मला इथे पाठवलं गेलंय.. थोडी ना मी माझ्या चॉईस नि आलीये इथे.. मला तर टीम मीटिंग अटेंड करायच्या आधी पर्यंत माहिती न्हवत कि माझा exact रोल काय आहे टीम मध्ये.. मी काय इनपुट देणार होते तिथे ते तुम्ही मला असं घालून पाडून बोललात.. मी असे insults सहन करायला नाही आलेली इथे.. माझं बॅकग्राऊंड जॉब च काहीही माहित नसताना as a deputy chief editor असं बोलणं तुम्हाला तरी शोभत का?

"काही बोलायचं होत का?" राहुल नि परत विचारलं.. कारण हे सगळं ती जे बोलली होती ते मनातल्या मनात च बोलली होती.. तो तिच्या तोंड कडे पाहत ती पुढे काही बोलायची वाट पाहत होता.. तिच्या तोंडातून काही शब्द फुटेना म्हटल्यावर

"ठीके मग काही नसेल बोलायला तर.. " असं म्हणून त्याने लिफ्ट च बटन दाबलं आणि लिफ्ट मध्ये शिरला..

"१ मिनिट सर.. १ मिनिट.. मला बोलायचंय " असं म्हणत मानवी पण त्याच्या मागून लिफ्ट मध्ये चढली..

लिफ्ट मध्ये राहुल पुन्हा त्याच्या टॅब मध्ये डोकं घालून काहीतरी पाहत होता आणि मानवी त्याला सांगायचा प्रयत्न करत होती..

"सो..उम्म्म्म...  मला ते.. हां.. काल स्टुडिओ मध्ये माझ्या कडून जे झालं त्या बद्दल मी माफी मागते.. पण.. मला.. "

तिला पुढे बोलू न देता राहुल म्हणाला.. " तुला तुझी चूक कळाली आहे ना.. तर मग पुन्हा असं होऊ देऊ नकोस.. "

"थँक यु .. पण.. मला.. मला असं वाटतंय कि.. म्हणजे.. I do feel wronged in some aspects..म्हणजे मला जशी वागणूक मिळाली.. म्हणजे.. उम्म्म्म... म्हणजे actually मी management डिपार्टमेंट मधून आहे.. "

आता तिला मध्येच थांबवून पण टॅब मधून मान सुद्धा वर न करून तो म्हणाला.. "तू फॉरेन वरून आलीयेस का?"

"हां ? नाही तर.. सॉरी.. मला नाही.. ?" न कळून मानवीने विचारले..

"मग तू तुझ्या प्रत्येक sentence मध्ये "उम्म्म्म्म " , "सो.. " आणि "म्हणजे" असे शब्द का वापरतेस ? Don't tell me you have speaking disability.."

मानवीनी आता हद्द झाली या माणसाची असा हार मानल्या सारखा चेहरा केला.. पण त्याचा उलटच परिणाम झाला.. राहुल म्हणाला..

"तुला काय म्हणायचंय ते आधी ठरव आणि मग ये बोलायला.. नाहीतर आत्ता लिफ्ट ओपन व्हायच्या आत काय ते बोल पटकन..I don't like wasting my time with useless things.. " शेवटचं वाक्य त्याने थोडं तिरस्काराने बोललं हे मानवीला जाणवलं.. आता काय तो सोक्ष मोक्ष लावायचाच या दृष्टीने ती म्हणाली..

"मला माहितीये कि तुम्हाला मी आवडत नाही कारण मी काल स्टुडिओ मध्ये चूक केली.. पण.. why do you hate me so much? " न राहवून तिने विचारलंच.. आता राहुल चा आवाज किंचित वाढला.. तो ओरडून बोलत न्हवता पण त्याच्या आवाजाला एक धार होती..

"Your poor work skills, lacking quality, unprofessional attitude and most importantly तुझ्या सारख्या व्यक्तीच नाव मानवी कुलकर्णी आहे.. I feel like हे नाव तुझ्या साठी जरा जास्तच चांगलं आहे.. No no.. Let me rephrase that.. तू त्या नावाच्या लायकीची नाहीयेस.. तू ज्या कुठल्या टीम मधून काम करत असशील.. जर का ते म्हणतात तशी तुझ्या कामाची quality असेल तर ठीके.. पण नसेल तर तू इथे काम करायला qualified नाहीयेस.. आणि तुला हि टीम आवडत नसेल तर जस्ट leave ! प्लीज.. नाहीतर मी तुला काढून टाकेन.. "

"काढून टाकेन म्हणजे? " मानवी ने विचारलं.. इतक्यात लिफ्ट च दार उघडलं.. बाहेर पडता पडता राहुल म्हणाला.. " Means I'll fire you.. Anytime.."

मानवी पटकन बॉक्स ठेवून बाथरूम मध्ये पळाली.. ती तोंडावर पाण्याचे हबके मारत होती.. तिच्या डोक्यात राहुल बोलला होता ती वाक्य घुमत होती..

तिने मोठे मोठे श्वास घेतले.. एकदा खात्री करून घेतली कि कुणी नाही तर बाथरूम मध्ये.. tissue पेपर नि तोंड पुसलं आणि त्याच बोळ्यामध्ये जोरात किंचाळली.. ती स्वतःशीच बोलत होती..

" हा नालायक, तो nice, इनोसंट राहुल नाहीये ज्याला मी ओळखत होते.. त्याच्या बरोबरच्या त्या सुंदर आठवणींनी तुझं पोट भरलंय का मानवी ? कि त्यांच्या मुळे  तुला हातात कुणी सॅलरी आणून दिलीये..? First love, my foot! आज पासून तो पण माझ्या साठी same नाव असलेला एक अनोळखी माणूस असेल जशी या घडीला मी आहे त्याच्या साठी.. खड्ड्यात गेला यार हा.. आणि काय म्हणाला.. I'll fire you ? तू मला fire करणार? (स्वतःशीच हसून पुढे मानवी म्हणाली ) या आधी कंपनी बंद झाल्यात पण कुणी मला आजवर कामावरून काढलेलं नाही.. आणि आता तर मी कधीच सोडणार नाही हि कंपनी.. I will never allow myself to be fired by you Rahul Avasthi! Never !!"

मानवी आता ताठ मानेंनी पुन्हा ऑफिस मध्ये गेली आणि जाऊन तिच्या जागेवर बसली..  

*********

ब्युटी टीम मधली रिया तिच्या जागेवर बसून विचार करत होती.. "पटवर्धन ग्रुप चा वारस, त्यांचा मुलगा आमच्या ऑफिस मध्ये काम करतो.. पटवर्धन ग्रुप- सगळ्यात श्रीमंत, construction मध्ये असलेली त्यांची कंपनी आहे, लॉजिस्टिक, फॅशन, फायनान्स आणि कबड्डी प्रो ची १ टीम पण आहे त्यांची.. त्या पटवर्धन ग्रुप चा वारस, त्यांचा मुलगा आमच्या ऑफिस मध्ये काम करतो.. कोण असू शकेल तो.. एक तर इथे surname ने बोलायची काही सोय च नाहीये... सगळे एकमेकांना फर्स्ट name नि च बोलावतात.. आता ID कार्ड वर असेल हि नाव पण ते चेक कस करणार? सगळे जण एक तर खिशात ठेवतात नाहीतर बॅग मध्ये.. आणि तस चेक करणं suspicious वाटेल.. नकोच तस.. पण कोण असू शकत? (ती आजू बाजूला पाहत विचार करत होती.. ) विजय सर? नाही.. श्यक्यच नाही.. एक रुपाया सोडत नाहीत.. फुकट दिलं तर expired झालेलं माझं yogurt ड्रिंक पण पिलं होत त्यांनी.. आणि दिसतात कसे..ewww... त्यांच्या बरोबर मला जमणार पण नाही प्रेमाने बोलायला.. मग विशाल असेल? हां ! श्यक्यता नाकारता येत नाही.. त्याच वय लहान आहेच पण तो कपडे पण कसले छान घालतो.. He gives off a subtle rich vibe! या दोघांच्या शिवाय अजून कोण आहे.. हां.. रवी.. रवी सर जॉईन पण जस्ट च झालेत.. पण तेहि विजय सरांच्या सारखेच फुकटे आहेत.. नसावेत ते.. I mean he doesn't look anything like a rich kid.. ओह.. कोण आहे ते मला लवकरात लवकर शोधलं पाहिजे.. जसं मी ऐकलं तस दुसऱ्या मुली पण ऐकायची श्यक्यता आहेच ना.. मग तर मला जो कुणी असेल त्याच्या बरोबर चान्स मिळायची probability पण कमी होईल.. "

इतक्यात लोला मॅम नि त्यांच्या शॉपिंग बॅग्स घेऊन एन्ट्री केली.. त्यांच्या येण्याने थोडी गडबड कमी झाली आणि त्यांच्या बोलण्या कडे सगळे लक्ष देऊ लागले..

"विशाल हे सगळं माझ्या केबिन मध्ये नेवून ठेव.. थँक्यू.. "

विशाल ने त्यांच्या हातातून सगळ्या बॅग्स घेतल्या.. रिया हे पाहत होती.. इतक्यात राहुल कामानिमित्ताने बाहेर जायला निघाला होता त्याची मॅम सोबत तिथेच गाठ पडली.. त्यांनी त्याला आडवून विचारलं..

"Mr. Rahul are you free tonight ? आज तुमच्या येण्या निमित्ताने तुमची वेलकम पार्टी दिली असती आपण स्टाफ ला.. "

"सॉरी पण मला काम आहे.. मला वेळ नाहीये मॅम.. "

"ओह.. मग उद्या ?"

"नाही.. उद्या पण नाही.. "

"मग परवा?"

"For the time being, मी बिझी च असणार आहे.. तुम्ही मला पकडू नका कोणत्या प्लॅन मध्ये.. "

"ओह.. पण एखादी संध्याकाळ तुम्ही नाही काढू शकणार का एका स्टाफ च्या डिनर साठी? फक्त १ तरी at least ?"

"हि माझी वेलकम पार्टी आहे ना? सो अंडर माय ऑथॉरिटी, मी माझी पार्टी झाली असं पकडून चालतो.. मग तर झालं? जाऊ मी आता..? बाय.. "

त्यांना पुढे काही बोलायचा चान्स पण न देता तो तिथून निघून पण गेला.. सगळ्यांच्या कडे वळून लोला मॅम म्हणाल्या..

"काही हरकत नाही.. खरच खूप बिझी दिसतायेत ते.. आपण पुन्हा कधी तरी करू पार्टी.. " सगळ्यांनी त्यांच्या बोलण्याला होकारार्थी मान हलवली.. आता  त्याही त्यांच्या केबिन मध्ये गेल्या..

ते दोघेही गेल्यावर लगेच मुली घोळका करून बोलायला लागल्या, त्या मानवीच्या शेजारच्याच cubicle मध्ये गोळा होऊन बोलत होत्या.. मानवीला त्यांचं बोलणं ऐकू जात होत..

"पाहिलंस? How rude!" एक जण म्हणाली..

"हो ना.. I mean.. काही झालं तरी त्या कोण आहेत हे माहिती असणारच आहे त्यांना.. तरी सुद्धा असं वागणं म्हणजे.. " दुसरीनी तिला उत्तर दिला..

"हो ना ग.. मला तर arrogant च वाटलं त्यांचं behavior.. " अजून १ जण बोलली..

"मग काय तर.. राहुल अवस्थी नाही.. राहुल आखडू नाव ठेवायला हवं त्याच.. "

त्यांचं बोलणं ऐकून बसल्या जागेवरून च मानवी म्हणाली..

"Exactly!  राहुल आखडूच आहे तो.. आणि तुम्ही लोक त्याच्या दिसण्याचं एवढं कौतुक करत होता.. पण तो खरोखरी काही तेवढा चार्मिंग आणि handsome नाहीये.. " तीच बोलणं ऐकून त्या मुलींना पण बरं वाटलं.. तिच्या बोलण्याला त्यांनी पण सहमती दिली आहे हसू लागल्या.. मानवी अजून हि बोलत च होती..

"दिसण्याला काय चाटायचंय ? personality बघा त्यांची.. आपल्या चौपाटी वरच्या रेती मध्ये तरी ओलावा सापडेल इतका कोरडा आहे तो माणूस.. "

अचानक त्या सगळ्या मुली तिला शांत राहा म्हणून खुणावू लागल्या कारण राहुल त्याची १ फाईल मानवीच्या टेबल वर विसरून गेला होता.. तो तिच्या मागेच येऊन उभा होता आणि सगळं ऐकत होता.. पण मानवी काही थांबायचं नाव घेत न्हवती..

"आणि ते डिजिटल घड्याळ.. What is with that bloody clock? त्यावर नाचवणार काय हा आपल्याला.. " शेवटी त्या मुलींनी खाणाखुणा करून तिला मागे वळायला सांगितले.. आता मानवी ने मागे वळून पाहिले.. राहुल च्या चेहऱ्यावर कसलेही expressions न्हवते.. तो आला.. त्याने त्याची file तिच्या कडे बघत घेतली आणि तिथून गेला.. मानवीला काही explanation द्यायचं पण सुचलं नाही.. तिची ती अवस्था बघून रवीला मात्र हसायला येत होत.. तो तोंडावर हात ठेवून हसत होता.. रवीची जागा तिच्या मागेच होती त्यामुळे त्याला हि सगळं ऐकायला आलंच होत.. त्याने मागून तिला पाठीवर थोपटलं आणि म्हणाला.. "बस ग.. जे व्हायचंय ते होऊन गेलंय.. " मानवीनी तिच्या खुर्चीवर धपकन बसत १ उसासा सोडला..

***********

स्नेहल तिच्या हॉटेल मध्ये रेग्युलर चेकिंग करत होती.. तिने मानविला रागाने तुला जे करायचंय ते कर म्हटल्या नंतर तिचा काहीही कॉल वर मेसेज आला न्हवता.. स्नेहल पुन्हा पुन्हा मोबाइल चेक करत होती.. "खरोखरच resign केलं कि काय हिने.. " तिने स्वतःशीच विचार केला..

राहुल एका महत्वाच्या मीटिंग साठी या हॉटेल मध्ये आला होता.. त्याची मीटिंग successful झाली होती.. आता तो पुन्हा ऑफिस ला जायला निघाला होता..

स्नेहल ला तिच्या बॉस नि हाक मारली.. एका VIP गेस्ट ला see off करण्या साठी ते तिला बोलवत होते.. स्नेहल त्यांच्या शी बोलत थांबली होती.. आणि राहुल त्याच्या गाडीतून ड्राईव्ह करत तिथून एक्सिट करत होता.. इतक्यात त्याला rear view mirror  मधून त्याला ओळखीची व्यक्ती दिसली.. त्याने गाडी जागेवर थांबवली.. आणि पुन्हा नीट पहिले.. नाही.. तो चुकला न्हवता ती त्याची मानवी च होती..  इकडे स्नेहल त्या गेस्ट ना बाय करून आणि तिच्या बॉस ना पण निरोप देऊन आत मध्ये जातच होती  कि मागून कुणीतरी जोरात तिचा हात पकडून तिला वळवले..

"मानवी.. ?? तू इथे?? "

राहुल चा शॉक चेहरा बघून स्नेहल चे डोळे विस्फारले गेले..

************

क्रमशः

*************

🎭 Series Post

View all