माझी मानवी... 18

A story about love, friendship, kindness and relationships

मिनिट्स ऑफ मीटिंग मानवीने चुकीचे रेकॉर्ड केले.. त्यानंतर राहुल नि तिला चांगलंच फैलावर घेतलं.. त्याने ज्या पद्धतीने शब्द वापरले त्याने मानवीला खूप राग आलेला.. तीला हा झालेला अपमान चांगलाच झोंबला होता.. तिने फाईल उचलली आणि तिथून बाहेर आली.. तिला रागाने आता रडायला येत होत.. ती जागेवर आली आणि तिने तिच्या बाटलीतलं पाणी पिलं..  इतक्यात ब्युटी टीम मधली १ जण आली आणि तिला म्हणाली.. "ओह मानवी.. प्लीज मला items सॉर्ट आऊट करायला मदत कर ना.. आम्ही तिघी जणी करतोय पण तू आलीस तर फास्ट होईल.. "

"हो.. चल.. आलेच मी.. " असं म्हणून ती तिच्या बरोबर गेली..

एका भल्या मोठ्या रूम मध्ये एका मोठ्या टेबल वर खूप साऱ्या ब्युटी related items मांडले होते.. आणि ते सगळं सॉर्ट करायचं काम चालू होत.. कोण उभ्याने काम करत होत, कोण बसून तर एकीने तर फरशीवर च मांडी घातलेली.. सगळ्या जणींचे हात फास्ट चालले होते.. मानवीला एक खुर्ची देऊन ती मुलगी निघून गेली.. तिथेच ब्युटी टीम ची रिया बसली होती.. तिला मानवीने विचारलं.. "नक्की काय करायचंय?"

"मी हे सगळं separate करतीये.. आपलं काम झालय तर हे सगळं पुन्हा ज्यांचं त्यांना परत पाठवायचंय.. आई ग माझी कंबर.. " बऱ्याच वेळ ती वाकून काम करत होती त्यामुळे तिची आता कंबर दुखायला लागली होती.. "तू कशाची वाट बघतीयेस सुरु कर सॉर्टींग.. " मानवी कडे बघत तिने सांगितलं..

"म्हणेज नक्की काय करू?" मानवीला अजून क्लिअर झालं न्हवत कि नक्की करायचंय काय..

"आधी त्यांना ब्रँड wise separate कर, मग आपण लोकेशन प्रमाणे त्यांना एकत्र करूया.. "

"मानवीने खुर्चीवर बसत म्हणाली.. "ओके ओके.. brand categorization करायचं आधी.. " तिने हातात १ बाटली घेतली आणि नाव वाचायचा प्रयत्न केला.. कुठलं तरी फ्रेंच ब्युटी प्रॉडक्ट होत.. तिला काही त्याच नाव वाचता येईना.. तिचा तो struggle बघून तिने कुत्सित पणे विचारलं.. " काही प्रॉब्लेम आहे का तुला?"

"आं ? नाही.. म्हणजे तस नाही.. हे पहिल्यांदा पाहतिये मी असले प्रॉडक्ट्स सो.. "

"ओह माय गॉड.. पहिल्यांदा पाहतियेस तू हे प्रॉडक्ट्स? खरं कि काय?" हे ती इतक्या जोरात म्हणाली कि पलीकडच्या विंग मध्ये सीमा मॅम बरोबर राहुल cloth selection करत होता त्याने हि वळून पाहिलं.. मानवीची त्याच्या कडे पाठ होती त्यामुळे तिला हे कळालं नाही.. पण त्या ब्युटी टीम च्या मेंबर कडून हे ऐकल्यावर राहुल नि विचार केला.. "या मुलीच्या बाबतीत हे श्यक्य आहे.. कशाला हिला ठेवलंय देव जाणे.. हे हि काम हिच्याच्याने होणार नसेल तर.. "

इकडे रिया ला आता मानवीची उडवायचा चान्स च मिळाला होता.. ती म्हणाली..

"तू काय cosmetics वापरत नाहीस का?"

 "वापरते मी पण सुपर मार्केट मध्ये मिळतात ते.. "

"म्हणजे तुझ्या साठी पॉंड्स ची पावडर म्हणजे cosmetics आहे का?" कुत्सितपणे हसत ती म्हणाली.. "बरं.. मला तो ब्युटी ब्लेंडर ब्रश दे.. तुझ्या साईड ला आहे बघ तिथे.. " मानवीला तिथे बरेच मेकअप चे ब्रश होते त्यातला ती कोणता मगतीये ते कळेना.. ती १-१ उचलून तिला दाखवायला लागली आणि तिचे expressions बघून दुसरा उचलायला लागली.. तशी ती म्हणाली..

"१ मिनिट १ मिनिट.. तुला ब्रश पण माहिती नाहीत? इकडे बघ.. मला तुला यातलं काय माहितीये ते सांग.. " मानवीला तिच्या कडे बघायला लावून ती म्हणाली..

"तुला CC क्रीम माहितीये?" त्याची ट्यूब तिला दाखवत तिने विचारलं.... मानवीने  नकारार्थी मान हलवली..

"What about blush? And highlighter and primer?" ते सुद्धा १-१ प्रॉडक्ट्स दाखवून तिने विचारलं ..तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली.. मानवीचा पडलेला चेहरा बघून ती म्हणाली..

 "ओह माय गॉड.. तुला खरच माहिती नाहीये कि.. तुझे बाबा काय forest officer होते कि काय? जंगलात वाढलीयेस का तू?" मानवीला आता हिचा पण राग यायला लागला होता.. एक तर या मुलीच वय लहान आणि हि अशी बोलतीये म्हटल्यावर तिला नाही म्हटलं तरी राग आला होता.. "माझ्या वडिलांची प्रिंटिंग प्रेस आहे.. " तिने थोडक्यात उत्तर  दिले..

" तू काही खेड्यापाड्यातून आलेली तर वाटत नाहीस.. एका मुलीला ब्युटी related या बेसिक गोष्टी पण माहिती नाहीत हे जरा पटायला अवघड जातंय मला.. " मानवीने काहीही उत्तर न देता खाली मान घालून काम करायला सुरुवात केली..

तीच सॉर्टींग झाल्यावर तिला आठवलं कि सकाळी तिला सीमा मॅम नि १ काम  दिलं होत ते तिने अजून complete च केलं न्हवतं.. ते करायला ती पुन्हा तिच्या जागे कडे निघाली तेवढ्यात पलीकडच्या विंग मधून सीमा मॅम नि तिला हाक मारली आणि म्हणाल्या..

"मानवी मानवी.. जाता जाता तेवढं ब्लॅकबेरी च quilted जॅकेट दे बघ.." मानवीच्या समोरच एका रॅक वर ओळीने खूपसे जॅकेट्स लावले होते.. "ओके ओके.. "

मानवी त्या रॅक समोर उभं राहून विचार करायला लागली.. "ह्यातलं कुठलं? ब्लॅकबेरी म्हणजे? इथे तर सगळेच ब्लॅकबेरी च्या कलर चे दिसतायेत.. तिने त्यातलंच १ जॅकेट काढून मॅम च्या इथे घेऊन गेली.. ते बघून त्या म्हणाल्या, " हे नाही ग.. हे ब्लॅकबेरी च नाहीये.. इथून दिसतंय बघ मला.. तिसरं.. ते घेऊन ये.. "

सीमा मॅम च्या इथेच राहुल उभा होता आणि त्याची नजर तिला judge करत होती.. झालं.. मानवी नि परत  गोंधळून घाईगडबड करायला सुरुवात केली..

रॅक च्या इथे पळत गेली.. तिथे असलेलं कुठलंतरी जॅकेट काढायला लागली तस सीमा मॅम पुन्हा तिथूनच ओरडल्या.. " अग ते नाही.. ते बॉम्बर जॅकेट आहे.. ते नाही.. " मानवीने ते ठेवलं आणि दुसरं उपसायला लागली.. तशा त्या म्हणाल्या " ते नाही ते नाही.. उजवीकडून तिसरं.. "

मानवी पुन्हा गडबडून डावीकडच्या बाजूचं शोधायला लागली.. तशा त्या म्हणाल्या.."उजवी उजवी बाजू.. तुझ्या जेवतानाचा हात जो असतो तो.. " तरीही मानवी गोंधळ घालतीये बघून त्याच आल्या तिला बाजूला सारलं आणि जॅकेट घेऊन गेल्या.. जाताना फक्त एवढंच बोलल्या.. "उजवी-डावी बाजू कळत नाही तुला ? बाकीचं काही कळत नसलं तरी?! मला दुपार पर्यंत मी सकाळी दिलेलं document रेडी पाहिजे.." राहुल एक शब्द बोलला नाही पण त्याची नजर च सांगून गेली जे त्याला वाटत होत ते.. मानवी तिच्या डेस्क वर येऊन बसली.. आणि काम करू लागली.. जे येतंय ते तरी व्यवस्थित करूच शकतो आपण असा विचार करून तिने कामाला सुरुवात केली..

तीच ते काम झालंच होत कि तिला विशाल नि हाक मारली "दीदी माझं पण हे काम राहिलंय प्लीज देते करून?"

 "अरे हो का नाही?! अजून काही हेल्प लागली तर सांग मी करते.. "

आणि त्या नंतर मात्र तिचा पूर्ण दिवस कामात गेला.. तिचा इंटर्न असल्याचा फायदा सगळे जण घेत होते.. आणि एका मागो माग १ काम देत होते.. कामाची कमी न्हवतीच या डिपार्टमेंट मध्ये.. इथे कुणीही बसून न्हवतंच कारण.. सगळ्यांच्या बरोबर धावपळीत तिचा दिवस कसा गेला ते हि तिला कळालं नाही.. सगळ्यांच्या साठी कॉफी बनवून सगळ्यांना देण्याची जबाबदारी पण तिनेच घेतली.. १ राहुल सोडून ती सगळ्यांना कॉफी देऊन पुन्हा तिच्या कामाला लागली.. जेव्हा संध्याकाळचे ७ वाजले तेव्हा तिला घरी जायची परमिशन मिळाली.. सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत ती ऑफिस मध्येच होती.. ती निघाली तरीही राहुल त्याच्या केबिन मध्ये बसूनच काम करत होता.. त्याने सकाळी बोललेले तिला आठवलं.. तिने १ उसासा सोडला आणि घरी निघाली.. बस मध्ये तिला खिडकी शेजारची जागा मिळाल्याने ती खुश होती.. गार वाऱ्याने तिला लवकरच डुलका लागला.. झोपेत तीच डोकं गोल गोल फिरत होत.. सिंगल सीट वर ती बसली असल्याने तिच्या बाजूला कुणी बसलं न्हवत.. आणि ती अक्षरशः जेव्हा तिच्याच घोरण्याच्या आवाजाने जागी झाली तेव्हा तिने पहिले कि एका स्टॉप वर बस थांबलीये  आणि १ आजी बस मध्ये चढल्यात.. तशी पटकन उठून तिने त्यांना जागा करून दिली.. बस सुरु झाली अचानक त्यामुळे त्या आजींचा तोल गेला तस तिने  पटकन त्यांना सावरून नीट बसवलं.. ती स्वतः दिवसभराच्या कामाने एवढी दमली होती तरी तिच्यातली हि माणुसकी जिवंत असल्याचे पाहून बस मध्ये सगळ्यात मागच्या सीट वर बसलेल्या एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्माईल आली..

**********

मानवी-स्नेहल च्या घराच्या इथे, स्नेहल ची बर्थडे पार्टी ज्याने अरेंज केलेली तो निलेश हातात रेड रोजेस चा बुके घेऊन उभा होता.. स्नेहल हॉटेल मधून तर आली होती पण सुपर मार्केट मधून काही तरी आणायला चालत गेली होती.. निलेश तिथेच बराच वेळ झाला तिची वाट पाहत उभा होता.. स्नेहल घरा जवळ आली आणि तो कोण आहे हे लक्षात येताच तिचा चालायचा स्पीड तिने वाढवला.. ती आपल्याला टाळून आत जाणार हे लक्षात आल्यावर निलेश तिच्या बरोबर फास्ट चालत माफी मागू लागला..

 " स्नेहल.. स्नेहल ऐकून तर घे माझं.. मी म्हणालो ना सॉरी म्हणून.. तू खरच माझ्याशी सगळे संबंध तोडणारेस? मी पुन्हा नाही करणार अशी चुकी.. स्नेहल यार..Just because of that small mistake I made that one time.. मी आज वर तुझ्या साठी जे केलं ते सगळं पाण्यात का?"

आता स्नेहल जागेवर थांबली आणि त्याच्या कडे कुत्सितपणे पाहून ती म्हणाली..

 "A small mistake ?one time? You are really pathetic.. तुला अजूनही माहिती नाहीये तू काय चुकीचं वागला आहेस ते? तुझ्या पायावर उभं राहून आठवण करून देऊ का परत?" तिचा एक पाय उचलत तिने शेवटचं वाक्य उच्चारलं तस तो घाबरून २ पावलं मागे गेला.. तशी स्नेहल घरामध्ये निघून गेली.. निलेश मागून बोलत होता..

 " स्नेहल वेट.. ऐक  तर माझं.. सॉरी ना.. पुन्हा नाही होणार असं!! स्नेहल!!!" स्नेहल आत मध्ये गेल्याचं पाहून त्याने १ उसासा सोडला.. इतक्यात त्याला मागून एका लहान ११-१२ वर्षांच्या मुलीचा आवाज आला.. -

"च च च च.. तुझ्या कडे बघूनच कळतंय.. You have messed up pretty badly.."

" तुला काय करायचंय ग?"

"दादा.. माझ्या दीदीला असं दुखावलेलं असताना, तुझ्या जागी मी असते तर असं बोलले नसते.. "

"ओह.. तू स्नेहल ची धाकटी बहीण आहेस?"

"मग? माझा चेहरा पण तिच्या सारखाच सुंदर आहे.. ओळखायला नाही आलं काय? तिला मनवायची काही आयडिया मला तुझ्या बरोबर share करायला काही प्रॉब्लेम नाहीये तसा.. "

"ओह.. तस झालं तर.. I will be really grateful.."

" ठीके मग.. इथे जवळच १ पेस्त्री शॉप आहे.. तिथे जाऊन आपण खात खात बोलूयात.. "

तो मुलगा काही रिप्लाय देणार इतक्यात त्या मुलीचा कान कुणी तरी जोरात पकडला.. ती मानवी होती आणि हि छोटी अगाव मुलगी मानवीची बहीण मेधा होती.. कान पकडला गेला तसा ती जोरात ओरडली.. " आ ताई, दुखतंय ना.. आई ग.. " तरी मानवी नि तिचा कान सोडला नाही.. आणि ती त्या मुलाला म्हणाली..

"हि माझी बहीण आहे.. स्नेहल ची नाही.. हिला काही देऊ नका तिच्या नावाने काही मागितलं तर.. " मानवीचे बोलणे ऐकून तो मुलगा डोळे फिरवून निघून गेला.. तो गेल्यावर मानवीने तिला सरळ उभी केली आणि म्हणाली..

"लाज नाही वाटत तुला स्नेहल च्या नावावर असले धंदे करायला? फसवतेस होय तू लोकांना?"

"दिसण्यावरून तर मीच तिची बहीण वाटते.. फसवायचं काय आणि त्यात.. मी काय पैसे मागतीये का कुणाला?"

"तेवढंच बाकी ठेवलंय तू.. स्नेहलनी तुला डोक्यावर चढवून ठेवलंय दुसरं काही नाही.. आणि तू इतक्या लांब आलीस कशाला ग आमच्या रूम वर? आई वाट पाहत असेल कि घरी.. "

"तुला नाही काही स्नेहल दीदी ला भेटायला आलेले.. "

मेधा हि मानवीची बहीण.. जशी मानवी लहानपणी दिसायची तिच्या वयाची असताना तशीच मेधा आत्ता दिसत होती.. पण स्वभावाने म्हणा किंवा तिच्या मैत्रिणींच्या मुळे म्हणा तिला तिच्या रूपाचा जरा गर्व च होता.. ती कपडे घ्यायला गेली तरी स्नेहल ला विचारल्या शिवाय काही खरेदी करायची नाही.. तिला मानवीला स्वतःची बहीण म्हणवून घ्यायला पण आवडायचं नाही.. पण ती कधी उद्धट बोलली कि मात्र सगळ्यांची बोलणी पडायची अगदी स्नेहल सुद्धा तिला रागे भरायची.. म्हणून ती थोडी तरी नीट वागत असायची.. आत्ता सुद्धा ती पहिल्यांदा अशी वागली न्हवती.. पण स्नेहल सगळं हसण्यावारी न्यायची.. त्यामुळे च तिचा आगाऊपणा वाढला होता.. आत्ता सुद्धा मानवीने रागावून खालूनच घरी फोन करून सांगेन ची धमकी दिल्यावर ती घरी गेली होती.. तिला बस स्टॉप वर सोडून मानवी घरी आली.. सगळं आवरून करून झाल्यावर ती आणि स्नेहल दिवसभरतल्या गोष्टी एकमेकींना सांगत होत्या.. एकदम काहीतरी आठवून मानवी म्हणाली..

"स्नेहल तुला ब्लॅकबेरी च quilted कि काय जॅकेट असते.. तो काय प्रकार आहे माहितीये का?"

"हो माहितीये कि.. मी १ विकत घेतले ना मागच्याच आठवड्यात.. "

"काय? मग तुला high lite काय असत ते पण माहितीये?"

"  high lite नाही ग.. highlighter म्हणतात त्याला.. "

आता मानवीने सगळ्या तक्रारी सांगायला सुरुवात केली.. कस तिला सगळ्यांनी कमी लेखलं.. ब्युटी टीम ची रिया कशी तिला घालून पाडून बोलली.. आणि राहुल तिला काय काय बोलला ते पण.. सगळं सांगून झाल्यावर मानवी म्हणाली..

"मला फॅशन शी काही प्रॉब्लेम नाहीये ग.. पण असली कसली नाव? quilted जॅकेट कुठे असत का? quilted ब्लॅंकेट असत.. आणि primer हा शब्द मेकअप मध्ये काय कामाचा? primer तर रंग द्यायच्या आधी भिंतीला लावतात ना?! सरळ सोप्प्या भाषेत बोलायला काय झालं? दुसऱ्या ग्रहावरच्या भाषेत बोलायला लागल्यावर मी कस काय MOM लिहायचे होते.. ? सगळे नुसते show off करतात.. show off !! " इतक्या वेळ स्नेहल फक्त ऐकत होती तिने आता बोलायचे ठरवले.. ती म्हणाली..

"तू चुकलीस.. म्हणून काय झालं?"

"काय?"

"तुला असं का वाटत कि ते show off करत होते? प्रत्येक इंडस्ट्री मध्ये काही टेकनिकल टर्म्स असतात.. आता माझ्या हॉटेल इंडस्ट्री मध्ये सुद्धा खूप साऱ्या अशा टर्म्स आम्ही वापरतो मग आम्ही काय show off करतोय का? नाही ना? That attitude of saying fashion and beauty isn't important  आणि म्हणायचं कि सगळा show off आहे, हे बरोबर आहे का? आणि राहुल नि रागवण्या बद्दल म्हणशील तर एका बॉस ने त्याच्या एम्प्लॉयी ला चुकत असेल तर रागावणं साहजिक च नाही का?"

"ए बायको.. तू नक्की कुणाच्या side नि आहेस ? मला पण चांगलं काम करायचंय.. मला पण नाही बोलणी ऐकायला आवडत.. पण मी सगळं हे पहिल्यांदा पाहतिये आणि ऐकतिये.. मग मला समजायला वेळ तर लागणारच ना.. ?"

"हो का? मग मला सांग तू कितीवेळा स्वतः हुन समजून घ्यायचा प्रयत्न केलास? Have you made an effort? तू फक्त राहुल चा विचार करत होतीस पूर्ण वेळ.. कामाच्या बाबतीत कुठे तू लक्ष दिलस? आता मला सांग.. तो बोलला तेच जर का सीमा मॅम बोलल्या असत्या तर तू अशीच झाली असतीस का रिऍक्ट? तू त्यांच्या मॅगझीन मध्ये काम करतीयेस पण तू एकदा तरी ते उघडून वाचलंस का? त्यामुळे तू नुसती अशी तक्रार करणं मला तरी नाही पटतं!"

मानवी थोड्या लटक्या रागात म्हणाली "तू ना.. जाऊदे.. मी जाते झोपायला.. गुड नाईट ! "

ती तशी रागात गेलेली बघून स्नेहल ला हसायला आलं.. कारण मानवी पुढे काय करणार हे हि तिला माहिती होते..

***********

क्रमशः

*************

🎭 Series Post

View all