माझी मानवी...भाग ६६

इकडे रवी आणि मानवी सोबत बसून जेवत होते. राहुल त्याच्या केबिन मध्ये होता. तितक्यात रवीच्या मोबा??

मागील भागात आपण बघितले ...

"आय एम सॉरी. परत तुझ्या सोबत असं राहता येईल की, नाही माहीत नाही! पण सत्य कळेपर्यंत मला तुझ्या सोबत छान क्षण घालवायचे आहेत. होप तू मला माफ करशील." स्नेहल मनात बोलत होती आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रूंचे दोन थेंब ओघळले. स्नेहलने हळूच मानवीच्या अंगावर हात टाकला आणि झोपी गेली.

आता पुढे...

दुसऱ्या दिवशी सकाळी मानवी उठायच्या आधीच स्नेहल आवरून तयार होती. तिला रवीला भेटायचे होते. त्यामुळे ती लवकर जाणार होती. मानवी उठली तेव्हा स्नेहलने तिला मिठी मारली. 

"बायको सँडविच केलं आहे ते खाऊन घे. आज मला काम आहे सो लवकर जाते आहे बाय." म्हणत स्नेहल निघून गेली देखील.

मानवीने तिला ओरडूनच बाय केले आणि पटकन आवरायला गेली. 

दुसरीकडे रवी देखील आवरून ठरलेल्या ठिकाणी स्नेहलची वाट बघत होता. तितक्यात स्नेहल आली. 

"गुड मॉर्निंग." म्हणत स्नेहलने त्याला विष केले.  

"गुड मॉर्निंग. बोला काय काम आहे?" रवीने वेळ न घालवता सरळ विषयाला सुरुवात केली. 

"मी मानवी आणि राहुलला सत्य सांगायचे ठरवले आहे." 

"छान तुमच्यात माणुसकी आहे म्हणायची तर."

"मी जे वागले ते मुद्दाम नाही. अनाहुतपणे मी राहुलकडे खेचले गेले. पण तुम्ही म्हणता तेच खरं आहे. जे आपलं नाही त्याला मिळवण्याचा अट्टाहास करण्यात काही अर्थ नाही. जी मी नाही, ती मी बनून देखील राहुल माझ्या प्रेमात नाही तो तिच्याच प्रेमात आहे. ह्याची जाणीव मला त्याच्या नजरेतून होत असते. " स्नेहल बोलत होती.

"हो. हे खरं आहे. पण आता काय प्लॅन? मी काय मदत करू शकतो?"

स्नेहल काही बोलणार तितक्यात रवीला कोणाचा तरी कॉल आला. 

"हॅलो. हो हो लगेच येतो."रवी फोनवर बोलत होता.

"सॉरी स्नेहल. मी नंतर भेटतो आता जावं लागेल खूप महत्त्वाचा फोन होता. लगेच बोलावलं आहे मला." असे म्हणत रवी पळतच तिथून निघून गेला.

स्नेहलने नुसतीच मान डोलावली. आता काय करायचं हाच विचार तिच्या डोक्यात चालू होता. तितक्यात मागून टाळ्यांचा आवाज आला. तीन मागे वळून बघितले आणि तिच्या डोळ्यांत राग उतरला. समोर शांती उभी होती.

"चल म्हणजे तुझ्यात माणुसकी आहे तर! मला वाटलं होतं तू देखील तुझ्या आई सारखी स्वार्थी आहेस." शांती टाळ्या वाजवत स्नेहलला हिणवत होती.

"माझ्या आईला परत परत मध्ये अनात नको जाऊस." स्नेहल रागाने बोलली.

"तू तुझ्या मैत्रिणीला खरं सांग मग त्या नंतर मी तुझ्या आईचं नाव देखील घेणार नाही." शांती स्नेहलकडे एक बोट दाखवत बोलली आणि मुद्दाम स्नेहलला धक्का देऊन निघुन गेली.

स्नेहल काहीवेळ तशीच उभी होती. तिने टाकलेल्या पावलांच्या पाऊलखुणा तिचे भविष्य बदलणार होत्या हे तिला समजत होते. त्यात तिची मैत्रीण आणि तिचे प्रेम दोघांना देखील तिने गमावल्याचे तिला जाणवत होते. पण आता घडून गेलेली घटना बदलता येणार नव्हती. आणि भविष्यावर होणारे त्याचे परिणाम देखील.

******

मानवी आवरून बरोबर पावणे नऊ वाजता ऑफिसला पोहोचली. इतर स्टाफ देखील हळू हळू येत होता. मानवीने नेहमी प्रमाणे पेन आणि डायरी सोबत घेतली आणि सगळ्यांसोबत मीटिंग रूम मध्ये जाऊन बसली. बरोबर नऊ वाजता मीटिंग सुरू झाली. 

"मी काय सांगतो ते प्रत्येकाने लक्ष देऊन ऐका. आपल्याकडे वेळ कमी आणि काम जास्तं आहे. त्यामुळे सगळ्यांना रात्री उशिरा पर्यंत काम करावे लागणार आहे. सगळ्यांनी घरी तशी कल्पना देऊन ठेवा आणि सगळ्यात महत्वाचे ऑफिस मधील लेडीज स्टाफला सुखरूप घरी सोडण्याची जबाबदारी आपल्या मेल स्टाफवर आहे. कोणत्याही लेडीजला एकटी जाण्याची परवानगी नाही."

राहुलच्या ह्या वाक्याने सगळ्यांना आश्चर्य वाटले. पण मानवीला मात्र समजत होते की राहुल असा का बोलला. 

काल रागाने लाल झालेला त्याचा चेहेरा तिला आठवला.

सर्वानुमते मॅगझिन साठी मानवी ची थीम वापरण्याचे ठरले. जो तो आपापल्या आयडिया देत होता. मानवी सगळ्यांचे लक्षपूर्वक ऐकत होती. मीटिंग संपताच राहुलने मानवीकडे एक नजर बघितले. 

"हो सर मिनिट्स ऑफ दि मीटिंग तयार आहेत." राहुल काही न बोलताच मानवीने उत्तर दिले. 

"हिच्या सारखं काम कोणीच करू शकत नाही हे मात्र खरं आहे." राहुल मनातच बोलला.

मीटिंग संपवून सगळे लंच ब्रेक साठी गेले. पण विषय मात्र थीमचाच होता. जो तो विचार करत नवीन नवीन कल्पना फुलवत होता.

*********

दुसरीकडे स्नेहलचे मन कशातच लागतं नव्हते. 

"किती मूर्ख आहे मी. सगळं माहीत असून देखील राहुलच्या प्रेमात पडले. पण मी त्याच्याकडे कधी खेचले गेले मलाच कळलं नाही. मुळात आधीच त्याला सगळं सांगितलं असतं तर गोष्ट इतकी पुढे गेलीच नसती. मी आधीच त्याला सगळं सांगायला हवं होतं. मानवीने माझ्यावर किती विश्वास ठेवला आणि मी तिचा विश्वास घात केला. शी लाज वाटते आहे आता मला माझीच. 

एक वेळ राहुल शिवाय जगता येईल पण मानवी शिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाही मी. काय अर्थ राहील अशा जगण्याला." स्नेहल मनातून पूर्ण खचली होती. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी तिची अवस्था होती. तिने मनातच काहीतरी ठरवले. आणि तडक तिच्या केबिन मध्ये गेली.

इकडे रवी आणि मानवी सोबत बसून जेवत होते. राहुल त्याच्या केबिन मध्ये होता. तितक्यात रवीच्या मोबाईल वर एक मेसेज आला. मानवीशी गप्पा मारत तिची मस्करी करत त्याने तो मेसेज उघडला.

"काय करू खरंच सुचत नाहीये मला. खरं तर सांगायचं आहे पण भती वाटते आहे. माझी मैत्रीण आणि प्रेम मी कायमचे गमावणार आहे. आता माझ्या कडे एकच मार्ग आहे." रवी पुढे वाचणार तोच मानवी आणि राहुलच्या मोबाईल वर देखील एक मेसेज आला. रवी वाचत होता

माझ्याकडे एकच मार्ग आहे ह्यातून सुटका. माझ्या मैत्रिणीची काळजी घ्या. गुड बाय."

राहुल देखील त्याच वेळी मेसेज वाचत होता.

"खूप प्रेम करते तुझ्यावर पण मला माहित आहे तू माझा नाहीस. तू जिला मानवी समजतोस ती म्हणजे मी तुझी मानवी नाही. मी तिची मैत्रीण स्नेहल आहे. तुझी मानवी ती आहे, जी तुझ्या सोबत तुझ्या ऑफिस मध्ये काम करते. तिचं तुझी बाल मैत्रीण आहे. खरी मानवी. खर सांगते जाणून नाही वागले मी अशी. बस तुझ्याकडे ओढत गेले. सत्य सांगून तुला आणि तिला मी गमावते आहे. शक्य झाले तर माफ कर आणि माझ्या मानवीची काळजी घे. खूप प्रेम करते ती सुद्धा तुझ्यावर. पण तिलाच कळत नाहीये ते." 

"बायको रागावू नकोस. पण तुझ्या बायकोला दुखावणार दुसरा कोणी नाही तुझा बाल मित्र राहुल आहे. पण तो तुझ्यावर प्रेम करतो, खऱ्या मानवीवर माझ्यावर नाही. ह्याचा मला त्रास होत होता. त्याला मी सत्य सांगितले आहे. माफ करशील ना मला? सकाळची आपली शेवटची भेट. गुड बाय बायको. वर जाऊन त्या ईश्वराला तोंड दाखवायचं आहे." मानवी मेसेज वाचताना ताडकन उभी राहिली. राहुल देखील केबिन मधून पळत बाहेर आला. 

"आपल्याकडे वेळ नाहीये तिला थांबवायला हवं. " रवी घाईत राहुल आणि मानवीला बोलला. दोघे ही त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते.

"सगळं नंतर सांगतो पण आता चला आधी." रवी, राहुल, मानवी धावतच स्नेहलच्या ऑफिस जवळ गेले. समोरच अँब्युलन्स उभी होती. भोवती गर्दी जमा झाली होती. ऑफिस चा स्टाफ सगळ्यांना बाजूला करत होता पोलिसांची एक गाडी देखील उभी होती. एक क्षण तिघेही घाबरले. गर्दीतून वाट काढत मानवी तिच्या मागे राहुल आणि रवी पुढे सरकत होते. 

समोर चे दृश्य बघून मानवी एकदम स्तब्ध झाली. 

काय झाले असेल. असे काय बघितले असेल मानवी ने? 

वाचत राहा ..

क्रमशः

प्रिय वाचक मित्रांनो. माझी मानवी आपल्या सगळ्यांचीच खूप आवडती कथा आहे. ती पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि मी लिहिलेल्या पहिल्याच भागाला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला आणि छान छान कमेंट करून मला प्रोत्साहन दिले ह्या बद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. तुमच्या मुळे ही कथा पुढे लिहिण्याचा मला हुरूप आला आणि हिम्मत देखील. सुभाषिनी मॅडम इतकी छान लेखिका मी नाही. त्यात त्याची लोकप्रिय कथा पूर्ण करण्याचे काम खरंच अवघड आहे. तरी त्याची कथा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आहे काही चुकल्यास सांभाळून घ्या.

माफ करा भाग पोस्ट करायला खूप उशीर होत आहे. पण घरी आजारपण काही सुचुदेत नाहीये. वातावरण बदलाचे पडसाद सगळ्या घरावर उमटत आहेत. पुढील भाग लवकर टाकण्याचा प्रयत्न करेल.

सुभाषिनीच्या आठवणीत

© वर्षाराज 

🎭 Series Post

View all