माझी मानवी...भाग ६४

आता फक्त मानवी आणि राहुल तिथे होते, आणि त्यांना बघणारी ती व्यक्ती. पण दोघांना ती दिसली नाही. सग??

मागील भागात आपण बघितले...

"पण अजून दोन महिने आहेत तुला जॉईन करायला. तोपर्यंत तरी ये." राहुल एकदम बोलला.

"मानवी सध्या तुझी गरज आहे टीमला. मॅगझिन पब्लिशिंग साठी अजून फक्त दोन महिने आहेत." सीमा मॅम.

आता पुढे..

"प्लिज ये ना." सगळे एका सुरात बोलले. तसे कॅफे मधील इतर लोकं त्यांच्या दिशेने बघायला लागले. 

तशी मानवी ओशाळली.

"हळू हळू... इतरांना त्रास नका देऊ. येते मी. पण फक्त दोन महिने." मानवी सगळ्यांना आवाज हळू करण्याचा इशारा करत बोलली.

"येऽऽऽऽ" म्हणत सगळ्यांनी परत कल्लोळ केला आणि एक एक करत मानवीला मिठी मारत तिच्या बाजूला उभे राहिले.

राहुलच्या चेहेऱ्यावर एक समाधान होते. मानवी परत ऑफिसमध्ये येणार ह्याचा त्याला आनंद झाला होता. 

त्याच्या चेहेऱ्यावरिल भाव रवी टिपत होता. पण त्याच बरोबर हा सगळं चालेल गोंधळ आणि राहुलचा खुललेला चेहेरा अजून एक व्यक्ती लपून बघत होती. रवीचे मात्र त्या व्यक्तीवर पूर्ण लक्ष होते. 

"चला म्हणजे उद्यापासून माझ्या कामाचा भार कमी होणार." रिया एक मोठ्ठा श्वास घेत म्हणाली.

ती काय बोलली हे राहुल सुद्धा ऐकत होता हे तिच्या लक्षात आले तसे लगेच तिने अर्थ बदलवला.

"म्हणजे मानवी येणार, तर सगळ्यांना खूप मदत होईल असं म्हणत होते मी." 

तिच्या ह्या बोलण्यावर सगळे हसले. कारण सगळ्यांनाच माहीत होते की, रिया तिचे काम मानवी कडून घेत असे.

"मदत तर होणारच आहे सगळ्यांना. पण उद्या पासून नाही आज पासून." राहुल पुढे बोलला.

" मानवी तू आज पासूनच ऑफिस जॉईन करणार आहेस."

"पण सर, आत्ता? आज नको, उद्या येते."

"ते काही नाही. मानवी अगं खूप काम आहे आणि वेळ कमी. तू आजच ये. सर बरोबर बोलत आहेत." सीमा मॅम राहुलच्या बोलण्याला दुजोरा देत बोलल्या.

"लावकर ये आम्ही वाट बघतोय." असं म्हणत मानवीला कोणी काही बोलण्याची संधी न देताच सगळे तिथून निघून गेले. 

आता फक्त मानवी आणि राहुल तिथे होते, आणि त्यांना बघणारी ती व्यक्ती. पण दोघांना ती दिसली नाही.  

सगळे गेल्यावर मानवीने मागे वळून बघितले तर राहुल तिला एक टक बघत होता. त्याच्या लक्षातच आले नाही की मानवी त्याला असे बघताना बघत आहे. त्याच्या त्या नजरेने मानवीला जरा ऑकवर्ड वाटतं होते. 

"सर, काय झालं?" मानवीने त्याला आवाज दिला.

"हाऽऽ कुठे काय?" चल तू ये ऑफिस मध्ये मी पुढे जातो." म्हणत राहुल कॉफीचे बिल पे करुन निघून गेला. 

तशी मानवी पण त्याच्या मागोमाग डॉक्युमेंट्सची फाईल घेत निघाली. 

*********

सगळे ऑफिस मध्ये गेले तेव्हा त्यांच्यात एक वेगळाच उत्साह होता. 

"आता लक्षात आलं मघाशी राहुल सरांनी 'मी सांगेल तेव्हा समोरच्या कॉफी शॉप मध्ये लगेच या' असा मेसेज का केला होता." रिया टीम मधील एका मुलीला बोलली.

"असं पहिल्यांदाच झालं ना की एका intern साठी डायरेक्टरने असे प्रयत्न केले." दुसरी बोलली

"चूक पण तर त्यांचीच होती ना." रिया

"काहीही असो पण मानवी परत येते आहे हे बेस्ट झालं ." विजय सर.

"इतके पण वाईट नाहीत राहुल सर, जितके आपण त्यांना समजत होतो. हो, की नाही रवी सर?" सीमा मॅम बोलल्या तसे सगळे रवीला बघू लागले पण रवी कोणाला दिसलाच नाही. कारण रवी ऑफिस मध्ये आलाच नव्हता.

"कुठे गेले रवी सर?" विशाल इकडे तिकडे बघत बोलला.

"असतील इथेच येतील थोड्यावेळात. आपण कामाला लागू नाहीतर राहुलसर आल्यावर उगाच रागावतील." सीमा मॅम सगळ्यांना कामाला लावत बोलल्या.

*****

राहुल आणि मानवीला जाताना बघून ती व्यक्ती अजून एक पाऊल मागे सरकली जेणे करून त्यांना ती दिसणार नाही. एक पाऊल मागे सरकतच ती कोणाला तरी धडकली म्हणून तिने मागे वळून बघितले. तर तो रवी होता.

"तुम्ही इथे काय करताय?"

"तेच मी पण विचारतोय तुम्ही इथे काय करत आहात स्नेहल उर्फ मानवी मॅडम?" रवीने एक भुवई उंचावून स्नेहलला विचारले.

"ते, मी इथे, ते..." स्नेहल ची बोलताना त-त, प-प होत होती.

" वाईट वाटतंय मानवी आणि राहुलला सोबत बघून?" रवी सरळ स्नेहलच्या नजरेत नजर मिळवून बोलत होता.

"हो. नको वाटायला का?" स्नेहलच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती.

"का वाटायला हवं? जो खेळ तुम्ही दोघींनी सुरू केला होता त्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला सुरुवाती पासून माहीत होत्या. तरी तुम्ही राहुलच्या प्रेमात पडलात. ह्यात चूक तुमची नाही का?"

"कळतंय मला पण मनाला कसं सांगू? मला ही सगळं खरं सांगायच आहे. पण हिम्मत होत नाहीये." स्नेहल समोर जाणाऱ्या मानवी आणि राहुलला बघून बोलत होती.

"स्नेहल मला कळतंय तुमच्या मनात काय सुरु आहे. पण तुम्हालाच हे पटते आहे का? बघा राहुलसर तुम्हाला मानवी समजत असेल तरी त्यांच्या मनात खरी मानवी आहे. तुमच्यामुळे ते मानवी आणि खरी मानवी ह्यात गोंधळात आहेत. तुम्ही तुमच्या मैत्रिणीचा विश्वास घात करत आहात. जर हे मानवीला दुसरीकडून कळले तर? तेव्हा तुम्ही तिचा सामना कसा कराल? आणि मग तुम्ही तुमची मैत्री कायमची गमावून बसाल." 

"नाही मला असं अजिबात करायचे नाही." स्नेहलच्या डोळ्यातील एक अश्रू तिच्या गालांवर ओघळला.

"मी शेवटचे सांगतो आहे. तुमच्या हातात पंधरा दिवसांचा कालावधी आहे. एक तर तुम्ही दोघांना सगळं खरं सांगा नाहीतर, मी सांगेल, आणि मी जर सांगितलं तर त्याचे परिणाम काय असतील ह्याचा विचार तुम्ही करून ठेवा." आता मात्र रवी थोडा जबर आवाजात बोलून निघून गेला. 

स्नेहलच्या डोळ्यातील पाणी वाहत होते. तितक्यात तिचा फोन वाजला. बायको कॉलिंग तिने तो फोन उचलला.

"हॅलो, हा बोल बायको." स्नेहल डोळे पुसत बोलली.

"स्नेहल मी आता माझ्या जुन्या ऑफिसला जाते आहे. काय झालं कसं झालं? सगळं संध्याकाळी सांगते. Ok?" मानवी बोलली.

"ठिक आहे ." म्हणत स्नेहल ने जास्त नं बोलता फोन ठेवला. 

मानवी विचारात पडली की, अचानक स्नेहल चा आवाज का उतरला.

तितक्यात मानवी ऑफिस समोरच्या सिग्नल जवळ येऊन थांबली. राहुल तिच्या समोरच उभा होता. सिग्नल सुटला तशी मानवी पुटपुटली "गेट सेट गो." 

तिचे हे शब्दं परत राहुलच्या कानात पडले आणि तो तिथेच उभा राहिला. 

"सर चला लवकर सिग्नल बंद होईल परत."  

तसा राहुल तिच्या बरोबर चालू लागला.

"राहुल आता परत मानवी आणि ही ह्यात गोंधळ करून चीड चीड नाही करायची. आपली पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेग वेगळी ठेवायची." राहुल मनातच स्वतः ला बजावत होता.

राहुल आणि मानवी ऑफिस मध्ये पोहोचले त्यांच्या पाठोपाठ रवी देखील आला.

मानवी तिच्या जागेवर जाऊन बसली आणि राहुल तिच्या केबिन मध्ये गेला. खुर्चीत बसल्यावर त्याने मोबाईलचे नोटिफिकेशन बघितले, तर मानवी म्हणजे स्नेहलचे सहा मिसकॉलस् होते. खरं तर तिचे कॉल येत होते म्हणूनच त्याने फोन सायलेंट वर लावला होता. पण आता त्याला त्याच्या वागण्याचे वाईट वाटत होते. 

दुसरीकडे...

मानवीच्या येण्याने कामाला गती मिळाली होती. सगळे नेहमी प्रमाणे मानवीला काम सांगत होते आणि ती सगळ्यांची कामं पळून पळून पूर्ण करत होती. त्यात रवी तिच्या मागे पुढेच राहत होता. हे सगळं राहुल त्याच्या केबिन मधून बघत होता. रवीला असं सतत मानवी सोबत बघून त्याला राग येत होता. 

" काय माणूस आहे हा. सतत काय मानवीच्या मागे मागे करतोय." राहुल मनातच बोलत रवीकडे रागाने बघत होता. राहुलला असं बघून. रवी मुद्दाम मुद्दाम मानवी सोबत राहत होता. 

क्रमशः

पुढे बघू मानवी आणि राहुल परत जवळ येतील का? स्नेहल सत्य सांगेल का?

प्रिय वाचक मित्रांनो. माझी मानवी आपल्या सगळ्यांचीच खूप आवडती कथा आहे. ती पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि मी लिहिलेल्या पहिल्याच भागाला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला आणि छान छान कमेंट करून मला प्रोत्साहन दिले ह्या बद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. तुमच्या मुळे ही कथा पुढे लिहिण्याचा मला हुरूप आला आणि हिम्मत देखील. सुभाषिनी मॅडम इतकी छान लेखिका मी नाही. त्यात त्याची लोकप्रिय कथा पूर्ण करण्याचे काम खरंच अवघड आहे. तरी त्याची कथा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आहे काही चुकल्यास सांभाळून घ्या.

सुभाषिनीच्या आठवणीत

© वर्षाराज 

🎭 Series Post

View all