माझी मानवी...भाग ६२

"हा.. तुम्हाला कसं समजलं मी तिला घ्यायला गेलो हे तुम्हाला कसं समजलं?" रवी एक भुवई उंचावून आणि एक ड?

राहुलने मेसेज वाचला तोपर्यंत तो त्याच्या घरी पोहोचला होता. मेसेज वाचून त्याने डोळे बंद करून घेतले. मानवीचा चेहेरा त्याच्या डोळ्यासमोर येतं होता.

दुसऱ्या दिवशी सकाळीच मानवी इंटरव्ह्यू साठी तयार झाली. स्नेहल देखील ऑफिस साठी तयार झाली होती. 

"बायको पोहे केले आहेत ते खा आणि मग जा ऑफिसला. मी इंटरव्ह्यू देऊन येते." म्हणत मानवीने चप्पल घातली.

"फोन कर इंटरव्ह्यू झाला की. तुला जॉब नक्की लागेल." स्नेहल आतूनच ओरडत बाहेर आली तोपर्यंत मानवी बाहेर निघून गेली होती. पण तिचा आवाज मानवीच्या कानावर पडला होता. 

"हो करते." मानवी धावत बोलली. 

मानवी खाली उतरली तो समोर रवी त्याची बाईक घेऊन उभा होता. 

"रवी सर तुम्ही?" मानवी आश्चर्याने बघत बोलली.

"हो, चल बस पटकन तुला सोडतो इंटरव्ह्यूच्या ठिकाणी." रवी बाईक ला किक मारत बोलला

"अहो सर, तुम्हाला उशीर होईल. मी जाईन की बस ने." 

"छोटी आता बसतेस की नाही? चल पटकन नाहीतर माझं तर माहीत नाही पण तुला नक्की उशीर होईल.

तशी मानवी लगेच रवीच्या बाईक वर बसली आणि तो तिला घेऊन निघून गेला.

इकडे राहुल मात्र रागाने लाल होत होता. आज मानवी इंटरव्ह्यू ला जाणार हे त्याला माहीत होते त्यामुळे तो बघण्यासाठी आला होता. पण रवीला तिथे बघून त्याला खूप राग आला. त्यात मानवीला असे त्याच्या सोबत जाताना बघून तर त्याचा जीव तुटत होता. 

"हा इथे पण आला मध्येच. ह्याचं काहीतरी करावं लागेल." राहुल मनातच मोठ्याने ओरडला आणि तसाच तावातावात ऑफिसला जायला निघाला.  

"छोटी इंटरव्ह्यू झाला की कॉल कर. जमलं तर येतो घ्यायला." रवी मानवीला म्हणत होता.

" नको सर मी जाईन. एक काम आहे ते करून जाईल घरी." मानवी चेहरा पाडत बोलली.

"कोणतं काम? मी पण येतो मग सोबत." 

"सर राहुल सरांचा मेसेज होता भेटायचं आहे बोलले. खरं तर मला भेटायची अजिबात इच्छा नाही पण एकदा भेटते."

"छोटी तू त्याला सगळं खरं सांग आता. असं मला वाटतं." 

"नाही सर आता माझी मुळीच इच्छा नाहीये त्याला काही सांगायची. आता फक्त भेटून काय म्हणतो आहे ते बघायचे आहे आणि परत तर मी अजिबात येणार नाही." 

"ठिक आहे बघ काय म्हणतो ते, चल तू जा तुला उशीर होईल." म्हणून रवी मानवी ला सोडून निघून गेला 

*******

राहुल रागातच ऑफिसमध्ये आला. आत येताच त्याने एक नजर सगळी कडे फिरवली रवी त्याला कुठेच दिसला नाही. त्यामुळे त्याच्या अजूनच जीवावर आली. तितक्यात रवी त्याच्या मागून आत आला. त्याला येताना बघून राहुल च्या भुवया आपसूकच जवळ आल्या. 

राहुल त्याला रागाने बघत त्याच्या कॅबिन मध्ये निघून गेला हे रवीच्या लक्षात आले होते.

थोडावेळ गेल्यावर रवी काहीतरी काम काढून राहुलच्या कॅबीन मध्ये गेला. त्याने दरवाजा नॉक केला तसा त्याला बघून राहुल च्या जीवावर आली होती पण त्याने त्याला आत येण्यास सांगितले. रवी नेहमी प्रमाणे खट्याळ हसत आत गेला.

"अरे वाह राहुल सर. माझ्या बोलण्याचा परिणाम झालं म्हणायचा. तुम्ही मानवीला भेटणार म्हणजे आता."

"रवी सर, तुम्हाला दुसरी काही कामं नाहीत का? उगाच ह्याच्या त्याच्या आयुष्यात डोकावत राहतात."

"मी? काहीतरीच काय राहुल सर. मी फक्त मानवी बद्दल बोलत होतो."

"तेच म्हणतोय मी. काय गरज होती सकाळी सकाळी तिला घ्यायला जायची? तिने तुम्हाला बोलवलं नक्कीच नसेल ह्याची खात्री आहे मला." राहुल पटकन बोलून गेला आणि त्याच्या लक्षात आले की तो काय बोलला तसा ती इकडे तिकडे बघायला लागला.

"हा.. तुम्हाला कसं समजलं मी तिला घ्यायला गेलो हे तुम्हाला कसं समजलं?" रवी एक भुवई उंचावून आणि एक डोळा बारीक करत बोलला.

"ते..ते, मी त्या रस्त्याने जात होतो. काही काम होते म्हणून. तेव्हा बघितलं मी." राहुल नजर चोरत बोलला.

"काय काम होतं?" रवीने परत विचारले

"होतं काही पर्सनल काम. तुम्हाला काय त्याच्याशी?" 

"ओह, पर्सनल. म्हणजे तुम्ही मानवी ला बघायला किंवा तिच्याशी बोलायला नव्हते गेले. उगाच गैरसमज होतो बघा. आता आलं लक्षात तुम्ही त्या जवळच्या मॉल मध्ये गेला होतात का? तिथे तुम्ही घालतात तशा चड्या छान मिळतात. त्याच घ्यायला गेले होते का?" रवी मिश्किल हसत होता.

"रवी सर. मला काम आहे तुम्ही जाऊ शकता." म्हणत राहुल ने कॉम्प्युटर मध्ये डोकं खुपसले. रवीच्या तोंडून चड्यांचे नाव ऐकून राहुलला जरा अवघडल्या सारखे झाले. आता पण काहीही बोललो तर हा काही आपला पिच्छा सोडणार नाही आणि सारखा चड्या चड्या चिडवत राहील हे त्याच्या लक्षात आले होते.

"हो. झालं आहे माझं काम. पण मानवीलाच भेटा बरं. नाहीतर दुसऱ्या कोणाला भेटाल." असे बोलून रवी निघून गेला. मानत मात्र राहुल ची चोरी पकडल्या बद्दल हसू येत होते.

राहुल मात्र त्याच्या बोलण्यावर विचार करत होता. "हा असा का बोलला असेल? मानवीलाच भेटा म्हणजे काय? काय विचित्र माणूस आहे. काय बोलतो त्याचा साधा संदर्भ देखील लागतं नाही."

क्रमशः

सुभाषिनीच्या आठवणीत

(वर्षाराज)

प्रिय वाचक मित्रांनो. माझी मानवी आपल्या सगळ्यांचीच खूप आवडती कथा आहे. ती पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि मी लिहिलेल्या पहिल्याच भागाला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला आणि छान छान कमेंट करून मला प्रोत्साहन दिले ह्या बद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. तुमच्या मुळे ही कथा पुढे लिहिण्याचा मला हुरूप आला आणि हिम्मत देखील. सुभाषिनी मॅडम इतकी छान लेखिका मी नाही. त्यात त्याची लोकप्रिय कथा पूर्ण करण्याचे काम खरंच अवघड आहे. तरी त्याची कथा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आहे काही चुकल्यास सांभाळून घ्या.

🎭 Series Post

View all