रवी मानवीच्या घरी जाताना हाच विचार करत होता कि स्नेहल ने काहीच सांगितलेलं दिसत नाहीये.. नाहीतर तिने राहुल ला येऊन सांगितले असते.. आता तिच्या घराच्या इथे तो गाडी लावून तिला फोन करणार इतक्यात ती त्याला बाहेर येताना दिसली.. त्याला बघून ती जवळ आली आणि म्हणाली..
"ओह.. रवी सर? तुम्ही इथे काय करताय?"
"मी? मी तुला विचारायला आलो होतो कि तुला एक जॉब करण्यात इंटरेस्ट आहे का?"
"काय?"
"हां मग? आता माझी छोटी बेरोजगार झाली म्हटल्यावर मी काहीतरी initiative घ्यायला हवं ना?" तिच्या लक्षात त्याची चेष्टा आली तशी ती म्हणाली..
"हो का? पण मी आत्ता माझ्या जुन्या कॅफे मध्येच चालली आहे मला तिथे पुन्हा घेतात का हे पाहायला.. तुमचा जॉब काय आहे? कारण तिथल्या पेक्षा तरी थोडे पैसे जास्त असले तर consider करण्यात अर्थ असेल नाही का?"
"तू त्या कॅफे च्या मालकांना फोन करून जातीयेस का?"
"नाही.. का हो?"
"मग आज माझ्या बरोबर मला हेल्प कर कामांत.. आज काही conceptual फोटोज क्लिक करायचेत आणि मला एका assistant ची गरज आहे.. "
"काय? रवी सर सॉरी पण मला आज नाही वेळ काढता येणार.. मी पाहिलं पाहिजे ना काहीतरी कामाचं.. " ती असं म्हणून पुढे जायला लागली तस तिच्या कानावर तिचाच आवाज आला.. "मी मानवी कुलकर्णी, रवी ला प्रॉमिस करते कि मी त्याच्या ३ requests पूर्ण करेन काही झालं तरी.." मानवीने आता मागे वळून पाहिलं.. तिची नजर अशी होती कि आज नको ना काही.. तरी रवी म्हणालाच..
"पहिली request नाही पूर्ण केलीस आता हि दुसरी तरी कर.. "
"सर प्लीज.. " तसा रवी लगेच म्हणाला..
"per day जास्त असणारे बघ.. विचार कर.. "
"किती असणार?"
रवीने तिला काहीतरी absurd amount सांगून त्याच्या बरोबर यायला तयार केले.. त्याने तिच्याच सॅक मध्ये त्याची कॅमेरा ची बॅग घातली आणि त्याच्या bike वर बसवून तिला घेऊन मुंबईच्या रस्त्यांवरून फिरू लागला.. मध्येच त्याला एखादा चांगला कन्सेप्ट फोटो होईल असं वाटलं कि दोघे उतरायचे आणि फोटो काढायचे.. असेच दिवसभर दोघे फिरत होते.. फिरता फिरता वाटेतच त्यांनी मिळेल तिथे स्ट्रीट फूड खाऊन पोटपूजा पण केली.. मानवी साठी पण तिच्या नेहमीच्या कामापेक्षा हा experience खूप वेगळा होता.. फोटो काढून झाला कि रवी तिला फोटो दाखवायचा आणि तिला फार आश्चर्य वाटायचं कि आपल्या डोळ्यासमोर आहे हे पण यातलं सौंदर्य फक्त याचीच नजर कशी काय टिपते.. तिला आज रवी चे पण त्याच्या लिखाणा बरोबरचे अजून एक टॅलेंट कळत होते.. तिला पण काहीतरी नवीन शिकायला मिळत होते त्यामुळे ती खुश होती आणि त्यात तिची काळजी थोडी विसरून गेली होती.. ती थोडी रमलेली बघून रवीला पण बरं वाटत होत.. उन्ह कलली तसा तो तिला घेऊन मरीन ड्राईव्ह ला आला.. आणि गाडी लावून दोघे जरा निवांत तिथल्या कट्ट्यावर बसले.. रवी तिला म्हणाला..
"आत्ताच्या या उन्ह उतरायला लागलेल्या वेळेला काय म्हणतात माहितीये?"
"संध्याकाळ?" मानवीने innocently उत्तर दिलं तसा मोठ्याने हसून तो म्हणाला..
"हो.. पण फोटोग्राफी साठी ह्याला golden hour म्हणतात.. या वेळेला काढलेले फोटो वेगळाच इफेक्ट देतात आणि काही झालं तरी सुंदर च दिसतात.. बघ आता तुझ्या कडे काही कारण नाही कारण आता नो मॅटर व्हॉट तू सुंदर च दिसणार फोटो मध्ये.. काढूयात मग?"
दिवसभर तिने त्याला तिचा एकही फोटो काढून दिला न्हवता म्हणूनच तो आता असा म्हणाला होता.. आता मानवीने पण हसून होकार दिला.. आणि दोघांनी त्याच्या त्या भल्या मोठ्या DSLR मध्ये सेल्फी काढायला सुरुवात केली.. दोघे पण एक फोटो मध्ये सरळ तोंड करत न्हवते.. थोड्या वेळाने त्यांची हि मस्ती थांबल्यावर रवी दोघांच्या साठी भेळ आणायला गेला.. तेव्हा तिथेच बसून मानवी त्या दोघांचे फोटो बघत होती आणि ते चित्र विचित्र फोटो बघून हसत बसली होती.. भेळीचे कोन घेऊन येताना रवीला तिला तसं सगळी चिंता विसरून हसताना बघितले आणि २ मिनटं तसेच बघत थांबला आणि पुन्हा काही विचार करून तिच्या जवळ आला.. तिच्या कडे १ कोन देऊन म्हणाला..
"हे घे ग.. "
"ओह.. थँक्यू.. " तिने कॅमेरा पुन्हा बॅगेत ठेवून दिला आणि तो भेळीचा कोन हातात घेतला.. आता रवी खाता खाता म्हणाला..
"छोटी.. तू ये ना ग परत.. आम्ही सगळी जण तुझी वाट पाहतोय.. राहुल सरांचा गैरसमज झाला होता.. माफ कर ना त्यांना.. "
"रवी सर मला नाही यायचं परत.. जे झालं.. त्या नंतर तर नकोच.. बाकी तुम्हाला खरं सांगायचं झालं तर.. तुम्हाला आठवतंय तुम्ही मला एकदा विचारलं होतत 'तुला १००% फक्त राहुलला एक मित्र म्हणून पाहायचंय without other feelings..?'"
"हो आठवतंय ना.. "
"तेव्हा मी sure न्हवते पण आता मी सांगू शकते कि मी त्याच्या कडे फक्त एक बालमित्र म्हणून नाही तर त्याहून काही अधिक असावं आमच्यात याच अपेक्षेने पाहत होते.. त्यामुळेच मला जास्त त्रास झाला या सगळ्याचा.. तुम्हाला तो two way mirror माहितीये? ज्यातून आतून पाहणाऱ्याला सगळं बाहेर च दिसत पण बाहेरच्याला फक्त स्वतःचच प्रतिबिंब दिसत.. मला कायम असं वाटत आलं कि आमच्यात पण तोच आरसा आहे.. मी त्याला स्पष्ट पाहू शकत होते.. तो कशातून जातोय ते ओळखू शकत होते पण त्याला मात्र मी कधी दिसलेच नाही.. कधी कधी असं वाटायचं मला कि त्याने मला ओळखूच नये, मी त्याला कोण आहे हे माहिती नाही हे बरच आहे.. पण कधी कधी मात्र वाटायचं कि हा ओळखत कसा नाही मला.. आता तरी ओळखायला हवं होत याने मला.. हेच सतत चालू असायचे माझ्या मनामध्ये.. त्यामुळे तर काम करण सुद्धा त्याच्या बरोबर अवघड वाटायचं.. आता त्यानेच काढून टाकले ना ते एका अर्थी असं वाटलं कि सुटले मी एकदाची.. " हे सगळं ती समोर समुद्रा कडे पाहत बोलत होती मात्र आता एक मोठा श्वास घेऊन ती रवी कडे बघून म्हणाली..
"पण तरी तुमच्यामुळे तिथे काम करणं थोडं तरी सुसह्य झालं होत.. तुम्ही कितीही चेष्टा मस्करी केली तरी तुम्ही माझ्या पाठीशी होतात कायम त्यामुळे काम करायला मजा आली.. आज सुद्धा मला माहितीये कि तुम्ही मला बर वाटावं म्हणून सुट्टी काढून आलात.. हो ना? थँक्यू सर.. खरच थँक्यू.. " इतका वेळ तीच सगळं ऐकत असलेला रवी थोडा सेल्फिश विचार करत तिला म्हणाला..
"एवढी grateful आहेस तर मला डेट का नाही करत तू? राहुल चा विचार काढून टाक म्हणजे ऑफिस मध्ये पण काम करायला तुला काही नाही वाटणार.. " तशी वैतागत मानवी म्हणाली..
"पहा सुरु झाले पुन्हा तुम्ही.. चेष्टा संपत च नाही ना तुमची? परत घेते मी माझं थँक्यू.. झालं मग आता?"
मानवीला तस उचकलेलं बघून रवीला अजून मजा वाटत होती..तिने त्याला सिरिअसली घेतलं नाही हे कळून सुद्धा तो हसला कारण आता तिला रिलॅक्स झालेलं च त्याला पाहायचं होत.. त्याला हसताना बघून मानवी पण जरा रिलॅक्स झाली.. इतक्यात तिचा फोन वाजला.. तिने रवी कडे फोन घेऊ का अशा नजरेने पाहिलं, त्याने मान डोलावली तसा तिने फोन उचलला.. त्यांच्याच ऑफिस मधल्या management डिपार्टमेंट मधल्या तिच्या आधीच्या बॉस चा फोन होता..
"हॅलो?"
"हां हॅलो मानवी मी बोलतोय.. "
"हां सर.. बोला ना.. "
"मला कळलं काय झालं तुझ्या बाबतीत ते.. "
"ओह.. well.. " मानवीला पुढे काय बोलावं न कळून एवढंच तोंडून बाहेर पडलं..
"जे झालं ते वाईट च झालं पण माझ्या कडे एक जॉब ऑफर आहे.. "
"सर मला पुन्हा तिथे काम करायला थोडं अवघड जाईल.. " नकार कसा द्यावा आणि पुन्हा दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये सुद्धा काम करायचं तरी कधी ना कधी राहुलच्या समोर यावं लागेल असं वाटून तिने politely उत्तर दिले..
"अग नाही.. आपल्या कंपनी मध्ये नाही.. दुसरीकडे.. तू इथे म्हटली असतीस तरी माझ्या हातात न्हवत्या काही गोष्टी आपल्या कंपनी मध्ये.. आपण भेटून बोलूयात का? मी तुला आत्ता तासाभरात ऑफिस सुटले कि भेटू शकतो.. "
"ओह.. हो चालेल ना सर.. कुठे येऊ मी?" मानवीने भेटायची जागा आणि वेळ ठरवली आणि फोन ठेवला.. तिचा सगळा फोन रवीने ऐकलाच होता.. तसा तो उठत म्हणाला..
"आपल्या ऑफिस कडेच सोडू ना तुला?"
"हो.. management डिपार्टमेंट मधले माझे सर आहेत त्यांच्या कडे एक जॉब ऑफर आहे म्हणाले.. " तिला लगेच दुसरी जॉब ऑफर अशी स्वतःहून आलीये म्हटल्यावर रवीने पण समजून मान डोलावली आणि तिला सोडायला त्याने गाडी काढली..
*****
राहुल ऑफिस मध्ये त्याच काम उरकत होता.. त्याच्या फाइल्स मधून ते न्यूजपेपर च कव्हर घातलेली डायरी सारखी डोकावत होती.. पण तो जाणून बुजून तिच्याकडे दुर्लक्ष करत होता.. त्याने रवीच्या समोर नुसती ती चाळली होती नीट वाचली न्हवतीच.. आता त्याने समोर ऑफिस कडे काचेतून एक नजर टाकली, एखाद दुसरी व्यक्ती सोडली तर ऑफिस रिकामं च होत.. त्याच काम पण बऱ्यापैकी संपलं होत.. काही विचार करून त्याने मानवीची ती डायरी उचलली आणि नीट बघायला सुरुवात केली.. त्यात जे लिहिलं होत ते मानवी जशी बोलेल तशाच टोन मध्ये त्याने ते वाचायला सुरुवात केली.. ते वाचताना पण त्याच्या लक्षात येत होत कि कुठेही तिच्या language मध्ये कडवटपणा नाही.. त्यातून सुद्धा तिचा kindness च जाणवत होत होता.. एक एक पान वाचताना त्याच्या ओठांवर स्माईल आलेली त्याच त्याला पण कळालं नाही.. या कन्सेप्ट मधलं वेगळेपण त्याला भावलं होत आणि शेवटी फिल्म्स related काही कन्टेन्ट असेल तर सेल्स जास्त व्हायची श्यक्यता पण नाकारता येत न्हवतीच.. त्याने काचेतून मानवीच्या डेस्क कडे नजर टाकली.. तिला त्याने दिलेला humidifier तिथेच होता.. त्यावर तिने मार्कर नि draw केलेली स्मायली पण त्याला दिसत होती.. आता काही निर्धार करून तो उठला आणि ऑफिस मधून बाहेर पडला..
******
मानवी त्या सरांना भेटून आली.. बस मधून घरी येताना ती ते जे बोलले त्याचाच विचार करत होती.. त्यांच्या मित्राची स्वतःची छोटी स्टार्ट अप कंपनी होती आणि तो सध्या recruitment करतच होता.. तर तिथे त्यांनी तिच्या साठी शब्द टाकायचे ठरवले होते.. त्या संदर्भात च ते तिच्याशी बोलले होते.. management डिपार्टमेंट मध्ये तिने हार्डली एक आठवडाभर काम केले होते पण तरी त्या सरांना तिची खात्री वाटली होती.. तिला स्वतःहून अशी कुणी जॉब ऑफर देईल असं वाटलं न्हवतेच त्यामुळे आता तिला टेन्शन खूपच कमी झाल्यासारखे वाटत होते.. आजचा दिवस नाही म्हटला तरी तिला खूपच छान गेला होता.. ती बस मधून खुश होऊन खाली उतरली आणि चालत त्यांच्या घराच्या दिशेने वळली..
मानवी ची वाट बघत बस स्टॉप च्या जवळ राहुल त्याच्या गाडीत बसला होता.. तिला बस मधून उतरून तिच्या घराकडे जाताना बघून तो पटकन तिची डायरी घेऊन उतरला.. पण त्याने हाक मारायच्या आधीच मानवी त्यांच्या घराच्या दिशेने असणाऱ्या गार्डन कडे वळली होती.. आणि आता तिला समोर जाताना बघून त्याला पण अवघडल्या सारखे वाटत होते.. त्याला ठरवून पण तिला हाक मारता येईना.. तो तिच्या पाठोपाठ चालू लागला..
******
नमस्कार वाचकहो..
सध्याचा काळ माझ्या कुटुंबासाठी थोडा कठीण आहे.. पण तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळेच मला पुढे लिहायला उभारी मिळतिये..मेडिकल emergency मुळे हॉस्पिटलच्या waiting रूम मध्ये बसून मी गेले काही पार्ट पूर्ण केले.. त्यामुळे जर का तुम्हाला कधी काही लिंक मध्ये लिखाण वाटले नाही आणि वेळेत पार्ट पोस्ट केले गेले नाहीत तर तो माझा दोष आहे.. I am really sorry for that..But I am totally dedicated to this story and to you all.. and I promise I will complete it no matter what.. मी अपूर्ण तर नाहीच सोडणार हि स्टोरी.. आता असे वाटते कि प्रीमियम मध्ये मी जायचा अट्टाहास केला नाही हे फार बरे झाले.. मी तुम्हा सर्वांना खूप नाराज केले असते.. मी अजूनही तुम्हा सगळ्यांच्या कंमेंट्स वाचल्या नाहीयेत त्यामुळेच रिप्लाय दिलेला नाही.. मी लवकरच तुम्हा सगळ्यांना लवकरच रिप्लाय सुद्धा करेन.. माझ्या मानवी वर तुम्हा सर्वांचे असेच प्रेम राहू द्या.. Thank you so much for your support..
******
क्रमशः
*******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा