माझी मानवी... 46

A story about love, friendship, kindness and relationships

"साहेब तुम्ही १०,००० वरून ५००० वर आला आणि आता म्हणताय हे ४००० घ्या आणि जाऊ द्या.. हे चालणार नाही.. "

राहुल कडून २००० आणि मानवी कडून ATM मधून अजून २००० काढून घेऊन पण त्यांना पुढे जाऊ देत न्हवते.. आता त्यांच्यातला १ हट्टाने म्हणाला..

"तुम्हाला सांगितलं होत ना कि आमचे पैसे बुडवून जाऊ देणार नाही.. शेतात मजुरीला नेईन म्हणून.. ते काही नाही.. " असं म्हणून तो सरळ राहुल ला घेऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात ढकलून घेऊन गेला.. मघाशी ज्यांनी मध्यस्ती केली ते पण आता कुठे तरी गायब झाले होते.. या लोकांनी धरून मारलं तर करणार काय असा विचार करून मानवीय पुढे आली आणि म्हणाली..

"ठीके.. आम्ही तयार आहोत.. " "काय?" राहुल तिच्या वर च ओरडला.. तशी ती म्हणाली..

"सर ठीके ना.. आपल्याला काही येत नाही शेतीतलं.. हि लोक जाऊ पण देत नाहीयेत.. जेवढं जमेल तेवढं करू.. "

"इंटर्न पण अग.. " तो काही बोलणार इतक्यात तिने त्याला आपल्या जवळ खाली खेचलं आणि त्याच्या कानात म्हणाली.. "सर आपण खूप लांब आहोत मुंबई पासून.. मदत यायला पण वेळ लागणार.. या लोकांनी तुम्हाला मारलं तर मी काय करू? प्लीज सर ऐका.. "

तिची भीती कळून राहुल पण आता तयार झाला.. त्या लोकांना मात्र आता काय करावं ते कळेना.. ह्यांच्या कडे खरंच पैसे नसणार त्या शिवाय असे कसे तयार होतील हे पण आता जवळपास अर्धा तास वाद घातला होता त्यामुळे ज्याने कोंबडा फेकला होता त्याने हा त्याच्या अहंकाराचा मुद्दा बनवला.. आणि खरंच त्यांना आपल्या शेतातल्या घराकडे यायला त्याने सांगितलं.. राहुल ची गाडी तिथेच रस्त्यावर पार्क करून ते त्याच्या शेतात असलेल्या घरा जवळच्या एका बांधावर आले.. आजूबाजूला पाहत तो म्हणाला.. "हे सगळं रान माजलंय ना काँग्रेस च्या गवतानी.. हे सगळं उपटा.. ओ ताई आणि तुम्ही या बांधावर च उपटा सगळं.. " असं म्हणून तो तिथेच उभा राहिला.. आता काही गत्यंतर नाही हे कळून राहुल नि त्याच जॅकेट काढून ठेवलं, शर्ट च्या आणि पॅन्ट च्या भाया वर केल्या आणि कामाला लागला.. त्याच्या कडे बघून मानवी पण कामाला लागली.. जमत तर दोघांना पण न्हवतं.. निव्वळ हातानी केवढं उपटणार.. तरी दोघे न बोलता कामाला लागले.. आणि "मी सुटाबुटातल्या माणसांना कामाला कसं लावलंय " याचा माज करत तो माणूस तिथे त्याच्या मित्रांच्या बरोबर गप्पा मारत बसलेला.. पण हि दोघे खरच इतके मन लावून कामात बुडालेले कि त्यांना या लोकांनी पळ काढलाय हे सुद्धा कळालं नाही.. इतक्यात एक आजी तिथे आल्या.. त्या तिथे उभ्या राहून बघत होत्या.. हि चांगली शहरातली माणसं गवत उपटत बसलीयेत ते.. त्यांनी तिथूनच हाक मारली..

"ए पोरांनो.. कुणाची आहात रे तुम्ही?" त्यांच्या आवाजाने दोघांनी एकदम दचकून वर पाहिलं.. मानवी पुढे येत म्हणाली..

"मावशी.. आम्हाला तुमच्या मुलाने बोलावलं इथे गवत काढायला.. " त्या दोघांच्या अवताराकडे आणि त्यांनी मागे काढलेल्या गवताच्या ढिगाकडे बघत होत्या.. तीच बोलणं ऐकून म्हणाल्या..

"पोरी माझा पोरगा शिपाई आहे ग सैन्यात.. तिकडे सीमेवर असतो.. कुणी सांगितलं तुम्हाला काम करायला ? आधी या तिथून.. " त्या टग्यांनी आपल्याला फसवलेलं कळून दोघे पण त्यांच्या जवळ आले.. मानवीच्या हातात त्या गवतामध्ये दुर्वा पण होत्या तिने त्या तिथेच गवत काढता काढता वाचल्या होत्या.. त्या दुर्वा त्या आजींच्या कडे देत तीने पूर्ण किस्सा सांगितलं.. ते ऐकून मात्र आजी संतापल्या..

"मुडदा बशीवला त्या पोरांचा.. नेमके तुम्ही घावला त्यांच्या तावडीत.. बरं चला आता घरात.. " तसा राहुल म्हणाला..

"मावशी सॉरी पण आम्हाला आता जावं लागेल आधीच खूप उशीर झालाय.. आम्हाला  बरीच काम उरकायची आहेत.. " तशा मानवी कडे बघत त्या म्हणाल्या..

"तुझं ठीके रे पोरं.. पण हिच्या तोंडाकडे बघ.. भुकेने जीव कालवलाय तिचा.. आजच्या दिवशी तरी माझ्या सोबत असेल कुणी तरी जेवायला.. या आत.. "

राहुल नि मानवीच्या कडे बघितलं.. तिचा चेहरा पूर्ण लाल झाला होता.. तिच्या गालांवर असलेले लाल freckles अजूनच डार्क झाले होते.. तिला तर सकाळीच भूक लागलेली त्यात हे सगळं घडलं.. आता रिसॉर्ट वर जाईपर्यंत तरी त्यांना खाता काही येणार न्हवते.. आणि असे शारीरिक कष्ट जिम शिवाय दुसरीकडे कुठे करायची त्याला पण सवय न्हवतीच त्यामुळे भूक तर त्याला पण लागलेली.. त्या आजींच्या दयाळूपणा मुळे तर त्याला अजूनच अवघडल्या सारखं झालं होत..

त्या आजींनी अंगणात ठेवलेल्या हौदा कडे त्यांना हात पाय धुवून यायला सांगितलं.. दोघे हात पाय धुवून घरात आले तसे त्यांनी पहिले आजींनी भाकऱ्या थापायला घेतल्या होत्या.. मानवी लगेच त्यांच्या हाताखाली कामाला लागली.. "मावशी हे असचं वाढू ना?" , "मावशी हा तांब्या घेऊ पाणी प्यायला.. ?" असं करत तिने त्यांना विचारून विचारून सगळी मदत केली.. त्या पण आता खूप जुनी ओळख असल्या सारखं हक्क दाखवत काम सांगत होत्या आणि जेवायला वाढत होत्या.. राहुल कौतुकाने तिच्याकडे बघत होता.. तो अवघडून एका जागी बसला होता मात्र तिने गोड बोलून ते घर च आपलं केलं.. सगळे एकत्र जेवायला बसले.. आजींनी वांग्याची भाजी बहुदा आधीच करून ठेवली होती त्यामुळे फक्त भाकऱ्या केल्या कि त्यांनी वाढलं होत.. ते साधंच पण झणझणीत जेवण जेवल्यावर मात्र राहुलच्या नाकातून पाणी यायला लागलं होत.. आजी आणि मानवी त्याची चेष्टा करत होत्या त्याची अजूनच हालत खराब झालेली बघून मात्र त्यांनी मानवीला गुळाचा खडा कुठुन आणायचा ते सांगितलं आणि तिने तो त्याला नेऊन वाढल्यावर मात्र त्याला जेवण गेलं.. जेवण झाल्यावर पण मानवीने सगळं आवरून ठेवायला मदत केली.. ती तर भांडी पण घासायला बसलेली पण त्याच म्हणाल्या "तुम्हांला जावं लागेल ना ? पुन्हा उशीर व्हायचा..भांडी मी कारेन ते राहूदे..  मी ताक करते तोवर ओसरीवर बसा.. ताक पिऊन मग निघा.. "

राहुल आणि मानवी ओसरीवर बसले होते.. मानवी त्या कट्ट्यावर बसून बाहेर आकाशाकडे बघत होती.. तिच्या कडे बघून राहुल हळूच म्हणाला..

"इंटर्न हा झाला प्रकार ऑफिस मध्ये कुणाला सांगू नकोस हां .. "

"का बरं ?"

"हि सांगण्या सारखी तर गोष्ट नाहीये ना? कि आपल्याला ठगवलं आणि आपण इथे गवत उपटत बसलो होतो ते..?"

"हां पहिली गोष्ट न्हवती आपल्या हातात पण गवत उपटलं तर त्यात कमीपणा काय आहे?"

"तरी नको सांगू ना.. "

"If it bothers you this much.. नाही सांगणार.. "

"थँक यु.. "

त्याच्याशी बोलता बोलता तिने तिचा मोबाईल काढला होता आणि आकाशाकडे बघत फोटो काढत म्हणाली..

"आज आकाश सुंदर आहे ना पण ..  तो ढग पहा ना.. पुस्तका सारखा दिसतोय.. " तिच्या बाजूला उभा राहत तो पण बघू लागला.. "खरंच कि.. "

एवढा त्रास पडला होता प्रवास सुरु झाल्या पासून तरी तिची हि पॉसिटीव्ह राहायची वृत्ती बघून नाही म्हटलं तरी राहुल हैराण होता.. आणि तिचा हा स्वभाव बघून नाही म्हटलं तरी तो पुन्हा तिच्या कडे खेचला जात होता.. त्याच त्याला जेव्हा हे जाणवलं तसा तो म्हणाला.. "इंटर्न आत जाऊन आजींना बघ मदत कर.. मी जरा गाडी कडे बघून येतो.. " ती हो सर म्हणून उठली इतक्यात तिचं लक्ष तिच्या गळ्यातल्या ID कार्ड कडे गेलं; तिच्या गळ्यात फक्त कार्ड ची लेस च राहिली होती.. कार्ड कुठे तरी पडून गेलं होत.. ते लक्षात आलं तशी ती एकदम म्हणाली..

"सर.. माझं ID कार्ड? गळ्यातच होत.. कुठं गेलं.." ती उभी राहून इकडे तिकडे शोधू लागली.. हात-पाय धुतले होते तिथे पण पहिले तिने पळत जाऊन पण सापडलं नाही.. तिला एवढं अस्वस्थ झालेलं बघून राहुल म्हणाला..

"ठीके ना.. पडू दे.. मी ऑफिस मध्ये गेल्यावर नवीन issue करून देईन तुला.. मग तर झालं?"

"नाही हो.. माझं पहिलं ID कार्ड आहे ते.. "

"म्हणजे?"

"म्हणजे माझ्या साठी ते फक्त एम्प्लॉयी ID कार्ड नाहीये.. मला ते शोधायलाच पाहिजे.. आत मध्ये काम करताना स्वयंपाक घरात कुठे पडलं का पाहते.. " असं म्हणून ती आत गेली.. तरी मुद्दाम तो मागून ओरडला.. "इंटर्न मी फक्त २० मिनीट थांबेन हां.. पटकन शोध आधीच उशीर झालाय खूप.. " पण हे ऐकायला मानवी तिथे न्हवतीच ती तर पळत आत गेली होती.. तिला एवढं अस्वस्थ झालेलं बघून राहुल पण त्यांनी जिथले गवत उपटले होते तिकडे गेला.. त्यांनी एका जागी जो उपटलेल्या गवताचा ढिगारा रचला होता तिथे बरंच शोध शोध केल्यावर तिचं ID कार्ड सापडलं.. तो ते घेऊन परत आला तेव्हा मानवी बाहेर ID कार्ड शोधण्यात मग्न होती.. आजींनी ताक आणून ओसरीवर ठेवलं होत आणि त्या पण तिला शोधायला मदत करत होत्या.. राहुल ने तिला हाक मारून थांबवलं आणि म्हणाला..

"देव जाणे काय एवढा जीव अडकलेला तुझा त्या ID कार्ड मध्ये? हे घे.. तिकडे गवतामध्ये सापडलं.. " त्याच्या कडून कार्ड घेत खुश होत मानवीने तिच्या ID कार्ड ची पापी घेतली आणि राहुल ला म्हणाली.. "थँक्यू सो मच सर.. " तिची ती reaction बघून त्याच्या पण चेहऱ्यावर स्माईल आली..

****

ऑफिस मध्ये सगळ्यांनी आज जेवणाआधी सूप प्यायची टूम काढली होती.. जेवायला जायच्या आधी सगळ्यांनी कुठलं तरी सूप ऑर्डर केलं होत आणि पॅन्टरी च्या इथे जमून सगळे गप्पा मार्ट आपापलं सूप पित होते.. आत्ता रवीने तर टोमॅटो सूप ऑर्डर केलं होत पण विजय सरांनी ऑर्डर केलेलं मशरूम च सूप बघून त्याला मानवीची खूप आठवण येत होती..

मानवीला बरं न्हवत म्हणून एकदा ती रवी ला घेऊन त्यांच्या ऑफिस जवळच्या सूप स्टेशन नावाच्या रेस्टॉरंट मध्ये गेली होती.. आणि तिथे तिने तिच्या आवडीचं मशरूम सूप ऑर्डर केलं होत.. तेव्हा रवीला सुद्धा तिने ते खायचा आग्रह केला होता..

"सर तुम्ही टेस्ट च नाही केलं तर तुम्हांला कसं कळणार ते कसं लागतंय ते?"

"मानवी पण ते कसलं गिळगिळीत दिसतंय ग.. जगामध्ये खाण्या सारख्या इतक्या गोष्टी असताना तुला ते मशरूम का आवडत ग?"

"पण healthy असत ते सर.. माझ्या बाउल मधला एक चमचा पिऊन तर बघा.. "

"नको.. ewwwww.. " तिने अगदी त्याच्या तोंडासमोर चमचा नेला तरी त्याने तोंड वाकड करून नको नको केलं होत..

आता विजय सर तेच सूप पित होते ते बघून तो स्वतःशीच म्हणाला.. "मानवीला पण खूप आवडत हे सूप.. "

नाही म्हटलं तरी रवी सगळ्यांच्यात असून पण मानवीला खूप मिस करत होता..

************

क्रमशः

************

🎭 Series Post

View all