Oct 18, 2021
कथामालिका

माझी मानवी... 47

Read Later
माझी मानवी... 47
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

आजींचा निरोप घेऊन राहुल आणि मानवी पुन्हा त्यांच्या प्रवासाला लागले.. गाडीत बसल्यावर सुद्धा तशीच शांतता होती पण आता मात्र ती awkward वाटत न्हवती.. खूप वेळ झाला मानवी तिच्या गळ्यातल्या ID कार्ड कडे बघत होती.. राहुल ने एकदा तिच्या कडे नजर टाकली पण ती तशीच विचारात बुडलेली पाहून शेवटी त्याने घसा खाकरला.. तरी त्याच्या कडे न बघत मानवीने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली..  

"हि माझी पहिलीच वेळ आहे, you know.. इतक्या मोठ्या MNC कंपनी मध्ये काम करण्याची.. असं एम्प्लॉयी ID कार्ड असण्याची, ज्याच्यावर माझा फोटो प्रिंट केलाय.. तुम्हाला माहितीये मी जेव्हा जॉब शोधत होते ना तेव्हा मला सगळ्यात जास्त जेलसी या अशा एम्प्लॉयीज ची वाटायची (तिच्या गळ्यातलं ID कार्ड दाखवून त्याला ती म्हणाली) ज्यांच्या कडे हे असं ID कार्ड असायचं.. त्यामुळेच जेव्हा  केव्हा मी माझ्या ID कार्ड कडे पाहायचे.. मला माझाच अभिमान वाटायचा.. I felt thrilled and thankful every time.. असं वाटायचं.. या कंपनी मध्ये माझी एक जागा आहे.. मी खरंच इथे काम करते.. इथली एम्प्लॉयी आहे.. You know a feeling that I belong here.. things like that.. (राहुल तीच बोलणं ऐकत होता, त्याच्या चेहऱ्यावर १ हलकीशी स्माईल होती आणि त्याला तिच्या innocent विचारांच्यामुळे थोडी मजा पण वाटत होती.. पण ती सगळं इतकी मनापासून बोलत होती कि न राहवून त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल अजून मोठी होत होती.. आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मानवी पण हसून पुढे म्हणाली.. ) ID कार्ड तर ID कार्ड असतं.. हो ना? am i overreacting?" तीच शेवटचं वाक्य ऐकून त्याला तिची चेष्टा करायची इच्छा आवरली नाही म्हणून तो म्हणाला..

"हम्म.. बरोबर च आहे तस तुझं.. You really do go overboard.. (पण तिच्या बोलण्याशी कुठं तरी कनेक्ट तो पण झाला होता त्यामुळे तो पुढे म्हणाला.. ) पण मी समजू शकतो तुला काय म्हणायचंय ते.. प्रत्येक कडे अशी एखादी दुसरी गोष्ट असतेच, जिचं महत्व फक्त त्यांच्या साठी असत बाकीच्यांना ती फक्त १ वस्तू वाटते.. "

"तुमच्यासाठी पण अशी एखादी गोष्ट आहे?"

"हो.. आहे ना.. मागच्या वेळी तू माझ्या घरी आल्यावर जे फोडलं होतंस ते.. "

मानवीला आठवलं ते पझल, जे त्याने काचेच्या बॉक्स मध्ये फ्रेम करून ठेवलं होत, ते त्याने एकदम मागून हाक मारल्याने, तिच्या दचकून धक्का लागून पडून फुटलं होत.. ते आठवून तीच्या तोंडून फक्त "ओह ते.. " एवढंच बाहेर पडलं.. आता तिची अजून चेष्टा करायचा मूड त्याला आला तसा गाडी चालवत च गियर शिफ्ट वरचा हात तिच्या पुढे करत तो म्हणाला..

"मग? आता दे मग.. " त्याचा असा हात त्याने तिच्या पुढे काही तरी मागितल्याचा आवेशात पुढे केल्याचा बघून ती न कळून म्हणाली..

"काय देऊ?"

"ते फुटलेलं होत, glass box त्याचे पैसे.. "

"सिरिअसली?"

"हो मग!.. आत्ता नको देऊ.. आत्ता नाहीयेत तुझ्या कडे काही ते मला पण माहितीये पण मुंबई ला परत गेल्यावर दे.. माझा अकाउंट नंबर आहे - CZ५६९७८.. "

"१ मिनिट १ मिनिट.. " असं म्हणून मानवीने पटकन फोन काढून त्यात नोट्स मध्ये त्याचा अकाउंट नंबर लिहायला लागली.. "CZ५६.. त्याच्या नंतर काय?"

तिची अशी गडबड उडालेली बघून राहुल हसू दाबत म्हणाला..

"म्हणून तो रवी तुझी इतकी चेष्टा करतो.. तुला जोक आहे कि सिरिअसली बोलतोय समोरचा हे सुद्धा कळत नाही.. एवढी कशी ग तू भोळी.. " तो चेष्टा करतोय तिची हे कळल्यावर मात्र ती मुद्दाम फुरंगुटून म्हणाली..

"पण मी देणारे पैसे.. ५६ च्या नंतर काय आहे ते सांगा.."

"१०००० होते त्याचे.. " तशी पटकन ती म्हणाली.. "मला कळला तुमचा जोक.. कळला.. " असं म्हणून तिने पटकन मोबाईल खिशात आत ठेवून दिला.. आता मात्र राहुल तोंड दाबून हसत होता.. जस मानवीच त्याच्या कडे लक्ष गेलं तसा त्याने पटकन चेहरा नॉर्मल केला.. त्याने चेहरा पटकन नॉर्मल केलेला तिच्या पण नजरेतून सुटलं नाही.. ती पण त्याचा हा खेळकरपणा बघून स्वतःशीच हसली..

 

*****

 

इकडे रिया ने एका फूड कोर्ट च्या बाहेर गाडी लावली होती.. आणि जेवायला म्हणून बाहेर आले होते.. विशाल तिला विचारत होता..

"तू तर म्हणालीस कि आपण रास्ता चुकलोय मग आता असा स्टॉप घेणं बरोबर नाही ग.. " तशी पटकन हसून रिया म्हणाली..

"अरे मी सांगितलं ना तुला.. राहुल सर म्हणाले कि ते जाताहेत पुढे सो we can take our time.. Don't worry.. Just enjoy the food..Okay?" त्यांनी आपापली ऑर्डर घेऊन एका मोकळ्या टेबल कडे ते निघाले होते..

"हम्म..ok.. पण रिया मला अजूनही वाटतंय तू इथे सीफुड नको खायला.. असल्या फूड कोर्ट ला सीफुड कधीच फ्रेश नसतं.. काही त्रास झाला तर?"  रिया ची डिश बघून विशाल तसं बोलला..  

"ओह.. तुला माझी काळजी वाटतीये? सो cute.. Don't worry..माझी immunity छान आहे अगदी.. काही नाही होणार मला.. इथे बसुया?" असं म्हणून त्यांनी १ टेबल निवडलं आणि विशाल एका खुर्चीत बसला.. त्याच्या समोरची चेअर मध्ये बसायला तिनी ती ओढली आणि म्हणाली.. "अरेच्चा.. हि खुर्ची तर खराब आहे.. मी तुझ्या शेजारी बसते.. " असं म्हणून त्याच्या शेजारी येऊन बसली.. ती खुर्ची अजिबात खराब न्हवती पण रिया ला एकही चान्स सोडायचा न्हवता.. ती बसल्यावर विशाल म्हणाला.. "पटकन खाऊन निघूया.. "

"हो हो.. लगेच निघुयात.. " असं तोंडदेखलं म्हणाली.. पण मनात मात्र ती स्वतःशीच म्हणाली.. "जायचंय कुठे कुणाला? माझा प्लॅन फक्त execute करायला आलोय आपण इथे.. पहिल्यांदा मी टाईमिंग बघून गाडी बंद पडल्याचं नाटक करेन.. त्या नंतर सर्व्हिस सेंटर ला कॉल करतीये असं नाटक करून मी अजून थोडा वेळ काढेन.. त्यानंतर जेव्हा संध्याकाळ होईल आणि वातावरण रोमँटिक होईल तेव्हा तुझ्या शेजारी बसून मी आकाश किती सुंदर दिसतंय असं काहीस बोलून तुझ्या खांद्यावर डोकं ठेवेन.. आणि असा जेव्हा मूड सेट होईल तेव्हा naturally आपण.. k-i-s-s.....त्यामुळे आजचा दिवस च तू सिंगल असणारेस.. आणि उद्या पासून माझा बॉयफ्रेंड असणारे पटवर्धन ग्रुप चा वारस.. विशाल.. आजच्या दिवसानंतर माझी life तर सेट असणारे.. येस्स.. जॅकपॉट.. " तिचे हे दिवास्वप्न चालू होते पण ती काही खात न्हवती.. शेवटी जेव्हा विशाल च तिच्या कडे लक्ष गेले तेव्हा तो म्हणाला..

"तू खात का नाहीयेस?"

"ओह.. हो.. खाते ना.. "

 

*****

मानवी आणि राहुल च्या मधलं वातावरण जरा हलकं फुलकं झालं होत त्यामुळे दोघे पण जरा रिलॅक्स होते.. लोला मॅम नि सांगितलेल्या हॉटेल/रिसॉर्ट वर जायच्या आधी राहुल नि search करून अजून १ स्पॉट शोधून काढला होता.. १ कन्सेप्ट आर्टिकल च फोटोशूट करण्यासाठी त्याने ती जागा निवडली होती.. त्याने गाडी आधी तिथे घेतली.. तो एक प्रकारे बीच च होता पण तिथे लोकांची गर्दी न्हवती.. मानवीने गाडीतून उतरून समोर समुद्र पाहिला आणि मोठा श्वास घेत ती हात पसरून म्हणाली..

"wow.. किती मस्त आहे समुद्र.. " तिच्या मागे जेव्हा राहुल पण गाडीतून उतरून आला.. तेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे बघून मात्र ती पटकन म्हणाली.. "ओह.. आपण पिकनिक वर नाही आलो नई का?" पण राहुल मात्र तिच्या सारखेच हात पसरून म्हणाला.. "खरंच छान वाटतय.. " तशी मानवी पण खुश झाली.. तो पुढे म्हणाला.. "आता जरा फिरून बघूया.. आपल्याला अजून थोडं जवळ पार्क करता येईल का ते पाहिलं पाहिजे.. "

"ओके सर.. मी १ कॉल करू का पण आधी? आता रिया आणि विशाल ला पोहोचायला उशीर लागणारे तर मी माझ्या मैत्रिणीला पैसे पाठवायला सांगते.. म्हणजे आपल्या कडे रात्रीच्या जेवणासाठी पैसे असतील.. (राहुल नि समजून होकारार्थी मान हलवली पण आता मानवीला पण त्याची खेचायची लहर आली ती एकदम सिरीयस चेहरा करून म्हणाली ) पण तुम्ही मला ते पैसे द्याल ना परत? " तसा राहुल म्हणाला..

"ओह सिरीअसली यार.. लिही तुझ्या नोट्स मध्ये सगळा खर्च.. देतो तुला.. मग तर झालं.. ?" तशी हसून मानवी म्हणाली..

"सर तुम्हाला पण नाही कळत, जोक आहे कि सिरिअसली बोलतोय समोरचा.. I was also joking.." तसा हसून तो म्हणाला.. "कळालं बरं.. तू जा कॉल करून ये.. मी तोवर पुढे जाऊन बघतो.. "

"ओके सर.. " मानवी एवढं बोलून पुन्हा गाडीच्या इथे आली आणि त्याच्या पासून थोडी लांब गेली.. इतक्यात राहुल चा फोन वाजला..त्याने कॉल receive केला आणि म्हणाला..

"हां मानवी बोल ग.. " स्नेहल नि त्याला कॉल केला होता, ती म्हणाली..

"आज ऑफिस झाल्यावर डिनर ला जाऊयात?"

"मग ८ वाजता sea shell रिसॉर्ट वर येतेस?"

"ते तर खूप लांब आहे मुंबई पासून.. ओह.. आत्ता आठवलं तू म्हणालेलास ना business ट्रिप वर जायचंय म्हणून.. म्हणजे आता तू उद्या येणार हो ना?" राहुल पुढे काही बोलणार इतक्यात तिच्या फोन वर मानवीचा फोन येतोय हे तिला दिसलं तशी ती पटकन त्याला म्हणाली..

"राहुल मला १ कॉल येतोय मी तुला नंतर कॉल बॅक करते.. "

"हो चालतंय.. मी त्या पेक्षा उद्याच करतो तुला परत आल्यावर कॉल.. "

"हो..चालेल.. बाय.. "असं म्हणून तिने त्याचा फोन ठेवला आणि मानवी चा घेतला..

"हां बायको बोल ग.. मी तुझा मिस कॉल बघून तुला कॉल बॅक केला होता पण तेव्हा तू उचलला नाहीस.. "

"ओह..तेव्हा ना? मी गवत उपटत होते.. "

"काय? गवत?"

"मी तुला मुंबई ला परत आल्यावर सगळं explain करते.. ऐक ना मला थोडे पैसे पाठव ना माझ्या अकाउंट वर.. "

"तू ? आणि मला पैसे मागतीयेस? नक्की झालं काय?"

"अग विचारू नकोस.. माझ्या सॅलरी अकाउंट वरचे सगळे पैसे संपलेत.. "

"ठीके ग.. मी आत्ता लगेच पाठवतीये बघ.. अँड... सेंट.. आले का बघ बरं.. "

"हो बघते.. आणि ऐक ना आज मी घरी येणार नाही.. मला जबरदस्ती या business ट्रिप वर पाठवलंय सीमा मॅम नि.. "

"business ट्रिप? कुणाच्या बरोबर?"

"राहुल आखडू.. (मानवी खुसपूसत म्हणाली.. )"

"फक्त तुम्ही दोघेच आहात ?"

"आत्ता पुरतं तरी.. हो.. पण अजून टीम मेंबर्स येताहेत मागून गाडीतून.."

"ओह..ओके.. " स्नेहल चा आता आवाज पूर्ण पडला होता..

"थँक्यू यार बायको.. "

"हां? ओह.. हो हो.. बाय.. "

मानवीने फोन ठेवला मात्र स्नेहल च्या मनात आता काळजीचे काहूर उठले.. "इतका वेळ दोघांच्यात काही झालेले नाही.. मानवीच्या बोलण्यातून तर जाणवले नाही पण.. ते फक्त दोघेच त्या रिसॉर्ट वर त्यांचे टीम मेंबर्स येईपर्यंत असणार आहेत.. जर का बोलता बोलता काही विषय निघाला तर? नाही नाही.. मानवी आत्ता सुद्धा त्याला आखडू च म्हणाली.. पण.. मला हि माहितीये कि राहुल किती चांगला आहे ते.. तो कितीवेळ आखडूपणा दाखवेल तिला.. ते सुद्धा फक्त दोघे च असताना.. आणि मानवीला पण त्याची तशी सवय झालीये ती काही पहिल्यासारखी गोंधळ घालणार नाही.. तिने त्याला सगळं खरं सांगायचं ठरवलं तर?"

विचार करता करता स्नेहल नि डोकं हातात पकडलं.. आजची रात्र स्नेहल साठी फार मोठी असणार होती..

 

************

क्रमशः

 

************

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..