माझी मानवी... 49

A story about love, friendship, kindness and relationships

मानवी राहुल पासून लांब येऊन बीच वर फिरत होती.. राहुल नि पण आता त्याच sketch बाजूला ठेवल होत आणि डिजिटल कॅमेरा मध्ये लोकेशन चे फोटो काढत होता.. मानवीला बीच वर फिरायला म्हणून आलेली १ गोल्डन रिट्रिव्हर भूभू भेटली.. तशी मानवी खुश होऊन त्या भूभू कडे आणि तिच्या owner कडे गेली.. "सो cute.. काय नाव आहे?" त्या owner नि सांगितलं.. "पेगी.. " मानवी त्या पपी बरोबर खेळायला लागली.. "hi पेगी.. किती वर्षांची आहे हि?"

लांबून राहुल च तिच्या कडे लक्ष होत.. तिला तसं खुश होऊन त्या पपी बरोबर खेळताना बघून त्याच्या पण चेहऱ्यावर स्माईल आली.. "बाय पेगी.. " तीला जाताना बघून मानवी म्हणाली.. आणि तीच सहज च लक्ष राहुल कडे गेलं तसे त्याने पटकन दुसरीकडे नजर केली आणि पुन्हा सिरीयस होऊन फोटो काढायला लागला.. मानवी च्या पण ते लक्षात आलं तसे तिने विरुद्ध दिशेला जायला सुरुवात केली.. जो अनायसे मोकळेपणा त्यांच्यात आला होता तो निदान या ट्रिप पर्यंत तरी टिकावा असच तिला वाटत होत.. आणि तिने जेव्हा केव्हा त्याला तिच्या कडे बघताना पकडलं होत तेव्हा तेव्हा तो कसा रिऍक्ट करतो हे पाहून तर हा मोकळेपणा टिकवायचा असेल तर जास्त विचार करायलाच नको आणि थोडं लांब असलेलच बरं.. असच तिने ठरवलं होत.. आता ती बीच वर काही शंख शिंपले दिसतायेत का ते बघत होती.. आणि राहुल अजूनही लांबूनच light house आणि आजूबाजूच्या ठिकाणचे फोटो काढत होता.. पण तिला तस स्वतःतच रमलेलं बघून त्याच्या पण चेहऱ्यावर स्माईल होती..

त्यांचं हे लोकेशन hunting चालू असताना सीमा मॅम नि फोन करून सांगितलं होत कि रिया ची तब्येत बिघडल्याने विशाल आणि ती त्यांना जॉईन करणार नाहीत.. पण मानवीचा रिलॅक्स आवाज ऐकून त्यांना पण तिची काळजी वाटायची कमी झाली.. त्यांनी अजून २ ठिकाणे फिरून पाहिल्यावर ते finally त्या रिसॉर्ट वर पण आले आणि त्यांनी तिथली लोकेशन आणि facilities पण कन्फर्म केल्या.. मानवीने त्या रिसॉर्ट ला असलेल्या private बीच वर असतानाच सीमा मॅम ना कॉल केला तोवर राहुल तिथल्या मॅनेजर लोकांशी बोलत होता..

"हॅलो मॅम.. मानवी बोलतीये.. हो.. लोकेशन्स सगळे बघून झालेत.. मी तुम्हाला फोटोज पाठवते माझ्या मोबाईल मधले.. बाकीचे राहुल सरांच्या डिजिटल कॅमेऱ्यात आहेत.. हो हो.. ओके मॅम.." असं बोलून तिने फोन ठेवला..आणि राहुल पण त्याच काम संपवून तिच्या कडे आला.. तिने सीमा मॅम शी झालेलं बोलणं त्याला सांगितलं.. ते ऐकून तो म्हणाला..

"गुड.. बरं मानवी आता इथलं तर आटोपलं आहे.. तर मग आता आपण जाऊयात का बाहेर कुठं तरी?" पण मानवी त्याच्या कडे तिच्या चष्म्यातून डोळे मोठे करून बघत होती.. त्याच्या तोंडून मानवी ऐकल्या नंतर पुढचं काही तिला ऐकायला च आलं न्हवत.. तिची तशी नजर बघून त्याने त्याच्या चेहऱ्याला हात लावत विचारलं..

"अशी का बघतीयेस? काही लागलं आहे का चेहऱ्यावर माझ्या?"

"नाही.. ते आज पहिल्यांदा असं झालं ना.. "

"काय पहिल्यांदा झालं?" त्याने न कळून विचारलं.. आणि मानवीला कळत न्हवत कि त्याला कसं explain करावं.. पण शेवटी तीने सांगितलं..

"ते तुम्ही पहिल्यांदा माझं नाव घेऊन मला हाक मारलीत.. मानवी अशी.. तुम्ही नेहमी 'ए इंटर्न' अशीच हाक मारलीय ना त्यामुळे.. "

"ए काहीही काय ग.. मी कधी तुला 'ए इंटर्न' अशी.. " आणि बोलता बोलता तो स्वतःच थांबला आणि त्याने आज वर तिला कशी हाक मारलीय ते त्याला आठवलं - एक तर 'management इंटर्न.. ' नाहीतर 'ए इंटर्न..' अशीच त्याने तिला हाक मारली होती.. पण आता ते आठवलं तेव्हा स्वतःला सावरून घेत तो घसा खाकरून म्हणाला..

"पण तरी राहुल आखडू पेक्षा तरी चांगलीच हाक आहे ना मी मारलेली? तुझं काय मत आहे त्या बद्दल?"

"काय?" मानवीने घाबरून विचारलं.. कारण त्याने तसं म्हटल्यावर तिला पण आठवलं कि त्याच हे बारसं तिनेच केलं होत.. अगदी टल्ली होऊन त्याला फोन केल्यावर पण ती त्याला बोललीच होती.. आता मानवी सारवासारव करत म्हणाली..

"पण.. ते नाव मी नाही दिल.. म्हणजे मी नाही.. " ती चाचपडत बोलायला शब्द शोधायला लागली तसा तो म्हणाला..

"राहू दे.. चल जेवायला जाऊयात आता.. " असं म्हणून तो पुढे गेला आणि मागून मानवी अजूनही defensive मोड मध्ये त्याच्या मागून चालत होती..

"पण तू माझं नाव राहुल आखडू ठेवलंस ? How could you?" आता राहुल ला तिची खेचायचा फारच मूड आला होता..

"तुमचा काही तरी गैरसमज होतोय सर.. मी नाही केलं ते.. "

“ठीके मग ते १०,००० दे मला.. "

"हां ? हे बरोबर नाही सर.. "

"आह.. सिरीअसली या मुलीनी माझं नाव राहुल आखडू ठेवलं.. "

"नाही हो सर.. मी नाही ठेवलं.. " मानवीला अजूनही त्याची चेष्टा कळाली न्हवती.. ती अजूनही त्याला मनवायचा प्रयत्न करत त्याच्या मागे मागे करत होती.. अशीच चेष्टा मस्करी करत ते जेवायला पोहोचले.. एका लोकल रेस्टॉरंट मध्ये ते चालतच गेले होते.. तिथे आऊटडोअर sitting एरिया मध्ये ते जेवायला एकमेकांच्या समोर बसले होते.. त्यांनी दोघांच्यात पुरेल म्हणून चायनीज मागवले होते.. व्हेज फ्राईड राईस मध्ये हिरवे मटार टाकले होते.. ते बघून राहुल च्या कपाळावर आठ्या पडल्या.. त्याने एक -एक करत ते मटार बाजूला काढत एका वाटीत काढून ठेवायला सुरुवात केली.. त्याला तस करताना बघून मानवी खाता खाता थांबली आणि तिने त्याला विचारलंच.. "हे काय करताय तुम्ही?"

"ते मी मटार खात नाहि.. " त्याला तस करताना बघून तिला लहानपणी सुद्धा राहुल मसालेभातातून मटार काढून खायचा त्याची आठवण आली.. तो तिला पुढे सांगत होता मात्र तिला लहानपणीचा राहुल च बोलतोय असं वाटत होत.. "मला खरंच कळात नाही लोक मटार खातातच का? त्यांना अशी काही स्पेसिफिक टेस्ट तर नसते.. They are just crumbly.." आता मात्र त्याच ते शेवटचं वाक्य ऐकून तिला त्याने हे सेम कारण लहान असताना पण दिलेलं ते आठवलं आणि ती ते आठवून हसली.. पण राहुल नि विचारलं.. "हसायला काय झालं?"

"नाही.. मला कुणाची तरी आठवण आली.. ते आठवून हसले.. " तिने सांगितलं..

ते बसले होते तिथे टेबल वर गेम म्हणून टेबल मॅट वर फाईंड वे गेम आणि tic tac toe चा पण गेम draw केला होता.. मानवीनी खाता खाता तिच्या सॅक मधून पेन काढला.. तसा राहुल म्हटला.. "मी पण खेळणार.. " मानवी मनाशीच म्हटली.. "चांगला सापडला हा.. आता दाखवते मजा.. माझी चेष्टाच सुचते ना नेहमी.. tic tac toe मध्ये मला आज पर्यंत कुणी हरवलं नाहीये.. " त्याला मात्र साळसूद पणे ती म्हणाली..

"सर तुम्ही सुरुवात करता का?"  तसा तिच्या समोर मुद्दाम भाव खात तो म्हणाला..

"मी पुढच्या गेम ला खेळतो.. आत्ता चा तू सुरु कर.. कारण पुन्हा हरल्यावर रडणार तू..  "

मानवीने सुरुवात केली.. त्यांनी जेवण संपवलं खेळत खेळत तरी एकही गेम राहुल जिंकला नाही.. प्रत्येक वेळी तीच जिंकायची.. नाहीतर draw व्हायचा..शेवटी राहुल वैतागून म्हणाला..

"काही तरी ट्रिक आहे तुझी जी मला लक्षात येत नाहीये.. "

"अजून एकदा खेळुयात मग?" थोड्या वेळाने मात्र त्याने ती खेळायच्या आधी हात पकडला आणि म्हणाला.. "चीटिंग करते तू.. मी नाही खेळणार.. बस आता.. " तशी ती हसून म्हणाली..

"बरं.. राहिलं मग हे खेळूया?" फाईंड वे गेम वर बोट ठेवत ती म्हणाली.. त्यांनी वेटर ला अजून कोल्ड कॉफी ची ऑर्डर दिली आणि पुन्हा खेळण्यात गुंतले.. त्यात एका टोकाला १ बेडूक होता आणि त्याला विहिरीच्या चित्र पर्यंत न्यायचे होते.. ते वाट शोधत होते इतक्यात राहुल म्हटला.. "मानवी ते बेडकावर गाणं होत ना ग कोणतं तरी.. "

"crazy फ्रॉग..? " मानवीला लगेच आठवलेलं बघून तो excitedly म्हणाला..

"हां तेच तेच.. कस होत ग ते.. Baa aramba baa bom baa barooumba.. " तो त्यातलं music वर ते म्हणत होता तशी मानवी म्हणाली..

"तस न्हवत काही ते.. असं होत.. Ring ding ding ding ding ding

Ring ding ding ding bem bem bem" तिनी ते त्याच सुरत म्हणून दाखवल्यावर.. राहुल हसत म्हणाला..

"मी म्हणतोय तस होत ग.. किती हट्टी आहेस ग मानवी.. मी सांगतोय तर.. "

"नाही हो सर.. मी म्हणतीये तसेच होत.. थांबा हवं तर मी search करून दाखवते.. " असं म्हणून तिने ते गाणं शोधून वाजवून दाखवलं.. आता ते पेपर वर चा गेम सोडून हे गाणं ऐकत त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.. त्यांनी त्यांच्या गप्पांना पण एका खेळाचं रूप दिलं होत..

"ओके.. फेव्हरेट music बँड ? ऑन द काउन्ट ऑफ ३.. १ -२ -३!"

"backstreet boys.." दोघे एकदम म्हणाले.. तसा दोघांनी आश्चर्याने एकमेकांच्या कडे पाहिलं.. असेच त्यांची प्रश्न उत्तर चालू होती.. राहुल तिला विचारत होता..

"तुला movies आवडतात?"

"हो आवडतात ना.. "

"ओके.. मग फेव्हरेट मूवी? १-२-३!"

"pursuit of happiness " दोघांनी एकदम उत्तर दिलं तसे दोघे पण हसायला लागली.. "this is so cool.. " राहुल म्हटला.. कारण त्यांच्या आवडी निवडी इतक्या एकसारख्या होत्या योगायोगाने कि आता त्यांना आश्चर्य न वाटता मजा वाटायला लागली होती.. त्यांच्या अशा गप्पा चालल्याचं होत्या इतक्यात एका वेटर नि येऊन त्यांना सांगितलं..

"Sorry to disturb you sir..पण आता रेस्टॉरंट बंद करायची वेळ झालीये.. "

"ओह.. ओके.. बिल देता मग?" वेटर गेल्यावर मात्र राहुल मोबाईलच्या घड्याळात बघत मानवीला म्हणाला..

"आपण खूप वेळ झाला इथे आहोत ना?" मानवी मात्र त्याच्या कडे न बघताच म्हणाली..

"हो ना.. खूप दिवसांनी अशा गप्पा झाल्या.. "आता दोघे एकमेकांच्या कडे हसून बघत उठले.. बिल पे करून ते बाहेर पडले तेव्हा ९.३० वाजले होते.. ते त्यांच्या रिसॉर्ट च्या जवळच पायी चालत गेले होते त्यामुळे आत्ता सुद्धा ते तसेच गप्पा मारत चालत येत होते.. त्यांना गप्पा मारताना वेळेचं पण भान राहील नाही ह्या जाणीवेने ते दोघे पण थोडे लाजले होतेच पण त्यांच्या तशा फ्रेंडली गप्पा च चालू होत्या त्यामुळे तिकडे जास्त लक्ष न देता त्यांनी पुन्हा गप्पा मारायला सुरुवात केली.. मानवी मात्र त्याच्या या मोकळ्या वागण्याने थोडी जास्त खुश होती.. ते शतपावली करताना जितकं हळू चालतात त्याहून हळू चालत होते.. कारण रिसॉर्ट वर गेल्यावर त्यांना आपापल्या रूम मध्ये जावं लागणार होत..   

 ते चालत होते इतक्यात समोरून १ माणूस थोडा झिंगलेल्या अवस्थेत चालला होता तो मानवीला पाहून रस्ता क्रॉस करून आला.. गप्पा मारताना मानवीला नाही कळले पण राहुल च्या लक्षात आले होते.. त्याने बरोबर वेळेत तिला आतल्या बाजूला घेतले आणि तो माणूस धडक देणार तेव्हा रस्त्याच्या बाजूला आला.. राहुल च्याही नकळत त्याने मानवीचा हात घट्ट पकडला होता आणि तो माणूस त्यांना क्रॉस करून थोडा लांब जात नाही तोवर त्याने तिला सोडलं नाही.. नंतर मात्र भानावर येत त्याने तिचा हात सोडला.. आणि अवघडून घसा खाकरायला लागला.. तसं मानवीने मुद्दाम न कळाल्याचं नाटक करून त्याला विचारलं..

"ओह.. तुम्हाला अजून हि खोकला आहे?"

"नाही नाही.. ते घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटलं.. " त्याच्या बोलण्यावर मानवी किंचित हसली.. आता त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली.. त्यांचं बोलणं तिने केलेल्या तब्येतीच्या चौकशी वरूनच पुढे continue करत तो म्हणाला..

"आता विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं.. मी तुला थँक्यू तर म्हटलंच नाही.. त्या दिवसा साठी.. थँक्यू सो मच.. "

"ओह.. well .. " ती काय बोलावं ते कळून एवढंच बोलून शांत झाली पण राहुल पुढे सांगू लागला..

"माझी आई.. मी १० वर्षांचा असताना देवाघरी गेले.. त्या दिवशी सारख्याच पावसाळी रात्रीत मी आणि  ती गाडीत असताना आमचा accident झाला होता.. त्या दिवशी पासून मला कार मधून प्रवास करताच यायचा नाही, अजूनही त्रास तर होतोच.. मला नेहमी भीती वाटत राहायची त्या दिवशी झाला तसा accident पुन्हा व्हायची.. नंतर थेरपी घेऊन म्हणा किंवा खूप वेळ मध्ये गेला त्यामुळे म्हणा काही दिवस तरी मला अजिबात त्रास नाही झाला.. पण त्या दिवशी.. तस का झालं काही कळालं नाही.. " तो नर्वसली हसून शेवटचं वाक्य म्हणाला.. मात्र मानवी पूर्ण सिरीअसली हे सगळं ऐकत होती.. लहानपणी जे तिने लपून तिच्या आई च आणि त्याच्या बाबांचं बोलणं ऐकलं होत ते आज तो स्वतःच्या तोंडून सांगत होता.. ती अशी सिरीयस झाल्याचं बघून मात्र तो पुन्हा मूड हलका व्हायला म्हणाला..

"मी अशा type च्या गोष्टी तुला का सांगतोय पण? त्या कोल्ड कॉफी मध्ये काही मिक्स केलं होत कि काय त्यांनी?" मानवी मात्र त्याच्या बोलण्यावर फक्त हळुवार हसली.. पण तिच्या त्या चष्म्यातून तिचे कनवाळू डोळे त्याला झालेल्या त्रासा मुळे हळवे झाले होते ते त्याने हि ओळखलं.. थोडा वेळ काही न बोलताच ते चालत राहिले.. रिसॉर्ट वर काही वेळात ते पोहोचले पण दोघांनाही रूम वर जायचं नसल्या कारणाने राहुल ने जेव्हा बीच च्या बाजूला असलेल्या कट्ट्याकडे बोट दाखवलं तेव्हा मानवी पण त्याच्या बरोबर चालत तिकडे गेली.. ती बरोबर आलीये हे बघून जेव्हा त्याने कट्ट्यावर तिला बसायला आधी जागा हातानेच झाडली तेव्हा हसून मानवी "असू दे सर.. " म्हणून त्याने झाडलेल्या जागी बसली.. तिच्या शेजारी बसत त्याने एकदा तिच्या कडे बघितलं.. तीही त्याच्या कडे बघतीये हे कळल्यावर थोडा सुखावून त्याने आकाशाकडे बोट दाखवलं.. ना कुठलं pollution.. ना कुठला lighting चा झगमगाट.. त्यामुळे आकाशात खूप सारे तारे लुकलुकताना दिसत होते.. त्याने बोट केलेल्या दिशेने मानवीने पाहिले मात्र पुन्हा तिचा तो खुश झालेला आवाज त्याच्या कानावर आला.. "wow.. " आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल अजून मोठी झाली.. आकाशाकडे बघत तो पुढे म्हणाला..

"आह.. हा आकाशाचा अर्धा तुकडा जरी मुंबईत बघायला मिळाला तर काय मजा येईल ना?" ते दोघे असे आकाशाकडे बघत असताना मानवी मात्र विचार करत होती..

"मला वाटलं होत तू पूर्ण बदलला आहेस.. आणि माझा तो लाडू कुठे तरी हरवून गेला असं वाटलं होत पण तू तर पहिल्या सारखाच स्वीट आहेस.. अजूनही तू तोच राहुल आहेस.. मी जर का मूर्खासारखं वागून तुझ्या पासून लपायचा निर्णय घेतला नसता आणि जशी आहे तशी तुझ्या समोर आले असते तर आज आपण जसे मोकळेपणाने हसलो-खेळलो तसेच त्या दिवशीही वागलो असतो.. आणि तुला जेव्हा माझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा हक्काने मी तुझ्या बरोबर थांबले असते.. हो ना? राहुल.. मे बी.. आज.. आज मी तुला सांगू शकते.. कि मी तीच बालमैत्रीण आहे तुझी.. आज मला असं वाटतंय कि मी तुला सगळं काही सांगू शकते.. आजच तो दिवस असेल तर मे बी तुला सगळं खरं सांगून टाकेन..”

************

क्रमशः

************

🎭 Series Post

View all