Oct 24, 2021
कथामालिका

माझी मानवी... 45

Read Later
माझी मानवी... 45

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मानवी आणि राहुल बराच वेळ गाडी चालवत होते.. अर्धा तास तरी झाला असेल तरी गाडीतली शांतता तशीच होती.. राहुल नि अगदी निर्धार केला होता कि मानवी कडे बघायचं नाही.. पण मानवी अधून मधून थोडी खोकली कि तो नाही म्हटलं तरी अस्वस्थ व्हायचाच.. आता ते छोट्या छोट्या खेडांच्या बाजूने चालले होते.. राहुल ला आता अंदाज आला होता कि ते काही इतक्यात पोचणार नाही.. कुठे तरी जेवायला गाडी थांबवायला हवी होती.. तो या बाबतीत सीमा मॅम वर अवलंबून राहिला होता पण नेमकं त्यांचंच यायचं कॅन्सल झालं होत, आणि विशाल आणि रिया पण कुठवर आलेत हे त्याला माहिती न्हवतं.. पण आज त्यांचं जेवण किती लांबणार आहे ह्याची त्याला पण कल्पना न्हवती..

*****

इकडे सीमा मॅम ऑफिस मध्ये कामा मध्ये बुडाल्या होत्या.. त्यांचं काम चालू होत इतक्यात रवी ने त्यांच्या टेबल वर रबराची पाल टाकली.. आणि जोरात त्यांच्या मागे जाऊन म्हणाला.. "सीमा मॅम.. पाल बघा तिथे.. तुमच्या हाताच्या बाजूला.. " तो त्यांना घाबरवायला म्हणाला होता पण त्यांनी त्यांच्या लॅपटॉप मधून मान वर न करता ती उचलली आणि त्याच्या हातात एका हाताने देत म्हणाल्या.. "घे.. " त्या जरा पण घाबरल्या नाहीत हे बघून तो हिरमुसला.. इतक्यात विजय सर सीमा मॅम ना काहीतरी द्यायला आले तसा त्यांना पण घाबरवायला त्याने त्यांच्याशी शेकहॅंड केला तसे ते ती पाल बघून म्हणाले..

"जुना झाला हा जोक रवी.. बाजूला हो बरं.."

त्याचा त्यांना पण घाबरवायचा प्रयत्न फसलेला बघून सीमा मॅम म्हणाल्या.. "कधी हा मोठा होणार देव जाणे.. " त्यावर विजय सर म्हणाले.. "या जन्मात तरी नाही व्हायचा मोठा.. "

त्यांच्या त्या कंमेंट्स ऐकून रवी पुन्हा त्याच्या डेस्क वर गेला आणि त्याच्या मागची मानवी ची मोकळी खुर्ची बघून स्वतःशीच म्हणाला.. "छोटी कडून जशी रिऍक्शन  येते तशी दुसऱ्या कडून नाही आली आजवर.. ह्म्म्म.. मिस यु यार मानवी.. "

काही कामाने विजय सर राहुल च्या केबिन मध्ये गेले.. आणि त्यांचं लक्ष राहुलच्या कॉम्पुटर स्क्रीन च्या जवळ गेलं.. राहुल च wallet तिथेच राहिलं होत.. ते बघून ते म्हणाले.. "काय विसराळू माणूस आहे हा.. wallet सारखी गोष्ट कुणी विसरत का?! बरं सगळे एकत्रच आहेत.. करतील manage .." ते wallet राहुल च्या डेस्क च्या ड्रॉवर मध्ये ठेवून ते पुन्हा त्यांच्या जागेवर येऊन बसले..

*****

इकडे मानवी आणि राहुल एका गावाच्या मधून रस्ता जात होता त्या वरून चालले होते.. थोडी माणसांची गर्दी होती त्यामुळे राहुल गाडी हळूच चालवत होता.. आता गावातून बाहेर पडणार असं त्यांना वाटत होत इतक्यात एका वळणावर एकदम एक कोंबडा एका माणसाने राहुलच्या गाडीवर फेकला.. अचानक अशा झालेल्या हल्ल्याने राहुल ने भांभावून गाडी जागेवर थांबवली.. तसा एक माणूस ओरडत रस्त्यावर आला..

"ओ साहेब.. काय केलं तुम्ही.. हे बघा कोंबडा मेला माझा.. "

खर तर तो कोंबडा मेलाच होता पण त्याने असा आरडा ओरडा करायला सुरुवात केल्यावर लोक काय झालं हे बघायला यायला लागली.. झाला प्रकार समजायला दोघांनाही थोडा वेळ लागला.. मानवी डोळ्यानेच राहुल ला गाडीतून उतरू नको.. जाऊयात आपण असं खुणवत होती.. पण आता उशीर झाला होता.. जवळपास ते गावाबाहेर होते त्यामुळे ५-६ च लोक जमले होते.. पण ते आता त्याच्या गाडीच्या समोर येऊन त्याला बाहेर ये म्हणून ओरडू लागले.. त्यांचा तो aggressive अवतार बघून नाही म्हटलं तरी राहुल पण घाबरला च  होता..  पण मानवी चा पण घाबरलेला चेहरा बघून तो जरा शांत होता.. शेवटी दोघे पण गाडीतून खाली उतरली आणि त्यांनी गाडीच्या समोर जाऊन पाहिलं.. हे असे प्रकार होतात हे मानवी ऐकून होती त्यामुळे तिने तिची पर्स सॅक मधून काढून घेतली होती.. आणि राहुल च्या मागे जाऊन उभी राहिली.. मानवीच्या गळ्यात सकाळी घातलेलं कंपनी च ID कार्ड तसेच होते त्यामुळे त्यांना हि काम करणारी लोक आहेत हे बघून आता जोर चढला होता.. सगळे ओरडत राहुल च्या कडून पैशाची मागणी करत होती.. शेवटी तो पण जरा आवाज काढून म्हणाला..

"कशाचे पैसे? तो कोंबडा आधीच मेलाय.. माझ्या गाडीवर या माणसाने फेकला चक्क तो उचलून.. मी हळू चालवत होतो गाडी त्यामुळे मी पाहिलं नीट.. "

"आता पैसे द्यायला नको म्हणून असं खोटं बोलतोय हा माणूस.. सूट बूट घातला म्हणजे तुझं चालेल असं वाटलं काय? हे माझं गाव आहे.. "

तो माणूस भांडायला च तयार होता.. या बाचा बाची मध्ये त्याची भाषा पण बरीच घसरायला लागली होती.. शेवटी वैतागून घड्याळात पाहत राहुल जोरात ओरडून म्हणाला..

"ए बास कर..” १ वयस्क काका मध्यस्ती करत त्या माणसाला रागावले आणि राहुल ला म्हणाले..” साहेब कशाला नदी लागता याच्या.. तुमच्या सोबत या ताई पण आहेत.. देऊन टाका पैसे.. "

आज बरीच काम ऑन site जाऊन त्यांना करायची होती.. पण यातच बराच वेळ गेला होता त्यामुळे त्याने शेवटी पैसे देऊन वेळ तर वाचेल असा विचार करून पैसे द्यायला तयार झाला.. तसा तो माणूस म्हणाला..

"काढा १०,०००.. माझा कोंबडा गेला.. तुमचं काय जातंय.. माझ्या गरीबाचा धंदा बसवला तुम्ही.. हातावर पोट असतं आमचं.. "

त्याच बोलणं ऐकून राहुल पुन्हा जोरात ओरडला..

"काय? १०,०००? डोक्यावर पडला काय तू? तू फसवतोय हे कळून पण मी पैसे द्यायला तयार झालोय याचा अर्थ हा नाही होत कि तू लूटशील मला आणि मी गप्प बसेन.. अजिबात नाही देणार.. "

ते काका पुन्हा मध्यस्ती करायला लागले.. तस तो म्हणाला..

"तुम्हाला काय माहिती मोठ्या लोकांना कोंबड्याची किंमत? तेवढी किंमत च आहे मार्केट मध्ये.. "

त्याच ऐकून मानवीने मागच्या मागे google वर search करून पाहिलं तर ५००० पासून पुढे किंमती होत्या.. ते बघून तिने तिच्या calculator वर ५००० type करून फक्त राहुल च्या समोर धरलं.. तस त्याला समजलं, तो म्हणाला..

"मी ५००० च्या वर १ रुपया देणार नाही.. "

त्या नंतर बऱ्याच वेळ वादा वादी झाल्यावर तो माणूस ५००० वर तयार झाला.. आता त्याला पैसे द्यायला राहुल ने त्याच्या ब्लेझर च्या आत हात घातला आणि त्याच्या हाताला wallet लागेना तसा तो गोंधळला.. त्याने सगळे खिसे तपासले.. गाडीत जाऊन पण पाहिलं.. आता तो wallet च विसरलाय हे लक्षात आल्यावर तर खूपच दंगा घालायला त्या माणसाने सुरुवात केली.. शेवटी मानवीने situation समजून राहुल ला बाजूला घेतलं आणि म्हणाली.. "सर माझ्याकडे आत्ता २००० आहेत.. तुमच्या खिशात ५०० जरी असले तरी आपलं काम होईल.. "

"नाहीत ना माझ्याकडे.. "

"बरं.. मग असं करा.. हे द्या आणि म्हणावं अजून आमची लोक येताहेत ते आली कि मी उरलेले देतो.. तोवर मी रिया ला कॉल करून विचारते कुठं पर्यंत आलेत ते.. विशाल चा no नाहीये माझ्याकडे नेमका.. " तिचा मोबाईल काढत मानवी म्हणाली.. राहुल तिने दिलेले पैसे घेऊन त्या लोकांच्या कडे पुनः बोलायला गेला.. तोवर मानवीने रिया ला फोन लावला..

"हॅलो रिया.. "

"मानवी? तू का केलाय फोन? मी आज बिजनेस ट्रिप ला आलीये माहितीये ना?"

"मी पण त्याच ट्रिप वर आहे.. सीमा मॅम नि मला पाठवलंय त्यांच्या ऐवजी.. " तीच उत्तर ऐकून तिने डोळे फिरवले.. तिने शेजारी झोप लागलेल्या विशाल कडे पाहिलं.. आणि म्हणाली..

"बरं मग? कॉल का केलाय?"

"तुम्ही कुठं पर्यंत आलाय? आम्ही नदीच्या पुलावरून पुढे आल्यावर १ गाव आहे तिथं पर्यंत आलोय.. "

"नदी? कसली नदी? माझ्या रूट वर कुठली नदी नाही दाखवते गूगल मॅप्स वर.. " रियानी उत्तर दिलं.. रिया ने मुद्दाम त्यांचं ठरलेलं जे रिसॉर्ट त्याच्या opposite direction च १ रिसॉर्ट च नाव निघालं होत डिस्कशन मध्ये त्याचा रस्ता पकडला होता.. जेणेकरून तिला विशाल बरोबर जास्त वेळ घालवता येईल आणि काम पण जास्त पडणार नाही.. ते पोहोचे पर्यंत काम होऊन जाईल.. आता मानवी तर लास्ट मिनिट ला आलेली.. तिला काहीच कळेना.. इतक्यात राहुल त्या लोकांच्या इथून आला आणि म्हणाला.. "किती वेळ लागेल अजून त्यांना?"

"सर.. मला काही कळत नाहीये.. तुम्हीच बोला.. " त्याच्या कडे फोन देत ती म्हणाली.. राहुल नि तिच्या कडून फोन घेतला आणि बोलला..

"हॅलो?"

"हॅलो राहुल सर.. मला अजून २ तास दाखवतंय डेस्टिनेशन पण हि मानवी तर म्हणते तुम्ही कुठल्यातरी नदीच्या पुलावरून आला.. मला  माझ्या रूट वर कुठली नदी नाही दाखवते गूगल मॅप्स.. "

"काय? कुठं चाललाय तुम्ही?"

"sea side रिसॉर्ट वर जायचंय ना?"

"sea side नाही sea shell रिसॉर्ट ला जायचं ठरलंय.. तुम्ही अगदी exactly opposite direction ला आहात.. " तो वैतागून चिडत म्हणाला.. तशी नाटकीपणे ती म्हणाली..

"oh my god sir.. I am so sorry.. मी आत्ता गाडी वळवते.. तुम्ही पोचाल त्याच्या थोड्या वेळात आम्ही पोहोचूच.. " तिने एवढं बोलून फोन पण कट केला.. तसा मानवी कडे फोन देत राहुल म्हणाला.. "मला अजिबात आवडत नाही हि रिया.. " त्याच बोलणं ऐकून मानवी पण पुटपुटली.. "मला पण.. सर पण काय झालं बोलणं? किती वेळ लागेल त्यांना यायला?"

"त्यांना तर संध्याकाळ होईल.. काय करावं? तुझं कार्ड असेल तर बरोबर त्यावरून काढूया का पैसे? इथे जवळपास ATM तर असेल च ना.. "

"हो हो.. चालेल.. " मानवी लगेच तयार झालेली बघून त्याला जास्तच शरमल्या सारखं वाटत होत.. त्याला असं वाटलं होत कि तिला भूक लागलीये तर तिला चांगल्या ठिकाणी जेवायला घालू.. आता हे नवीनच प्रकरण सुरु झालं होत.. ती मात्र लगेच त्याला मदत करत होती.. इतक्यात मानवीला एकदम आठवलं कि तिच्या अकाउंट मध्ये अजून २००० च आहेत.. १ हजार कमी पडतील.. तशी तिने त्याला कल्पना दिल्यावर तो म्हणाला.. "ओके.. ऑफिस मध्ये सरळ कॉल करूयात आणि मागुयात ३००० डायरेक्ट.. " त्याच बोलणं ऐकून मानवीने होकारार्थी मान हलवली आणि रवी ला फोन लावला.. रवीने नेमका १ interview ररांगे केला होता आणि तो त्यांच्याशी त्यांच्या conference रूम मध्येब बोलत होता.. त्याने त्याचा फोन त्यामुळे त्याच्या डेस्क वर च ठेवला होता.. बराच वेळ फोन वाजून बंद व्हायला आला तेव्हा तिथून जाणाऱ्या एका फॅशन टीम मधल्या मुलीने मानवी च नाव पाहिलं आणि फोन उचलला..

"हॅलो रवी सर?"

"रवी सर  conference रूम मध्ये आहेत.. काय झालं मानवी आवाज कसला येतोय?"

इतक्यात त्या माणसाबरोबर चा १ माणूस तिच्या बाजूला येऊन पैसे असे कसे नाहीत.. मॅडम तुम्ही द्या म्हणून मोठ्याने बोलू लागला.. जेव्हा मानवीने तेच मागायला कॉल केलाय असं सांगितलं तेव्हा त्या माणसाने चक्क तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि त्या मुलीशी बोलायला लागला..

"ओ मॅडम.. या लोकांनी आमचा कोंबडा मारलाय.. पैसे नाहीत आणि म्हणे ह्यांच्या कडे.. पैसे पाठवा तुम्ही आत्ता च्या आत्ता.. "

राहुल ला तिकडे बोलण्यात गुंतवून त्या माणसाच्या मित्राने तिचा फोन हिसकावून घेतला होता कारण त्यांना भीती होती कि हे लोक अजून लोकांना बोलावतील तर मग आपलं काही चालायचं नाही.. इकडे त्या माणसाचं बोलणं ऐकून ती मुलगी भाम्भावली आणि तिने सीमा मॅम ना फोन दिला.. त्यांना जेव्हा असं काही सांगितलं तसं त्यांना हे सगळं काहीतरी पैसे उकळण्यासाठी कुणी तरी फसवतंय असं वाटलं.. कारण शेवटी त्यांना पण माहिती न्हवत कि रिया आणि विशाल त्यांच्या सोबत नाहीयेत..  त्यांनी त्या माणसाला उडवून लावलं..

"तुम्ही असे पैसे उकळण्या साठी कुणाला पण फोन करून मागणी करता का? आमची माणसं ४ आहेत.. २ नाहीत.. काही पैसे मिळणार नाहीत.. ठेवा फोन.. "

त्यांनी फोन ठेवला तसा मानवीला फोन देत तो माणूस म्हणाला,"कुणी सुद्धा नाहीये तुमची मदत करणार? असं असेल तर शेतात यावं लागेल आमच्या मजुरीला.. "

"तुम्ही बोलूच दिलं नाही मला.. मी माझ्या बँकेत पाठवायला संगतीये पैसे.. आम्ही ATM मधून काढून दिले असते ना पैसे.. " तिने असं सांगितल्यावर त्याने "मग लावा दुसऱ्याला कुणाला फोन लावायचाय तो.." असं बोलून पुन्हा त्याच्या मित्राकडे गेला..

मानवीने पुन्हा सीमा मॅम ना फोन लावला पण तिच्या फोन वरून च रवीला फोन आलेला त्यामुळे त्यांनी तिचा फोन बघून कट केला.. आता मात्र मानवी घाबरली.. ती पुन्हा राहुल कडे गेली आणि म्हणाली..

"सर.. ऑफिस मध्ये माझा कुणीच फोन उचलायला तयार नाही.. तुमच्या ओळखीचं नाही का कुणी जे पैसे पाठवेल.. ?"

"नाही.. "

"१ पण नाही?"

"नाही.. " राहुल नि मान खाली घालत सांगितलं.. आता मानवीला लक्षात आलं.. तिच्या शिवाय त्याचं भारतात कुणी त्याच म्हणायला असं न्हवतंच ना.. शेवटी तीच म्हणाली..

"ठीके सर.. मी बघते माझ्या मैत्रिणीला फोन करून.. "

असं म्हणून तिने स्नेहल ला फोन लावला.. पण आज त्यांचं नशीबच खराब होत.. ती पण नेमकी तिचा फोन तिच्या केबिन मध्येच ठेवून कुठे तरी गेली होती.. तिने खूपदा फोन लावला पण तिने उचलला नाही बघून तीच तिथे येऊन म्हणाली..

"हे बघा दादा.. आत्ता तरी कुणाशी आमचा कॉन्टॅक्ट होत नाहीये.. तर आम्ही तुम्हाला बँकेतून २००० काढून देतो पण उरलेले १००० काही आमच्या कडे नाहीयेत.."

आता तर त्यांच्यातल्या एकाने रागाने राहुल च्या गाडी वर लाथ च मारली.. मानवी एकदम घाबरून राहुल च्या मागे लपली..

 

************

क्रमशः

 

************

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..