Oct 18, 2021
कथामालिका

माझी मानवी... 48

Read Later
माझी मानवी... 48
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

रवी त्याच्या ऑफिस मधल्या डेस्क वर काम करत बसला होता इतक्यात त्याच्या पाठीमागून १ भला मोठा कोळी त्याच्या पुढ्यात कुणीतरी टाकला.. तसा रवी जोरात घाबरून ओरडत मागे सरकला आणि मागे उभ्या असलेल्या विजय सरांना धडकला.. तसे ते  हसून म्हणाले..

"सगळ्यांना घाबरवतोस पण स्वतः पण तितकाच घाबरतोस कि.. हे तुझं खेळणं तिकडे पॅन्टरी मध्ये होत.. " त्याला ते देऊन ते गेले.. इतक्यात ऑफिस मधली १ मुलगी रवी कडे काही पेपर्स घेऊन आली.. तिच्या कडे बघून रवी म्हणाला..

"अरे तू अजून इथेच आहेस?अजून घरी नाही गेलीस तू?"

"इतक्यात घरी? आत्ताशी ४ वाजलेत रवी सर.. "

"काय? मला तर वाटलं संध्याकाळचे ७ वाजलेत.. आज वेळ जातच नाहीये.. " तिच्या कडून पेपर्स घेत तो म्हणाला.. शेवटी डोकं झटकत तो म्हणाला..

"मी जरा मोकळ्या हवेत जाऊन येतो.. मग जरा उत्साह येईल कामाला.. " त्याला जाताना बघून ती मुलगी हसून स्वतःशीच म्हणाली.. "आज मानवी नाही ना छळायला म्हणून वेळ जाईना ह्यांचा.."

*****

इकडे रिया आणि विशाल एका वेगळ्याच रस्त्याला लागले होते.. पण विशाल च न ऐकून रिया नि जी सीफुड ची डिश खाल्ली होती त्यानी तिला थोडा त्रास व्हायला लागला होता अन तिच्या हि नकळत त्यांच्या गाडीचा स्पीड कमी झाला होता.. विशाल इकडे तिकडे बघत म्हणाला..

" आपण बरोबर रस्त्यावर आहोत का ग? आपण अजून पण highway वर च कसे? एव्हाना गावं लागायला हवी होती ना आपल्याला?" पोटातली कळ दाबत ती म्हणाली..

"अरे बरोबर च रस्त्यावर आहोत रे.. हा शॉर्टकट आहे.. "

"रिअली? that's so strange.. (आता तिच्या कडे त्याने पहिले आणि तिला घाम फुटलेला बघून तो म्हणाला.. ) रिया.. are you alright? तुला एवढा घाम का आलाय?"

"हां ? हो हो.. मी ठीक.. " पण तिने वाक्य पण पूर्ण न्हवतं केलं एवढ्यात तिच्या पोटात १ जोराची कळ आली.. पोट  दाबून ती म्हणाली..

"बापरे.. आह.. मी मघाशी ते सीफुड खाल्लं त्यामुळे मला वाटतंय.. आह.. शीट! मला.. बाथरूम.. मला बाथरूम ला जावं लागेल.. "

"ओह.. पोटात गुडगुडतंय तुझ्या? अरे बापरे, थांब मी मॅप वर बघतो पटकन.. " त्याने त्याचा मोबाईल काढून त्यावर बघायला सुरुवात केली.. दरम्यान रिया मात्र..

"आह.. बाथरूम बघ.. आह.. प्लीज..पटकन.. " एवढंच बोलत होती.. पण इतक्यात ते चालले होते तिथे वाटेवरच  १ पब्लिक टॉयलेट त्यांना दिसलं.. रियाने गाडी लगेच बाजूला घेतली आणि जवळपास धावत च ती बाथरूम ला गेली.. अर्थात आपल्या देशात जी अवस्था असते तीच अवस्था होती त्या पण टॉयलेट ची पण आता तिच्या कडे पर्याय न्हवता.. एवढा त्रास होत होता तिला पण तिच्या डोक्यात मात्र विचार हेच होते कि हे सगळं विशाल च्या समोर व्हायला नको होत.. तो काय विचार करत असेल आता तिच्या बद्दल.. नंतर स्वतःलाच धीर देत ती म्हणाली.. "natural आहे ना असं काही होणं.. मी काय मुद्दाम नाही केलं.. don't worry Riya..you still can recover from this..फक्त मी माझ्या प्लॅन वर फोकस ठेवला पाहिजे.. "

ती तीच आवरून बाहेर आल्यावर विशाल नि विचारलं.. "ठीक आहेस आता? काही देऊ का गाडीतून?"

"हो.. ठीके मी.. " रिया कशी बशी म्हणाली.. ती तिथल्या पायऱ्या उतरून खाली येत होती पण तिच्या पायातल्या हिल्स मुळे आणि त्या पायऱ्या पण काही फार चांगल्या न्हवत्याच तिचा पाय मुडपून बॅलन्स गेला आणि ती खाली पडली.. तिला पडलेली बघून विशाल पळत तिच्या जवळ आला.. पण तिला धड उठून पण बसता येत न्हवतं.. तिच्या पायाला चांगलीच सूज आली होती.. काळा निळा झाला होता पाय.. तिला एवढं जास्त लागलेलं बघून विशाल पण काळजीत पडला..

त्याने तिला आधार देऊन गाडी पर्यंत नेलं आणि सीट वर बसवलं.. त्याच्या सॅक मध्ये असलेला pain relief स्प्रे मारला पण काही फरक पडला नाही.. शेवटी त्याने तिला हळूच विचारलं..

"रिया तुला आता या अवस्थेत गाडी कशी ग चालवता येईल?"

"हम्म.. नाही ना येणार.. तू चालव कि.. "

"मला नाही येत गाडी चालवता.. "

"काय? पण तू तर अमेरिकेत होतास ना शिकायला? तिथे तर teen age मध्येच गाडी चालवायचं license मिळत ना?"

"हो.. ते सगळं खरं असलं तरी माझ्या वडीलांनी मला कधी permissionच नाही दिली चालवायची.. आणि नंतर कधी गरज पण नाही पडली.. "

"पण आता पडली ना.. आता काय करायचं?" त्याच्यावर ओरडत रिया म्हटली.. पण त्यात पण तिच्या मनात विचार आलाच कि बरोबर आहे ना.. पटवर्धन ग्रुप च्या  वारसाला कुणी गाडी कशी काय चालवू देईल.. पण आता काय करायचं हा प्रश्न च होता त्यांच्या समोर.. त्यात पुन्हा तिच्या पोटात पण अजूनही गडबड होत होतीच.. ते काय करायचं असा विचार करत होतेच एवढ्यात रवी चा त्यांना फोन आला.. रवी त्यांच्या ऑफिस च्या गार्डन एरिया मध्ये येऊन बसला होता.. कॉफी चा कप घेऊन काही कलिग्स पण बाकीच्या डिपार्टमेंट मधली तिथे बसली होती.. रवी सुरुवातीला मानवीलाच कॉल करत होता पण तिचा बिझी आला त्यामुळे त्याने विशाल ला केला होता.. आपल्या बहिणाबाई फोन का उचलत नाहीयेत हे विशाल लाच विचारू आणि त्यालाच तिच्या कडे फोन द्यायला सांगू असा त्याने विचार केला..

"हॅलो विशाल.. कसं चालू आहे रे काम?"

"रवी सर इथे १ प्रॉब्लेम झालाय अहो.. आम्ही अर्धा रस्ता पण पार नाही केला पण आम्ही इथेच अडकून पडणार असं दिसतंय.. "

"काय? काय झालं?"

"आधी आम्ही रास्ता चुकलो आणि नंतर बरोबर रस्त्यावर आलो पण पुन्हा आता ब्रेक घेतला होता तेव्हा नेमका रिया चा पाय मुरगळला.. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला गाडी चालवता येत नाही.. "

"मग मानवी? मानवी कुठाय?"

"मानवी दीदी तर पुढे गेली ना राहुल सरांच्या बरोबर.. "

रवी नि त्यांच्याशी बोलून फोन ठेवला आणि त्यांना गाडी tow करून नेणाऱ्याचा नंबर पाठवला.. त्यांना मदत करून झाल्यावर मात्र तो  विचारात पडला..

"म्हणजे आता राहुल आणि मानवी दोघेच बरोबर आहेत एकमेकांच्या? आणि हि business ट्रिप म्हणजे ओव्हर night स्टे आहे.." तो असा स्वतःशीच बोलत इकडे तिकडे बघत होता इतक्यात त्याच लक्ष एका कपल कडे गेलं.. ऑफिस रोमान्स चालू होता त्यांचा.. कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने तो तिचा हात हातात घेत होता आणि लपवायचा प्रयत्न करत ती लाजत होती.. ते बघून मात्र रवी ने डोळे मोठे केले.. आणि स्वतःशीच म्हणाला.. "no no no.. this can't be happening with her.." आणि जवळपास पळतच तिथून बाहेर पडला..

 

****

इकडे राहुल त्याच sketch बुक घेऊन काहीतरी draw  करत एका बेंच वर बसला होता.. आणि मानवी गाडी मधून कॅमेरा आणायला गेली होती.. तिने येता येताच १-२ स्पॉट पहिले होते.. ती राहुल जिथे बसला होता तिथे येत म्हणाली..

"सर तिथे light house पण दिसतंय बघा.. तो पण स्पॉट छान राहील ना? मला वाटतंय 'solo traveling' च्या कन्सेप्ट ला ते छान सूट होईल " तिने दाखवलेल्या दिशेने पाहत तो म्हणाला..

"हम्म, मे बी.. " तो जे draw करत होता तिकडे बघत मानवी त्याच्या शेजारी बसली आणि म्हणाली..

"wow.. caravan? तुम्ही स्वतः proposal साठी sketch बनवताय?" sketching करत तो म्हणाला..

"हो.. आत्ता या moment ला जे सुचतंय ते तरी करतोय draw.. "

"It's really good.." तिच्या या कॉम्प्लिमेंट वर राहुल हसून म्हणाला..

"Do you think so? (तिने होकारार्थी मान हलवली तसा तो पुढे कन्सेप्ट त्याची explain करत म्हणाला.. ) मी मोनोटोन कलर scheme वापरेन.. त्याने एकटं असल्याची फीलिंग येईल.. आपल्या सोलो traveling च्या कन्सेप्ट ला ती benefiting असेल.. what do you think?"

"उम्म्म.. त्या बरोबर तिथे १ छोटा टेबल आणि त्यावर लॅम्प आणि १ लेटर पॅड पण ठेवा.. छान वाटेल अजून.. "

"लेटर पॅड ?"

"जरी तुम्ही एकटे असाल तरी इतकी सुंदर जागा पाहिल्यावर तुम्हांला ती फीलिंग कुणा बरोबर तरी share करावीशी वाटेल ना! And at times like this, तुम्ही पत्र लिहिणं प्रेफर कराल कॉल करण्या पेक्षा.. (राहुल विचारात पडून तिचे इनपुट्स ऐकत तिच्या कडे बघत होता.. मानवी मात्र त्याच्या sketch कडे बघत आणि समोरच्या बीच वर ते सगळं इमॅजिन करत त्याला सांगत होती..) म्हणजे बघा ना.. आपण एकटे असलो तरी अशा सुंदर ठिकाणी आल्यावर वाटतं ना कि आपल्याबरोबर ती special व्यक्ती असावी.. 'नेक्स्ट time तिला बरोबर च घेऊन येईन' असं वाटतंच ना अशावेळी.. तो solo traveller मे बी १ पोलोरॉईड फोटो घेईल.. स्वतः साठी १ कप कॉफी बनवेल आणि ती पीत त्याच्या त्या special व्यक्तीला पत्र लिहेल.. जरी तो एकटा असेल तरी तो लोकल फूड enjoy करेल.. आणि छान time spend करेल.. त्याने इथे किती मजा केली हे तो त्या पत्रातून सांगेल आणि पुढच्यावेळी तो तिला घेऊन येईल तेव्हा ते कुठं कुठं जातील ते हि सांगेल.. जर का तुम्ही फक्त हा mode of interaction ऍड केलात लेटर पॅड चा तरी सोलो ट्रॅव्हलिंग हि कन्सेप्ट एकटेपणाची जाणीव घेऊन नाही येणार.. it would be more exciting..हम्म.. " मानवी इतका वेळ हे सगळं समुद्राकडे पाहत बोलत होती.. राहुल मात्र  मुग्ध होऊन तिच्या कडे बघत होता.. बोलून झाल्यावर स्वतःच्याच या कल्पनाचित्रावर खुश होऊन ती हसली आणि तीच राहुल कडे लक्ष गेलं.. तो तिच्या कडे बघत होता हे लक्षात येऊन आणि आपण जरा जास्तच बोलून गेलो कि काय असं वाटून ती म्हणाली..

"ओह सॉरी.. बोलताना लक्षातच नाही आलं.. मी पुन्हा overboard गेले.. हो ना? मला तर काही कळत पण नाही यातलं.. " तिच्यावरची नजर न काढता तो हसून म्हणाला..

"नाही तर.. आता विचार केल्यावर मला पण असं वाटतंय कि असे प्रसंग माझ्या आयुष्यात पण येऊन गेलेत.. There were times when I would be excited by a letter.."

राहुल ला त्याचे अमेरिके मध्ये गेल्यावरचे दिवस आठवले.. जेव्हा त्याला तिथल्या शाळेत bullying चा सामना करावा लागला होता.. त्याच्या इंडियन लंच बॉक्स चा जिथे मजाक उडवून त्याचा सगळं जेवण ती मुले फेकून द्यायची.. आणि तो उपाशी पूर्ण दिवस शाळेत घालवायचा..त्याच्या जाडीची पण खूप चेष्टा करायची ती मुले.. ते आठवून तो तिला सांगू लागला..

"मी लहान असताना माझी फॅमिली अमेरिकेमध्ये मायग्रेट झाली होती.. मला तिथे कुणी फ्रेंड्स न्हवते.. फक्त माझी १ मैत्रीण होती जी मला न चुकता इंडिया मधून पत्र पाठवायची.. त्यामुळे पत्रात का होईना मला मित्र असल्याची तसल्ली मिळायची.. मी हि तिला माझी खुशाली कळवायचो.. ‘मी ठीक आहे’.. ‘मी इथे आता रुळतोय’.. असं सांगायचो जेव्हा कि गोष्टी खरं तर डिफिकल्ट होत्या माझ्या साठी.. पण त्या पत्रांचा मला आधार होता.. आणि त्यामुळेच बहुदा मी ते सगळं सहन करू शकलो.. आणि नंतर.. नंतर अचानक तिची पत्र यायची बंद झाली.. तेव्हा मात्र खूप दिवस मला त्या गोष्टीचा त्रास झाला होता.. " राहुलनी हे सगळं सांगितल्यावर मानवी मात्र गप्प झाली होती.. पण आता काहीतरी बोललं पाहिजे हे कळून ती म्हणाली..

"ओह.. म्हणजे असं स्वतः अनुभवलं आहे तर तुम्ही.. "

"Anyway.. आता हे फोटो शूट थोडं कमी एकाकी वाटेल.. गुड आयडिया हां.. high five!" असं म्हणून त्याने तिच्या समोर हात high five साठी पुढे केला.. मानवीनी पण हसून त्याला टाळी दिली.. तिचा हात त्याच्या हातात बघून पुन्हा तो आपण हात पकडून ठेवूया का थोड्यावेळ असा विचार करू लागला.. आणि स्वतःच्याच विचारांवर चपापत त्याने पटकन हात काढला आणि म्हणाला..

"मी हे.. हे sketch पूर्ण करतो.. " मानवीच्या पण लक्षात नाही म्हटलं तरी हे आलंच होत.. आणि थोडंसं अवघडलेपण तिला पण जाणवत होत.. त्यामुळे ती पण जागेवरून उठत म्हणाली.. "सर मी अजून काही स्पॉट्स आहेत का बघते.. " असं म्हणून ती त्याच्या पासून पळत लांब गेली.. तिला पळत जाताना बघून आणि आता तीच लक्ष आपल्याकडे नाही हे बघून राहुल पुन्हा एकदा तिच्याकडे बघण्यात गुंतला..

*****

कसे आहात वाचकहो? काळजी घेत आहात ना? मी खूप खूप आभारी आहे तुमच्या या प्रेमाची आणि तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाची.. गेले काही दिवस मी जरा जास्त च struggle करतीये time management करताना.. एक तर पुढचा पार्ट लिहू शकते किंवा तुमच्या कंमेंट्स ना रिप्लाय.. मी वेळ मिळेल तेव्हा तुम्हां सगळ्यांना नक्की रिप्लाय देईन.. पण मी सध्या तरी social मीडिया वर active नसेन.. पण पुढील पार्ट जास्तीत जास्त लवकर पोस्ट करायचा मी प्रयत्न करेन.. thank you so much for your kind words.. your support and your love.. Hope you will like next parts as well..

************

क्रमशः

 

************

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..