Oct 24, 2021
कथामालिका

माझी मानवी... 50

Read Later
माझी मानवी... 50

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

विशाल आणि रिया रात्री उशिरा घरी पोचले.. विशाल ने त्याच्याकडे जी गोळी होती ती दिल्याने तिला जास्त त्रास झाला नाही पण तरी पूर्ण प्रवासात तिचा मूड वाईटच होता.. त्याने जेव्हा गाडीतून सीमा मॅम ना पुढे जात नसल्याचा कॉल केला होता.. तेव्हा पासून तर अजूनच मूड तिचा गेला होता.. तिला तिच्या घरी सोडून तो जेव्हा त्याच्या घरी आला.. तेव्हा बेड वर पडल्या पडल्या रियाच्या एक एक गोष्टी आठवत होता.. पण ती जे नाटकी चांगलं वागत होती ते न आठवत त्याला सगळं ती पडल्याचं, तिने त्याच्या अंगावर ओरडल्याच्या गोष्टीच आठवत होत्या.. त्या पब्लिक टॉयलेट मध्ये जाताना तिला किती embarrassing वाटत होतं तेव्हाचा तिचा चेहरा आठवून आता सुद्धा त्याला हसायला आलं.. तो स्वतःशीच म्हणाला.. "तशी cute आहे रिया.. "

इकडे रिया मात्र बेड वर पडल्या पडल्या विचार करत होती.. "सगळी मेहनत पाण्यात गेली.. उगाच ते सीफुड खाल्लं.. सगळा प्लॅन फिस्कटला.. विशाल आता तो टॉयलेट चा प्रसंग झाल्यानंतर पाहणार पण नाही.. नाही रिया.. असं करून चालणार नाही.. असं हारून कसं चालेल.. आयुष्याचा प्रश्न आहे.. आता ऑफिस गेल्यावर बघावं लागेल पुन्हा काय करता येईल ते.. "

 

******

 

इकडे आता नाईलाजाने मानवी आणि राहुल उठले.. कारण रात्र बरीच झाली होती.. हळू हळू ते चालत त्यांच्या रूम कडे जाऊ लागले.. मानवी स्वतःशीच खूप विचार करत होती.. शेवटी ते एका गार्डन एरिया मधून चालले होते आणि आता त्यांच्या रूम कडे जाणाऱ्या कॉरिडॉर कडे वळणार होते तेव्हा मानवीने सांगायचं धाडस करायचं ठरवलं.. ती घसा खाकरून म्हणाली..

"सर मी तुम्हाला आता काहीतरी सांगणारे.. ते ऐकून तुम्ही खूप surprised व्हाल.. असं म्हणतात ना कि काही आठवणी 'जर-तर' मध्येच सोडून द्याव्यात.. असं झालं असत तर काय झालं असतं.. म्हणजे ते प्रत्येकाच्या imagination वर राहतं.. मला विचाराल तर, मला असं वाटायचं कि काही आठवणी ह्या जास्त सुंदर राहतात जेव्हा त्या आठवणीच राहतात.. त्या वर्तमानात आल्या कि त्यांचं वास्तव जास्त भीतीदायक ठरत.. अगदी अलीकडे पर्यंत मला अगदी असच वाटायचं.. Beautiful memories should be frozen in time.. then they  are more beautiful than the present.. (आता चालता चालता राहुल तिच्याकडे लक्ष देऊन पाहत होता.. त्याला पण कुठे तरी असच तर वाटलं होत) पण आजच्या दिवसानंतर मात्र.. मी चुकीचा विचार करत होते असं वाटतंय.. " ती एवढं बोलून परत शांत झाली.. तिला कसं सांगावं तेच कळत न्हवत.. शेवटी राहुल जागेवर थांबला आणि त्याने विचारलं..

"मानवी तू काय सांगायचं प्रयत्न करतीयेस? म्हणजे मला कळालं ना.. " त्याच बोलणं मध्येच तोडत मानवी त्याच्या कडे वळून म्हणाली..

"राहुल सर.. " आता बँड एड जस पटकन काढलं तर कमी दुखतं तसेच आता हे पण पटंकन सांगून मोकळं व्हावं असं तिला वाटलं.. तो तिच्याकडे बघत तिला पुढे बोलण्यासाठी प्रोत्साहन देत होता.. तिला ते त्याच्या नजरेतून जाणवत होत.. ती म्हणाली..

"खरं सांगायचं झालं तर.. " तिने एक मोठा श्वास घेतला आणि ती आता बोलणार इतक्यात मागून १ आवाज आला..

"ए छोटी.. " राहुल आणि मानवीने एकदम मागे वळून बघितलं..

"तू म्हणालेली मला KFC मध्ये पार्टी देशील म्हणून.. " रवी हसत येत होता.. त्याने त्याच्या मोबाईल वर तीच रेकॉर्डिंग पुन्हा वाजवलं.. "मी मानवी कुलकर्णी, रवी ला प्रॉमिस करते कि मी त्याच्या ३ requests पूर्ण करेन काही झालं तरी.." राहुल पण ते रेकॉर्डिंग मागून ऐकत होता पण त्याला रवीचा राग आला होता.. मानवी काहीतरी महत्वाचं बोलणार होती आणि हे कार्टून मध्ये तडमडलं.. त्याने वैतागून मान फिरवली.. रवी मात्र  मानवीच्या चेहऱ्यावरचे घाबरल्याचे expressions एन्जॉय करत म्हणाला..

"बघ बरं.. तू मला असं प्रॉमिस करून सुद्धा KFC तू घेऊन नाही दिल.. असं कस करू शकते ग तू? पहिल्या प्रॉमिस ला च मला टांग मारायचा विचार होता काय तुझा?" आता मानवीने पण डोळे मोठे करून त्याच्या कडे बघितले.. तिने हळूच राहुल कडे १ नजर टाकली आणि त्याचा वैतागलेला चेहरा बघून ती रवी वर ओरडली..

"काय?  KFC?  KFCसाठी मुंबई हुन एवढ्या लांब कुणी येत का?"

"पण मी तर आलो.. " तिच्या कडे खाली वाकून हसत रवी म्हणाला.. तसा मानवीने वैतागून कपाळावर हात मारला.. तिची reaction बघून मात्र सरळ होत तो राहुल कडे बघून बोलला..

"I am just joking yaar.. मला कळालं कि विशाल ची टीम तुम्हाला जॉईन करू शकली नाही.. म्हणून मग मी आलो त्यांच्या ऐवजी.. आता उद्या पण जेव्हा आपण लोकेशन hunting ला जाऊ तेव्हा एक तरी एक्सट्रा helping हँड असेल ना.. "

"तुमचं कामाप्रती एवढं डेडिकेशन आहे हे माहिती न्हवत मला रवी सर.. असो.. आता झोपायची वेळ झालीये.. जाऊयात आता.. " राहुल नि पहिलं वाक्य तर sarcasm मध्ये बोलला होता पण आता त्याला रवीची मस्ती सहन करायची न्हवती.. specially मानवी बरोबर एवढा छान दिवस गेलेला असताना.. पण असा easily सोडेल तो रवी कसला.. तो लगेच म्हणाला..

"ओह काय हो सर.. मी एवढ्या लांबून आलो.. ते पण bike वर.. at least १ ड्रिंक तरी घेऊयात ना.. "

"मी पीत नाही.. " राहुल एवढं बोलून पुन्हा जायला वळाला.. तो ४ पावलं पुढे गेला नसेल तेवढ्यात रवी म्हणाला..

"ठीके तर मग.. तुम्ही जावा आधी.. We will go in after we get a drink.."

"काय?" त्याच बोलणं ऐकून मानवी म्हणाली.. पण रवी मानवी बरोबर एकटाच असणार हे लक्षात आल्या आल्या राहुल म्हणाला..

"चला मग जाऊयात.. आजकाल non alcoholic drinks पण छान मिळतात.. " असं बोलत तो त्या दोघांच्या आधी पिछे मूड करून रिसॉर्ट मध्ये असलेल्या ओपन बार कडे जायला लागला.. त्याला तस जाताना बघून रवीने मानवीला खुणावलं आणि ते दोघे पण त्याच्या मागे धावत गेले.. पण पाठीमागून मानवी रवीला विचारत असताना राहुल नि ऐकलंच..

"पण रवी सर.. खरंच सांगा ना तुम्ही का आलात इथे?" रवी हसून म्हणाला.. "मला पण तोच प्रश्न पडलाय.. चल गाठूया त्यांना.. "

रवीने उडवाउडवीचं उत्तर दिलेलं मानवीलाही नाही पटलं आणि हळूच ऐकलेल्या राहुल ला पण नाही.. सगळे जण ओपन बार च्या बाहेर असलेल्या टेबल वर बसले होते.. बाजूला ला स्विमिंग पूल होता.. रात्रीच गार वारं वाहत होत.. राहुल आणि रवी एकमेकांच्या समोर बसले होते, आणि मधल्या खुर्चीवर मानवी बसली होती.. फारसं राहुल आणि मानवी बोलत न्हवतेच ते बघून रवीच बोलत होता..

"वाह.. असं कधीतरी मुंबईच्या बाहेर पण यायला पाहिजे नाही? किती छान वाटतंय इथे.. (दोघांची काहीच reaction नाही हे बघून रवी थोडा पुढे सरकून राहुल ला उद्देशून म्हणाला..) पण.. मी खूप घाईघाईत आलो ना त्यामुळे चड्डी पॅक च नाही केली मी बरोबर.. तुम्ही मागच्या वेळी दिलेली तशी द्याल मला?" मानवी त्यांचं बोलणं ऐकता ऐकता तीच कॉकटेल ड्रिंक पीत  होती.. तिला रवीच शेवटचं वाक्य ऐकून जोरात ठसका लागला.. रवी तिचा ठसका कमी व्हायला तिच्या पाठीवरून हात फिरवत होता.. त्याला वाटलं होत राहुल चिडेल.. पण आता मानवी सोबत राहुल रिलॅक्स झालाय हे त्याला पण माहिती न्हवतेच ना.. त्यामुळे राहुल चा रिप्लाय ऐकून त्याचे डोळे आश्चर्याने थोडे मोठे झालेच.. कारण राहुल म्हणाला..

"का? तुम्ही तुमच्या चड्ड्या माझ्याकडे देता का सांभाळून ठेवायला? कोण आहे मी? चड्ड्या विकतो का मी?जेव्हा केव्हा मला भेटता तेव्हा सुरु होऊन जाता - चड्ड्या चड्ड्या.. मी फक्त माझ्यापुरतंच आणलंय सामान.. " रवी मात्र आता मुद्दाम छोटा चेहरा करत म्हणाला..

"पण मग मी काय घालू? धुवून वाळल्यावर घालू का मग मी चड्डी?पण मी झोपताना तर फक्त चड्डी घालूनच झोपतो.. जर का ती च मी धुतली तर मग.. " मानवीने अजून १ घोट घेतला होता.. आणि रवीच शेवटचं वाक्य ऐकून तिला मगाशी लागला होता त्याहून जोरात ठसका लागला.. इतका जोरात कि तिच्या तोंडातून ते सगळीकडे उडालं.. रवीने हसत त्याचा चेहरा  पुसला आणि मानवी दोघांना.. "I am so sorry.. " असं हळू आवाजात म्हणाली.. पण तिच्या कडे लक्ष न देता राहुल म्हणाला..

"एवढा प्रॉब्लेम आहे तर उद्या आधी दुकानात जाऊन विकत घ्या नाहीतर इथल्या गिफ्ट शॉप मधून स्विमिंग ट्रंक घ्या विकत.. "

"क्या बात है राहुल सर! असे झट कि पट तुम्हीच solution काढू शकता बघा.. "

त्यांचं बोलणं चालू होत तेव्हा मानवीने १ चिप्स च पॅकेट घेतलं होत ते फोडायला घेतलं.. तस तिच्या हातातून ते घेत म्हणाला..

"छोटी.. दे इकडे ते.. तुझा दादा ओपन करून देईल तुला.. दादा आहे ना मी तिचा.. " त्याने तिच्या इतकं जवळचं असल्याचं त्याला दाखवलं तस राहुल नि हळूच मानवीकडे बघितलं.. त्याची ती नजर बघून रवीनेच पुढे सांगितलं..

"ऑफिस च्या बाहेर आम्ही बहीण भाऊ आहोत.. हो कि नाही ग.. " मानवीने आपली मान डोलवली.. राहुल नि पण हसून ड्रिंक उचललं आणि १-२ घोट घेत म्हणाला..

"ओह.. बहीण-भाऊ होय?" पण मानवीच लक्ष मात्र त्याच्या हातातल्या ग्लास कडे होत.. त्याने चुकून तिचा ग्लास घेतला होता.. त्याच्या कडून ग्लास घेत ती म्हणाली..

"सर ते non alcoholic drink नाहीये.. " पण तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत राहुल म्हणाला..

"मानवीची तर specialty दिसतीये कुणाच्याही बरोबर जवळीक आहे असं pretend करायची.. "

"तसं काही नाही हो.. " मानवी आपली हळू आवाजात पुटपुटत म्हणाली.. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत रवी मानवीकडे मोर्चा वळवत म्हणाला..

"ओह.. छोटी.. तुझ्या गालाला हे काय लागलं? हलू नको हां.. " असं बोलत त्याने तिच्या गालावर मघाशी ठसका लागल्यावर जे उडालं होत ते ड्रिंक चे थेंब पुसले.. त्यानी तिच्या गालाला हात लावलाय एवढंच राहुल ला दिसलं.. त्याने वैतागून मानवीचाच पुन्हा ग्लास घेऊन त्यातून अजून १ घोट घेतला.. इकडे रवी तिला सांगत होता..

"ऐक ना पण मानवी.. मी मुंबई हुन तुझ्या साठी काय गिफ्ट घेऊन आलोय?" रवी नि तस बोलल्यावर राहुल वैतागून म्हणाला..

"सकाळी ऑफिस मध्ये भेटली होती ना ती? आता लगेच संध्याकाळी गिफ्ट द्यायचंय का?" त्याच्या बोलण्यावर हसून रवी म्हणाला..

"खास मुंबई वरून आणली इथवर तर द्यायला हवं ना?" त्याने खिशात हात घातला.. मानवीचा हात हातात घेतला अन तो भला मोठा रबराचा कोळी तिच्या हातावर ठेवला.. मानवी घाबरून ओरडायला लागली..तिचे हात थरथरायला लागले तसं हसून तो कोळी तिच्या हातातून त्याने काढून घेतला आणि तिचे थरथरणारे हात त्याच्या हातात घट्ट पकडले.. आणि हसत राहुल कडे बघत म्हणाला..

"ह्या reaction साठी आतुरलेलो मी.. " राहुल च्या कपाळावर मात्र बारीक आठ्या पडल्या.. त्याच लक्ष फक्त त्याने तिचे हात हातात पकडले होते तिकडेच गेले होत.. मानवी मात्र अजूनही भितीनी थरथरत होती.. तिने वैतागून रवीला मारत त्याच्यावर ओरडायला सुरुवात केली..  

"घाबरले ना मी किती.. " आता सुद्धा ती त्याला पाठीवर मारत होती, रवी हसत होता, मात्र राहुल ला एवढंच दिसत होत कि ती त्याला हात लावतीये.. रवीच लक्ष मानवीकडेच बघून तर त्याला अजूनच राग यायला लागला.. तो त्याच्या जागेवरून किंचित पुढे उठला आणि त्याने रवीच्या जोरात डोक्यात मारलं..

तसे रवी आणि मानवी दोघेही थांबले आणि त्याच्या कडे बघायला लागले.. राहुल मात्र हसून म्हणाला.. "मच्छर! मच्छर होता.. मारला.. "

रवी मात्र पुटपुटत म्हणाला.. "मला तर वाटलं मुद्दामच केलं.. " तो तसं म्हटलं मात्र राहुल आता त्याच्याकडे तिरकस पणे हसून दारू चढलेल्या आवाजात म्हणाला..

"तू गोगलगाई सारखा गिळगिळीत दिसतोस.."

"काय??" रवीने थोडं ओरडून विचारलं.. राहुल मात्र आता पूर्ण टुन्न होऊन जीभ जड झालेल्या आवाजात म्हणाला..

" बघावं तेव्हा चिकट..चिकट..चिकटलेला.. " आणि खुर्चीतच मागे पडला.. तसे रवी आणि मानवी दोघे पण.. "ओह ओह ओह.. " असं ओरडत त्याला खुर्चीतच सरळ बसवायच्या प्रयत्नात लागले.. त्याची ३-४ घोटात झालेली हि अवस्था बघून दोघांनी एकमेकांच्या कडे पाहिलं.. आता पुढे जे करायचं होत ते तर क्लिअर च होत.. मानवीने पळत पुढे जाऊन रूम च दार उघडलं.. रवीने पाठंगुळीला घेऊन राहुल ला घेऊन आला आणि रूम वरच्या बेड वर टाकलं.. त्याने पाठ सरळ करत मानवीला म्हटलं.. "असा कसा ग आहे हा माणूस? किती घोट घेतले असतील ? लगेच टल्ली झाला! बरं कळत पण नाही ह्याच.. अजिबातच काही आधी पत्ता लागत नाही कि याला किती चढलीये ती.. एकदम pass out झाल्यावर च कळत.. ओह.. दमलो बाबा.. मानवी जा बाई.. १ ग्लास पाणी आन.. इथे रूम मध्ये दिसत नाहीये.. " इकडे तिकडे बघत तो म्हणाला.. इकडे मानवी मात्र काही न बोलता राहुलची बॅग, त्याचा डिजिटल कॅमेरा, त्याचा जॅकेट वगैरे तिथल्या एका टेबल वर ठेवत होती.. नंतर तिने त्याचे पाय सरळ करत बेड वर ठेवले..त्याचे बूट काढत होती इतक्यात रवीने तिला पाणी मागितलं.. तेव्हा वैतागून ती म्हणाली..

"तुमचं तुम्ही आणा ना सर.. " राहुल च्या डोक्याखाली उशी ठेवत ती स्वतःशीच म्हणाली.. "कसा आहे हा असा.. एक- दोन  घोट पण सहन नाही होत याला.. प्यायचच कशाला ना! " तिला त्याची काळजी घेताना बघून रवी फुरंगुटून तिच्याकडे बघत म्हणाला..

"इकडे मी इतका दमलोय आणि तू काय बोलतीयेस ग.. तुझा दादा तुला पाणी मागतोय तर तू देईना पण मला?" राहुल ला व्यवस्थित झोपवलेलं बघून आता मानवीला स्वतःकडे वळवत तो म्हणाला..

"मानवी.. पण खरंच सांग ग.. मी काय गिळगिळीत दिसतो का? नाही कि नई?" त्याच्या कडे तिच्या चष्म्यातून २ मिनटं बघत ती म्हणाली.. "मी पाणी आणायला जाते.. " तिच्या त्या उत्तरावर तिला तोंड वेडावत दाखवत त्याने तिला जाताना बघितले आणि स्वतःशीच म्हणाला.. "इतका handsome तर आहे चेहरा माझा.. "

आता इकडे तिकडे बघितल्यावर त्याची नजर मानवीने टेबल वर ठेवलेल्या डिजिटल कॅमेऱ्यावर गेली.. तो हातात घेत तो म्हणाला..

"बघू तरी काही चांगली लोकेशन्स मिळालीत का?" एक एक फोटोस बघत तो पुन्हा म्हटला.. "चांगली आहेत कि लोकेशन्स.. " तो पुढे पुढे घेत होता आणि त्याला मानवीचा १ फोटो दिसला.. पाठमोरा.. चुकून काढला असेल असं वाटून त्याने पुढे घेतलं.. पुढचा फोटो एका पपी बरोबर खेळतानाचा होता.. त्याच्या पुढचा फोटो ती शिंपले हातात घेऊन बघतानाचा होता.. तो फोटो त्याने झूम करून बघितला.. मानवीचा साईड प्रोफाइल त्यात होता.. समुद्राच्या दमट हवेमुळे फुगलेल्या तिच्या केसातून तिचा चेहरा अजूनच नाजूक दिसत होता.. तिचे रेड फ्रेकल्स तिच्या लाल ओठांना match करत होते.. ती नेहमीचीच मानवी होती तिने काही वेगळं केलं न्हवतं त्या फोटोंच्यामध्ये.. पण का कुणास ठाऊक ती त्याला खूप सुंदर दिसत होती..त्याच्या त्या विचारांवर त्यालाच कसतरी वाटलं.. मानवी तिच्या रूम मध्ये झोपायला गेल्यावर रवी हेडफोन्स घालून रात्रीचा जॉगिंग करायला बाहेर पडला.. त्याला त्याच्या डोक्यातले विचार आजच सॉर्ट आऊट करायचे होते.. पण आजच्या भेटीतून त्याला हे तर पक्क कळालं होत कि राहुल ला मानवी आवडते.. ती त्यांच्या फॅशन इंडस्ट्री च्या मापा प्रमाणे सुंदर न्हवती .. पण ती जशी आहे तशी ती राहुलला आवडते..

 

************

 

क्रमशः

 

 

 

************

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..