Oct 18, 2021
कथामालिका

माझी मानवी... 52

Read Later
माझी मानवी... 52
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

मानवी राहुल शी बोलून केबिन मधून बाहेर पडल्यावरही रवी हाच विचार करत होता कि त्यांच्यात बोलणं काय झालं असेल.. आजही त्यांना बराच वेळ लागला होता.. बऱ्यापैकी रात्र झाली होती त्यामुळे ती आणि रवी त्यांच्या नेहमीच्या चायनिज च्या गाड्यावर जेवायला आले होते.. एकमेकांच्या सामोरा समोर बसून ते जेवत होते.. दोघांनी १ हक्का नूडल्स दोघांच्यात share करायला ऑर्डर केली होती पण बाकी स्टार्टर्स ऑर्डर केले होते.. काल पासून प्रॉपर जेवण झालं नसल्याने मानवी अगदी मन लावून जेवत होती.. त्यामुळे च तिच्या लक्षात आले नाही कि रवी तिच्याकडे नेहमी पेक्षा रोखून बघतोय.. रवीने शेवटी हळूच विचारलं..

"मानवी.. तू मघाशी राहुल सरांच्या ऑफिस मध्ये गेलेली तेव्हा काय बोललीस ग तू?"

राहुलच नाव ऐकून मानवीचा चेहरा खुलला.. तिने खरं काय ते सांगितलं..

"ओह! ते मी त्याला माझ्या साठी कव्हर शूट च्या दिवशी वेळ काढायला सांगितला.. मी त्या दिवशी त्याला सगळं सांगून टाकणारे.. "

"ओह! खरंच?" रवीने १ उसासा सोडून म्हटलं.. आता तर तो खायचं थांबवून तिच्याकडे बघत बसला होता.. आता मानवी च्या पण ते लक्षात आलं.. तिने त्याच्याकडे बघत विचारलं..

" तुम्ही माझ्याकडे असं का बघताय रवी सर? "

तिने असं विचारून सुद्धा त्याची नजर तिच्यावरच विचारात गढलेली बघून मानवी च काही समजून पुढे म्हणाली..

"ओह.. मला बघून तुम्हाला तुमच्या बहिणीची आठवण येते ना? म्हणून बघताय असे?" तिच्या या बोलण्याने भानावर येऊन तो म्हणाला..

" आं? हो.. " आणि स्वतः शीच हासला..आणि म्हणाला.. "जितका मी तुझ्याकडे बघतो तितके मला तुम्ही दोघी सारख्या दिसता.. तू सुद्धा तिच्या सारखीच प्रेमळ आहेस.. तू सुद्धा तिच्यासारखीच डोळे मोठे करून माझ्याकडे बघतेस.." आता मानवी च्या डोळ्यात सहानुभूती बघून तो हसून तिच्या प्लेट कडे हात करत म्हणाला.. "पोटभर खा हां छोटी.." त्याला असं इमोशनल झालेलं बघून मानवीने होकारार्थी मान हलवली आणि तिच्या प्लेट मधून थोडा पोरशन त्याला देत प्रेमाने म्हणाली..

" रवी दादा तुम्ही पण खा पोटभर.. हे मन्चुरिअन पण खा.. आणि हे तर तुम्ही खाल्लेच नाही.."

"एवढं प्रेमाने वाढलं ना.. आता सगळं संपवतो बघ.." तिची बेचैनी ओळखून रवी हसून म्हणाला.. "तू पण खा पोटभर.. आजची ट्रीट माझ्याकडून.."

"थँक्यू दादा.." असं म्हणून मानवीने गरम असलेला १ स्टार्टर तोंडात टाकला.. त्यातच तिला मिरची लागली.. तशी जीभ बाहेर काढून ती "आह.. तिखट लागलं.. हा" असं करू लागली.. तिने जीभ बाहेर काढलेली बघून रवी पुन्हा हसून म्हणाला.." आता तर अगदी तिच्या सारखीच दिसतियेस.. "

त्याच बोलणं ऐकून मानवी तिला तिखट लागलेलं पण विसरली.. तिला त्याच्याप्रती अजूनच सहानुभूती वाटू लागली.. त्यानंतर च जेवण मात्र त्यांचं हसत खेळत पार पडलं.. पण रवीच्या डोक्यातुन मात्र हि गोष्ट जात न्हवती कि आता लवकर च राहुल आणि मानवी मधल्या गोष्टी सॉर्ट आऊट होतील.. त्यांचं जेवण झाल्यावर तो बिल पे करायला उठला.. रवी ने तिथल्या मालकाला विचारले..

"दादा किती झाले..?"

"४००"

रवीने त्याचे wallet काढून पैसे काढून दिले तेव्हाच मानवीने त्याच्या वाळलेत मध्ये असलेला एका क्युट कोर्गी भूभू चा फोटो बघितला.. तशी ती खुश होऊन म्हणाली..

"रवी सर कसल क्युट आहे हो हे पपी! तुमची आहे?"

तसा हसून रवी म्हणाला..

"हो ना.. तीच नाव मीया होत.. माझी लहान बहीण.." 

"ओह.. " आता तो बोलून गेल्यावर बिल पे करून पुढे चालत गेल्यावर मानवी स्वतःशीच विचार करू लागली.. मीया.. लहान बहीण ? एक मिनिट.. लहान बहीण? तिने आता रवीलाच जाऊन विचारलं..

"रवी सर..म्हणजे इतके दिवस तुम्ही जे मला सांगत होतात कि मी तुमच्या बहिणी सारखी दिसते..आणि मला बघितल्यावर तुम्हाला तिची आठवण येते, ती एक कुत्री होती? like actual डॉग? भौ भौ  वाला डॉग?" कुत्र्या सारखं भुंकून दाखवत तिने विचारलं..

"हो.. का?" रवीने casually म्हटलं तसा तिचा पारा चढला.. ती वैतागून त्याच्यावर खेकसत म्हणाली..

"तुम्ही म्हणाला होतात ती तुमची लहान बहीण होती.. पेट डॉग नाही.. "

"हो मग बरोबरच आहे कि.. लहान बहीणच होती ती माझी.. आम्ही तिला एका फॅमिली मेंबर सारखं वाढवलं होत.. एक मिनिट... तुला काय वाटलं मी व्यक्ती बद्दल बोललो होतो? काय ग हे असं? असे गैरसमज का बरं करून घेते तू?" मानवीवरच त्याने ब्लेम ढकलला हे बघून ती आता sarcastically हसून म्हणाली..

"घ्या.. चोराच्या उलट्या बोंबा.. "

"तू गैरसमज करून घेतला.. तू! मी कधीच न्हवतो म्हणालो कि ती माणूस होती म्हणून.. "

"तुम्ही! तुम्हाला चेष्टा सुचतिये माझी? थांबा चांगला धडा शिकवते.. या तर इकडे.. " असं म्हणून मानवी त्याला मारायला मागे पळाली.. रवी तिचा मार चुकवत पळाला.. आणि पळताना पण तेच म्हणत होता..

"पण मी कधीच न्हवतो म्हणालो कि ती माणूस होती म्हणून.. "

"मग आता माणसाकडून चावल्यावर कुत्र्याची आठवण येते का बघा.. " मानवीला आता जाम राग आला होता.. तिच्या चांगुलपणाचा असा फायदा घेतल्याचा.. पण तीच वाक्य ऐकून रवीला मात्र अजूनही चेष्टाच सुचत होती..

"मानवी स्टे.. बॅड मानवी बॅड मानवी.. " त्याच्या अशा चिडवण्याने अजून चिडत त्याच्यावर ती म्हणाली..

"आता हा कुत्रा सांगून चावणार.. आता तर तर लावल्याशिवाय सोडत नाही मी तुम्हाला.. " तसा तिच्यापासून अजून लांब पळत रवी म्हणाला..

"एवढं काय ग मनाला लावून घेतेस.. आता प्लीज बास.. " त्यांची हि पळापळी मात्र तिथल्या Chinese च्या गाड्यावर जेवायला जमलेल्या लोकांना फुकटच मनोरंजन म्हणून बघितली.. मानवीला आपण काय आणि किती चिडलो होतो हे त्या बाकीचा लोकांच्या हसण्यातून कळालं तसे तिने तोंडावरून विस्कटलेले केस नीट केले आणि मागूनच जोरात ओरडली..

"थांबा.. पळू नका.. काही करत नाही मी.. "

शेवटी ते दोघे त्यांच्या बिल्डिंग बरोबर बाकीच्या बिल्डींग्स ना कनेक्ट करणाऱ्या कॉमन गार्डन मध्ये आले.. एखाद्या IT पार्क सारखीच त्या पार्क ची रचना होती पण ते कॉमन असल्याने तिथे कुणीही येऊ शकत होते..त्यामुळेच तिथे उशिरा पर्यंत काम करणाऱ्या ऑफिस कपल चिंच संख्या जास्त होती.. आता ते तिथून चालत होते आणि अजूनही रवी विचारात गढला होता.. मानवीने मात्र अजूनही त्याचा पिच्छा  न्हवता..ती वौइतागून त्याला बोलत होती..

"रवी सर तुम्ही नेहमी माझी चेष्टा मस्करी करत असता.. पण आता तुम्ही मला कुत्र्याच्या सारखं ट्रीट करणार.. ? मला पण माहितीये मी दिसायला नाहीये चांगली.. पण याचा अर्थ हा तर नाही ना होत तुम्ही तुमच्या पेट डॉग बरोबर माझी तुलना कराल.. तुम्हाला मी आत्ता सुद्धा माझ्या ताटातलं वाढलं.. "

"वेल.. actually.. " त्याच बोलणं मध्ये तोडत ती म्हणाली..

"तुम्हाला माहितीये मला किती वाईट वाटलं होत जेव्हा तुम्ही सांगितलेलं कि तुमची लहान बहीण वारलीये? मी तुम्हाला इतकं छान वागवलं आणि तुम्ही असं वागता कंक माझ्या बरोबर?तुम्ही असं नाही करू शकत.. पण आता मला सांगाच कि तुम्ही असं का केलंत? का???"

आता मात्र रवी खरंच खूप जास्त विचारात पडला होता.. तो सिरिअसली विचार करत होता कि तो असा वागलाच का.. त्याच्या कडून काही उत्तर आले नाही आणि तो असा विचारात गढलेला बघून मानवी पुढे म्हणाली..

"see? मी आत्ता बोलतीये तरी तुम्ही मला इग्नोर करताय.. बरोबर.. तुम्हाला तर मी कुत्रा वाटलेले ना.. त्यामुळेच तुम्ही माझ्या कडे लक्ष देत नाहीये.. "

रवी मात्र स्वतःचेच विचार जुळवत आता मोठ्याने म्हणाला..

"ओह्ह.. That's why I was like that.." अजूनही त्याचा विचारात बुडालेला चेहरा पाहून मानवी त्याला उसकावत म्हणाली..

"हो का? ठीके तर मग.. सांगा तुमचं काय कारण होत ते.. मी पण ऐकते.. का? नक्की का असं वागवलंत तुम्ही मला?"

आता तिच्याकडे वळून तिच्या डोळ्यात पाहत रवी तसाच त्याच्या विचारांच्या तंद्रीत म्हणाला..

"छोटी.. I think I like you.."

"हँ?"

"तू जेव्हा म्हणालीस मघाशी कि तू राहुल सरांना सगळं सांगून टाकणारेस.. फॉर सम reason, मला नाही आवडलं ते.. मला काळजी लागून राहिली होती कि तू सगळं सांगितल्या वर तुम्ही दोघे जवळ याल.. आणि त्या दिवशी तू business ट्रिप वर गेली होतीस तेव्हा पण विजय सरांना मशरूम सूप पिताना बघून मला का कुणास ठाऊक तुझी आठवण आली.. काही कारण न्हवत तुझी आठवण यायचं.. पण तरी आली.. मला पण प्रश्न पडला होता कि मी एवढा डाउन का होतो त्या दिवशी.. पण आता सगळा विचार केल्यावर असं वाटतंय कि मला कारण कळालं.. " तिच्या कडे तो एक पाऊल पुढे गेला तशी मानवी २ पावलं मागे सरकून त्याच्याकडे पाहू लागली.. रवी पुढे म्हणाला.. "I like you मानवी.. In fact, quite a lot!" मानवी मात्र आता घाबरून म्हणाली..

"रवी सर.. १ मिनिट.. तुम्ही काय म्हणताय ते कळतंय ना तुम्हाला?" रवीची तिच्यावर ची नजर एकदा पण हलली न्हवती.. तो तिचे बदलणारे expressions बघत होता.. मात्र आता मानवी एकदम डोक्यात प्रकाश पडल्यासारखी खुश होऊन जोरात म्हणाली..

"wow.. मी अल्मोस्ट तुमच्यावर आत्ता विश्वास ठेवला होता! तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला पुन्हा गंडवू शकाल? पुन्हा खोटं बोलताय तुम्ही.. " तसा रवी मनापासून पुन्हा बोलला..

"अरे मी जोक नाही करते ग.. खरंच बोलतोय.. मीया शप्पथ खरं !! I seriously like you.."

"खरं सांगताय म्हणाला आणि मेलेल्या त्या निष्पाप जीवाची शप्पत घेता होय? मी काही बोलायला च नको होत.. " रागाने वैतागून मानवी ओरडून त्याला म्हणाली.. २ पावलं त्याच्यापासून पुढे गेली आणि मागे वळून म्हणाली.. "पण सिरीअसली सर?" पुन्हा २ पावलं त्याच्यापासून पुढे गेली आणि मागे वळून म्हणाली.. "तुम्ही खरच अगदी दुष्ट आहेत.. " पुन्हा २ पावलं त्याच्यापासून पुढे गेली आणि मागे वळून म्हणाली.."पुन्हा असं काही कराल तर.. " आता काय बोलावं ते न कळून आता पाय आपटत ती पुढे गेली.. रवी मात्र तिला तसं करताना बघून हसत तिला गाठायला जात चालत म्हणाला..

"तू चिडून सगळं बोलतीयेस पण तरी मला खूप cute वाटतीयेस ग.. छोटी..I like you.." तिला मागून हाक मार्ट रवी म्हणाला.. "छोटी.. मानवी.. ए मानवी कुलकर्णी.."

 

*****

 इकडे स्नेहल ला अगदी न राहवल्याने तिने राहुल ला भेटायला याच कॉमन गार्डन मध्ये बोलावलं होत.. मानवी ऑफिस मध्येच असेल किंवा घरी गेली असेल असा विचार करून तिने हि रिस्क घेतली होती.. आपण पण म्हणावा असा वेळ देऊ शकत नाहीये असं वाटून राहुल ने सुद्धा भेटायला होकार दिला होता.. ते हळू चालत फिरत गप्पा मारत होते.. प्रस्तावना झाल्यावर मुद्द्याला हात घालत स्नेहल ने विचारले..

"business ट्रिप कशी झाली तुझी?"

"business ट्रिप?" राहुल ला सगळी business ट्रिप डोळ्यासमोरून गेली आणि तो म्हणाला..

"खरं सांगायचं तर this business trip was really weird..तुला सांगून खरं वाटणार नाही मी काय केलं माहितीये? तिथे एका शेतात गवत उपटत.. " पण स्नेहल चा चेहरा बघून तो बोलायचं थांबला आणि हसून म्हणाला.. "ते इम्पॉर्टन्ट नाही एवढं.. never mind.." पण तो स्वतःशीच हसत होता म्हणून स्नेहल ने विचारले..

"काय झालं? काही फनी आठवलं का?"

"काही नाही ग तसं विशेष.. पुन्हा कधीतरी सांगेन.. " आता तिने पण हसत जोर देत विचारलं..

"सांग ना काय झालं होत ते.." तसा हसू दाबत राहुल सांगू लागला..

"अग काही नाही, आमच्या टीम मध्ये १ इंटर्न आहे same तुझ्याच नावाची.. आपल्या एवढंच वय असेल तीच.. आणि ते आपल्या लहानपणी आलेलं crazy frog च गाणं आठवत का तुला तिला ते अजूनही आठवत आणि तिने ते actually म्हणून पण दाखवलं.. तेच आठवून हसत होतो.. तू तिथे असायला हवी होतीस ग.. मग तुला कळलं असत मी आत्ता एवढा का हसतोय ते.. खूप गमतीशीर आहे ती इंटर्न.. " राहुल आठवणीत रमत म्हणाला.. आता मात्र स्नेहल ला कळालं आत्ता जर का त्याला आपल्या भावना नाही सांगितल्या तर पुन्हा कधीच नाही सांगता येणार.. ती जागेवर थांबत म्हणाली..

"राहुल?"

"हम्म?"

"ने तुला काही विचारू?"

"हो..विचार ना.. "

"मी तुझी बालमैत्रीण आहे म्हणून फक्त माझ्याबरोबर time स्पेंड करतोस का?" राहुल आता सिरीयस होत म्हणाला..

"असं अचानक ... का विचारतीयेस.. म्हणझे तुला नक्की म्हणायचंय काय ते कळालं नाही मला.. "

"तुझं उत्तर काय असेल या साठी मी थोडी curious आहे..  (राहुल तिच्याकडे बघत आता विचारात पडला होता.. स्नेहल पुढे खाली मान घालून बोलत होती.. ) आत्ता ची मी जशी आहे as a person तशी तुला आवडते म्हणून तू माझ्याबरोबर टाईम स्पेंड करतोस कि मी तुझी लहानपणीची आठवणीतली मैत्रीण आहे म्हणून टाईम स्पेंड करतोस? तुझ्या माझ्या बद्दल च्या भावना नक्की काय आहेत हे मला कन्फर्म करायचं होत.. कारण माझ्या या आहेत.. " असं म्हणून स्नेहल पुढे झाली आणि तिने राहुल च्या ओठावर ओठ टेकवले..

 

इथून पुढचे काही पार्टस तुम्हाला मे बी आवडणार नाहीत.. पण प्लीज Don't kill me..ok? माझ्याकडे प्लॅन आहे.. आणि तुम्हा सर्वांचं खरंच किती जास्त प्रेम आहे हे तुमच्या कंमेंट्स मधून कळालं.. मी लवकरच पुढचे पार्टस पण पोस्ट करेन.. वन्स अगेन.. Thank you so much..

 

 

***********

 

क्रमशः

 

***********

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..