Oct 24, 2021
कथामालिका

माझी मानवी... 53

Read Later
माझी मानवी... 53

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मानवी पुढे पुढे आणि रवी तिच्या मागे मागे असे चालत ते दोघे पण आता त्या गार्डन मध्ये पोहोचले.. ते आता बागेत ३ रस्ते एका ठिकाणी मिळत होते अशा ठिकाणी उभे होते.. त्या दोघांच्या बाजूच्याच रस्त्यावरून राहुल आणि स्नेहल चालले होते.. शेवटी एका ठिकाणी मानवी थांबली आणि रवी कडे तोंड करून म्हणाली..

"मी तुम्हाला वॉर्निंग देतीये हां रवी सर.. तुम्ही पुन्हा असली चेष्टा करायची नाही.. "

"हो ग माझी आई कळालं.. सॉरी म्हणालो तर.. " रवी तिला असं म्हणत होता इतक्यात त्याच लक्ष स्नेहल आणि राहुल कडे गेलं.. मानवी अजून पण त्याला झापतच होती आणि इतक्यात स्नेहल नि राहुल च्या ओठावर ओठ टेकवले.. आता रवीच्या डोक्यात एक एक करत ट्यूब पेटायला लागली..

आता त्याला कळालं कि त्याला स्नेहल चा आवाज का ओळखीचा वाटलं होता.. आता त्याला लक्षात आलं कि स्नेहल असं का म्हणाली होती कि तिचा हक्क नसलेल्या माणसाच्या प्रेमात ती पडतीये.. आता त्याला कळालं कि जेव्हा मानवीने त्याला सांगितलं होत कि राहुल दुसऱ्या कुणाला मानवी म्हणून ओळखतो आणि ती व्यक्ती तिची 'बेटर हाफ' आहे असं ती म्हणाली होती.. आणि आता त्याला आठवलं कि मानवीच्या फोन वर बायको नावाने कुणाचा तरी नंबर सेव्ह होता आणि स्नेहल ला फोन आल्यावर तिने पण बायको बोल ग म्हणून सुरुवात केली होती.. जशी सगळी लिंक लागली तसा तो स्वतःशीच म्हणाला.. "ओह शीट.. "

ते मात्र बरोबर मानवीने ऐकलं आणि ती म्हणाली..

"मी तुम्हाला एवढं बोलतीये तर तुम्ही म्हणताय -  ओह शीट..? असं सॉरी म्हणतात काय कुणाला? तुमचं तर लक्ष पण नाही माझ्याकडे.. पण बघत कुठे होतात तुम्ही.. ?"

असं म्हणून ती राहुल आणि स्नेहल उभे होते तिकडे बघणार इतक्यात रवी तिच्या समोर उभे राहुल तिला विरुद्ध दिशेला वळवून थांबला आणि म्हणाला..

"तिकडे नको बघूस.. " त्याला तिला आता तरी hurt होऊ द्यायचं न्हवत..

"का? काय झालं? काय आहे तिकडे?" तिने मागे वळून बघायचा प्रयत्न केला कि रवी तिला पुन्हा वळवायचा.. शेवटी वैतागून म्हणाली..

"रवी सर.. सोडा बरं तुम्ही मला.. सारखं खांद्याला पकडून वळवताय.. आहे काय असं तिकडे?" तसा काही विचार करून रवी तिला सोडून म्हणाला..

"घाणेरडं आहे तिकडे.. बघायचंय का तुला? एक पेदाड माणूस शु करतोय असा पब्लिक मध्ये.. बघायचंय ? बघ.. " तशी मानवी वाकडा चेहरा करून म्हणाली..

"ewwwww.. काय हो सर? हि काय सांगायची गोष्ट आहे का? शी बाबा.. चला पटकन तिकडे जाऊया.." विरुद्ध दिशेला स्वतः हुन जात मानवी म्हणाली..

 

इकडे स्नेहल आता राहुल पासून वेगळी होऊन बोलत होती..

"मला आता फक्त तुझी बालमैत्रीण नाही राहायचं, I want to be your girlfriend.. मला आता जाणून घ्यायला आवडेल how do you feel about me आणि तुझं उत्तर काय असेल.. " त्याच्याकडे अपेक्षेने बघत ती म्हणाली..

राहुल मात्र बराच शॉक होता.. त्याला काय बोलावे तेच कळत न्हवते, त्याने खाली बघत विचार करत आवंढा गिळला पण काही उत्तर देऊ शकला नाही.. आता ती एवढी स्पष्ट वागली आणि बोलली होती कि तिचे इंटेंशन्स न कळून त्याने उत्तर न देण्याचा सवाल च न्हवता.. स्नेहल ला आजवर हा अनुभव पण कधी आलाच न्हवता कि तिने किस करायला पुढाकार घेतलाय आणि पुढून काहीच रिस्पॉन्स आला नाहीये.. तिने ओठावर ओठ टेकवून सुद्धा राहुल च्या कडून १ muscle पण move झाला न्हवता.. त्याची ती reaction बघत आणि आधी सुद्धा जेव्हा तिने त्याच्या ओठावर ओठ टेकवले होते तेव्हाची  reaction आठवून स्नेहल च पुढे म्हणाली..

"I think..you don't feel the same way like me.."  आता तिच्या डोळ्यात पाणी जमायला लागले होते.. ते बघून राहुल ला वाईट वाटले.. शेवटी काही झालं तरी हीच तर त्याच्यासाठी त्याची मानवी होती ना.. काही ठरवून त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला.. "चल माझ्या बरोबर.. " स्नेहल पण त्याच्या बरोबर मान खाली घालून गेली..

 

*****

मानवी नको म्हणत असताना पण रवी तिला सोडायला घरापर्यंत आला होता.. आणि पूर्ण रस्त्याने ती एकटीच बडबडत होती तो मात्र विचारात हरवला होता.. मानवी एकटीच बडबडत होती.. रवीने तिला मला तू आवडतेस हे म्हटलेलं तिने जोक सारखंच घेतलं होत आणि आत्ता रवीला पण आपण काही अर्थ लावायच्या आधी एकदा मानवीशी बोलूयात का हा विचार डोक्यात येत होता.. त्याला या क्षणी तरी त्याच्या फीलिंग्स ला तिने validation देण्यापेक्षा ती hurt होणार नाही ना ह्याची काळजी लागून राहिली होती..

"मी किती मूर्ख असेन.. मला वाटलं तुमची सक्खी धाकटी बहीण वारली.. पण कुत्र्याला कोण बहीण/भाऊ म्हणतं ? I feel so wronged..इतकं मारावास वाटतंय ना मला तुम्हाला.. आता बस झालं माझ्या मागे मागे यायचं हां ! मी माझ्या रस्त्याने चाललीये तुम्ही तुमच्या रस्त्याला लागा.. " मानवी रागाने म्हणून पुढे जाऊ लागली तसा तिला थांबवत रवी म्हणाला..

"छोटी.. तू तुझ्या ज्या मैत्रिणी बरोबर राहतेस.. तीच ती मैत्रीण आहे का जिला तू तुझी बेटर हाफ म्हणाली होतीस?"

"तुम्ही अचानक माझ्या स्नेहल बद्दल का विचारताय?" मानवी साशंकतेने म्हणाली पण स्नेहल च नाव ऐकल्या बरोबर रवीने त्याचा संशय खरा निघाला असा चेहरा केला.. पण मानवीला सांगावं कि कसं ते त्याला कळत न्हवतं.. त्यामुळे तो म्हणाला..

"ते मला तुला विचारायचं.. काही नाही.. २ मिनटं इथे बसून बोलूयात?" मानवीच्या घर समोर जी पाणपोई होती तिच्या शेजारी एक छोटंसं बाकडं होत तिकडे बोट करून तो म्हणाला.. त्याला लगेच तिकडे जाऊन बस्तान बघून ह्याला अचानक काय झालं असा विचार करत मानवी पण त्याच्या शेजारी जाऊन त्याच्या कडे तोंड करून बसली.. रवीने वेळ न घालवता मुद्द्याला हात घातला..

"तू लास्ट time जेव्हा घेतली होतीस तेव्हा मी तुला घरी सोडायला आलो होतो, त्या वेळेला तू काहीस तिच्या बद्दल बोलली होतीस ते माझ्या लक्षात होत.. (मानवीची साशंक नजर बघून त्याने मुद्दाम तिला लक्षात नसलेल्या incident चा दाखल देऊन थोडं खोट बोलत सुरुवात केली..) तुम्ही दोघी खूप close आहेत का? नाही म्हणजे तू तिला तुझी बेटर हाफ म्हणतेस म्हणून विचारलं.. " मानवी काही विचार करत म्हणाली..

"आम्ही दोघी खूप close आहोत असं म्हणून पण आमचं relation मी तुम्हाला explain करू शकणार नाही.. कसं सांगू? उम्म्म.. आमच्या दोघींच्या आया बेस्ट फ्रेंड्स आहेत त्यामुळे आम्ही एकमेकींच्या बरोबर जन्मापासून आहोत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. चड्डी बडी म्हणतात ना.. तस काहीसं.. (रवी लक्ष देऊन तीच बोलणं ऐकत तिचे हावभाव बघत होता.. मानवी आता खुश होऊन तिच्या आणि स्नेहल च्या relation बद्दल सांगत होती.. ) माझ्या आयुष्यात एक जर कुठली चांगली गोष्ट मी केली असें तर ती म्हणजे माझ्या स्नेहल शी मैत्री.. (रवीच्या चेहऱ्यावरचे dismissive भाव बघून ती पुढे सांगत म्हणाली) आता म्हणतो ना आपण कि human nature च असतं कि जरी तुमच्या मित्रांच्या बरोबर काही चांगलं घडलं तर थोडीशीSSS का होईना जेलसी वाटतेच.. पण माझ्या बाबतीत जेव्हा केव्हा काही चांगलं घडली तेव्हा माझ्यासाठी completely १००% जर का कुणी खुश असेल तर ती माझी स्नेहल आहे.. अगदी माझ्या आई एवढंच तीच माझ्या वर प्रेम आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.. " मानवीने हसून बोलणं पूर्ण केलं.. रवीने मात्र तीच ऐकून चेहरा दुसरीकडे केला.. एवढी चांगली आहे हि मुलगी खरंच तर ती अशी कशी वागू शकते तिच्या बेस्ट फ्रेंड बरोबर हेच त्याला कळत न्हवत.. इतक्यात मानवी त्याला म्हणाली..

"एवढंच नाही.. माझी स्नेहल प्रचंड सुंदर आहे दिसायला.. हे बघा.. जोक नाही करते मी.. " त्याच्या तोंडासमोर तिचा मोबाईल पकडत मानवी म्हणाली.. रवीने तिच्या हातातून फोन घेतला आणि स्नेहल चे फोटो बघून त्याचा उरला सुरला संशय पण खरा ठरला.. तो slide करत बघत होता कि मानवी किती खुश असते स्नेहल बरोबर ते.. पण त्याला तसे एकामागून एक फोटोज पाहताना बघून मानवी मात्र बोलत होती..

"आहे कि नाही सुंदर माझी बायको? मॉडेल ला लाजवेल अशी फिगर आहे तिची.. एकदम बार्बी डॉल.. आवडली ना तुम्हाला पण? Don't fall for her okay? माझ्याशी ओळख आहे म्हणून तुमचा नंबर आधी लागणार नाही.. तिच्या मागे असलेल्यांची लाईन बरीच मोठी आहे.. Don't even think about it.." मानवीने आता त्याच्या हातातून फोन काढून घेत शेवटचं वाक्य म्हटलं.. तिला एवढं स्नेहालच गुणगाण गाताना बघून आता रवी वैतागत म्हणाला..

"तू माझ्यासाठी तिच्यापेक्षा १०० पटींनी सुंदर आहेस मानवी.. " रवी स्वतःच्याच विचारात असं बोलला तशी मानवी त्याच्यावर ओरडत म्हणाली..

"काय माणूस आहे हा! तुम्हाला काय चेष्टा करायला मीच दिसते का हो? आता हा कसला prank करायचा विचार आहे तुमचा माझ्यावर? असल्या गोष्टी बोलायचं बंद करा आणि घरी जावा तुमच्या.. " ती वैतागून उठून जाऊ लागली तसा रवीने तिला हाक मारून थांबवले..

"मानवी.. तुझी ती मैत्रीण.. " असं बोलला आणि बोलता बोलता थांबला.. त्याला वाटत होत सगळं सांगून टाकावं मानवीला.. पण लगेच काही साचार करत तो म्हणाला.. "काही नाही.. never mind.. मी जातो बाय.. " तिला टाटा करून तो निघून गेला.. त्याला जाताना बघून मानवी स्वतःशीच म्हणाली..

"He's totally fallen for her.. मी तिचे फोटो दाखवायलाच नको होते.. " आता ती पण विचार करत घरी गेली..

 

******

इकडे राहुल स्नेहल ला घेऊन त्यांच्या शाळेच्या इथे गेला होता.. शाळेच्या मागच्या बाजूला एक दगडी भिंत होती.. आणि त्यांच्या शाळेच्या आवारातच १ पडकी वास्तू होती.. काही कारण नसताना मुलांनी उगाच तीच नाव भुताचा बंगला पाडलं होत.. त्या बंगल्याच्या बाजूला पण ती दगडी भिंत होती आणि तिथे लहान असताना मानवीला घेऊन राहुल गेला होता.. आत्ता तेच आठवत तो स्नेहल ला येथे घेऊन आला होता.. लहान असताना त्याने इथल्याच एका दगडावर च्या भिंतीवर कोरून त्याच आणि मानवीचे चेहरे काढले होते आणि ते दाखवून मानवीला म्हटलं होता..

"मानवी हे बघ.. आता आपण मोठ्या शाळेत जाऊ तेव्हा इकडे आपण जास्त येणार नाही हो ना? पण हे कायम इथे राहील.. आपली शाळा संपल्यावर हे इथेच आहे का हे बघायला येऊयात का?" त्याने स्वतःचा मोठा गोल आणि मानवीचा नाजूक चेहरा काढला होता.. ते बघून हसून मानवी म्हणाली होती..

 

"नक्की येउयात.. "

आता राहुल तोच दगड शोधायचा प्रयत्न करत होता.. तो हे शोधत असताना मात्र स्नेहल मागे उभे राहून अवघडून उभी होती.. finally त्याला तो सापडला.. इतक्या वर्षांच्यामुळे त्या दगडावर शेवाळ चढलं होत पण त्याने ते हाताने साफ केल्यावर त्याने कोरलेले त्या दोघांचे चेहरे तिथेच होते.. तो excited होत म्हणाला..

"ओह मानवी.. हे बघ इकडे.. अजून हे इथे आहे.. इतक्या वर्षांनी पण आहे.. ओह माय गॉड.. माझा तर विश्वास च बसत नाहीये.. तुला आठवतंय आपण आलो होतो इथे तेव्हा.." आता मात्र स्नेहल वैतागून अजिबात इंटरेस्ट न दाखवता, त्याच बोलणं मध्येच तोडून  म्हणाली..

"आलो होतो.. It's in the past राहुल.. आता तरी आपल्या भूतकाळाबद्दल बोलायचं थांबवूयात.. आत्ता वर्तमानकाळात न जगता भूतकाळातल्या आठवणीत रमत बसणं आणि भविष्याची चिंता करणं माझी style नाहीये.. मे बी पूर्वी असेनही मी तशी पण आता नाही.. आत्ताचा हा क्षण ! हा वर्तमानकाळ मला जगायचा आहे.. "

तीच बोलणं ऐकून राहुल काही बोलायचं थांबला आणि त्याच्या खिशातून १ ब्लॅक मार्कर पेन काढून त्याने तिथल्या भिंतीवर काही चित्र काढायला सुरुवात केली.. त्याला तिच्याकडे पाठ करून असं काढताना बघून आणि तिच्या बोलण्याला काहीच उत्तर न दिलेलं बघून ती मागून विचारू लागली..

"राहुल ? काय करतोयस तू?"

"२च मिनिटं हां मानवी.. " राहुल त्याच चित्र पूर्ण करून बाजूला होत म्हणाला.. आता त्याने आत्ता चा तो आणि स्नेहल चा चेहरा रेखाटला होता.. त्याच्या लहानपणीच्याच style मध्ये.. त्या चित्राकडे बघून राहुल म्हणाला..

"ठीके मानवी.. काही हरकत नाही.. तू म्हणतीयेस ते बरोबर आहे.. आता भूतकाळाबद्दल नको बोलूयात.. आत्ता आपण जसे आहोत त्या बद्दलच बोलूयात.. तुझ्या आणि माझ्या बद्दल.. " त्याने तिला एक assurance ची स्माईल दिली ते बघून स्नेहल ला दिलासा मिळाला.. याचा अर्थ त्याला एक्साक्टली तिला त्याच्या बद्दल जस वाटतं ते वाटत नसल तरी तो तिला डेट करायला तरी तयार आहे..

थोड्यावेळाने ती तिच्या गाडीतून घरी आली.. तिने अजूनही गाडी रस्त्यावरच उभी केली होती, अजून आत पार्किंग मध्ये नेली न्हवती.. अजूनही गाडीतच बसली होती.. जरी तिच्या मनासारखं आताच्या घडीला झालं होत तरी ती खुश न्हवती.. तिचा चेहरा टेन्शन नीच ग्रासला होता.. तिला खूप दमून गेल्या सरळ वाटत होत.. तिने थकून steering व्हील वर डोकं टेकवलं इतक्यात तिच्या काचेवर कुणीतरी जोरात टकटक केलं.. स्नेहल ने दचकून वर पाहिलं तर तिच्या मागे लागलेला आणि तिला डेट वर नेणारा मुलगा बाहेर उभा होता.. गाडीतून बाहेर येत स्नेहल म्हणाली..

"What's with you?"

"hi , हॅलो काही नाही? डायरेक्ट What's with you? तूच सांग.. तुझं काय चालूये? तू मला भेटत नाहीस.. माझे कॉल पण उचलत नाहीस.. " स्नेहल नि उडवाउडवीच्या टोन मध्ये उत्तर दिलं..

"तुला काय वाटतं ? का करतीये मी असं? It means you are out! तुला एवढंही समजत नाही माझ्या दारावर आला आहेस ते कन्फर्म करून घ्यायला?" असं म्हणून स्नेहल त्याला क्रॉस करून पुढे चालायला लागली तसा तो मागून म्हणाला..

"कोण आहे तो बास्टर्ड? असं काय आहे त्याच्यात जे मी नाही देऊ शकत?" त्याने शिवी घातलेली बघून स्नेहल च डोकं फिरलं.. त्याच्याकडे जोरात चालत येत आणि मारायची acting करत ती म्हणाली..

"तो तुझ्या सारखा ऐरागैरा नाहीये.. तोंड सांभाळून बोलायचं समजलं? जीभ हासडून हातात ठेवेन पुन्हा असं बोलताना दिसलास तर.. " स्नेहालचा अवतार बघून तो मुलगा खरच घाबरला.. त्याला घाबरलेला बघून त्याच्या कडे वर खाली बघत तोंडातच पुटपुटत स्नेहल घराकडे जायला आत वळाली तर समोर मानवी कचरा टाकायला म्हणून कचऱ्याच्या पिशव्या घेऊन उभी होती.. आता मात्र स्नेहल ला घाम फुटला.. मानवीने केवढं ऐकलंय हे तिला माहिती न्हवत.. तिच्या तोंडून फक्त तीच नावच बाहेर पडलं..

"मानवी.. "

"बायको.. तुला खरंच कुणीतरी आवडायला लागलंय? really ? हां ?" मानवी excited होत विचारत होती..

 

************

 

क्रमशः

 

 

************

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..