Oct 18, 2021
कथामालिका

माझी मानवी... 56

Read Later
माझी मानवी... 56
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

मानवी सकाळी लवकरच ऑफिस साठी निघाली होती.. ती बस मधून उतरून त्यांच्या ऑफिस कडे जाणाऱ्या सिग्नल ला उभी राहिली होती..मॅडम च्या हातातून अजूनही मॅगझीन काही सुटलं न्हवत.. ती अजूनही एक एक आर्टिकल बघत होती.. तिला ते मॅगझीन चालताना अजूनही कुठल्या आर्टिकल वर तिने कशी मदत केरळी होती ते आठवत होत.. ते आठवून आठवून खुश होणं चालू होत त्यामुळे तीच इकडे तिकडे लक्ष न्हवत.. राहुल पण त्याची कॉफी घेऊन त्याच सिग्नल वर  आला होता आणि आता  रस्ता क्रॉस करायला तो सिग्नल ला इतर लोकांच्या सोबत उभा राहिला.. सिग्नल ग्रीन झाला इतर लोक जाऊ लागले पण राहुल मात्र नेहमी प्रमाणे  डोकं टॅब मध्ये घालूनच उभा होता.. सिग्नल सुटला.. तशी इतर लोक जायला लागली.. ते पाहून मानवीने तिच्या मॅगझीन मधून डोकं वर केलं आणि म्हणाली..

"गेट सेट गो.. " इतक्यात त्याला तो आवाज आला.. आता राहुलनं मान वर करून पाहिलं.. त्याने इकडे तिकडे पाहिलं.. तो इकडे तिकडे मानवी कुठे आहे का ते पाहू लागला.. पण त्याच्या समोर तर ऑफिस मधली मानवी चालत चालली होती.. तिची फुगलेली केस सगळ्या गर्दीतून त्याला उठून दिसली.. आता एव्हाना त्याला तिचा आवाज पण ओळखू येत होताच.. त्याच्याही नकळत तो धावत तिच्या कडे आला..   

मानवी सिग्नल क्रॉस करून ऑफिस कडे जातच होती कि तिला पाठीमागून कुणीतरी जोरात हात पकडून थांबवलं.. राहुल च्या चेहऱ्यावर प्रचंड अविश्वास दिसत होता.. त्याला कळत न्हवत कि हे कसं श्यक्य आहे.. माझ्याकडे प्रूफ आहे कि माझी मानवी वेगळी आहे.. हि ती नाहीये.. पण.. पण हि अगदी माझ्या आठवणीतल्या मानवी सारखीच कशी काय.. हि माझी मानवी आहे ? नाही.. म्हणजे मला माहितीये हि माझी मानवी नाहीये पण तरी असं का वाटतं कि हीच माझं काही जुने नाते आहे.. जर का तीच्या कडे फक्त attract झालो होतो तर तिच्या पासून लांब जाताना नेहमी इतका त्रास का होतो मला? असं का वाटत कि कुणीतरी गळा दाबतंय.. हि माझी मानवी नाहीये ना? राहुल च्या डोक्यात एवढे सगळे विचार येत होते.. मात्र  मानवी तिच्याच तंद्रीत होती त्यामुळे तिला यातली कुठली गोष्ट जाणवली च नाही.. ती मात्र  त्याने तिला असं थांबवलेलं पाहून नेहमी सारखी हसून म्हणाली..

"ओह.. गुड मॉर्निंग राहुल सर.. (राहुलच्या नकळत त्याच्या हाताची पकड तिच्या मनगटावर आवळत चालली होती.. त्याला असं वाटत होत हि माझी मानवी असेल तर मी हिला जाऊ देतोय का माझ्या पासून लांब.. पण त्याच्या या विचारात त्यालाही कळालं नाही कि त्याची पकड किती घट्ट झाली होती ते.. इतकी घट्ट झाली होती कि त्याचा हात थरथरत होता आणि मानवी ला आता दुखायला लागलं होत.. ती कळवळून म्हणाली.. ) आ.. सर तुम्ही इतकं घट्ट का बरं.. ? "

ती पुढे काही बोलणार इतक्यात तीच लक्ष सिग्नल च्या आकड्यांच्या कडे गेलं.. त्यांची रास्ता क्रॉस करायची वेळ संपत आली होती.. पण राहुल ची नजर मात्र अजूनही तिच्या चेहऱ्यावर खिळली होती असं वाटत होत कि तिच्या चेहऱ्यात काहीतरी शोधतोय.. कुठली तरी खूण.. त्याची मानवी असल्याची.. शेवटी मानवीच  म्हणाली..

"सर.. चला लवकर आपण अडकू नाहीतर मध्येच.. " त्याने तिचा हात पकडलाच होता.. ती त्याला तशीच खेचत रस्ता क्रॉस करून घेऊन गेली.. राहुलची नजर मात्र तिच्यावर तशीच गढलेली होती.. रस्ता क्रॉस करून आल्यावर मानवी हसून म्हणाली..

"ओह.. आपण वेळेत पोहोचलो बरं का.. नाहीतर मध्येच अडकलो असतो.. " राहुल चा काहीच रिस्पॉन्स न्हवता.. तो अजूनही तिच्या कडे बघत होता.. पण त्याने आता तिचा हात सोडला होता.. तो काही बोलेना म्हणून शेवटी मानवीच हसून म्हणाली..

"ओह.. राईट.. सर आज फोटो शूट झाल्यावर आपण जेवायला जाऊयात ना? खूप expensive ऑपशन सिलेक्ट करू नका हां प्लीज.. नाही.. ठीके.. तुम्ही १०,००० माफ केलेत माझे.. तुम्ही म्हणाल तिथे मी ट्रीट देईन.. नो प्रॉब्लेम.. आणि सर.. या महिन्याच्या एडिशन मध्ये माझं पण नाव छापून आलंय.. " त्याला तीच छापून आलेलं नाव दाखवत ती खुश होऊन बोलत होती मात्र  राहुलची तीच नजर तिच्यावर तशीच खिळलेली होती.. इतक्यात त्याचा फोन वाजू लागला.. तरी त्याच लक्ष न्हवते.. जेव्हा मानवी म्हणाली..

"सर.. तुमचा फोन.. " तेव्हा भानावर येत तो त्याचा फोन जॅकेट च्या आत चाचपू लागला पण अजूनही नजर मानवीवरच खिळलेली होती.. शेवटी मानवीच म्हणाली..

"सर तुमचा कॉल झाला कि याल ना तुम्ही? मी जाते पुढे.. " असं म्हणून ती ऑफिस मध्ये जायला वळाली.. तिला जाताना बघून राहुल नि त्याच्या फोन च्या स्क्रीन कडे पाहिले.. फोन वर मानवी चे नाव फ्लॅश होत होते.. जिच्या बद्दल त्याला खात्री होती, पुरावा होता कि ती त्याचीच मानवी आहे त्या मानवीचा हा फोन होता.. पण त्याच्या समोर ऑफिस मध्ये जाणारी ती पाठमोरी मुलगी त्याला त्याची मानवी का वाटत होती याच उत्तर त्याच्या कडे हि न्हवतं.. पण आज त्याला हा फोन घेता आला नाही.. तो फक्त मानवीला त्याच्या पासून लांब जाताना बघत राहिला..

इकडे मानवीला काळत न्हवते कि याला नक्की झालंय काय.. आधी तर तिच्याशी इतका rude वागला.. तिने आणलेला डोनट विजय सरांना देऊन टाकला.. कामाव्यतिरिक्त १ शब्द बोलला नाही.. आणि आज असा अचानक तिचा इतका घट्ट हात धरला कि तिला दुखलं.. आज तस पण डिनर च्या वेळी ती त्याला सगळं सांगणार होती तेव्हाच  त्याच्या वागण्याचा अर्थ पण विचारूया असा विचार करून ती ऑफिस मध्ये गेली..

 

******

 

ऑफिस मध्ये राहुल ला headquarters मधून फोन आला होता.. तो त्याच्या केबिन मध्ये बसून त्यांच्याशी बोलत होता.. पलीकडून ते त्याला analysis सांगत होते..

"The gap has been reduced.. But we are still second in sales, subscription rates, and even in advertisement revenue.. now you have only 2 chances left.. I hope what you have promised us can be fulfilled and you will show us that we haven't trusted the wrong guy!"

"Yes.. I got it.." अजून थोडं बोलून झाल्यावर त्याने फोन ठेवला.. आणि राहुल त्याच्या टॅब मध्ये sales, subscription rates, advertisement revenue च्या फिगर्स पुन्हा एकदा चेक करत होता.. टेन्शन मुळे त्याने त्याच डोकं दोन्ही हातात पकडून तो कपाळ चोळत होता.. इतक्यात knock करून मानवी आत

आली.. पण त्याचा चेहरा बघून म्हणाली..

"ओह.. सॉरी सर.. मला वाटलं तुम्ही इथे नसाल कारण सगळे खाली स्टुडिओ मध्ये आहेत तर मला वाटलं तुम्ही पण तिकडेच आहात.. सीमा मॅम नि मला हे तुमच्या केबिन मध्ये ठेवून यायला सांगितलेलं.. तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा चेक करा.. " त्याच्या समोर तिच्या हातातली फाईल दाखवत ती म्हणाली.. राहुल आता जागेवर उठून बाहेर जात म्हणाला..

"ठेव आणि जा.. "

"सर.. तुम्हाला बरं वाटतं नाही का? खूप थकल्या सारखे .. " तीच वाक्य पूर्ण करायच्या आत राहुल त्याच्या केबिन च्या बाहेर पडला होता.. तो गेल्यावर मानवीने ती फाईल त्याच्या टेबल वर ठेवली तेव्हा तीच लक्ष त्याच्या टॅब कडे गेले.. टॅब मध्ये sales, subscription rates, advertisement revenue च्या फिगर्स बघून तिला त्याच्या काळजीच कारण समजलं.. ती एक उसासा सोडून स्टुडिओ मध्ये गेली..

स्टुडिओ मध्ये सगळे जण आजच्या फोटोशूट साठी खास design करून आणलेल्या ड्रेस च्या भोवती गोळा झाले होते.. मानवी इतर कामांच्यात गुंतली होती.. आणि तिला मदत करत तिच्या मागे मागे करत होता.. तो तिला एक बॉक्स उचलायला मदत करत म्हणाला..

"छोटी.. इथलं उरकलं कि आपण जेवायला जाऊयात आज? माझी ट्रीट.. काय म्हणते?"

"नाही रवी सर.. तुम्ही विसरला का? आज माझ्या साठी महत्वाचा दिवस आहे.. "

"ओह.. तू राहुल सरांशी बोलणार आहेस? सांगणार आहेस त्यांना सगळं?"

"आहे कि म्हणजे तुमच्या लक्षात.. मग कशाला विचारलं जेवायला?" तीच बोलणं ऐकून रवीने एक उसासा सोडला.. त्याला मानवी hurt होईल याची भीती होती.. पण तिला थांबवायचं कसं हे हि त्याला काळात न्हवत..

 तो designer ड्रेस एका mannequin ला लावला होता.. त्याच्या समोर उभे राहून सगळे जण बोलत त्याचे फोटो काढत होते.. विशेष करून मुली.. फॅशन टीम मधली एक मुलगी ब्युटी टीम मधल्या एकीशी बोलत होती..

"किती सुंदर आहे ना ग हा ड्रेस?"

"हो ना ग.. आणि काम पण बघ ना त्यावर किती नाजूक केलंय.. " तशी अजून एक जण म्हणाली..

"हो ना designer लोक उगाच नाही एवढी किंमत वसूल करत.. टॅलेंट आहे ग शेवटी.. "

"बघ ना ग.. असं सुचणार पण नाही आपल्याला बनवायला.. सो beautiful.. "

"मी करू का ग हा फोटो इंस्टाग्राम वर अपलोड ?"

"बघू बघू.."

"किती छान आलाय.. कर कर.. "

ती मुलगी आता इंस्टाग्राम वर तो फोटो अपलोड करणार इतक्यात राहुल चा चिडलेला आवाज स्टुडिओ मध्ये घुमला..

"आत्ताच्या आत्ता सगळे फोटो delete करा ते.. "

तशा सगळ्या मुली घाबरून त्याला त्यांच्या कडे येताना पाहू लागल्या.. मानवी पण आता तिकडे बघत होती.. ती काय स्टुडिओ मधले सगळेच त्यांच्या कडे बघत होते.. मागच्या वेळी जेव्हा राहुल तिला ओरडला होता तेव्हा जशी पिन ड्रॉप शांतता पसरली होती तशीच या वेळी पण पसरली.. राहुल त्या सगळ्या मुलींच्या कडे रागाने बघत होता.. त्याच्या नजरेला नजर मिळवायची कुणाच्यात हिंमत होत न्हवती.. आता त्याने बोलायला सुरुवात केली तेव्हा ना त्याचा आवाज कमी झाला होता ना राग..

"तुम्ही काय सगळ्याजणी इथे मजा बघायला आलाय? कॉमन सेन्स आहे कि नाही काही? तुम्हाला माहिती आहे ना कि २०th एनिवर्सरी ची एडिशन ला अजून २ महिने आहेत पब्लिश व्हायला?  जर का आपलं design लीक झालं तुम्ही इन्स्टा ला अपलोड केल्यावर तर त्याची जबाबदारी घेणार आहात का तुम्ही कुणी? Put the dress in the changing room immediately.."

"येस सर.. " असं म्हणून फॅशन डिपार्टमेंट मधल्या एकीने तो mannequin उचलायला म्हणून त्याला हात लावला.. तसा तिचा हात पटकन पकडत राहुल रागाने तिला म्हणाला..

"स्टॉप! काय करतीयेस तू हे?" तिच्या हाताकडे बघत तो म्हणाला.. तिच्या हातामध्ये ब्रेसलेट, अंगठ्या असं बरच काही होत.. त्यातलं काही अडकलं फॅब्रिक मध्ये तर फाटायचे चांसेस होते.. तिचा हात त्याने जोरात झटकला तशी ती मान खाली घालून उभी राहिली.. तसा तो ओरडून म्हणाला..

"अशी कशी झाली तू फॅशन assistant? तुला एवढं कळत नाही कि कुठल्याही clothing ला हात लावायच्या आधी accessories काढून ठेवाव्यात? तुझ्यामुळे जर का ड्रेस damage झाला तर तू घेणार ना त्याची जबाबदारी?"

"सॉरी सर.. मी ते विसरले आधी काढून ठेवायला.. " असं म्हणून ती हातातून ते सगळं काढू लागली.. पण आता तिच्या ऐवजी तिच्या शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या मुली कडे बघत तो म्हणाला..

"आत्ताच्या आत्ता कपडे supervise करणारा माणूस बदला.. आणि तू.. सरळ दारातून बाहेर पडायचं आणि पुन्हा मला तुझं तोंड दाखवायचं नाही स्टुडिओ मध्ये.."

ती मुलगी थरथरत तिथून पटकन बाहेर पडली आणि त्याच्या नजरेसमोरून दूर झाली.. राहुल चा आरडा ओरडा बघून आता सगळेच घाबरले होते.. त्याने आता त्याचा मोर्चा lights च्या टीम कडे वळवला होता.. त्याच्या वाटेतून तो त्यांच्या अंगावर ओरडला तशा सगळ्या मुली बाजूला झाल्या आणि त्याला वाट करून दिली.. सीमा मॅम मात्र तिथे येत म्हणाल्या..

"काय झालं? मान खालावू घालून उभ नाही राहायचंय.. चला कामाला लागा.. " बाकीच्या मुली मात्र आपापसात म्हणाल्या..

"त्या सीमा मॅम कडक होत्या तेवढंच पुरायचे आता तर हा माणूस त्यांच्या वरचढ मिळाला आपल्याला.. मॅम ना तर काही वावगं वाटणार पण नाही तो असा ओरडला ते.. " राहुलचा तो अवतार बघून रवी मात्र मानवीला म्हणाला..

"बघितलंस? आज राहुल सर खरंच चांगल्या मूड मध्ये नाहीयेत.. आजच्या दिवशी कॅन्सल कर ना फक्त.. आजच्या दिवस खा ना माझ्या सोबत.. मग नंतर त्यांना दे पार्टी जरा मूड चांगला बघून.. " रवीने सल्ला दिला मात्र मानवी राहुल कडे बघत बसलेली बघून तीच लक्ष त्याच्या कडे वळवायला रवी म्हणाला..

"आज माझा बर्थडे आहे माहितीये ना?" तशी मानवी त्याच्या कडे बघत म्हणाली..

"घ्या.. झाले तुम्ही सुरु खोटं बोलायला? मागच्या वेळी तुम्ही मला दादा म्हणायला लावलं तुम्हाला का तर म्हणे मी तुझ्या पेक्षा महिनाभर आधी जन्मलोय.. विसरला का तुम्ही?"

"मी म्हणालो का असं?" इतक्यात सीमा मॅम नि हाक मारली तशी मानवी "आले.. " म्हणत त्यांच्या कडे पळाली.. रवी मात्र विचारात पडला..

"तो ड्रेस changing रूम मध्ये घेऊन जा आणि मॉडेल येईपर्यंत त्याची काळजी घे.. त्याला काही होऊ देऊ नकोस.. " सीमा मॅम नि तिला सांगितलं तशी "हो मॅम " म्हणत मानवीने काळजीपूर्वक तो ड्रेस उचलला आणि changing रूम कडे गेली..

 

 

नमस्कार वाचकहो.. मला पुढचा पार्ट पोस्ट करायला नेहमी पेक्षा जास्त वेळ लागू शकतो.. काही अचानक महत्वाची कामे निघाली आहेत ज्यामुळे लिखाण मागे पडायची श्यक्यता आहे..तरी सुद्धा मी जास्तीत जास्त लवकर पार्ट पोस्ट करायचा प्रयत्न करेन.. उशीर होणार असल्यामुळे मी आधीच तुम्हा सर्वांची माफी मागते..

 

************

क्रमशः

************

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..