
मानवी ने एका फॅशन टीम मधल्या मुलीच्या मदतीने तो ड्रेस manniquien वरून काढला आणि हँगर ला लावून ती त्याच रूम मध्ये बसली होती.. स्नेहल च्या कडे तिने नेहमी असे designer ड्रेसेस बघितले होते.. पण तरी हा ड्रेस काही औरच होता.. तिला फारसा काही वेस्टर्न ड्रेस चा सेन्स न्हवता पण ती पण त्या ड्रेस कडे अप्रूपाने बघत होती.. इतकं सुंदर काम केलं होत त्या ड्रेस वर.. कि ती पण न राहून तो ड्रेस बघण्यात गुंतली होती.. इतक्यात रिया फोन वर बोलत बोलत आत आली..
"थोडा वेळ नाही का चालणार तिथे राहिली तर गाडी? बरं.. ठीके.. पाठवते मी कुणाला तरी.." असं म्हणून ती मानवी च्या जवळ आली.. आणि तिच्या गाडीची चावी देत म्हणाली..
"आजकाल फारच त्रास द्यायला लागलेत पार्किंग साठी.. मानवी खाली जाऊन माझी तेवढी गाडी हलव.. आता ती मॉडेल येईल फोटोशूट साठी तर मला तिचा मेकअप करायला लगेच सुरुवात करावी लागणारे.. नाहीतर मीच गेले असते.." तशी मानवी जरा द्विधा मनस्थिती मध्ये म्हणाली..
"पण सीमा मॅम नि मला ड्रेस वर लक्ष ठेवायला सांगितलंय.."
"इतक्या मोठ्याने राहुल सर ओरडलेत मघाशी.. आता कोण हात लावायला जाणारे त्या ड्रेस ला? जा पटकन तेवढी माझी गाडी हलवून ये.. " एवढं बोलून ती निघून पण गेली..
मानवी ला आता तरी सुद्धा जरा धाकधूक वाटत होती पण तरी ५ मिनटात जाऊन येऊयात असा विचार करून मानवी रिया ची गाडी पार्किंग मधून काढायला गेली..
*******
" काळजी करू नकोस.. शूटिंग छान पार पडेल.. ओके.. बाय.. " स्नेहल राहुल शी तिच्या हॉटेल च्या लॉबी मध्ये बोलत होती.. आज त्यांचा काही भेटायचं ठरलं न्हवत पण सकाळी त्याने कॉल उचलला नाही म्हटल्यावर तिला जरा काळजी वाटली होती.. आणि आता फोन वर बोलल्यावर तिला त्याला कामाचं च टेन्शन आहे हे जाणवलं होत.. पण आता तिने फोन ठेवला आणि तिच्या पोटात कळ करून दुखलं म्हणून तिने हाताने पोट पकडल.. तिची १ कलीग तिथूनच जात होती तिने हे पहिल आणि म्हणाली.. "स्नेहल पोटात दुखतंय का ग?"
"हो ना.. गेले काहि दिवस असच चालू आहे.. मधून च असं एकदम जोरात पोटात दुखत आणि नंतर थोड्या वेळात थांबत पण.. काही कळत नाहीये.."
"आपल्या हॉटेल साठी आहेत डॉक्टर त्यांना दाखव ना एकदा.. ते काहीतरी पेनकिलर्स तरी देतील.."
"हम्म.. जाऊन बघते.. " असं म्हणून ती तिच्या केबिन मध्ये जायला निघाली..
रवी ला बाहेरच काम आलं होत त्यामुळे तो बाहेर आला होता.. आणि तसाच त्याच्या रूम मध्ये काहीतरी विसरलं म्हणून घ्यायला आला होता.. त्याने स्नेहल ला राहुल शी बोलताना बघितलं.. आता त्याला राहवलं नाही.. तो तिच्या पाठोपाठ गेला आणि त्याने तिला वाटेत च गाठलं.. गेस्ट साठी हा एरिया रेस्ट्रीक्टेड होता.. त्यामुळे त्याला एकदम तिथे बघून स्नेहल म्हणाली..
"तू इथे काय करतोयस? गेस्ट ना allowed नाहीये इकडे यायचं.." पण तिच्या बोलण्या कडे दुर्लक्ष करून रवी म्हणाला..
"आता थांबवं सगळं हे.." तिला काही कळालं नाही त्यामुळे तिने विचारलं..
"म्हणायचं काय आहे तुला?"
"प्लीज आता फसवायचं थांबवं स्नेहल.. मानवी ला असं फसवायचं थांबवं.. " त्याच्या तोंडून मानवी च नाव येण तिला अपेक्षित न्हवत.. आणि त्याला सगळं समजलंय हे तर कळलं तिला पण त्याचा आणि मानवीचा संबंध तिला कळेना. शेवटी तिने त्याला हॉटेल च्या गार्डन एरिया मध्ये नेले.. आणि तिथे त्याच्या बोलण्यातून तिला कळलं कि हाच आहे ज्याच्या बरोबर मानवी ऑफिस मध्ये क्लोज आहे.. स्नेहल म्हणाली..
"म्हणजे मानवी ज्याला भाऊ मानते तो तूच आहेस तर.."
"हम्म.. माझ्याही नकळत तुम्हा तिघांच्या मध्ये माझा इंटरफेरन्स झाला आहे..पण आता.. आता सगळं कळून फक्त शांत राहणं मला जमणार नाही.." स्नेहल आता खाली मान घालून फक्त त्याच बोलणं ऐकत होती.. रवी पुढे म्हणाला..
"स्नेहल.. आज रात्री ते दोघे भेटणार आहेत..डिनर साठी.. त्यावेळीस मानवीने राहुल सरांना सगळं सांगायचं ठरवलं आहे.. त्या दोघांना अशा प्रकारे कळले तर ते तुम्हा तिघांच्या साठी worse ठरेल असं नाही का वाटत तुला? मी किती हि विचार केला या सगळ्या चा तरी, तुम्ही तिघेही कमीत कमी दुखावले जाण्याचा एकच मार्ग आहे.. तूच सगळ्यात आधी हे क्लिअर करावं.. म्हणजे तुम्ही तिघे पण तुमचं कमीत कमी रेलशनशिप manage करता येईल अशा कंडिशन्स मध्ये तरी असाल नाहीतर आधीच खूप कॉम्प्लिकेशन्स झालेत ते अजून वाढतील.. I am counting on you for this.. "
स्नेहल चा आता हे सगळं ऐकून चेहराच पांढरा फटफटीत पडला.. आजच्या या एका रात्रीत ती मानवीने सगळं सांगितले तर तिची आयुष्यभर कमावलेली मैत्री पण घालवणार होती आणि जे तीच प्रेम होत ज्यावर ती तिच्या मैत्रिणीच्या नावाने हक्क गाजवत होती, ज्या बद्दल तिलाही कल्पना होती कि ते अगदी कमी वेळा साठी तिच्या आयुष्यात असणार होत ते हि गमवणार होती.. आता सगळं कसं हॅन्डल करायचं हा तिला प्रश्न पडला होता.. तिच्याशी थोडा वेळ बोलून रवी तर निघून गेला पण स्नेहल च्या पायातील त्राण च गेले..ती तिथेच मटकन खाली बसून विचार करू लागली..
*******
मानवी रिया ची गाडी पार्क करून पळत पुन्हा वर आली.. तिला त्यांच्या बिल्डिंग च्या बाहेर पार्किंग शोधून तिथे गाडी लावून यावं लागलं होत कारण रिया नि कोणत्या तरी VIP section मध्ये गाडी लावली होती तर तिथून काढे पर्यंत सगळं पार्किंग फुल्ल होऊन गेलं होत.. ती स्टुडिओ मध्ये आली कि लगेच रिया ला शोधत तिच्या गाडीची किल्ली द्यायला गेली.. रिया तिला शूटिंग च्या तिथेच विशाल बरोबर flirt करत काही तरी बोलत बसलेली दिसली.. तिच्याकडे जात ती म्हणाली..
"रिया.. तुझ्या गाडीची किल्ली.."
"ओह.. थँक यु.." पण मानवी कडे बघत आता ती तीच हसू दाबत होती..
आता तिच्या फुगून दुप्पट झालेल्या केसांच्या कडे बघत विशाल म्हणाला..
"दीदी बाहेर पाऊस पडतोय का?"
"हो.. तुला कस कळलं? भिजले पण मी अरे थोडी.." आता तिच्या डोक्याकडे हात करत तो म्हणाला..
" ते तुझी केस.. "
आता मानवीच्या लक्षात आलं कि रिया ला एवढं हसू का येतंय ते.. ती हातानेच दाबून बसवायचा प्रयत्न करत म्हणाली..
"अरे खूपच जास्त कुरळे होतात माझे केस पावसात.."
" कंगवा देऊ का मग दीदी तुला? " मुलांचा असतो तो छोटा कंगवा त्याच्या खिश्यातुन काढत विशाल म्हणाला..
" अरे नको.. विंचरली केस तर अजून फुगतात.. लहानपणापासून अशीच आहेत.. आणि हा छोटा कंगवा तर आत अडकून बसेल.." त्याच्या कंगव्या कडे बघत ती म्हणाली.. आणि आता हातानेच केस दाबून बसवायचा प्रयत्न करू लागली..
त्यांचं हे बोलणं राहुल मागे वळून ऐकत आणि पाहत होता.. सीमा मॅम च्या सोबत तो तिथेच पुढे उभा राहिला होता.. राहुल ला मानवी च्या केसांची अवस्था बघून त्याच्या लहानपणीची मानवी आठवली.. जेव्हा तिने त्याला भिजू न देता स्वतः भिजली होती आणि त्याला त्याच्या घरी सोडल्यावर तिच्यापण केसांची अवस्था अशीच झाली होती.. आता त्याला सकाळचा प्रसंग आठवला जेव्हा ती सिग्नल ग्रीन झाल्यावर "गेट सेट गो" म्हणाली होती.. तशीच जशी त्याच्या लहानपणीची मानवी म्हणायची.. आता राहुल अजूनच गोंधळला.. विचार करून त्याच डोकं फुटायची पाळी आली होती.. एक तर कामाचे टेन्शन त्यात ऑफिस मधली मानवी आणि जुनी मानवी सारख्या वाटत आहेत पण त्याची मानवी त्याला त्याची वाटेना.. या सगळ्या मुळेच त्याची सारखी चिडचिड होत होती.. आता सुद्धा तो तिच्या कडे बघत असताना कुणीतरी येऊन त्याला काही विचारायला गेले तर त्याच्या पण अंगावर खेकसला..
मानवी मात्र या सगळ्या पासून अनभिज्ञ च होती.. रवी अजून काही कामानिमित्ताने बाहेर गेला होता तो आला न्हवता.. त्यामुळे तिला छळायला कुणी न्हवते.. त्यामुळे तिचे काम चालू होते. त्यातच ती गाडी लावून आली तोवर च ती मॉडेल आली होती आणि चेंजिंग रूम मध्ये गेली पण होती.. त्यामुळे तीच तिकडे पण काही काम न्हवत..
मानवी तीच काम करत होती.. थोड्या वेळाने ती मॉडेल पण चेंज करून बाहेर आली.. आता तिचे शेवटचे चेकिंग करून तिला नवीन हिल्स चे शूज दिले कि शूटिंग ला सुरुवात करणार होते.. सीमा मॅम पण आता त्या मॉडेल च्या इथे जाऊन सगळं चेक करत होत्या.. इतक्यात त्या मॉडेल च्या लक्षात आले कि ड्रेस पोटाच्या बाजूला थोडा फाटला आहे.. तिने तो पटकन सीमा मॅम ना दाखवला आणि म्हणाली..
"हा तर faulty आहे पीस मॅम.. हा नाही चालणार.."
सीमा मॅम नि पण घाबरून तो ड्रेस नीट पाहू लागल्या.. काहीतरी ड्रेस बाबतीत गोंधळ चालू आहे हे लक्षात आल्यावर मानवी पण त्यांच्या जवळ गेली.. मानवीला पाहून राहुल च पण लक्ष आता त्यांच्या कडे गेले.. सीमा मॅम मानवीला विचारत होत्या..
"मानवी तू पाहिलं होतंस का हे?"
"नाही मॅम.. " तसा सीमा मॅम नि त्या मॉडेल ला घेऊन आलेल्या फॅशन टीम मधल्या मुलींच्या कडे मोर्चा वळवला आणि जरबेने विचारलं..
"कसं झालं हे?"
"मॅम.. माहिती नाही.. " " मॅम आम्ही पण हे आत्ताच बघतोय.. " त्या मुलींनी घाबरून स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली.. हा गोंधळ राहुल दुरूनच बघत होता.. त्याने तिथूनच जोरात ओरडून विचारले..
"कोणाला दिले होते supervision करायला?" त्याचा वाढलेला आवाज ऐकून मानवी पळत त्याच्या पुढे आली आणि म्हणाली.. "सर.. मी.. मी होते in charge.."
आता समोर मानवीला बघून राहुलचा चेहरा पडला.. आता तो ओरडत न्हवता पण त्याचा राग, त्याचा त्रास, त्याच frustration सगळं त्याच्या आवाजात जाणवत होत.."का? नेहमी काही चूक होते तेव्हा तूच का येतेस समोर माझ्या? का? उत्तर दे.. कोण आहेस तू नक्की?"
"सॉरी सर.. माझ्या कडूनच चुकलं असणार.. "
राहुल चा तो अवतार बघून रियाला guilty वाटायला लागलं.. ती पुढे येऊन काही बोलणार.. इतक्यात राहुल बोलला..
"मला त्रास द्यायचं बंद कर प्लीज.. तुझा इतका विचार करायला मला वेळ नाही.. you are fired.." राहुल हे इतक्या शांतपणे बोलला कि कुणाला त्याला काही बोलायची हिंमत पण झाली नाही.. शेवटचं वाक्य बोलताना त्याचे पण डोळे पाणावले होते पण मानवीने खाली मान घालून दाबून धरलेल्या हुंदक्यात ते कुणाला दिसले नाहीत.. मानवीने एकदा नजर वर करून पाहिले आणि राहुलचा त्रासलेला आणि काळजीने ओढवलेला चेहरा बघून तिथून निघून गेली..
*****
स्नेहल तिची शिफ्ट संपवून घाईघाईने गाडीत बसली.. तिला मानवीने राहुल ला सगळं सांगायच्या आधी स्वतःहून सगळं सांगायचं होत.. तिने गाडीतून त्याला ब्लूटूथ हेडसेट घालून फोन लावला.. पण तिने केला फोन वाजत राहिला पण राहुल ने उचलला नाही.. तो त्याच्या ऑफिस मध्ये निपचित बसून फक्त तिचा फोन वाजताना बघत राहिला.. पण त्याच डोकं, मन काहीही काम करायचं बंद झालं होत..
*******
नमस्कार वाचकहो.. तुम्ही सर्वांनी इतके दिवस या भागाची वाट पाहिलीत आणि मला लिहायला वेळ दिलात त्या बद्दल मी खरंच तुमची खूप आभारी आहे.. हा भाग लहान लिहिला पण छोटा का होईना एखादा भाग तरी पोस्ट करावा म्हणून हा एवढाच पोस्ट करत आहे.. हे गेले १५ दिवस मला प्रचंड वाईट गेले.. माझ्या कुटुंबातील माझ्या अतिशय जवळच्या २ व्यक्ती कोरोना ला बळी पडल्या.. जर का कुणी तरुण वाचक हि स्टोरी वाचत असतील त्यांनी प्लीज हि माझी कळकळीची विनंती समजावी.. जवळपास आपण २ वर्ष आपण आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींची काळजी घेत आहोत तर आता गहाळ पडून चालणार नाही.. comorbidity असल्यास डॉक्टर पण हतबल होतात हे मी बघितले आहे.. प्लीज लग्न, बारशी, वास्तुशांत, अशी काहीही कारण असूदेत.. कितीही कमी लोक जमणार असूदेत पण प्लीज अशा कार्यक्रमांना जायचे टाळा.. मला माहिती आहे कि इतक्या दिवसांनी घरात बसायला लावणे समजावणे कठीण होत आहे.. पण प्लीज काही झाले तरी कमीत कमी लोकांचा संपर्क येऊ द्या.. vaccination पण झाले असले तरी गाफील राहू नका.. आणि vaccination compulsory कराच.. माझ्या या स्टोरी मधून मला सगळ्या वडीलधाऱ्यांना एवढेच सांगणे आहे कि आम्हां मुलांना तुमच्या शिवाय कुणी नसते.. कुणाच्या कार्याला नाही गेलो तर लोक काय म्हणतील याचा विचार करण्याचे हे दिवस राहिले नाहीत.. प्लीज स्वतःची काळजी घ्या.. आमच्या साठी घ्या..
आणि पुन्हा तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते.. मला तुम्हा कुणाच्या कंमेंट्स ना पण रिप्लाय देता आला नाही तरी तुम्ही सर्वांनी मला इतके सांभाळून घेतले.. तुमच्या मायेच्या शब्दांनी पुन्हा एकदा मन उभारी घ्यायचा प्रयत्न करत आहे.. मी पुढील पार्ट लवकरच पोस्ट करायचा प्रयत्न करेन.. once again thank you very much for your kind support.. take care..
************
क्रमशः
************