Oct 18, 2021
कथामालिका

माझी मानवी... 51

Read Later
माझी मानवी... 51
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

दुसऱ्या दिवशी लोकेशन्स decide करून ते सगळे मुंबईला परतले.. पण रवीने कालच्या सारखी काही मस्ती केली नाही.. तोही शांत होता आणि त्यामुळेच राहुल आणि मानवी पण शांतच राहिले.. रवी त्याच्या बाईक वर आणि मानवी - राहुल त्यांच्या कार ने परत आले..

 

*****

 

सोमवारी सकाळी स्नेहल तिच्या रूमच्या बाहेर आली तिने मानवीच्या  रूम कडे पाहिलं इतक्यात मानवी पण तिच्या रूम चा दरवाजा उघडून बाहेर आली.. स्नेहल तिला काही म्हणणार इतक्यात मानवी ने तिच्या जवळ येऊन तिला मिठी मारली आणि म्हणाली..

"बायको.. I missed you.." तिला स्वतःपासून वेगळं करत स्नेहल म्हणाली..

"मी टू.. पण तू काल  कधी आलीस?"

"रात्री उशीर झाला अग.. "

"business trip वर काही झालं नाही ना?"

"म्हणजे?" मानवीने न कळून विचारलं.. तस सावरत स्नेहल नि परत विचारलं..

"नाही म्हणजे.. राहुल बरोबर होता ना.. म्हणून विचारलं.. तू uncomfortable तर न्हवतीस ना?"

"मला पण सुरुवातीला तसेच वाटलं होत अग.. पण कामामुळे असेल म्हणा किंवा ऑफिस च्या बाहेर होतो त्यामुळे म्हणा आम्ही दोघे पण खूप मोकळे झालो या ट्रिप मध्ये एकमेकांच्या बरोबर.. " आता घड्याळात बघत मानवी म्हणाली.. "ओह माय गॉड.. हे बघ आता मला उशीर होतोय तर आता निघते मी.. (आता तिच्या चेहऱ्याला ओंजळीत घेत ती पुढे म्हणाली.. ) आता आमची deadline खूप जवळ आलीये त्यामुळे हा आठवडा तुला माझं तोंड रोज बघायला मिळणार नाही.. त्यामुळे उगाच एकटं वाटून घ्यायचं नाही.. वेळेवर जेवायचं आणि लवकर झोपायचं.. ओके? माझी वाट बघत जागत बसू नकोस.. "

"हम्म.. " आता मानवी पळत च त्यांच्या शु रॅक कडे गेली.. तशी मागून स्नेहल ओरडली..

" तू पण ऑफिस मध्ये जेव व्यवस्थित.. " तिच्याकडे हसत बघत मानवी म्हणाली..

"ओके बॉस.. " आता ती पायऱ्या वरून जवळपास पळत च गेली.. तशी स्नेहल पुन्हा काळजीने ओरडली..

"पळू नकोस ग.. पडशील.. " पण ऐकायला मानवी होतीच कुठे.. ती तर निघून गेली होती.. मानवी ठीक आहे हे कळल्यावर तिला एका अर्थी बरं पण वाटलं आणि तीच धोक्याची घंटा आहे असं पण वाटलं.. याचा अर्थ आता राहुल आणि ती एकमेकांच्या सोबत छान वागत होते.. याचा अर्थ आता मानवी गोंधळून काही चुका करणार नाही.. याचा अर्थ राहुल आणि ती जवळ येऊ शकतात..

****

मानवी लिफ्ट मधून बाहेर आली आणि त्यांच्या ऑफिस च्या दरवाज्याकडे जात होती इतक्यात मागून राहुल आला.. तिला बघून त्याने मागूनच म्हटलं..

"गुड मॉर्निंग मानवी.. "

"ओह.. गुड मॉर्निंग राहुल सर.. " तो तिला पास होऊन पुढे जाताना बघून ती पण म्हणाली..

राहुल आत गेला तेव्हा जवळपास सगळे जण आले होते.. त्याच्या पाठोपाठ येत आणि तिच्या डेस्क वर जात मानवी बसली.. इतक्यात सगळ्यांना उद्देशून राहुल प्रसन्नपणे म्हणाला..

"गुड मॉर्निंग everyone.."

"गुड मॉर्निंग.. " सगळे म्हणाले..

"ओके आता आपला deadline चा आठवडा आजपासून सुरु होतोय.. let's all work together & do well.. We can do it..ओके?"

"येस सर.. " सगळेजण त्याच्या या प्रसन्न अवताराकडे बघत साशंकतेने म्हणाले.. रवी पण तिथेच बसला होता पण त्याने काही रिस्पॉन्स दिला नाही.. मात्र मानवीचा खुश चेहरा आणि तिचे पण प्रसन्नपणे लुकलुकणारे डोळे त्याच्या नजरेतून सुटले नाही.. राहुल त्याच्या केबिन मध्ये निघून गेल्यावर मात्र फ्लोअर वरच्या मुली एकमकींच्यात कुजबुजू लागल्या..

"राहुल सरांना काय झालं?"

"तेच तर.. नक्की काय खाऊन आले ते असे वागतायेत?!"

"हो ना.. नेहमी जसे खडूसपणे वागतात तेच ठीक असतं.. अंदाज तरी येतो.. हे जास्त भीतीदायक वाटतंय मला तर.. "

मानवी मात्र त्यांच्या गप्पा ऐकून पण हसत तिचा लॅपटॉप चालू करत होती.. रवी खुर्ची वळवून तिच्या त्या सगळ्या reactions नोट करत होता.. इतक्यात ती कुजबुज जरा वाढायला लागली हे लक्षात येऊन सीमा मॅम टाळी वाजवत मोठ्याने म्हणाल्या..

"चला सगळे.. बास आता गप्पा.. Let's work hard.. " तसे सगळे एकसुरात.. "yes" म्हणाले आणि कामाला लागले..

 

*****

राहुलच्या केबिन मध्ये विजय सर त्याला आर्टिकल चा draft दाखवत होते.. तो चेक करत तो म्हणाला..

"सगळं अगदी छान झालंय विजय सर.. फक्त हा पार्ट आहे ना तो जरा अजून emphasize करा म्हणजे परफेक्ट होईल.. "

"फक्त एवढाच.. "

"हो.. "

"ओके सर.. understood.. आणि सर तुमचं पाकीट मी तिथे ड्रॉवर मध्ये ठेवलंय.."

"ओह.. थँक्यू.. "

विजय सर गेले..इतक्यात त्याचा फोन वाजायला लागला.. त्याने स्क्रीन कडे बघत फोन उचलला आणि कान आणि खांद्याच्या मध्ये पकडून पुन्हा काम करत म्हणाला..

"हां मानवी.. बोल ग.. " न राहवून हॉटेल मध्ये पोहोचल्यावर स्नेहल ने त्याला फोन केला होता..

"तुझी business trip कशी झाली? मी तुझ्या टच मध्ये राहू शकले नाही ना या २ दिवसात म्हणून विचारलं.. "

"ओह.. हां.. मी तुला कॉल करणार होतो आल्यावर.. पण खूप उशीर झाला अग यायला.. त्यामुळे राहून गेलं.. आणि त्या नंतर तर आता मी फारच बिझी आहे ग.." तो हे सगळं काम करतच बोलत होता.. स्नेहल ला कागदपत्रांचा आवाज येत होता.. इतक्यात सीमा मॅम knock करत आत आल्या आणि बोलू लागल्या..

"राहुल सर ते मूवी फॅशन वर च जे आर्टिकल आहे त्याचे फोटोज.. " त्यांना एका हाताने थांबायचा इशारा करून राहुल फास्ट स्नेहल ला म्हणाला..

"आमची deadlineखूप जवळ आलीये ना त्यामुळे मी सध्या खूप बिझी आहे ग.. सॉरी.. मी तुला कॉल बॅक करतो.. " एवढं बोलून त्याने फोन पण कट केला..

"राहुल? राहुल.. " स्नेहल बोलत होती पण त्याने फोन कट केला होता हे तिच्या लक्षात आल्यावर तिने पुन्हा काळजीने केसातून हात फिरवला..

रात्र झाली होती तरी सगळे जण कामात बुडाले होते.. किती वाजले आहेत या कडे कुणाचं लक्ष न्हवत.. प्रत्येकजण थोडंसं कहीतरी खाऊन आला होता.. राहुल कामानिमित्त बाहेर गेला होता.. तो त्याच्या केबिन मध्ये आला तेव्हा त्याच्या टेबल वर iced टी आणि सँडविच च पार्सल त्याला दिसलं.. त्याने वळून काचेतून पाहिलं; मानवी तिच्या लॅपटॉप मध्ये डोकं घालून काम करत बसली होती.. तिने हळूच तो केबिन मध्ये आलाय तर खातोय का हे बघायला त्याच्या केबिन कडे बघितलं तेवढ्यात राहुल ने पण एका हातात सँडविच च पार्सल आणि एका हातात iced टी पकडून तिच्याकडे बघितलं.. आणि खायची आणि प्यायची acting करत तिला सांगितलं कि मी हे आता खातो.. आणि "थँक्यू" असं म्हणत त्याने तिला स्माईल दिली.. मानवीनी पण हसून मान डोलवली आणि समाधानाने ती पुन्हा तिच्या कामाकडे वळली.. त्यांचं हे सगळं Interaction रवी पण पाहत होता.. त्याच्या मात्र कपाळावर आठ्या पडल्या.. पण डोकं झटकून तो पुन्हा कामाला लागला.. त्याच त्याला कळत न्हवतं कि त्याला असं का फील होतंय.. पण आता विचार करायला वेळच कुठे होता त्यांच्याकडे.. कामच इतकं होत समोर वाढून ठेवलेलं.. त्या रात्री कुणीही घरी गेलं नाही.. लोकांनी डेस्क वर च डुलका काढला..जर का काही गरज लागली तर मात्र एकमेकांना उठवत त्यांनी काम पूर्ण करत आणलं..  त्या failed business trip वरून आल्या पासून रिया पण विशाल शी काही बोलली न्हवती.. आता मात्र तीची आळसावलेली नजर विशाल कडे गेली आणि त्यांची नजरानजर झाली तशी तिने शरमेने मान खाली घातली.. तिची ती reaction बघून आता पण विशाल ला मजा वाटली.. पण पूर्ण रात्रभरात सगळ्यांना गरज पडली असेल एका व्यक्तीची तर ती म्हणजे - मानवी.. तिच्या नावाचा पुकारा सीमा मॅम आणि विजय सर तर सारखे करत होते.. काही स्पेसिफिक instructions द्यायच्या झाल्या कि तिला त्यांच्या डेस्क वर जावं लागे.. रात्रभर मानवी इकडून तिकडे पळत काम पूर्ण करत होती..

"मानवी हे बघते जरा.."

"हो मॅम.. "

"मानवी पार्सल आलंय प्लीज जाऊन आण पटकन.. "

"हो हो.. आलेच घेऊन.. " असं म्हणत ती एक एक काम पूर्ण करत होती.. तिला असं इकडून तिकडे पळताना बघून रवीने २-४ वेळा तिच्या तोंडात काहीतरी खाऊ चारला होता.. कधी क्रिम च बिस्कीट तर कधी चॉकलेट तर कधी चिक्की.. सकाळ झाली तरी कामाचा स्पीड कमी झाला होता पण ते थांबलं न्हवत..

विजय सरांनी आता त्यांचं सगळं काम mail केलं तस ते मोठ्याने पाय पसरत म्हणाले..

"माझ्याकडून ज्यांना ज्यांना मेल जायचा होता त्यांनी आपापले मेल बॉक्स चेक करा.. आता मी २ दिवसा साठी झोपतोय कुणी मला उठवायचा प्रयत्न केला तर मी त्याचा जीव घेईन.. कळालं?" डोळ्यावर eye मास्क लावत त्यांनी खुर्चीवर च मागे सरकून मान टेकवली.. रवी मात्र अजूनही त्याच्या कॉम्पुटर स्क्रीन मध्ये डोकं घालून चुपचाप काम करत होता.. इकडे सीमा मॅम मात्र आळोखे पिळोखे देत म्हणाल्या.. "मी at least stretching  तरी करायला हवं..अंग अवघडलंय आता.."

मानवी पण आता जाम पेंगुळली होती.. तीच डोकं नेहमी प्रमाणे पेंगताना गोल गोल फिरायचं तस फिरत होत..

इतक्यात सगळ्यांच्या साठी Starbucksची  कॉफी घेऊन राहुल नि एन्ट्री मारली.. काल सकाळचा उत्साह आज कुणाच्यातही न्हवता.. रात्रभर राहुल पण थांबला होताच काम करत पण अति काम करायची त्याला सवयच होती.. त्यामुळे तो अजूनही काम करायच्या तयारीत च आत आला.. विशालच्या टेबल वर त्याने ते सगळे कॉफी चे कप ठेवले.. आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाला..

"Well done, everyone.. पण आपल्याला अजून थोडे जास्त काम करावं लागणार आहे.. "

त्याच्या शेवटच्या वाक्याने मात्र सगळ्यांची झोप उडाली आणि सगळे एकदमच जोरात म्हणाले..

"काय?"

"का?"

तो तक्रारीचा सूर जरा ओसरला तसे त्याने सांगायला सुरुवात केली..

"आपल्याला हव असलेल्या मॉडेल च schedule बदललंय आणि २०th एनिवर्सरी च कव्हरशूट याच गुरुवारी आलंय.."

त्याच बोलणं ऐकून सगळ्यांनी एकसाथ सुस्कारे सोडले.. राहुल पुढे बोलत म्हणाला..

"He's a top model so we have to adjust according to his schedule.."

"आह.. शीट.. "सगळ्यांच्या भावनांचा आता कडेलोट झाला.. पण राहुल पण त्यांच्या हो ला हो करत दमलेल्या आवाजात म्हणाला..

"I know..I know.. I feel the same..आपण इथवर आलोय तर अजून थोडी कळ काढूया.. एकदा हे तडीला जाऊदे.. मग एक छान ब्रेक घेऊयात सगळेच.. विशाल हि कॉफी सगळ्यांना पास कर प्लीज.. "

त्याने असं सगळ्यांना समजून घेत बोलल्या मुळे आता त्यांच्या कडे काही पर्याय पण न्हवता.. सगळे पुन्हा नाईलाजाने का होईना पण कामाला लागले.. कामाच्या बाबतीत एवढ्या डेडिकेटेड असणाऱ्या सीमा मॅम पण त्या पण वैतागून म्हटल्या..

"कधी कधी वाटत हा जॉब च सोडून द्यावा.. "

दुसरी पण एक मुलगी तक्रारीच्या सुरत म्हणाली..

"कसली असली हि रेप्युटेड कंपनी.. एवढं काम करून असा काय आदर सत्कार होणारे माझा.."

अशीच वाक्य सगळी कडे ऐकू येत होती.. पण तेवढ्यापुरतीच.. सगळे पुन्हा जोमाने कामाला लागले.. राहुल त्यांना ऑर्डर देऊन स्वतः काम करत न्हवता असं न्हवतंच ना.. तोही त्यांच्या बरोबर च जागून काम करत होता.. किंबहुना जास्तच करत होता.. तरी त्याने त्यांचं frustration समजून जशी situation हँडल केली ते बघून मानवीला पण त्याचा फार अभिमान वाटला.. मानवी सगळ्यांना पुन्हा जोमाने कामाला लागलेलं बघून तिने पण कामाला सुरुवात केली..  

 

मानवी काही documents घेऊन राहुल च्या केबिन मध्ये गेली.. तिने दारावर knock केलं.. तसा राहुल ने काम करत करतच "येस come in.." म्हटलं..

मानवीने आत येऊन त्याच्या समोर ते documents ठेवत सांगितलं..

"सर हे काही पेपर्स review करायचे आहेत.. आणि हे काही पार्सल आलेत.. " ती त्याच्याशी बोलत होती मात्र तिला बघून च राहुल चा थकवा जसा काही पळून गेला होता तो एकदम relaxed वाटत होता.. "थँक्यू मानवी.. " थोडासा विचार करून मानवी म्हणाली..

"राहुल सर.. आपलं कव्हर च फोटो शूट झाल्यावर तुम्ही मला थोडा वेळ देऊ शकाल?" (त्यांचं हे बोलणं चालू होत तेव्हा रवी पण त्यांच्या कडे त्या काचेतून बघत होता.. )

"उम्म्म.. का बरं ?"

"ते मी ग्लास box फोडल्याचे पैसे नाही दिले तर मला at least तुम्हाला डिनर साठी invite करायचं होत.. आणि मला तुम्हाला काही सांगायचं पण आहे.. " राहुल तीच बोलणं ऐकून हसून बोलला..

"चालेल.. नक्की जाऊयात जेवायला.. " आणि नंतर थोडा विचार करून म्हणाला..

"आपण दोघेच असू ना? नाही म्हणजे तुझा तो थोरला भाऊ पण येणार नाही ना ?" मानवीनी न कळून विचारलं..

"कोण?"

"रवी सर" तशी ती थोडी हसून म्हणाली..

"नाही नाही.. त्यांना नाही बोलावलेलं.. "

"मग ठीके.. गुरुवारी कव्हर शूट झालं कि भेटूयात जेवायला.. "

त्याने अगदी असा लगेच वार पण ठरवला हे बघून मानवी खुश झाली.. आणि त्याच्या केबिन मधून बाहेर येताना तिला कंट्रोल करता येत न्हवती इतकी मोठी स्माईल होती.. तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून रवीच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या होत्या..

 

************

क्रमशः

 

************

कसे आहात सगळे? आत्ता पर्यंत ची स्टोरी आवडली का? मी बऱ्याच वाचकांच्या कंमेंट मध्ये वाचले कि ते रोज वाट पाहतात.. पण पुढचा पार्ट यायला वेळ लागतो आणि खूप जणांची प्रेमळ मागणी पण आहे कि रोज १ पार्ट पोस्ट व्हावा.. मी खरेच खूप प्रयत्न केला पण जेव्हा प्रीमियम मेम्बरशिप सुरु झाली तेव्हा मला सुद्धा त्यात भाग घ्यायचा होता.. पण मला जेव्हा रोज लिखाण करणं ते सुद्धा घर, ऑफिस सांभाळून तेव्हा ते  सगळं कुवतीच्या बाहेर जायला लागलं.. ज्या लिखाणामुळे, तुम्हा सगळ्यांच्या अभिप्रायामुळे मला लिहायचा उत्साह यायचा त्याच सर्व गोष्टींचे मला बर्डन वाटू लागले..मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीये याचा मलाच त्रास होऊ लागला.. आणि म्हणूनच मी स्टोरी वर जास्त लक्ष केंद्रित केले.. मला लिहायला उशीर झाला तरी मनासारखं लिखाण झालं कि लगेच मी तो पार्ट पोस्ट करते.. अँड ट्रस्ट मी.. मी ५ मिनिट वेळ मिळाला तरी तो लिखाणात कसा देता येईल हे पाहते.. तुमचं प्रेम आणि सपोर्ट माझ्या पाठीशी आहेच त्यामुळे च हि कथा इथवर येऊ शकली.. इथून पुढे पण तुमचं प्रेम असेच असू द्या..  

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..