Aug 18, 2022
कथामालिका

माझी मानवी... 59

Read Later
माझी मानवी... 59

विजय सरांनी नेहमी प्रमाणे जागेवरून हाक मारली..
"मानवी.. एवढे documents प्रूफ रीड करून दे.. " आणि त्यांच्या लक्षात आलं कि मानवी नाहीये आता..
काल पासून सगळ्यांचा हाच हाल होता.. आज मानवी ऑफिस मध्ये नसण्याचा दुसराच दिवस होता पण प्रत्येकाला तिची आठवण आल्या शिवाय राहत न्हवती.. स्वतःच काम करून बाकीच्यांना त्यांच्या कामात मदत करण्याचा तिचा स्वभाव आता सगळ्यांना आठवत होता.. धावून धावून ती सगळ्यांचं काम आपलं मानून करायची.. आता फॅशन डिपार्टमेंट मधल्या मुली पण उघड उघड राहुल ला शिव्या घालत होत्या..
"त्या राहुल आखडू मुळे आता आपल्याला किती जास्त काम पडतंय.. "
"हो ना.. एवढं overreact व्हायची काही गरज न्हवती या माणसाला.. "
"मग काय तर.. असं काय पहिल्यांदा झालय का? असे accident तर होत असतात.. म्हणून काय कुणी काढून टाकत का?"
"आखडू नुसता.. "
रिया तर नुसती उसासे सोडत काम करत होती.. तिला गेल्या महिनाभरात मानवीच्या गळ्यात काम मारायची इतकी सवय लागली होती कि तिला तर सगळ्यात जास्त त्रास होत होता..
त्या सगळ्यांचं बोलणं राहुल ला त्याच्या केबिन मध्ये ऐकायला येत होत पण आता त्यानेही पाहिलं होतच कि मानवी किती काम उरकायची ते.. त्याच्या इमोशन्स आणि त्याचा तिच्या प्रति असलेला पर्सनल प्रॉब्लेम एकी कडे पण काम तर तिच्यासारख करणारी व्यक्ती त्याने पण आजवर पहिली न्हवती.. आजारी पडलेली तेव्हा पण तिने सुट्टी घेतली न्हवती.. त्यामुळेच म्हणा तो सगळ्यांचं frustration समजू शकत होता.. आणि त्यामुळेच ते सगळे त्याच्या नावाने बोट मोडत होती तरी त्याने कुणाला हटकलं नाही.. रवीच्या ते लक्षात आलं होत पण तो मुद्दाम शांत होता.. आज त्याला त्याचा प्लॅन execute करायला डोकं शांत ठेवणं गरजेचं होत..

आज त्यांची टीम मीटिंग होती आणि राहुल ला सगळ्यांनी २०th anniversary साठी ची प्रोपोजल्स सबमिट केले होते त्यावर डिस्कशन होत.. त्यांच्या नेहमीच्या conference हॉल मध्ये ते नेहमी प्रमाणे आपापल्या जागी जाऊन बसले.. आजची पहिली मीटिंग असणार होती ज्यात मानवी असणार न्हवती..  राहुल सगळ्यांचे प्रोपोजल्स चेक करत होता.. ते सर्व चेक करून झाल्यावर त्याने उसासा सोडला आणि म्हणाला..
"हे एवढंच सुचलंय तुम्हाला? या अशा स्पीड नि आपण २०व्या anniversary ला काय प्रिंट करणार? यातलं काही डिसकस करण्या योग्य आहे असं तुमचं तुम्हाला तरी वाटतंय का?"
त्याने असं बोलायला सुरुवात केल्यावर जो तो मान खाली घालून आपापल्या नोटबुक मध्ये बघत बसला.. मानवीला तसं काढून टाकल्यावर सगळ्यांच्या डोक्यात नाही म्हटलं तरी थोडा राग होताच.. त्यामुळे आता तो काही बोलला तरी कुणाला काही पटण्यासारखं न्हवतंच.. सगळे गप्प बसलेले बघून त्याने पण एक उसासा सोडला.. इतक्यात रवीने एक आयडिया दिली..
"आपण फिल्म्स वर एक कन्सेप्ट बनवली तर?" आता राहुल ने वैतागून त्याला म्हटलं..
"किती वेळा त्या एका विषया वर करणार आहोत आपण? १०० वेळा हाताळलेला subject पुन्हा घ्यायचा? आणि २०th anniversary च्या special एडिशन ला पण तेच?"
"दर वेळी फिल्म च्या main लीड च्या पॉईंट ऑफ व्ह्यू नि लिहिलंय आपण.. या वेळी साईड characters च्या पॉईंट ऑफ व्ह्यू नि लिहायचं.. "
"म्हणजे?" सीमा मॅम नि विचारलं..
"फॉर example.. दिल तो पागल है ची स्टोरी मेन characters च्या ऐवजी साईड characters च्या पॉईंट ऑफ व्ह्यू नि लिहायचं.. अक्षय कुमार ऑर करिष्मा कपूर च्या पॉईंट ऑफ व्ह्यू नि लिहायचं..म्हणजे जरी सेम मूवी वर आर्टिकल्स आली असतील तरी या पॉईंट ऑफ व्ह्यू नि नसल्यामुळं ते आऊट ऑफ द बॉक्स होईल.."
सीमा मॅम ना त्याची कन्सेप्ट आवडली तसा त्यांनी त्याला thumbs up दिला.. आता प्रत्येकानेच आपापल्या पॉईंट ऑफ व्ह्यू  नि बोलायला सुरुवात केली..
"हे वर्क आऊट होऊ शकत बर का.. मला पण त्या ब्युटी अँड द बिस्ट मूवी मध्ये ती त्याच्या प्रेमात पडते हे चुकीचं वाटलं होत.. ते अगदी क्लासिक example होत stockholm syndrome च.. जर का रिअल मध्ये असं घडलं असत तर त्या गावकऱ्यांनी तिला थेरपि साठी पाठवलं असतं.. " विजय सर म्हणाले..
"हो ना.. मला पण त्या sleeping ब्युटी च्या बाबतीत तसेच वाटले होते..जेव्हा तो प्रिन्स अरोरा ला किस करतो तेव्हा ती काहीही न बोलता त्याला accept करते.. अगदी माझा लहान मुलगा पण म्हणाला होता.. 'muma it's wrong..he didn't ask for her permission..' हा एक women empowerment चा टॉपिक पण होऊ शकेल.. " feature साठी काम करणारी एक जण म्हणाली..
"आणि जरी अगदी साईड character नाही घेतलं तरी अशा पॉईंट ऑफ व्ह्यू  नि लिहिलं तर ते वेगळंच ठरेल.. म्हणजे एरियल ला जमिनीवर आल्यावर पाय मिळाले पण आता तिला स्कर्ट घालायचा असेल तर तिला शेव करावं लागणार.. now she is gonna hate her legs for it.." ब्युटी च्या पॉईंट ऑफ व्ह्यू  नि रिया ने सांगितलं.. तीच बोलणं ऐकल्यावर सगळे हसायला लागले..
प्रत्येकाच्या टॉपिक ला हि कन्सेप्ट लागू होतीये आणि आऊट ऑफ द बॉक्स पण आहे हे बघून राहुल समाधानाने म्हणाला..
"ठीके.. या कन्सेप्ट वर अजून काम करा.. कुणाला काय काय सुचतंय ते आधी बघुयात मग फायनल करू.. पण फक्त fairy tales च नकोत.. बाकी फिल्म्स चा पण विचार करा.. इंटर्न मिनिट्स ऑफ मीटिंग.. " असं बोलता बोलता तो थांबला.. सगळे त्याच्या तोंडाकडे पाहायला लागल्यावर तो म्हणाला.. "विशाल तू घेऊन ये आजचे मिनिट्स ऑफ मीटिंग.." असं बोलून तो उठला.. त्याने सगळ्यांच्या समोर जरी दाखवलं कि त्याला नाही फरक पडला मानवीच्या जाण्याचा तरी आता त्याला स्वतःलाच वाटत होत कि विशाल चे त्याला मिनिट्स ऑफ मीटिंग समजून घ्यावे लागतील पटले नाही तरी..
मीटिंग संपली तसा राहुल त्याच्या केबिन मध्ये गेला पण रवी त्याच्या मागोमाग आला.. त्याने दारावर knock केलं.. त्याला बघून राहुल थोडा अवघडला पण तरी त्याने त्याला आत यायला खुणावलं.. आत मध्ये आल्या आल्या रवीने १ डायरी त्याच्या समोर ठेवली.. ती एक जुनी डायरी होती ज्याला न्यूजपेपर च कव्हर घातलं होत.. ते बघून राहुल म्हणाला..
"हे काय आहे?"
"उघडून बघा तर.. "
राहुल नि पहिलं पान उघडलं.. त्यावर त्या डायरी च्या मालकाचं नाव लिहिलं होत.. मानवी कुलकर्णी.. तीच नाव बघितलं तशी त्याने ती बंद केली आणि म्हणाला..
"बघितलं.. मला त्यात काय आहे ते जाणून घेण्यात काही इंटरेस्ट नाहीये.. घेऊन जा.. "
"तुमच्यात अजिबातच patience नाहीत बाबा.. आतली पान पण उलटून बघा ना.. " तो तसा बोलून उभा राहिला.. राहुल ला एव्हाना माहिती झालं होत रवी काही सहजासहजी पिच्छा सोडत नाही.. त्याने एक उसासा सोडत पान उलटायला सुरुवात केली..
त्यात रवीने जे उदाहरण दिल होत 'दिल तो पागल है' च, ते तर होतच पण त्या बरोबर अशाच अनेक फिल्म्स च्या न्यूजपेपर मधल्या कट आऊट होत्या आणि तिने साईड character च्या पॉईंट ऑफ व्ह्यू  नि छोटी छोटी स्टोरी लिहिली होती.. गली बॉय ची स्टोरी श्रीकांत च्या पॉईंट ऑफ व्ह्यू  नि, jab we met ची स्टोरी अंशुमन च्या पॉईंट ऑफ व्ह्यू  नि, कभी ख़ुशी कभी गम ची स्टोरी पू च्या पॉईंट ऑफ व्ह्यू  नि..
सगळ्या त्या कन्सेप्ट वर तिने बरेच काम केले होते.. काही साईड character च्या पॉईंट ऑफ व्ह्यू  नि लिहिलेली स्टोरी फनी होती तर काही इतकी रिऍलिस्टिक होती कि खरच फिल्म मध्ये दाखवलंय तस घडलं तर माणूस असाच विचार करेल असं वाटत होत.. ते सगळं चाळून बघितल्यावर राहुल नि वर मान करून बघितलं तसा रवी म्हणाला..
"आता तुमच्या लक्षात आलं असेलच कि मीटिंग मध्ये मी सांगितलेली आयडिया माझी न्हवती छोटीची होती.. एका गैरसमजामुळे तुम्हाला खरंच योग्य वाटत का तिला काढून टाकण ?"
"एका इंटर्न साठी पहिल्यांदाच पाहतोय मी एखादी कंपनी एवढे प्रयत्न करताना.. काल माझ्या परस्पर पण तुम्ही लोकांनी तिला परत बोलवायचा प्रयत्न केला होताच ना?"
"ती आम्हाला नाही म्हटली कारण आम्ही नाही तुम्ही तिला काढून टाकलंय ..ज्या व्यक्ती ने गैरसमज करून घेतला त्याने बोलावलं तर चित्र काही वेगळं असेल ना.. "
"मग काय म्हणणं आहे तुमचं रवी सर? मी डेप्युटी एडिटर इन चीफ असून सुद्धा एका इंटर्न ची माफी मागू? काही गरज नाही.. आणि राहिला प्रश्न या कन्सेप्ट चा तर आपण दुसरी कोणती तरी कन्सेप्ट वापरू यावर काम करायची गरज नाही.. मी आत्ताच सगळ्यांना तसा मेल टाकतो हवं तर.. "
"माझा अंदाज चुकला म्हणायचा.. मला वाटलं होत तुम्ही खूपच जास्त प्रोफेशनल आहात कामाच्या बाबतीत.. पण जेव्हा तो प्रोफेशनलेजीम मानवीच्या बाबतीत दाखवायची वेळ येते तेव्हा तुम्ही इतके पर्सनल का होता?" आता रवीने त्याच्या दुखऱ्या नसेवर च बोट ठेवले.. त्याच्या अशा बोलण्यावर राहुल नि चमकून वर पाहिले..
"फक्त एवढंच विचारतो राहुल सर तुम्हाला.. जर का मानवीच्या जागी ऑफिस मधल्या दुसऱ्या कुणी हि सेम मिस्टेक केली असती तरी हि तुम्ही असेच रिऍक्ट झाला असतात? असच काढून टाकलं असतं त्या व्यक्तीला पण?"
"तुम्हाला असलं काही बोलायचं असेल रवी सर तर तुम्ही जाऊ शकता.. "
"मी जाईन पण तुमचं उत्तर ऐकून च जाईन.. असं काय आहे मानवी मध्ये कि तुम्ही तिच्या बाबतीत च असे वेगळे वागता? तुम्हाला एवढी चांगली कन्सेप्ट सोडायला प्रॉब्लेम नाही पण तिला परत आणायचं नाही.. का? कोण आहे ती तुमच्या साठी? फक्त एक एम्प्लॉयी तर नक्कीच नाही.. " आता राहुल चिडून उभा राहिला आणि म्हणाला..
"मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही.. आणि तुमचं काय हो रवी सर? तुम्ही का तिच्या मागे मागे असता कायम? तिच्या प्रत्येक बाबतीत तुम्हाला का नाक खुपसायचं असत? "

"कारण मला ती आवडते.. मला मानवी खूप जास्त आवडते.. पुरेसं आहे माझं उत्तर?" रवीच्या डोळ्यात मानवी च नाव सुद्धा घेताना आलेलं प्रेम राहुल ला खूप आतपर्यंत दुखावून गेलं तो निःशब्द तसाच उभा राहिला.. त्याला काहीही बोलता येईना हे बघून रवी त्याच्या केबिन मधून निघून गेला, मात्र जाताना तिची ती डायरी तिथेच ठेवून गेला.. आणि त्याला जाताना बघून राहुल पुन्हा मटकन त्याच्या खुर्चीत खाली बसला..


******

मानवी आज सकाळी उठल्या पासून स्नेहल चा लॅपटॉप घेऊन बसली होती.. तिने तीच जॉब हंटिंग पुन्हा चालू केलं होत.. तिला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत न्हवता तरी ती गूगल वर शोधून फोन करून माहिती घेत होती.. कुठे काही ओपनिंग आहे का बघत होती.. तिचे जोरदार प्रयत्न चालू होते..  आलेल्या प्रसंगा मुळे हात पाय गाळून न बसता धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्याची हि वृत्ती तिच्यात अवघड परिस्थितीतून जाऊन जाऊन च तर आली होती..
इकडे मानवीच्या management डिपार्टमेंट मध्ये पण मानवीला काढून टाकलं असल्याची न्यूज समजली होती.. तिच्या बरोबर लागलेल्या मुलांच्या पैकी एक जण जाऊन त्यांच्या मॅनेजर ला बोलला सुद्धा..
"सर मानवीला त्या एडिटिंग डिपार्टमेंट मधून काढून टाकलंय.. तर आता आपण तिला पुन्हा इकडे नाही का बोलावू शकत.. "
"तस नाही ना करता येणार.. तिला त्या डिपार्टमेंट ला शिफ्ट केलं तेव्हा आपण त्यांना सगळे अधिकार पण दिले ना.. मला पण फार वाईट वाटलं.. तिला काढून कशाला टाकायचं ना? पुन्हा इकडे पाठवून द्यायचं होत.. त्यात ती लोला मॅम च्या डिपार्टमेंट मध्ये होती.. तिथे तर आपलं काहीच नाही चालू शकत.. उगाच त्या लोकांनी तिला काढून टाकलं..  "
"हो ना.. काम तिच्या सारखं खरंच आपल्या कडे कुणाला नाही जमत.. "
"हो पण आता आपल्या हातात पण नाहीत ना काही गोष्टी.. "

*******

राहुलच्या केबिन मधून बाहेर पडल्यावर रवीने सरळ उरलेल्या दिवसाची leave टाकली आणि तो मानवीच्या कडे निघाला..

 

************

 

क्रमशः

 

*************

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Subhashini

Ira Blogging Writer

Let's Root for each other And watch each other GROW..