माझी मानवी... 54

A story about love, friendship, kindness and relationship

"बायको.. तुला खरंच कुणीतरी आवडायला लागलंय? really ? हां ?" मानवी excited होत विचारत होती.. आणि स्नेहल ला मात्र काय उत्तर द्यावे ते कळत न्हवते.. ती चाचरत म्हणाली..

"नाही म्हणजे तस काही नाही.. " ती हि situation कशी हॅन्डल करावी हा विचार करत होती.. इतक्यात मानवीने तिला खुश होऊन उड्या  मारत मिठी मारली आणि म्हणाली..

"यीप्पी.. मस्तच न्युज सांगितली तू यार बायको.. Congratulations माऊ.. " मानवी तिला अजूनही मिठी मारून उड्या मारत होती आणि स्नेहलचा चार मात्र सपशेल पडला होता.. तिला एवढं खुश झालेलं बघून आता तिला रडायला येत होत.. ती पण आता मानवी बरोबर कचरा टाकायला गेली आणि येताना त्या दोघी पार्क मध्ये जाऊन रात्रीच्या गार हवेला बसल्या.. ती काहीच बोलत नाहीये आणि खाली मान घालून बसलीये हे बघून मानवीनेच सुरुवात केली..

"तुला आठवतंय तू खूप वर्षांच्या पूर्वी मला एकदा म्हणाली होतीस कि, जिथे मला माझी सक्खी आई सोडून गेली तिथे मी परक्या मुलावर कशाला विश्वास ठेवेन? तो तरी काय वेगळं वागेल? त्यामुळे मी कधीच प्रेमात पडणार नाही असं अगदी ठासून सांगितलं होतस तू मला.. तुझे ते शब्द तेव्हा माझ्या काळजात घुसले होते आणि अगदी आत्ता पर्यंत मला त्याचा त्रास होत होता.. पण तो मुलगा खरंच खूप मस्त असणारे ज्याने तुला त्याच्या प्रेमात पाडलं.. हां ? तो इथे नसताना त्याच्यासाठी तू अगदी मारामारी करायला निघाली होतीस.. त्याला बक्षीस च दिल पाहिजे.. कसा आहे तो स्वभावाने? सांग ना.. मला खूप उत्सुकता लागून राहिलीये.. सांग ना.. कसा आहे तो? "

मानवी एवढं सगळं बोलत होती मात्र स्नेहल ने एकदाही मान वर करून तिच्या कडे पाहिलं न्हवत.. मानवी तिला त्याच्यावरून चिडवायला बघत होती आणि खुश होत होती याचा विचार करून तर तिला आता रडूच येत होत.. डोळ्यातलं पाणी लपवायला तिने चेहरा मानवीपासून लांब वळवला.. तशी मानवी हसून म्हणाली..

"अग्गो बाई.. लाजतीयेस कि काय? इकडे बघ.. " स्नेहल ने काही न बोलता तिच्या कडे न बघता खाली मान घालून पुन्हा चेहरा सरळ केला तशी ती म्हणाली..  

"असं वाटतंय तुला काहीतरी काळजी खातीये.. काय झालं? तुम्हा दोघांचं काही भांडण झालं का?" स्नेहल ने नकारार्थी मान हलवली तशी मानवी उठत तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाली..

"सगळं छान होणारे ग आता.. नको काही काळजी करुस.. मी आहेच काही मदत लागली तर.. ओके? पण माऊ यार.. सेलेब्रेशन तो बनती है.. मी कॉर्नर च्या शॉप मधून ice cream घेऊन येते.. " मानवी आता थोडी पळत त्या पार्क च्या exit कडे जात मागे वळून म्हणाली..

"स्नेहल.. I am sooooo happy!!!" आणि एक छोटीशी उडी मारून गेली.. मानवीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद बघून आणि तिला तसं नाचत जाताना बघून आता मात्र स्नेहल चा बांध फुटला.. ती रडत स्वतःशीच म्हणाली..

"I am so sorry मानवी.. फक्त २ महिने दे मला हे त्याच्या बरोबरचे.. हे २ महिने अनुभवू दे मला प्रेम खरंच कसं असतं ते.. मग मी स्वतःहून तुला सांगेन सगळं.. अगदी सगळं काही.. आणि त्या नंतर तू जी शिक्षा देशील ती मला मान्य असेल.. "

****

राहुल आता घरी आला होता..त्याने त्याची बॅग आणि ब्लेझर खुर्चीवर ठेवला आणि कपडे बदलायला म्हणून बेडरूम च दार उघडलं आणि रवीने अगदी प्रेमाने त्याला हाक मारत त्याच स्वागत करत म्हणाला..

"आलात तुम्ही घरी?" राहुल इतका जोरात दचकला कि घाबरून मागेच पडला.. मोठमोठ्याने श्वास घेत उभा राहत तो म्हणाला..

"कसला घाबरलो मी.. तुम्ही.. इथे.. इथे काय करताय रवी सर?" त्याची reaction बघून रवी हसून म्हणाला..

"मी? मी माझी चड्डी घ्यायला आलोय.. त्या दिवशी नाही का इथेच वाळत घालून गेलो होतो.. पण सर.. तुमच्याकडे किती छान छान जॅकेट आहेत हो.. मला पण borrow करू द्या कि कधी तरी.. " रवीच बोलणं सोडा तो त्याच्या घरात असा रात्रीचा बघूनच राहुल वैतागला होता.. तो त्याच वैतागलेल्या आवाजात म्हणाला..

"नाही.. पण रवी सर तुम्ही या वेळेला करताय काय इथे?"

"मी इथेच शेजारच्या एरिया मध्ये आलो होतो मग म्हटलं आलोच आहे तर जाता जाता माझी चड्डी पण घेऊन जावी.. "

"जेव्हा केव्हा तुम्ही मला भेटता तेव्हा काय हो चड्डी वरून सुरु होऊन जाता ? सिरिअसली रवी सर ते सगळं सोडा.. मला आधी माझ्या घराची चावी द्या.. "

रवी मात्र राहुलच्या कपाटात त्याचे कपडे बघत बसला होता.. राहुलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला..

"पण आज तुम्हांला उशीर झाला घरी यायला.. तुम्ही काय डेट वर वगैरे गेला होतात कि काय? मी अशी rumor ऐकलीये कि तुमची गर्लफ्रेंड खूप सुंदर आहे म्हणून.. " राहुल ला असं झालं होत याला कधी एकदा घराबाहेर काढतोय पण रवीला मात्र चैन न पडल्याने राहुल मानवी आणि स्नेहल दोघींना तर फिरवत नाहीये या शंकेने तो त्याच्याकडून काही निघतंय का हे बघायला आला होता.. राहुल आता वैतागत त्याला त्याच्या कपाटात उचकपचक करताना बघून म्हणाला..

"आपण एवढे close कधी पासून झालो कि मी तुम्हाला या गोष्टी पण सांगू?" पण स्नेहल बद्दल नक्की माहितीये कि मानवी म्हटलीये तसेच स्नेहल ने चालू ठेवलंय हे जाणून घ्यायला त्याने डायरेक्ट च विचारलं..

"तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंड बद्दल कितपत माहितीये?"

"काय?"

"नाही हो..मी सहजच विचारतोय कारण.. गोष्टी जशा दिसतात तशा असत नाहीत.. "

"हे बघा रवी सर.. जे काय बोलायचंय ते स्पष्ट बोला.. " तसा उसासा सोडत रवी म्हणाला..

"बोलायचं तर खूप काही आहे सर पण स्वतःला आवरतोय मी.. कारण माझं मलाच ठरवता येत नाहीये कि मला या सगळ्या मध्ये काही बोलायचा अधिकार आहे पण कि नाही.. जाऊदे.. मी आपला जातो.. गुड नाईट!"  असं म्हणून तो त्याच्या घराबाहेर पडला पण.. राहुल गोंधळून तो काय बोलला यावर च विचार करत होता इतक्यात त्याला मुख्य दरवाजा लागल्याचा आवाज पण आला.. "काय विचित्र पात्र आहे हे.. जाऊदे..जास्त विचार करायला नको.. " असं म्हणून त्याने विषय सोडून दिला.. पण रवी मात्र राहुल च्या घराबाहेर लिफ्ट च्या समोर येऊन विचार करत होता.. त्याला काय कराव तेच कळत न्हवतं.. 

******

दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस ला जायच्या आधी राहुल ने स्नेहल ला कॉल केला.. ती पण तिचा मेकअप करत करत त्याच्याशी बोलत होती.. राहुल तिला विचारत होता..

"गुड मॉर्निंग मानवी.. झोप झाली व्यवस्थित?"

"हम्म.. "

"आता फक्त मला कव्हर शूट च काम आहे.. बाकी तर मॅगझीन पण झालं release या महिन्याचं.. मग ऑफिस नंतर भेटूयात आपण? तुला आहे वेळ?"

"हो आहे ना.. आपण मूवी बघायला जाऊयात? मला १ मूवी बघायचा होता पण वेळच नाही झाला, आज त्याचा लास्ट शो आहे.. जाऊयात..? " ती काही अजून पुढे बोलणार इतक्यात मानवी "नाश्ता तयार आहे.. " म्हणत आत आली.. स्नेहल तिला बघून जोरात दचकली.. ते बघून मानवी चिडवायला म्हणाली..

"तू सकाळी सकाळी कुणाला कॉल करतीयेस? ते पण एका हाताने मेकअप करत, हां ?" स्नेहल काही न बोलता फक्त मानवी कडे डोळे मोठे करून बघत होती.. तिला reaction काय द्यावी हे पण सुधारलं नाही.. मानवीच पुढे कन्फर्म करायला खुसफुसत म्हणाली जेणेकरून फक्त स्नेहल ला कळावं.. "तोच आहे का?" स्नेहल नि नकळत होकारार्थी मान हलवली तशी मानवी दारातूनच मोठ्याने म्हणाली..  

"congratulations बरं का.. माझी मैत्रीण तुम्हाला हो म्हणाल्या बद्दल.. Let's meet all together some time.." वेगळाच आवाज ऐकला तसा राहुल म्हणाला..

"मानवी कोण आहे ग?" त्याचा आवाज ऐकला तसं भानावर येत स्नेहल ने पटकन कॉल कट केला.. तशी मानवी पुन्हा तिला चिडवायला म्हणाली..  

"का ग ? लगेच बंद का केलास कॉल? मला तर काय बोलत होतीस ते ऐकायला पण येत न्हवत बाहेर इतकी हळू बोलत होतीस.. काय बोलत होतात एवढं? ठीके ठीके.. मी नाही मध्ये नाक खुपसत चालू दे तुमचं खुसुरपूसर.. " असं म्हणून ती इच्या बेडरूम च्या बाहेर जाताना नाचत गाणं म्हणत गेली "पेहला नशा.. पेहला खुमार.. नया प्यार है.. " तिने पूर्ण दार लावल्यावर मात्र स्नेहल ने इतका वेळ रोखून धरलेला श्वास सोडला..

*****

मानवी सगळ्यांच्या बरोबर ऑफिस मध्ये कामात जुंपली होती.. काम करता करता तिच्या लक्षात आलं तिच्या एका शूजच्या सोल निघाला होता.. तो अजून पूर्ण निघाला न्हवता पण तिला त्यामुळे पाय ओढत काम करावं लागत होत.. आज घरी जायच्या आधी तो चिकटवून घेऊनच जाऊ असा तिने विचार केला.. पुढच्या महिन्याच्या एका feature साठी A and B असे दोन ऑपशन त्यांनी तयार केले होते आणि नोटबोर्ड वर लावून त्याच्या समोर ५-६ जण  जमले होते..  सगळ्यांच्या बरोबर मानवी पण त्या बोर्ड कडे बघत सगळ्यांचे opinions ऐकत होती.. सीमा मॅम म्हणत होत्या..

"Why this is so difficult?" त्यावर विजय सर लगेच म्हणाले..

"त्यात डिफिकल्ट काय आहे.. मला तर B ऑपशन च बेस्ट वाटतोय.. "

"हो का? (फॅशन डिपार्टमेंट मधल्या एकीला हात लावत त्या पुढे म्हणाल्या.. ) तुला काय वाटत?"

"मला तर choose च करता येत नाहीये.. दोन्ही छान वाटतंय.. " तीच बोलणं ऐकून विशाल म्हणाला..

"मला तर A ऑपशन जास्त बरोबर वाटतोय.. " त्याच ऐकून सीमा मॅम म्हणाल्या..

"ओके मग.. A ! पण मग B ऑपशन वाया जाईल.. आह.. " त्यांचं बोलणं ऐकून रवी पण म्हणाला..

"हो ना.. दोन्ही draft इतके छान झालेत चॉईस करणं अवघड झालंय.. " त्यांचा हा गोंधळ ऐकून त्यांच्या मागेच लोला मॅम उभ्या होत्या त्या म्हणाल्या..

"hello everyone pay attention to me for a minute..आपण एक गेम खेळुयात.. डिनर प्लॅन साठी माझ्याकडे २ ऑपशन्स आहेत A. सुशी.. आणि B. इटालियन.. तर आता गेम हा आहे कि तुम्ही सगळ्यांनी मी एकेकाकडे बोट दाखवल्यावर डोक्यात जे येईल तो पर्याय पटकन सांगायचा.. without thinking..ओके? रेडी?" असं म्हणून त्यांनी एकेकाकडे बोट दाखवायला सुरुवात केली तसे सगळे एका मागोमाग सांगू लागले.. "A.. "

 "A.. "

 "B.. "

 "A.."

"B.. "

"B.. "

 "B.. "

असं सगळ्यांचं सांगून झाल्यावर त्या म्हणाल्या.. "गुड! म्हणजे B ऑपशन तुम्ही सगळ्यांनी सिलेक्ट केला.. छान ! Never mind..I am on diet.. I can't eat either but.. now look back at the board.. आता सांगा पहिल्यांदा कोणतं design जास्त छान वाटतंय.. लक्षात ठेवा विचार नाही करायचा.. फास्ट.. "

तसे पुन्हा प्रत्येकाने एकामागोमाग A / B मधून option choose करायला सुरुवात केली.. जसे सगळ्यांचे बोलून झाले तसे त्या म्हणाल्या..

"गुड! आता Aऑपशन तुम्ही सगळ्यांनी सिलेक्ट केला.. So let's go with A! जेव्हा आपलं हृदय आणि मेंदू वेगवेगळा विचार करायला लागत तेव्हा हे hesitation येत.. म्हणायचं असत A पण म्हणतो B.. why ? कारण आपलं मन काय म्हणताय ते आपलं आपल्यालाच माहिती नसत.. त्यामुळे असा विचार करायला वेळ नाही दिला कि तुमच्या मनात जे असत ते असे अनपेक्षित पणे पुढे येत.. got माय पॉईंट?"

"येस मॅम.. " सगळे हसून बोलले..

****

मानवी सगळं काम आटोपून चालली होती तिला घरी जायच्या आधी काही शोरूम्स ना त्यांनी पाठवलेले items रिटर्न करायचे होते.. ती पाय ओढत ऑफिस च्या लॉबी मधून चाललीच होती कि मागून रवी आला.. आणि त्याने तिच्या एका हातातल्या बॅग्स चा ताबा घेतला आणि तिच्या समोर उडी मारत म्हणाला..

"ढैन-टेणां! कुठे चाललीयेस? शोरूम ला?"

"हो.. पण राहूदे सर.. मी घेते ते.. द्या इकडे.. "

"असू दे ग.. मी घेतो.. त्या पण दे बॅग्स.. "

"नको.."

"दे ग.. माझे हात बोर झालेत म्हणून देतोय त्यांना.. (तिच्या कडून सगळ्या बॅग्स काढून घेत तो पुढे म्हणाला.. ) चल जाऊयात.. "

"नको.. मी घेते.. "

"पण मला घ्यायचाय ना.. " त्या बॅग्स ना धरून त्यांच्यात ओढाओढी चालू होती इतक्यात रवीने थोडा जोर लावून ओढले त्यामुळे मानवीचा पाय पुढे आला आणि बुटाचा सोल पूर्ण वेगळा झाला.. मानवीने एकदम घाबरून खाली तिच्या पायांच्या कडे पाहिलं.. तर पायात बूट होता आणि त्याचा सोल मागेच राहिला होता.. ते बघून रवी खोखो हसत सुटला.. त्याने सगळ्या बॅग्स एका हातात घेतल्या आणि एका हातात तिचा तो सोल उचलून घेत हसू आवरत म्हणाला..

"काय ग हे मानवी? मुंबईत राहतो आपण.. क्रॉफर्ड मार्केट ला गेलीस तर हजार शूज मिळतील स्वस्तात सुद्धा.. काय अवस्था केलीयेस त्या बिचार्या शूज ची.. " मानवीला पण आता हसायला येत होत.. ती पण हसत त्या शूज कडे बघत म्हणाली..

"असुदे हो सर.. बघा ना किती दणकट आहे तो ? सोल वेगळा झाला नाहीतर, त्याने कधी त्रास नाही दिला मला.. आता मी चिटकवला ना हा सोल कि अजून १ वर्ष जाईल.. " त्याच्या हातातून तो सोल घेत ती म्हणाली..

"करशील बाई.. अजून वर्ष काय २ वर्ष काढशील.. " पण आता तिच्या समोर पाठ करत खाली बसत तो म्हणाला.. "बर चल मी आज तुला piggyback riding करवतो.. " तो तिला पाठीवरून न्यायचं म्हणतोय हे बघून ती म्हणाली.. "ठीके हो सर.. मी चालू शकतीये.. नको.. " असं म्हणून ती पुढे चालत गेली तसा तो पुन्हा तिच्या समोर जात खाली बसला.. "बस ग.. मुंबईचे रस्ते एवढे पण छान नाहीयेत.. पायात घुसायचं काहीतरी.. रात्रीचा उद्द्योग नको वाढायला.. "

"नको हो सर.. " असं म्हणत ती पुन्हा एकदा पुढे गेली..  आता तिसऱ्यांदा पुन्हा तिच्या समोर येत रवी खाली बसायला गेला आणि टर्रर्रर्रर्रर्र असा आवाज आला.. तसा त्याने पटकन मागे हात ठेवला.. आणि मानवी मात्र हसून त्याची चेष्टा करत म्हणाली..

"कसला आवाज होता? तुम्ही पादला कि काय?"

"बघ ग, मला वाटतंय पॅन्ट फाटली कि काय?" तिने वाकून बघितलं..

"अरे खरंच कि.. चांगलीच फाटलीये.. "

"आता तरी बस माझी आई.. ते लपवायला तरी piggyback ride मला देऊ दे.. माझी चड्डी दिसेल नाहीतर सगळ्यांना.. प्लीज यार.. " तो एवढा गयावया करायला लागला तशी शेवटी ती तयार झाली आणि त्याच्या पाठीवर धरून बसली..

******

इकडे स्नेहल मूवी थेटर मध्ये पोहोचली होती.. तिने आधीच तिकीट काढून ठेवले होते.. आता पॉपकॉर्न आणि coke चे २ कॅन घेऊन ती तिथल्याच एका बाकड्यावर बसून राहुल यायची वाट बघत होती.. इकडे राहुल पण ऑफिस मधून निघाला होता.. आता पार्किंग लॉट मधून तो गाडीत बसून बाहेर पडत होता..

*******

मानवीला पाठंगुळीवर घेऊन रवी निवांत हळू हळू चालत त्यांच्या कंपनी मधून बाहेर पडत होता.. मानवी त्याच्या पाठीवर बसल्यामुळे त्याच्या हातातच सगळ्या त्या बॅग्स होत्या.. काहीतरी बोलायला सुरुवात करायची तसा तो म्हणाला..  

"बॅग्स मध्ये आहे तरी काय या?"

"प्रॉप्स.. त्या २०th एनिवर्सरी च्या फोटोशूट साठी मागवल्या होत्या पण चुकीच्या पाठ्वल्यात त्यांनी.. त्यामुळे या नेवून द्यायच्यात परत त्यांना.. "

"हम्म.. बाय द वे मानवी.. तू मागच्या वेळी म्हणाली होतीस कि तू राहुल सरांना सगळं सांगून टाकणार आहेस.. अजूनही करायचा विचार आहे का तुझा ते ?"

"हो.. कव्हर शूटच्या दिवशी आमचं भेटायचं ठरलंय.. आह.. त्या दिवशी तुम्ही business ट्रिप वर मध्येच आला नसतात तर त्याच दिवशी सगळं सांगणारच होते.. सिरिअसली रवी सर.. you are no help..  " तिची तक्रार ऐकल्यावर रवी काही विचार करून म्हणाला..

"तुला तुझा बालमित्र पुन्हा भेटावा असं वाटतंय कि.. त्याहून वेगळं काही relationship असावं असं वाटतंय तुला?"

"काय?" तिला त्याला काय म्हणायचंय तेच कळालं नाही बघून अजून समजावत तो म्हणाला..

"तुला १००% फक्त त्याला एक मित्र म्हणून पाहायचंय without other feelings..? Are you sure of that?"

"well.. " असं बोलून मानवी बोलायची बंद झाली.. मघाशी ऑफिस मध्ये लोला मॅम जे बोलल्या होत्या ते तिच्या डोक्यात येत होत.. (जेव्हा आपलं हृदय आणि मेंदू वेगवेगळा विचार करायला लागत तेव्हा हे hesitation येत.. म्हणायचं असत A पण म्हणतो B.. why ? कारण आपलं मन काय म्हणताय ते आपलं आपल्यालाच माहिती नसत.. त्यामुळे असा विचार करायला वेळ नाही दिला कि तुमच्या मनात जे असत ते असे अनपेक्षित पणे पुढे येत..) मानवीलाही हे माहिती न्हवते स्वतःचे स्वतःला कि तिला राहुल फक्त मित्र म्हणून हवा आहे कि तीच पहिलं प्रेम आता actual relation मध्ये बदलायला हवा आहे.. तिच्या डोक्यात आता तेच विचार घोळत होते कि तिला नक्की हवंय काय?!

आता काही न बोलता ते चालले होते..

इतक्यात राहुल नि पार्किंग लॉट मधून गाडी बाहेर कडून कॉर्नरवर turn  केली.. त्याच्या गाडीचा स्पीड खूप कमी होता कारण ट्रॅफिक बरेच होते.. इतक्यात त्याचे लक्ष बाजूने चालणाऱ्या एका जोडप्या कडे गेले.. ते रवी-मानवी होते.. रवी ने तिला piggyback घेतले होते.. तो त्यांना क्रॉस करून पुढे चालला होता पण त्याचे लक्ष त्यांच्या कडेच होते.. त्याची गाडी सरळ चालली होती पण तो मान वाळवून त्यांच्या कडे बघण्यात गुंतला होता.. आणि जे व्हायचे न्हवते तेच झाले त्याची गाडी जेव्हा पुढच्या गाडी वर जाऊन धडकली तेव्हा त्याची तंद्री भंगली आणि त्याने पुढे पहिले.. त्याची गाडी समोरच्या कार ला जोरात धडकली होती.. तरीही त्याने एकदा मागे वळून त्यांना जाताना पाहिलेच.. समोरच्या गाडीतला माणूस त्याची मान हातात पकडून जेव्हा शिव्या देत उतरला तेव्हा राहुल ने समोर वाढून ठेवलेल्या त्याच्या उद्योगाकडे पाहिले..

इकडे स्नेहल एकटीच त्या थेटर मध्ये वाट बघत थांबली होती.. मूवी सुरु होऊन गेला तरी राहुल आला नाही.. स्नेहल बाहेरच त्याची वाट बघत राहून गेली..

************

क्रमशः

************

🎭 Series Post

View all