माझी मानवी... 58

A story about love, friendship, kindness and relationships

राहुल त्याच्या केबिन मध्ये शून्यात बसला होता.. असं किती वेळ काही काम न करता बसायचं म्हणून तो बाहेर आला..  एव्हाना सगळे खालच्या स्टुडिओ मधून वर आले होते.. आऊटफिटच फाटल्या मुळे शूट कॅन्सल च झालं होत.. ती मॉडेल तर निघून गेली पण तिला भेटायला म्हणून आलेली १ मॉडेल थोडी घाबरत घाबरत त्यांच्या ऑफिस मध्ये आली.. तिने राहुल ला त्याच्या केबिन मधून बाहेर पडताना बघितलं आणि त्याच्या जवळ येऊन म्हणाली..

" सर मघाशी मी आले होते स्टुडिओ मध्ये.. "

" तुमचं जे काही काम असेल ते फॅशन टीम ला कळवा.." असं म्हणून तो पुढे जाणार इतक्यात ती म्हणाली..

"सर.. सर तो ड्रेस मी घातला होता.. " आता राहुल जागेवर थांबला आणि वळून तिच्या कडे बघू लागला.. ती मुलगी म्हणाली..

"मी फक्त हॅलो म्हणायला आले होते आमच्या agency च्या मॉडेल ला.. पण तो ड्रेस इतका सुंदर होता कि मला राहवले नाही.. "

"नक्की काय केलंस तू?" सीमा मॅम ना आता अंदाज आला तसं त्यांनी दरडावून विचारलं.. एव्हाना सगळेच त्या मुलीच्या भोवती जमले होते.. त्या मुलीने चाचरत सांगितले..

"मी तो ड्रेस try करून बघितला आणि काढताना तो थोडा उसवला.. " इतका वेळ ऐकत असलेली बाकीची लोक तिच्यावर जवळजवळ ओरडून म्हणाली..

"काय?"

"सो सॉरी.. मी मुद्दाम नाही केलं.. पण तुम्ही माझ्यामुळे त्या मुलीला काढलं.. ते बघून मी.. " कधीही स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय काही न बोलणारी रिया उचकुन म्हणाली.. कारण तिने जर का मानवी ला तिची गाडी काढायला पाठवलं नसत तर असं झालंच नसत.. या guilt मुळे तीच मन तिला खात होत.. त्यामुळे आता तिला या मुलीचा प्रचंड राग आला होता.. ती म्हणाली ..

"ते बघून काय? ते बघून तुला सुचलं का स्वतःची चूक कबुल करायची? तुला माहिती तरी आहे का काय झालं तुझ्या त्या एका चुकीमुळे? काही एक चूक नसताना आमच्या एका एम्प्लॉयी ला काढून टाकलं.. " तीच बोलणं ऐकून आता ती मुलगी पण घाबरून रडायला आली.. पण राहुल मात्र शांत च होता.. त्याला त्याने केलेल्या या एका गोष्टीमुळे स्वतःलाच जास्त त्रास होत होता.. त्याला असं वाटत होत कि त्याचाच एक भाग त्याला सोडून गेलाय.. तो फक्त त्या मुलीला एवढंच म्हणाला..

"ठीके.. तुम्ही सांगितलंत ते.. आता तुम्ही जाऊ शकता.. " असं म्हणून तो बाहेर जाऊ लागला.. तशा सीमा मॅम त्याला अडवत म्हणाल्या..

"पण राहुल सर.. मानवी?"

"जे झालं ते झालं सीमा मॅम.. त्यावर आता चर्चा नको.. तुम्ही आता सगळे घरी जा लवकर.. मी हि आता जातो.. " असं म्हणून तो निघून गेला..

तो निघून जात असताना रवी त्याला दारात क्रॉस झाला.. त्याचा पडलेला चेहरा.. आणि आत आल्यावर एक मुलगी रडतीये आणि बाकीचे तिला खाऊ का गिळू नजरेने बघतायेत हे बघून तो विशाल जवळ आला आणि त्याने त्याला विचारले..

"काय झालं रे?"

"शूट कॅन्सल झालं.. ड्रेस फाडला त्या मुलीने.. "

"ओह्ह.. अरे बापरे..पण मग असा मूड काय आहे ऑफिस मध्ये? सगळे असे गप्प गप्प? आणि छोटी कुठे आहे? दिसत नाहीये.. "

एव्हाना सगळ्यांना माहिती झालं होत कि तो मानवीला छोटी म्हणतो.. आता विशाल ने सगळा घडलेला प्रकार त्याला सांगितला..

*****

स्नेहल राहुल ला गाडी मधून फोन करत होती पण तो उचलत न्हवता.. आता मानवीने सगळं राहुल ला सांगितलं कि काय असं वाटून आता ती अजूनच घाबरून रीडायल करत होती.. इतक्यात तिचा फोन वाजला आणि तिने कोण आहे हे न बघताच फोन उचलला आणि म्हणाली..

"केव्हाची फोन करतीये मी तुला.. फोन का नाही उचलला तू?"

"तू मला फोन करत होतीस? मला नाही आला ग मिस कॉल.." पलीकडून मानवीचा पडलेला आवाज ऐकून स्नेहल म्हटली..

"बायको.. काय झालं? तुझा आवाज असा का येतोय? काय झालं?"

"माऊ.. आय गॉट फायर्ड टुडे.. राहुल नि मला काढून टाकलं.. " तिचा रडकुंडीला आलेला आवाज ऐकून स्नेहल नि विचारलं..

"कुठं आहेस तू? "

" घरी.. "

" आलेच.. " म्हणत तिने फोन कट केला आणि अगदी जमेल तितक्या फास्ट गाडी ट्रॅफिक मधून काढत घरी आली.. तिने तिच्या चावीने घराचा दरवाजा उघडून मानवी ला हाक मारली.. तिच्याकडून काही रिस्पॉन्स येईना बघून ती तशीच घाई घाईत आत आली.. स्नेहल नि आत येऊन बघितल तर मानवी हॉल मध्ये जमिनीवर गुडघ्यात डोकं घालून बसली होती.. स्नेहल तिच्या जवळ गेली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला.. मानवीने डोकं वर केलं तसा स्नेहल ला धक्का बसला आणि तिने तिथेच जमिनीवर बसून तिला मिठी मारली.. मानवीचा रडून रडून चेहरा पूर्ण लाल झाला होता.. डोळे इतके सुजले होते कि तिला आता डोळे मिटावेच लागत होते.. स्नेहल ने मानवीला अनेक अवघड परिस्थितीत पाहिले होते पण ती अशी एवढी हतबल कधीच न्हवती झाली.. आता ती रडत न्हवती.. आता ती तशीच स्नेहल च्या मिठी मध्ये हळू आवाजात बोलत होती..

"बायको.. पुढचा मागचा काही विचार न करता काढून टाकलं ग त्यानि मला.. त्याला कामाचं टेन्शन का आहे ते माहिती होत मला आणि त्यामुळेच त्याच अंगावर खेकसण पण माहिती होत.. पण त्याला मी समोर असल्याचा पण इतका त्रास होत होता हे आज कळलं मला.. तो किती शांत पणे म्हणाला - you are fired ते पाहायला हवं होतंस तू.. मीच वेडी समजायला लागले होते कि बिझनेस ट्रिप मधला मोकळेपणा म्हणजेच तो पूर्वीचा राहुल आहे.. मी त्याला आज सगळं सांगणार पण होते.. पण त्याच्या साठी ते तस अजिबातच न्हवत हे आता कळलं.. माझी चूक आहे कि नाही हे पण त्याने पडताळून पाहिले नाही.. ऑन द स्पॉट काढून टाकलं.. मीच मूर्ख कामाशिवाय इतर गोष्टी डोक्यात घेतल्या.. "

आता तीच बोलणं ऐकून स्नेहल च्या पण डोळ्यात पाणी यायला लागलं होत.. इतक्यात तिचा फोन वाजायला लागला.. तशा दोघी एकमेकींच्या मिठीतुन वेगळ्या झाल्या आणि स्नेहल च्या फोन कडे पाहू लागल्या.. त्यावर राहुल च नाव फ्लॅश होत होतं.. ते बघून स्नेहल नि पटकन फोन बंद केला.. पण मानवी ने राहुल नाव वाचल होत.. तिने सहज विचारलं..

"कोण ग हा?" तस स्नेहल च्या डोळ्यात जमा झालेलं पाणी खाली आलं.. तिला तसं रडतना बघून मानवी ने स्वतःला सावरलं आणि तिला विचारू लागली..

"काय झालं माऊ?" पण स्नेहल च्या तोंडून शब्द फुटेना आता ती अजूनच रडायला लागली.. तिला तस रडताना बघून मानवी म्हणाली.. "ब्रेक अप झालं का? " तशी स्नेहल नि तिला मिठी मारली आणि अजूनच रडायला लागली.. आता मानवी च समजून घेत बोलू लागली..

"याच मुलासाठी भांडली होतीस का ग? याच पण नाव नेमकं राहुल होत म्हणून मला वाईट वाटेल असं वाटून सांगत न्हवती काय मला नाव? असं नको ना ग रडू.. कुठल्या मुलासाठी नको रडू.. मी पण त्याच चुका केल्या.. एखाद्या व्यक्ती ला नको इतकं महत्व दिलं.." ते शेवटचं वाक्य ऐकून मात्र स्नेहल तशीच हमसाहमशी रडत म्हणाली.." सॉरी.. सॉरी ग.. " आता मात्र मानवीने तिला तिच्या मिठीतुन बाजूला केलं आणि तिचे डोळे पुसत म्हणाली..

" ए चल आता बस कर बरं.. तू कशाला सॉरी म्हणतेस आणि.. चल डोळे पूस.. आपण काय रडायची कॉम्पेटिशन ठेवली आहे का? मी झाले कि तू? किती रडते ग.. खड्ड्यात गेली बघ हि मुलं.. तू म्हणायची तेच बरोबर होत.. मुलांना जास्त महत्वच नाही दिल पाहिजे.. त्या ऑफिस मुळे त्याचा माझा संबंध येत होता आता तो पण येणार नाही.. आता मी पण छान दुसरा जॉब बघेन.. आपलं काम भलं आणि आपण भलं बघ.. आणि तू पण नको काही लक्ष देऊ बघ तुझ्या राहुल कडे पण.. माझ्या सुंदर बायकोला रडवले..पण जर का सुधारता येण्या सारखं असेल तर.. "

मानवीच  शेवटचं वाक्य ऐकून स्नेहल ने जोरात नकारार्थी मान हलवली.. आणि म्हणाली.. "नाही.. आता बास.. "

तिचे डोळे पुसत मानवीने तिला पाण्याची बाटली दिली.. पण अजूनही तिचे हुंदके थांबत न्हवते.. आज रात्री दोघी पण तशाच उपाशी पोटी झोपी गेल्या.. 

******

राहुल त्याच्या फ्लॅट मध्ये गेल्यावर सरळ बेड वर जाऊन पडला.. त्याने कपडे पण चेंज केले नाहीत आणि त्याच्या मानवीला फोन लावला.. पण तिने कट केलेला बघून त्याने पण सुटकेचा श्वास सोडला.. आज त्याला तिला काही एक्सप्लिन करायची पण ताकद न्हवती.. त्याने तसाच फोन बाजूला ठेवला आणि थकून डोळे मिटले.. त्याच्या मिटलेल्या डोळ्यातून तरी १ अश्रू ओघळलाच .. 

*****

रवीला सगळा प्रकार कळला होता तरी त्याने मानवीला फोन केला नाही.. त्याला वाटले कि स्नेहल ने जर का मानवीला आता सांगितले असेल तर एका दिवसात तिला बरेच धक्के बसले असणार.. त्यामुळे त्याने दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये गेल्यावर सकाळी फोन करायचे ठरवले.. सगळे ऑफिस मध्ये होते आणि आपापल्या कामाला लागले होते.. तरी काल झाल्या प्रकारची एक प्रकारचे सावट अजूनही जाणवत होते.. सीमा मॅम शी रवीने आधी बोलायचे ठरवले..
"सीमा मॅम? काल जे झालं त्या बद्दल काही ठरवलंय का हो तुम्ही?"
"हम्म.. मला वाटतंय मानवीला बोलवावं.. शेवटी मी तिला या टीम मध्ये घेतलं होत.. तिला तर यायचं पण न्हवत आपल्या टीम मध्ये.. आणि जे झालं त्यात तिची काही चूक पण न्हवती.. "
"तुम्ही तिला बोलावणार आहात ?"
"हो.. मी लोला मॅम शी बोलले काल तर त्या म्हणाल्या कि त्यांनी राहुल सरांना सगळे अधिकार दिले आहेत त्यामुळे त्या मध्ये हस्तक्षेप करणार नाहीत.. पण मी माझ्या रिस्क वर तिला बोलवायचं म्हणतीये.. " त्या दोघांचं बोलणं ऐकत असलेली रिया मध्येच म्हणाली..
"पण मॅम राहुल सरांनी बोलवायला पाहिजे ना तिला ?"
"खरंय ते.. पण आता त्यांना काही सांगायचं मला बरोबर नाही वाटत.. आधी मानवीला बोलावू.. मग पुढची सगळी जबाबदारी हवं तर मी घेईन.. "
"हेच बरोबर राहील.. शेवटी मानवी येतीये कि नाही हे पण पाहिलं पाहिजे.. " विजय सरांनी मत मांडलं..

शेवटी विजय सरांचाच अंदाज खरा ठरला.. मानवीने नम्रपणे सीमा मॅम ना नकार दिला.. सगळ्यांच्या समोर रवीला पण तिच्याशी काही बोलता आलं नाही.. पण सीमा मॅम नि समजावून सांगून पण ती तिच्या मतावर ठाम राहिली.. तिच्या स्वाभिमानाला लागलेली ठेच इतक्या सहज तर भरून येणार न्हवतीच..
राहुल ने त्याच्या केबिन च्या काचा पांढऱ्या करून ठेवल्या होत्या कारण त्याला समोरच दिसणारी मानवीची रिकामी खुर्ची त्याने केलेल्या चुकीची सतत जाणीव करून देत होती.. पण त्याच्या केबिन च दार त्याने थोडं उघडच ठेवलेलं असल्यामुळे त्याला या लोकांनी मानवीला फोन केलेला आणि तिने दिलेला नकार सुद्धा ऐकायला आला होता.. सीमा मॅम नि लोकांना १० मिनटे यावर बोलू दिले पण लगेच कामाला पण लावले होते.. राहुल नि चेहरा तर कोरा ठेवला होता पण त्याला मानवीची इतकी आठवण येत होती कि त्याच्या हातून आता कामात चुका होत होत्या आणि लक्षात आल्यावर त्याचा त्या सुधारण्यातच वेळ चालला होता.. कामासाठी लोला मॅम च्या केबिन मध्ये जाताना रवीने त्याला पाहिलं आणि त्याची अजूनही चाललेली चिडचिड बघून काही निर्णय घेतला..

🎭 Series Post

View all