माझी कन्या....... बरं झालं देवा, दिली एक कन्या तिच्यामुळे मला कळाली ही दुनिया...!!! तुरू-तुरू चालताना बोलायचे तिचे पैंजण, शोभा आली घरा, तिनं फुलवले आंगण...!!! बोबडे तिचे बोल, तिचे केस भुरू-भुरू, आई बाबा आनंदून म्हणती, किती लाड तुझे करू...!!! वाढू लागली लेक, झाली माझी आई, काढू लागली चुका, म्हणे 'तुला कळत नाही'...!!! घरभर फिरत असते, खूप तिची बडबड, 'मदत करते तुला' म्हणत, करते किती गडबड...!!! येता-जाता घरात मला मारत असते मिठी, सदानकदा नाव तिचेच माझ्यासुद्धा ऒठी...!!! खरच का? ही लेक कधी जाईल ला सोडून, नुसत्या विचारानंसुद्धा कंठ येतो दाटून...!!!