Nov 23, 2020
प्रेरणादायक

माझी जाऊ

Read Later
माझी जाऊ

     नूतन ऊर्फ पूजा ही माझी लहान जाऊ ( लगेच भुवया उंचवायला नको आहेत) हल्ली जावा-जावा खूप चांगल्या मैत्रिणी असतात. पूर्वीचा तो पारंपारीक लूक बदललाय आता, जावा जावा करतात कावा????. तस बघितलं तर गणपती मध्येच आम्ही सगळे एकत्र येतो. आणि आम्ही एकूण पाच जावा खूप चांगल्या मैत्रिणी सारख्या राहतो.
     तर पूजाच लग्न माझ्या आधीच झालं होतं. आमच जेव्हा लग्न ठरल तेव्हा मी तिला बघीतलं त्यावेळी मला जरा....स हायसं वाटलं कारण तिचा आणि माझा कलर सेम होता ????. लग्न झाल्यावर आम्ही लगेच गळ्यात गळे घालून नाही बसलो. ती खूप लांब राहत होती. त्यामुळे आम्ही फक्त हाय बाय पुरतेच मर्यादित होतो. मग हळूहळू गणपतीत आम्ही भेटत होतो.
     एकदा गावाला एक विधी करायचा होता. काय तो आता आठवत नाही. पण त्यावेळी आम्हीही गावला गेलो होतो. भटजी काका सकाळी लवकर येणार होते त्यामुळे सगळ लवकर आवरण गरजेच होत. म्हणजे सगळच जेवण आणि तो विधीही. तस म्हटलं तर ही आमच्या घरातली धाकटी जाऊ पण मनाने आणि विचाराने प्रगल्भ. तर त्या दिवशीची सकाळ उजाडली आणि अलार्म वाजला सकाळी 6 am चा. मला जरा कुठे खाट खुट झालं की लगेच जाग येते. तशी मला जाग आली. पण म्हणून मला झटकन उठायची चांगली सवय अजिबात नाही. म्हणून मी डोळे उघडून वाट बघत होते की कुणाचा अलार्म वाजला. समजा माझा वाजला असता तर सगळे झोपले आहेत अस बघून मी तो बंद करुन झोपले असते. पण पूजा उठली, पाणी गरम करुन आंघोळही झाली तिची. मग तिच्या पाठोपाठ मी ही उठले आणि आवरल माझ. तेव्हा आमची मुलही खूप लहान होती. पण तिने सर्व आवरून नाश्ता बनवला आणि नंतर ही पठ्ठी जेवण बनवायच्या तयारीला सुद्धा लागली.
     मग मात्र माझ्या अवगुणात एका गुणाची भर पड्ली की सासरी आल्यानंतर थोड मोठ व्हायचं असत. आणि कर्तव्य केव्हाही श्रेष्टच.
     असाच आमचा एकदा गणपतीचा टर्न होता गावाला. सगळी  जबाबदारी माझ्याच खंद्यावर होती. ती जबाबदारी घ्यायला माझी ना नव्हती पण मला किचन सांभाळण जरा जड जात पण हे मी कुणाला सांगू शकत नव्हते. एकतर मला मालवणी पध्दतीचे जेवण नाही जमत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवण कधी केलेल नाही. पण ती आल्यानंतर तीने सरळ किचनचा ताबाच घेतला. मग मला ही जरा बर वाटल. आमची बोलचाल सुरु झाली, हळूहळू मी तिलाआणि ती मला कळू लागली. तिच्याबरोबर किचन शेअर करताना, मलाही काही गोष्टी अनुभवता आल्या. त्यातली एक म्हणजे जेवण करताना ते कंटाळून करण्यापेक्षा ते हसत हसत करावं. मग जेवण रुचकर आणि सगळ्याना आवडेल अस होत. मग मी तिच्या टिप्स फॉलो करायला लागले. आता तर मला जेवण "बर " करायला यायला लागल.
     मी तिच्याकडून मेकअप टिप्स पण घेते. ती एका नामांकीत कॉस्मेटिक कंपनीत Business Head म्हणून काम करते.
     तिच ट्युनिन्गही छान जमत सगळ्यांशी म्हणजे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत. बर ही काही नुसती उठून ऑफीसला नाही जात, तर ती घरातलं सगळ जेवण आणि तिच्या आईचं वेगळ्या चवीच जेवण बनवून जाते. एवढं सगळ करुन ती खूप आनंदात असते. कधी मी तिच्याकडून ऐकल नाही,की मी एवढ सगळ करुन दमून जाते. त्यामुळे तिच्यकडे बघितल्यावर मलाही जरा हुरुप येतो घरातल्या कामाचा आणि किचन मधला सुद्धा.माझी जाऊ ही मला मैत्रिणी सारखी वाटते. 


 

Circle Image

Sapana Nandakumar Kadrekar

Housewife

I m a law graduate.