माझी आजी....

This is a poem about my grandma

बालपणात आजी रोज माझ्याजवळ बसायची,
सुंदर सुंदर तिचे विचार बोलायची,
आजीची कमी आजही जणविते,
तिच्या सोबत घलविलेले क्षणंक्षण आठविते...
बाहेरच्या दारासमोर सायंकाळी ती बसायची,
मला खेळ खेळत असताना पाहून ती हसायची...
कामासाठी थोड थोड रागवायची,
आणि नंतर लगेच जवळ यायची...
काळजी मात्र भरपूर करायची,
रोज तिच्या कुशीतच मी झोपायची...
अशी माझी आजी आज जिथे कुठे असेल,
मला पाहून कदाचित आजही ती नक्कीच हसेल.....