माझे संसाराबद्दलचे स्वप्न अंतिम

माझे संसाराबद्दलचे स्वप्न

      माझे संसाराबद्दलचे स्वप्न भाग अंतिम                                                                            शेवटी एकदाच आमच लग्न पार पडल.पहिले चार दिवस मी त्याच्या मूळ घरी होते मी नवी नवरी असल्यामुळे कोण मला कसल्याच कामाला हात लाऊ देत नव्हता.

                                            मी किचन मध्ये जाऊन काही करायला गेले की “तिकडे गेलीस कि सगळ तुला एकटीलाच करायचं आहे ग,हे चार दिवस मिळतात आराम करायचे तर कर आराम” अशी सासूबाईंची प्रेमळ दटावणी मिळायची.खरच सासरची लोक अगदी माहेरसारखीच वाटत होती.

           नंतर आम्ही शिमल्याला फिरायला गेलो.ते आठ दिवस कसे गेले कळल सुद्धा नाही.आल्यावर मात्र माझी खूप धावपळ झाली.

          त्याच्या खोलीवर अर्ध्या गोष्टी नव्हत्याच.पहिला चहा करायला गेले तर पक्कड मिळेना.

         त्याला विचारल्यावर बोलला “पक्कड कशाला लागते,मी तर फडक्यानेच पकडतो गरम भांडी ”काय काय समान लागणार ते यादी काढली,संद्याकाळी जाऊन आणल आणि दमून भागून झोपायला गेलो.सकाळी ५ वाजता उठावाच लागणार होत.

             सकाळी जाग आली तेव्हा बघितल तर साडेसहा वाजले होते.माझी झोपच उडाली,गजर लाऊन सुद्धा मला जाग आली नव्हती.

          आज सुट्टीनंतरच्या पहिल्याच दिवशी उशीर होणार म्हणून मलाच माझा राग आला.बाजूला बघितल तर तो नव्हता.

         एवढ्या सकाळी कुठे गेला हा काय माहित अस म्हणत मी बेडरूम मधून बाहेर आले.किचनमध्ये खुडखुड ऐकू आली म्हणू तिकडे जाऊन बघते तर एका कढइत कांदेपोहे तयार होते,कणिक मळलेली होती आणि भाजी शिजत होती.

         माझी चाहूल लागली म्हणून त्याने मागे बघितल आणि बोलला “ए पोळ्या तू कर हा प्लीज,माझ्या वाकड्या-तिकड्या होतात,बाकी सगळ रेडी आहे”

      “पण तू का केलंस हे सगळ ,मी करणार होते ना” मी थोड्याश्या रागातच बोलले.

          “मला सकाळी लवकर उठायची सवय आहे ग,सकाळी पळून आलो आणि बघितल तर तू झोपलेली,म्हटलं करू मदत तुला होईल तेवढी तसही तुला लवकर जाव लागेल ना.रोज मी करत जाइन मदत तुला सकाळी,फक्त रात्री तू कर हा मला यायला जाम उशीर होतो,चालेल ना ”

        माझ्या डोळयात पाणीच आल.मी धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली.

        " माझी संसाराबद्दलची स्वप्न पूर्ण होणार हे मला पहिल्याच दिवशी कळल" .                                                            हा माझा पर्सनल अनुभव आहे कुठे आढळल्यास हा योागायोग समजावा. ॲड. श्रद्धा मगर.

🎭 Series Post

View all