माझे पाककौशल्य

(ना) आवड स्वयंपाकाची
मी चार दिवस रजा घेतेय
स्वयंपाकवाल्या मावशीने सांगताच मला 33 कोठी देव ऐका क्षणात आठवले...
दिवसा तारे दिसले...
पायाखालची जमीन सरकली...
?
जेवढ्या म्हणी शाळेत असताना पाठ नव्हत्या त्या साऱ्या आठवल्या हो...
?
अगदी नम्रतेने मी ; का ग मावशी काय झाले ?
तेवढ्याच कणखरपणे तिचे उत्तर ; काही नाही, लग्न आहे कुटुंबात
मी ; मग काही पर्यायी व्यवस्था
ती ; करून पाहिली पण नाही झाली
हे मा माताजी
काय चुकले रे देवा जी इतकी कठीण शिक्षा...?

खरी परीक्षा तर आता होती
चार दिवस घरच्यांना माझ्या खायचे आहे हेच मुळी त्यांना पचनार नव्हते
?
मावशी चार दिवस नाही रे येणार...
कायssssssssss
अरे हो...हो...काय आभाळ नाही कोसळलं
अग बाई आभाळ कोसळलं असतं ना ते तरी चाललं असतं मला
पण .........
करते मी मॅनेज,तू काळजी करू नको
मुलांचे चेहरे पाहण्यालायक होते
?

पहिला दिवस उजाडला
गुरुवार ...
महाराजांना माझ्या हातचा पिठलं भाकरी चा नैवद्य दाखवाव असे मनात आलेच होते की, माझ्या दुसऱ्या प्रामाणिक मनाने मला आठवन करून दिली की मला भाकरी अजूनही जमत नाही...
तर काय भाकरी ऐवजी पोळी करूया म्हणत मी कामाला लागली.
नी पहिल्याच प्रयत्नात विकेट पडली ?
अंगठा कापला माझा
कांदा अर्धाच कापल्या गेला पण अंगठा पूर्ण कापला होता ...
पांढरा कांदा पूर्ण लाल झाला होता.
भाजीत टाकायला म्हणून काढलेली हळद आधी अंगठ्यावर टाकली.
आता स्वयंपाक बिघडला असता तरी कुणीही मला काही बोलूच शकणार नव्हते ??यातच समाधान...

दिवस दुसरा...
मुलं लादिकपणे जवळ येत बोलले
ये मम्मा तू थकली असशील ना ग
आज फक्त पावभाजीच कर
इतका आनंद झाला ...
ती सकाळ निघाली एकदाची पावभाजी वर
रात्री चा टिफीन ताई कडून आला अन् माझं मन गार्डन गार्डन हो गया ?

दिवस तिसरा...
सकाळी मुलं क्लासला गेली अन् मी कानात हेडफोन लावून दोन लिटर दूध गॅसवर चढवून मस्त गाणे एन्जॉय करत होती...नाही...नाही...दूध अजिबात उतू गेलं नाही ??
कानात हेडफोन असूनही थेंबभर दूध सांडले नाही याचं आनंदात थोडा डान्स करूनच टाकला ?
पण...पण... माझ्या कुंडलीत आनंदाला फक्त दोन सेकंदाचीच परवानगी असते ?
तिसऱ्यांच सेकंदाला मांजरीने भांड्यात तोंड घातले होते ?
आणि भरीस भर गरम आहे म्हणून सोडूनही दिले होते
मग काय थंड केले आणि दिले तिला प्यायला.
मुलगी बोलली या चार दिवसात बघ ती तूझ्या पेक्षा गुटगुटीत दिसेल ?

दिवस चौथा...
सकाळी उठल्या उठल्या मी गरीब गाय,
चेहऱ्यावरचा ग्लो गमावून बसलेली,
आपल्याच विचारात असलेली
किचन मध्ये आलीच होती की
फोन खणानला
का ग काय करतेस
अय्या मावशी तुम्ही...??
हो येतेय मी आज
कायssssss
देव आहे हो...हो... हो...आहेच
?
अग मला वाटलं तुझी फजिती होतं असेल म्हणून लवकर आले ग
बाई ग...
समोर असतीस ना तर नक्कीच गालगुच्चे घेतले असते ?
साक्षात परमेश्वराने दर्शन घडविले होते
मुलं - नवरा माझ्या पेक्षा जास्त आनंदात उद्या मारत होते.
असो ....
मी जास्त मनावर घेतच नाही असल्या गोष्टी...

तुमचीच स्वयंपाकात (ना)आवड असलेली
©®मीनल सचिन