Jan 29, 2022
कथामालिका

Minakshi Wagatakar

Read Later
Minakshi Wagatakar
? माझे  मन तुझे झाले ?
श्रावणी रडत रडत स्वतः च्या रूममधे गेली आणि दार बंद करून घेतले....

श्राऊ दार ओपन कर.... प्लिज मला काही बोलायची संधी देणार का बाळा .....?? ओपन द डोवर श्राऊ .... अशी रडत बसणार असेल तर मी परत कधीही येणार नाही , समजलं..?


     मला काहीही एकायाचं नाही ...प्लिज जा  तुम्ही ....

    \" श्रावणी ,अजयभाऊ काय म्हणतात ते तर एकूण घे.. त्यांना तुला दुखवायचं नव्हते... 

नाही म्हणले ना मी..... जा तुम्ही....मला कुणीही नको....तुम्ही पण नको.... तुम्हाला माझी काळजी असती तर मला सोडून  तुमच्या अजयभाऊला समजावून सांगा ..... जा जा ,
सगळ्यांना वाटतं माझीचं चुक आहे...मी पण निघून जाईल ... जशी माझी आई सोडून गेली तसे तुम्हा सगळ्यांना सोडून जाते. जा... आत्या ...हम्म्म....हू...म्म..


नंदु आत्या , आणि  प्रेम , श्राऊ ला दार ओपन कर म्हणून सांगत होते पण  ...ती दार बंद करून रडत बसली होती...

नंदू आत्या आणि प्रेम   कंटाळून निघून गेले.... आणि  श्राऊ  ने मोठ्याने आई म्हणत च  रडायला लागली.... रडून रडून ती तशीच झोपी गेली...

दुसऱ्या दिवशी ती बाहेर पडली ते हातात लगेज  बॅग घेऊनच...
डायनिंग टेबलवर आत्या , डॅड , अत्याची मुलगी रिना आणि तिचा मोठा भाऊ प्रेम... तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले....

तिचा भय्या तर उठून उभा झाला...  

  श्राऊ काय आहे हे.... तु कुठे जाते...?   डॅड थोडं काही बोलले तर काय घर सोडून जाणार का....? 

भय्या , मला नाही राहायचं इथं... तू मला हॉस्टेल मध्ये सोड... माझं ॲडमिशन आत्ताच्या आत्ता तु मुंबईला ट्रान्सफर कर... मला तीकडे जायचं.... श्राऊ डोळ्यांतील अश्रू पुसत बोलत होती..

प्रेम तिच्या कडे अगतिक होऊन बघत होता....
श्राऊ त्याची लाडकी छोटी बहीण होती... काल डॅड ने तिला सगळ्यांसमोर खूप बोले होते....  त्यांनी श्राऊला कधीच मुलगी मानलं नव्हतं , ना कधी  तिच्या बद्दल कुठलीही आपुलकी,  जिव्हाळा नव्हता ,  काल तीच्या बर्थ डे पार्टी मध्ये त्यांच्या बिझनेस पार्टनरच्या मुलाने तिच्या सोबत मिस बिहेवियर केले आणि तिने चिडून त्याच्या कानाखाली वाजवली...

तीचं काहीही न एकूण घेता डॅडने चांगलच फैलावर घेतलं होतं आणि तिला त्या मुलाला सॉरी बोलायला सांगितले होतं ..
श्राऊने ,  डोळ्यांतील पाणी डोळ्या आड दाबुन ठेवले... आणि   त्या बेशरम मुलाला सॉरी बोलली आणि  ती धावत तिच्या रूम मधे निघून गेली.. नंदू आत्या तिला समजावण्या साठी तिच्या पाठोपाठ तिच्या बेडरूम पर्यंत गेल्या... तिचा भय्या पण गेला ...पण ती दार बंद करून रडत बसली होती..

श्राऊ ही आपल्या स्टोरीची नायिका...  श्रावणी  सरपोतदार.
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अजय सरपोतदार यांची एकुलती एक मुलगी..

आई  मिरा , ती लाहन असताना देवाघरी गेली...‌ आणि त्या नंतर तीची आई तीचा भय्याचं झाला.... तिच्यासाठी काय पण करु शकतो... तिनं बोलल्या बरोबर तीला घेऊन मुंबईला आला..
ती BSC फस्ट इयर मधे आहे....आणि तिचं RD कॉलेज मध्ये ॲडमिशन घेतले आणि तिला त्याच एरियात छान असा  एक लक्झिरि 1BHK फ्लॅट खरेदी केला आणि  ती आणि तिची मैत्रिण पायल या दोघी मिळून तिथं  राहनार  होत्या.... उद्या पासून तिचं कॉलेज सुरू होणार होतं आणि तिचा भय्या तिला सोडून पुण्याला निघून गेला....
????????????????अर्णव ,,‌‌ उठ बाळा....  किती वेळ झोपणार आहेस....?
8 वाजलेत....

अर्णव ने  किलकिले करून डोळे उघडले आणि परत झोपी गेला...

मॉम ने मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि ऊठ बाळा ...असं प्रेमानं आवाज दिला...
अर्णव पण गुड बॉय सारखं लवकर उठून फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये शिरला...


हा आहे अर्णव केशव पाटील.... या स्टोरीचा. हिरो...


मॉम टेबलवर नाष्टा लावत होत्या , पप्पा पेपर वाचत होते... 

श्वेता ,,, चल नाष्टा तयार झाला... कॉलेज आहे आज.... विसरलात का सगळेच...?


श्वेता त्यांची मुलगी... कॉलेजमधे लास्ट इयर  होतं तिचं.. 
ती अर्णवची छोटी बहीण  ,  त्यांच्यासोबत कॉलेजला जाते आणि येते वेळी छोटा भाऊ प्रणव याच्या बाईकवर येते...

पप्पांनी पेपरमधून डोकं बाहेर काढले आणि त्यांच्या पत्नीला आवाज दिला.... 
दामिनी ,, आज मला काही मिळेल का.... खायला...?

  मॉम तर चिडून पप्पांना पाहू लागली... , मी किती वेळा पासून नाष्टा काढून ठेवला... तुम्ही सर्वजण मिळून माझा जीव का खाता..?   
भूक लागली असेल तर खा नाहीतर जा तसेच , माझं काही आडणार नाही....
मॉम रागात उठल्या आणि किचनमधे गेल्या.... अर्णव ला माहीत आहे... तिची चीड चीड का होतोय.... 

अर्णव -- मॉम... सॉरी.... अशी चिडून नको ना जाऊ...! काय झालं ते सांग...?

मॉम -- अर्णव आता मी एकटी हे घर नाही सांभाळू शकत , मला तू सूनबाई घेऊन ये..

श्वेता --. तू काळजीचं करू नको मॉम .. आमच्या कॉलेजमधल्या मुली तर फिदा आहेत भाई वर...

अर्णव -- श्वेत.....  अभ्यासाकडे लक्ष दे... फालतू गोष्टीकडे दुर्लक्ष करत जा... समजलं...


श्वेता --- सॉरी भाई.....  पण तू अख्या कॉलेजमधल्या मुलीचा क्रश आहेस..... 

मॉम --- हो का... बरं झालं... श्वेता तू एक एक जणींना घरी घेऊन ये ... मी त्यातलीच  एकांधी  त्याच्या साठी निवडेल...


   अर्णव --- मॉम , स्टॉप यार....काय तू सकाळी सकाळी सुरू होतेस... घरांत एक सोडून तीन तीन काम करायला माणसं आहेत...तरी पण तुला सून हवी...  तू उद्यापासून काहीही करायचं नाही... मी दुसरी एखादी मेड अरेंज करतो.. ok.. आता डोक्यातून लग्न हा विषय तूर्तास तरी बाजूला राहू दे....

पप्पा --- अर्णव , बाळा माझी आज महत्वाची मिटिंग आहे...  आज मी पूर्ण दिवस ऑफिसमधे येणार नाही... तू तुझं लेक्चर झाल्यानंतर ऑफिसला जा... तिकडे  चार वाजता... गेस्ट येणार आहेत.... तू हँडल  करशील ना...

अर्णव --- don't worry पप्पा , मी सगळं मॅनेज करतो... 
मॉम माझं झालं मी निघतोय... मी कॉलेज नंतर ऑफिसला जाईल
तू माझी अजिबात काळजी करू नको... 

मॉम -- हो जा.... आणि धावपळ कमी कर अर्णव..... आणि रात्री उशिरापर्यंत थांबू नको लवकर निघ....

अर्णव ---   मॉम , तू माझी नको काळजी करू....तुझ्या  लाडका प्रणवला सांग लवकर उठायला.... 9 वाजलेत पण अजूनही पत्ता नाही साहेबांचा ...
मॉम,  कॉलेज साडे नऊ वाजता आहे पण त्याला त्यांचं काही नाही... उशीर झाला तर मी आत घेणार  नाही आत्ताच सांगून ठेवतो....

  प्रणव  ---  गुड मॉर्निंग ब्रो अँड,   माय स्वीट मॉम... चल मला लवकरात लवकर नाष्टा दे ... खूप भूक लागली...


श्वेता --  हो दे दे... मोठ्या लढाईवर जातोय.... यायचं सगळ्यांच्या उशिरा आणि मग घाई करायची....

प्रणव -- दी.... तू माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा,, तुझ्या मेकपवर लक्ष दे.... आणि मी कॉलेज नंतर स्टुडीओ मधे जातोय.... तू कसं यायचं  ते तुझं तू बघ....

श्वेता -- मॉम ,पप्पा बघितलं....? यांच्या दोघांकडे गाडी आहे... मला पण स्कुटी हवी.... नाहीतर मी कॉलेजला जाणार नाही..

मॉम नाष्टा कर असे डोळ्यांनीच दटावले आणि सगळ्यांनी शांतपणे नाष्टा केला...

पप्पा --- श्वेता.... तुला गाडी कधी मिळणार नाही असं म्हणलं का... तुला नीट चालवता येत नाही आणि तू अशी अपंग... 

श्वेताच्या डोळ्यात पाणी दाटून आलं आणि ती तिची बॅग घेऊन बाहेर निघून गेली....

पप्पांना तर समजलंच नाही की त्यांनी श्वेताला नकळतपणे दुखावलं... मॉम आणि अर्णव , प्रणव पप्पाकडे रागाने बघू लागले...

पप्पा -- सॉरी.... मला तसं नव्हतं म्हणायचं... सॉरी अर्णव बाळा...

मॉम --- आम्हला नका श्वेताला म्हणा....  ती  किती दुखावली असेल याची काही चाड आहे का...? शी.... 
सोन्यासारखी सुंदर मुलगी.... थोडं हाताने अपंग आहे.... बाकी नाव ठेवायला जागा नाही... एवढी गुणी पोर पण तुम्हाला त्यांचं काही नाही... 

कुणी घेऊन जाऊ नका... मी घेऊन जाईल .... 

प्रणव ---कुणी घेऊन जाऊ नका... मी घेऊन जाईल .... मॉम ... मी घेऊन येईल तिला... don't worry ,

श्वेता अर्णवच्या  गाडीत बसून कॉलेज मध्ये गेली....

तिकडे श्राऊ आणि तिची मैत्रीण पायल.... कॉलेजमध्ये आल्या....
श्राऊ ने व्हाईट ड्रेस परिधान केला होता... आणि त्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती....  तिच्या भय्याने त्यांच्यासाठी मर्सिडिज बेंज कार पार्किंग मध्ये ठेवली होती... पण मॅडमला स्कुटिवर कॉलेजमध्ये जायची इच्छा झाली... 
पायलच्या ऍक्टिव्हा वर बसून दोघीही कॉलेजच्या गेट पर्यंत आल्या... पावसाचे दिवस आल्यामुळे.... जागोजाग डबकी साचलेली होती.... 

पायल स्कुटी पार्क करण्यासाठी निघून गेली.... आणि श्राऊ त्या  भल्यामोठ्या बिल्डिंग समोर उभी राहून बघत होती.... आणि अचानक एक गाडी सुसाट वेगाने तिच्या अगदी जवळून गेली...आणि तिचा तो व्हाईट ड्रेस सगळा चिखलाने माखला...
जोरदार शिवी तिने तोंडातून हासडली आणि स्वतः ला भरलेलं बघून तिला , त्या गाडीचा भयंकर राग आला....

पहिल्याच दिवशी असल्या अवतारात कॉलेज मध्ये जावं लागेल असं तिला वाटलं नव्हतं... मनातल्या मनातच ती त्या गाडीवल्याला शिव्या देत होती.... गाडीचा नंबर डोक्यात फिट करून घेतला....

पायल --  काय गं कशी काय भिजली ...?  चल आपण घरी जाऊयात...


श्राऊ --- नको पायल तु जा क्लास मध्ये , मी चेंज करुन  लवकरच येते...

ती चरफडत स्वतःशीच पुटपुटत घरी आली...

ड्रेस चेंज करुन परत आली.... पार्किंग मध्ये तिला ती गाडी दिसली आणि तीचा राग उफाळून आला आणि कूंडितील माती घेतली आणि त्याच्या गाडीच्या काचेवर  bloody fool .. असं रेखाटलं आणि तिच्या मनाला शांती लाभली आणि हसत ती क्लासच्या दिशेने निघाली.....

अर्णव चे लेक्चर म्हणलं की क्लास खचाखच भरलेल्या होता.... 
त्याला क्लासमध्ये उशिरा आलेलं अजिबात चालत नाही.... तो केमिस्ट्री हा विषय खूप मन लाऊन शिकवतो.... एव्हढा हार्ड विषय पण तो शिकवताना..... मंत्र मुग्ध होउन शिकवतो... आणि स्टुडंट्स पण मन लाऊन शिकत होती.... 

श्राऊ नवीन होती त्यामुळे तिला , अर्णव सर बद्दल काहीही माहीत नसल्याने ती क्लास समोर उभी राहिली..... 

मे आय कम इन सर..... तसा पूर्ण क्लास श्राऊ कडे त्रासिक चेहऱ्याने बघू लागला....

अर्णव --- नो ..... यू आर लेट ....  असं म्हणून तिच्याकडे  दुर्लक्ष केले आणि आपल्या शिकवणी मधे मश्गूल झाला....

श्राऊचा तर मुडचं खराब झाला... 

शीट यार आजचा दिवसचं खराब आहे....हे सगळं झालं त्या गाडीवाल्या मुळे झालं... भेटु दे त्याला चांगली अद्दल घडवते...

ती बाहेर गार्डनमध्ये जाऊन बसली.... तिच्या मागे थोड्या अंतरावर श्वेता बसली होती.... 

श्वेताने तिला सकळी बघितले होतं.... तिच्या अंगावर पाणी उडालं म्हणून तिने भाईला सांगितलं होतं पण त्याने तिचीच चूक आहे असं बोलून श्वेताला गप्प केले आणि तो स्टाफच्या  दिशेने निघून गेला...

श्वेताला त्या मुलीचां ड्रेस खराब झाला म्हणून वाईट वाटत होतं... आता तिला श्राऊ. दिसली आणि तीला माफी मागावी असं श्वेता च्या मनात आलं....

श्वेता -- -excuse me ,, 

श्राऊ ने तीच्या कडे बघितलं.....

श्वेता -- ,. ते सकाळी ,, तुझ्या अंगावर पाणी उडालं त्याबद्दल सॉरी... 


श्रााऊ --  म्हणजे ती तुझी गाडी होती.....??

श्वेता -- माझी म्हणजे , माझा भाई गाडी चालवत होता.... आणि चुकून ते तुझ्या अंगावर आलं... सॉरी प्लिज ...

श्वेता कान पकडून सॉरी म्हणत होती... आणि श्राऊचा राग भुर्रकन निघून गेला....

श्राऊ --- hii ,  मी श्रावनी सरपोतदार....FY ला आहे....


श्वेता --- , hii मी श्वेता पाटील.... TY ला आहे.... 
मग तू लेक्चर बंक करून इकडं काय करतेस....??

श्राऊ ने सकाळ पासून तिच्या सोबत काय काय झालं आणि आता उशीर झाला म्हणून सरांनी येऊ दिलं नाही...इथं पर्यंत सांगितलं...
दोघी मस्त पैकी गप्पा मारत बसल्या ..काही वेळात दोघींची छान मैत्रि झाली..बघुया...यांची मैत्री काय रंग भरते ते...नेक्स्ट पार्ट मधे....


क्रमशः


क्रमशः


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now