#fathers_day #अलक #माझे बाबा

छोट्याशा कारणावरून वडील रागवले, रागाने शरद शहरात निघुन गेला, त्याला नौकरी करायची होती, घरची चांगली शेती असून त्याला शहराच आकर्षण होत, हेच कारण होत त्यांच्या वादाच, शहरात चांगली नोकरी लागली नाही, खूप हाल झाले जेवणाचे, रहायचे, घरची खूप आठवण यायला लागली, तशी त्यांने गावाकडची वाट धरली


1 बाबा एक आधारस्तंभ

छोट्याशा कारणावरून वडील रागवले, रागाने शरद शहरात निघुन गेला, त्याला नौकरी करायची होती, घरची चांगली शेती असून त्याला शहराच आकर्षण होत, हेच कारण होत त्यांच्या वादाच, शहरात चांगली नोकरी लागली नाही, खूप हाल झाले जेवणाचे, रहायचे, घरची खूप आठवण यायला लागली, तशी त्यांने गावाकडची वाट धरली

वडिलांच्या छत्रछायेखाली आपण किती सुरक्षित आहेत याचा त्याला प्रत्त्यय आला
___________________________________________
2 - बाबा सासरे -

मायाला सासुबाई नव्हत्या, लग्नानंतर सासर्‍यांनी खूप सांभाळून घेतल, कधी काहीही बोलले नाहीत ते, काहीही त्रास नव्हता त्यांचा, सुरुवातीला खूप चुका व्हायच्या मायाकडून स्वयंपाकात, बाबा नेहमी सांभाळून घ्यायचे, स्वतः उठून भाजी नीट करून आणायचे, सध्या अर्धांग वायूने बाबांना उठता-बसता येत नाही, एखादी मुलगी करणार नाही तेवढी सेवा माया बाबांची करते, त्यांची आवडनिवड जपते,

बाबांनी आधी मायाला सांभाळल, आता माया बाबांना सांभाळते,
___________________________________________
3 हळवा बाबा

ऑफिस मध्ये 500 लोकांचा बॉस असलेला रमेश आज आभा उशीर घरी आली तर घाबरून गेला होता, तू पण ना डॅडी मी सांगितला होत क्लास उशिरा सुटणार, तू मेसेज बघत जा, म्हणून आभाने डॅडीचे डोळे पुसले, रमाची ही एक आठवण आहे माझ्याकडे, जपू दे प्राण पणाने,

बाहेरच्या जगासाठी कठोर बॉस बाबा घरात आई सारखी लेकीची काळजी घेतो, प्रसंगी हळवा होतो
___________________________________________4 - कठोर बाबा

परीक्षा जवळ आली होती, सात वाजले तरी सोहम उठला नव्हता, वडील चिडले होते, नको नको ते बोलले सोहमला, तेवढ्यात आजी आली बाहेर, अरे सोहमला का बोलतो आहेस, तो रात्र भर अभ्यास करत होता, मला सांगून झोपला , सोहम रागाने आत निघून गेला, बाबा ऑफिसला गेले, संध्याकाळी बरोबर येतांना सोहमची आवडती कचोरी घेवून आले, काही न बोलता स्वतः जावून लाडक्या लेकाला कचोरी देवून आले, आजीच्या चेहऱ्यावर हास्य होते

बाबांच्या कठोर वागणूकी आड मुलाच्या चांगल्या भविष्याची काळजी दडलेली असते
__________________________________________
5 - म्हातारपणीचा छोटासा बाबा

अजून का आला नाही शशी तू ऑफिसहून? जिन्यातच आहे मी बाबा, किती काळजी करणार, शशी आत आला तसे बाबा फुलले, दिवस भर काय झाल एक एक गोष्ट त्याला सांगू लागेल , जसा मी लहानपणी सांगायचो बाबांना तस..... शशी बाबांचे म्हणणं नीट ऐकून घेत होता त्यांना वेळ देत होता, बाबा कंटाळून जातात दिवसभर घरी एकटे हे तो जाणून होता

किती सुरेख मन जपून होता तो आपल्या बाबांच, बाबानी आधी त्याला जपल... आता तो बाबांना जपतो आहे

___________________________________________
6- नविन बाबा

शाम एकटाच वडलांच्या फोटो समोर उभा होता, आई बद्दल त्याला तक्रार होती, वडील लहाणपणी वारले होते त्याचे, मागच्या आठवड्यात आईने ऑफिस मधील काकांशी लग्न जमवलं होत, तेव्हा पासुन श्याम नाराज होता, आजी बघ आई कशी वागते, का तिला जगण्याचा हक्क नाही का? आजीने समजावल, आईच लग्न झाल, नवीन बाबा खुप चांगले होते ते श्यामसाठी काहीही करायला तयार होते, त्यांच कुटुंब पूर्ण झाल होत, आईचा निर्णय बरोबर होता, श्याम ही खुश होता.. love you बाबा

नवीन बाबानी हवा तो आधार दिला होता
___________________________________________
7 - मी आहे बेटा ,

आज शाळेत सत्कार समारंभ होता, बाबा का नाही आले अजून? नेहमी असच करतात बाबा, प्रीती कुरकुरत होती, ती... आई पोहचली कार्यक्रमाला, बाबा आले नव्हते, कार्यक्रम सुरू झाला प्रीतीच्या नावाचा पुकारा झाला, समोर बघते तर बाबा उभे, एकदम डोळ्यात पाणी आले तिच्या आणि बाबांच्या

तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस बेटा, तुला कधीही काही लागलं की मी हजर असेल, प्रीती अश्वस्थ्य होवुन बक्षीस घ्यायला गेली
___________________________________________
8 - कर्तव्य समजलेला बाबा .

पप्पा माझी वही संपली आहे आणि एक पुस्तक ही हव आहे, आणतो आज म्हणुन राघू कामावर गेला, संध्याकाळी पैसे मिळाले, खर तर त्याला चप्पल घ्यायची होती लेदरची, बरेच दिवस झाले त्याने बघून ठेवली होती, पूर्वी कधीही त्याने स्वतःच्या आवडीनिवडी वर तडजोड केली नव्हती, अर्ध्या पैसातूंन शाळेच सामान घेतल, साधीशी चप्पल घेवून रघू घरी आला

आज त्याच्या आवडी निवडी वर एका बापाने मात केली होती
___________________________________________
9 - हळवा झालेला बाबा

लग्न होवुन राधा सासरी गेली, घरी तो बायको तिच्या घरचे, त्याच्या घरचे उरले, रात्र भर त्याचा डोळा लागला नाही, सकाळी उठून आधी तिच्या वडिलांचे पाय धरले, बाबा मी चुकलो माफ करा, बायको शालिनीला माहेरी पाठवत नव्हतो मी, तुमच्या मनाला तेव्हा काय यातना झाल्या असतिल हे आता मला समजतंय

एक बाबा दुसर्‍या बाबाची माफी मागत होता, एका बाबा या परिस्तिथी तून गेले होते, एक जाणार होते, दोघांची मनस्थिती सारखी होती
___________________________________________
10 - उशिरा घरी येणारा बाबा -

झोपरे जावून अभी आता उशीर झाला, नाही बाबा येतीलच आता , मी झोपणार नाही, मला आज बाबांशी खेळायचा आहे, मी महत्वाचा की ऑफिस काम आज मी विचारणार आहे त्यांना, बोलता बोलता अभी सोफ्यावर आडवा झाला, बाबा आले अभीला पांघरुन दिल, डोक्यावरून हात फिरवला, आज ही उशीर झाला? आई विचारात होती, हो काम खूप होत, अभिच्या पुढच्या शिक्षणासाठी भविष्यासाठी मला हे श्रम करावे लागतील, अभी गुपचुप ऐकत होता, उठून त्यांने बाबांना मिठी मारली, रविवारी पिकनिक हा चॅम्प... बाबांनी आश्वासन दिल

मुलांच भविष्य उज्वल होण्यासाठी बाबा जास्तीच काम करत असतो