Feb 25, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

माझा सांताक्लॉज

Read Later
माझा सांताक्लॉज

गोष्ट छोटी डोंगराएव्हढी 


सॅन्टाक्लॉज,


               सॅन्टाक्लॉज म्हटला की लाल कपडे घातलेला, डोक्यावर लाल टोपी घातलेली, खांद्यावर खुप सारे गिफ्ट असलेली झोळी घेतलेला, भलीमोठी पांढरीशुभ्र दाढी असलेला, हसत हसत सगळ्यांना गिफ्ट देणारा..  हा असाच सॅंटा सगळ्यांच्या डोळ्यासमोर येत असतो.
   
        पण माझा सॅन्टाक्लॉज म्हणजे माझे पप्पा होते, जे न सांगता ही सगळे काही करायचे आमच्यासाठी. जी गोष्ट आम्हांला हवी असायची त्याआधीच ती पुढे आणून ठेवलेली असायची. आमच्या सगळ्या ईच्छा, गरजा ते वेळोवेळी पुरे करणारे माझे पप्पा.
        
          असे तर सगळ्यांचेच पप्पा करतात आपल्या लेकरांसाठी. आपल्या मुलांचे लाड करणे, त्यांचे हट्ट पुरवणे, खाऊ आणणे आणि अजून बरेच काही न सांगता न थकता बाप नावाचा माणूस आनंदाने आपल्या मुलांकरता करत असतो. खरा सॅन्टाक्लॉज तर तोच असतो, जो आपल्या मुलांच्या एका क्षणाच्या सुखासाठी नाही तर आयुष्यभराच्या सुखासाठी झटत असतो आणि एक काय अशा खुपसाऱ्या ईच्छा तो पूर्ण करत असतो.
       

      २५ डिसेंबर म्हणजे ख्रिसमस, येशूचा जन्मदिवस. हा सण पूर्ण जगभर साजरा केला जातो आणि त्याच दिवशी आमच्या पप्पांचा ही वाढदिवस असतो, आम्ही तर खुप खुश होऊन आनंदाने साजरा करायचो. लहान होतो तेव्हा तर आम्ही भाऊ बहीण मिळून आमच्याकडचे सगळे जमा केलेले पैसे एकत्र करून छोटासा छानसा केक घेऊन यायचो आणि पप्पांना सरप्राइज द्यायचो. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्ही पण खुप खुश व्हायचो.

पप्पांना आम्ही सगळे मिळून केक भरवायचो, या प्लॅन मधे आमची आई पण सामील असायची त्यामुळे जास्तच आनंद व्हायचा. मग आम्ही सगळे मिळून केक आधी पप्पां ना भरवायचो आणि मग आम्हीच पूर्ण फस्त करायचो. मग पप्पा लाडात म्हणायचे की माझा वाढदिवस आपणच काय संपूर्ण जग साजरा करते. खरचं पप्पा तुमचा वाढदिवस आम्ही अजूनही तुमच्या आठवणीत साजरा करतो पण हे सगळे बघायला तुम्ही हवे होतात पप्पा आता आमच्याजवळ.
            माझे पप्पा आता या जगात नाहीत पण, आमच्या मनात ते कायम आहेत आमचे सांताक्लॉज बनून.


तुमच्या असंख्य आठवणी आहेत आमच्यासोबत, त्यातच आम्ही तुम्हांला शोधत असतो. तुम्ही दिलेले संस्कार, शीस्त, हळवे मन, तुमचं आमच्यावर असलेलं अतोनात प्रेम.. हेच आमच्यासाठी मोठं गिफ्ट होत.

            आज आमच्या मुलांना तुमच्याबद्दलच्या सगळ्या आठवणी सांगून मन हळवं होतं, तुमच्या आठवणी देखील आमच्यासाठी मौल्यवान आहे. अडलेल्या नडलेल्या प्रत्येकासाठी मदतीचा हात देणे म्हणजे तो त्यांचा खरा सांताक्लॉज असतो हे तुम्हीच तर शिकवलंय आम्हांला.

कधी कधी आठवणी इतक्या हावी होतात मनावर की सहन होत नाही. आज तुम्ही हवे होता पप्पा आमच्यासोबत, अस खूप प्रकर्षाने वाटते. पण स्वतःच्या मनाला आम्ही असेच म्हणून समजावतो की कदाचित त्या देवालाही तुमची गरज पडली असावी आणि तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा सांताक्लॉज बनून गेला असाल.

तुमचा हा वारसा आम्ही सगळे अजूनही चालवतोय, तुमच्याच आठवणीत. आपण आपल्यासाठी सांताक्लॉजची वाट न बघता स्वतः कोणासाठी तरी सांताक्लॉज बनून जाणं हे खूप सुखावणार आहे.

खुप आठवण येतेय तुमची, पुन्हा कधी याल का हो भेटायला आम्हांला, तोच आमचा नेहेमीचा सॅन्टाक्लॉज बनून!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Trupti Koshti

मांजर प्रेमी ? पुस्तक प्रेमी ? आणि लिहायला थोडंफार जमत ✍️

//