#Father's Day#अलक

Maza Ladka Baba

१)


बाबा, बाबा जागा हो तिची आर्त हाक.. मला भूक लागली काहीतरी खायला दे ना!
दारूच्या नशेत धूर्त झालेला सखाराम मुलीच्या पोटातील आग समजू शकत नव्हता.
आईविना पोर... मात्र आपल्याच धुंदीत. तो बाप त्या मुलीची कधीच नाही होऊ शकणार नाही काय ?

----------------------------------
२ )
गंगाराम आज खूप आनंदात होता. त्याच्या मुलीसाठी तो बाजारात चालला होता पाटी-पेन्सिल आणण्यासाठी.
आपण अशी अशिक्षित राहिलो. पण, आपल्या लेकराने खूप शिकावं‌ . खूप मोठं व्हावं. अशी अपेक्षा करणारा एक बाप म्हणून आपल्या लेकीचं उज्वल भविष्य लिहिणारा.

----------------------------------
३)
किरण खूप आनंदात होता त्याची बायको साधना तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. परंतु , योगायोगानं एकीकडे आनंद तर दुसरीकडे दुःख झाले होते . त्याची पत्नी साधना त्याला सोडून गेली होती. एक बाप आपल्या डबडबलेल्या डोळ्याने आपल्या नवजात बाळाचा सांभाळ करण्यासाठी तयार होतो. त्याच्यावर प्रेमाची उधळण करतो.

---------------------------------

४)
निखिल आज डॉक्टर झाला होता. गावातील एकमेव डॉक्टर म्हणून संपूर्ण गावाने त्याचा सन्मान करायचे ठरवले. स्टेजवर जाताच त्याने त्याच्या वडिलांना म्हणजे सखारामला देखील बोलावले. त्यांच्यामुळे मी आज डॉक्टर झालो हे सर्वांसमोर सांगितले. निखिलने त्याच्या बाबांना एक घट्ट मिठी मारली. त्याचे कौतुक बघून सखाराम चे डोळे पाणावले.

----------------------------------

५)
नरेश ना करो ना मुळे वर फ्रॉम होम सुरू झाले. मुलांसोबत कधीही वेळ घालवायला मिळणारा नरेश ला आता वेळच वेळ होता. असलेल्या कामातूनही वेळ काढून तो मुलांसोबत खो-खो लगोरी ,आट्यापाट्या, चंपुल पाणी अशा विविध खेळांमध्ये तो मुलांसोबत मूल होऊन खेळू लागला.

----------------------------------
६)
सासरी गेलेल्या आपल्या मुलीला राधाला राजेश मिस करत होता. फक्त एकच दिवस झाला होता . तरीही त्याने ताबडतोब फोन लावला. तर देखील 24 वर्ष फुलाप्रमाणे जपलेली आपले मनु एका क्षणात बापासाठी परकी झाली होती. डोळे पुसत जागेपणी स्वप्न पाहू लागला. तर खरोखरच राधा त्याच्या शेजारी बसलेली होती.

----------------------------------
७)
कोरोनामुळे जवळजवळ दोन वर्षापासून गावाची जत्रा बंद होती. पण , गौरी ची खेळण्याची हौस तेही जत्रेत फिरून काहीतरी विकत घेण्याची मजा सगळं विसरली होती‌ . हिरमुसलेल्या त्यामुळे त्यांनी आणि तिच्यासाठी बाजारातून एक छानशी बाहुली विकत घेऊन आले. बाहुली बघताच गौरी चा आनंद गगनात मावेनासा झाला ‌.

----------------------------------
८)
कोरोना काळात व्यवसायाने डॉक्टर असलेल्या संकेत ची निस्वार्थ सेवा व समाजाप्रती असलेले ऋण भेटताना पाहून केलेल्या संस्काराचे फलित झाल्याचने वडिलांना आनंद झाला. मुलाचे कार्य पाहून बाप गदगद झाला . असाच पुत्र प्रत्येक घरात जन्मावा अशी मनोमन प्रार्थना देवाजवळ करू लागला.
----------------------------------
९)
सक्षम ला परीक्षेत मिळालेले घवघवीत यश पाहून डोळे आनंदाने पाणावले. आपल्या मुलाने घेतलेली उत्तुंग भरारी पाहून वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला. "पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा " याचा समोरासमोर प्रत्यय आला.

----------------------------------
१०)
सुहास ने आज बाजारातून येताना आईसाठी नवीन साडी व वडीलांसाठी ड्रेस व अत्यावश्यक सामान घेऊन आल्याने आई बापाच्या चेहऱ्यावरचे समाधान व आनंद अवर्णनीय होता. वृद्धापकाळात पोटच्या मुलाच्या प्रेमा व्यतिरिक्त बापाला मात्र कशाचीही अपेक्षा नसते.

©® सौ.आश्विनी सुहास मिश्रीकोटकर