माझा कृष्णसखा... भाग १ (जलद कथामालिका लेखन स्पर्धा)

एका आगळ्या वेगळ्या गोड नात्याची कथा




लाल मातीचा धुराळा उडवत एसटी एका गावात शिरली. दुतर्फा हिरवीगार झाडी पाहून माझे डोळे सुखावले होते. अंगातून प्रवासाचा क्षीण इथल्या वातावरणात कुठल्या कुठे गायब देखील झाला होता. एसटीतून उतरले, तो अनोळखी गाव पण जणू आपलाच भासत होता. आपली आणि गावाचा काही तरी जुना ऋणानुबंध आहे असच वाटत होतं. 
गावातल्या एका रिक्षावाल्या जवळ जावून मी पत्ता सांगितला, रतीचंद्र डॉ रामचंद्र गुप्ता यांचा बंगला, तसा तो रिक्षावाला माझ्याकडे आश्चर्याने बघू लागला. 

पण हातातली बॅग सावरत मी रिक्षात बसले, तसा तो रिक्षावाला देखील भानावर आला आणि त्यांने रिक्षा सुरू केली. 

दोन्ही बाजूची गर्द हिरव्या झाडातून जाणाऱ्या रस्त्यावर मी मग्न होऊन बाहेरचे ते दृश्य पाहत होते. गावापासून जवळपास तीन एक किलोमीटर अंतरावर रिक्षा थांबली, त्याचे रिक्षावाल्याचे पैसे देऊन मी उतरले आणि समोर भान हरपून पाहतच राहिले. 

कारण माझ्या समोर होता, मंत्रमुग्ध करेल असा तो सुंदर बगीचा, अनेक प्रकारची फुलझाड आणि मध्येच उभा तो तो छोटा महाल आणि त्यावर कोरलेली सोनेरी अक्षरातील पाटी रतीचद्रं.. 

गेट उघडून आत गेले, आज बऱ्याच वर्षांने पुन्हा इथे आले होते, त्यामुळे मन अगदी भरून आले होते. धडधडत्या काळजाने मुख्य दरवाज्या जवळची बेल वाजवणार तेवढ्यात समोरचा दरवाजा उघडला गेला. आणि काही समजायच्या आत दोन बळकट हातांनी मला विळखा घातला, आणि उचलून मला तो फिरवू लागला. 

"अरे सोड ना, नाही तर पडेन मी", 

"अशी कशी पडशील मी आहे ना, तुला सावरायला", मला खाली सोडत राम म्हणाला. 

"अशी अचानक कशी काय आलीस", राम माझी बॅग आत नेत म्हणाला. त्याच्या पाठीमागे मी देखील घरात गेले. 

त्यावर ती काहीच बोली नाही, शेवटी तिला समजून घेत, 
तो स्मित हास्य करत, पाणी आणायला स्वयंपाक घरात गेला. तर ती देखील फ्रेश व्हायला रुममध्ये गेली. 

मी फ्रेश होऊन बाहेर आले तर माझ्या आवडतीचा चहा घेऊन राम माझीच वाट बघत सोफ्यावर बसला होता. 


"अशी अचानक इथे कशी आलीस, म्हणजे खरच आलीच आहेस की मी स्वप्नात आहे राम स्वतःला चिमटा काढत म्हणला,त्याच्या या कृतीवर मात्र आता मला खूप हसायला यायला लागले होते.


थोड्या शांत बसून मी पुढे असेला तो माझा आवडता चहा संपवला, आणि शांत बसले. 

"रती"... शेवटी न राहून रामने मला हाक मारलीच, उतावळा होऊन माझ्या उत्तराची वाट जे बघत होता ना तो. 

"थांब... तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी द्यायलाच हवीत का रे, का मी इथे आले आहे हेच तुला आवडल नाहीय, की निघू मी आल्या पावलीच ? " रामच्या त्या तपकिरी डोळ्यात असंख्य प्रश्न दाटून आलेले प्रश्न ओळखून मी म्हणाले. 

मग एखाद्या आज्ञाधारक लहान मुला तो आता काही न बोलता शांत समोर बघत बसला. 

"खूप थकली आहे रे मी, राम. विश्रांतीची खुप गरज वाटत होती आणि त्यातच अचानक परवा माई कडून तुझा पत्ता मिळाला, मग आले तुला भेटायला", शेवटी पाच सहा मिनीटांनी मी न राहून बोलले. 

यावर काहीच न बोलता राम फक्त बाहेर हवेवर डोलणारी, फुलझाड पाहत होता. 

"राम पंधरा वर्षे झाली रे, तुला एकदा पण माझी आठवण आली नाही", बोलताना रतीच्या डोळ्यात पाणी आले होते. 

"रती पंधरा वर्षातला एकही दिवस असा नाही ग गेला ज्या दिवशी तुझी आठवण आली नाही", राम मागे वळून रतीच्या डोळ्यातले पाणी पुसत बोला. 

"तरी देखील मग पंधरा वर्षे माझ्या पासून दूर राहिलास," त्याच्या पाणवलेल्या डोळ्यात बघत रतीने विचारले. 

\"पंधरा वर्षातील पंधरा मिनिटत देखील तुझा विसर पडला नाही ग, नाही ना पटत, पण सवडीने माझी डायरी वाचायला देतो. प्रत्यक्षात तुझ्या सोबत जे बोलू शकलो नाही ते त्यात आहे, राम भरून आलेल्या डोळ्यातले पाणी अडवत म्हणाला. 

तशी बाजूला उभी असणारी रती त्याला जाऊन बिलगली, त्याने तिला आपल्या मिठीत घेतले. 
जणू काही पंधरा वर्षाचा दोंघांन मधील दुरावा आता मिटला होता.




क्रमशः

🎭 Series Post

View all