माझा काय गुन्हा....

Marathi Katha
माझा काय गुन्हा

"पहिली बेटी धनाची पेटी" सगळीकडे आनंदी आनंद वातावरण पसरले होते .पहिली मुलगी झाली म्हणून वडिलांनी फटाके फोडले .कारण दोन-तीन पिढ्या घरांमध्ये मुलगीच झाली नव्हती. आता मुलगी झाली म्हणल्यावर घरातील वातावरण आनंदमय झाले. आजोबांना पण खूप आनंद झाला होता .कारण आजोबांना बहिणी नव्हत्या . मुलीदेखील नव्हत्या .हीच नात पहिल्या मुलाला मुलगी झाली.

एक छोटेसे कुटुंब आनंदाने नांदत होते. दोन मुले आई-वडील असा त्यांचा संसार होता. मोठ्या मुलाचे लग्न झाले . त्याचे नाव प्रमोद त्याच्या बायकोचे नाव सुनिता होते . सुनिता आणि प्रमोद अगदी सुखाने संसार करत होते . पण खूप दिवस झाले .त्या दापत्यांना संतान नव्हते .घरामध्ये सतत टेन्शन असायचे आणि सुनिताला सारखं शेजारपाजारची सर्वजण वांझोटी वांझोटी म्हणत होते .उपासतापास केले ,देवधर्म केले ,दवाखन्याला दाखवले. काही केल्यास सुनिताला दिवस जात नव्हते.सर्व प्रयत्नकरून थकल्यानंतर शांत राहिले .

सर्व लोकांची टोमणे ऐकून ऐकून सुनीताला खूप वाईट वाटत होते.ती खुप दुःखी होत होती. सासूसमोर नवऱ्यासमोर सतत रडत होती.

"अहो मला कसंतरी वाटतंय सगळेजण मला वांझोटी वांझोटी म्हणतात" सुनिता म्हणाली

" अगं तू काही टेन्शन घेऊ नको प्रमोद म्हणाला".

"होईल हळूहळू देव आहे ना आपल्या पाठीशी प्रमोद म्हणाला".

"अहो मी तर सर्व काही करून बसले"सुनिता म्हणाली.

खूप प्रयत्नाने सुनिताला दिवस गेले होते .डॉक्टरांकडे दाखवायला गेली डॉक्टरांनी सांगितले की, तुम्हाला दिवस गेलेत. हे ऐकल्यावर सुनीताच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं. आपल्या कष्टाचे फळ आता आपल्याला मिळणार म्हणून सुनिता खूप खुश झाली होती. जेव्हा तिने ही बातमी प्रमोदला सांगितली. तेव्हा प्रमोदला देखील खूप आनंद झाला. सुनिता घरी आली गोड बातमी आपल्या सासूला सांगितली. सासू इतकी खुश झाली की सगळ्या गावाला सांगत फिरायला लागली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

आपल्या सुनेला दिवस गेलेत म्हणल्यावर सासु खूप खुश झाली .आपल्या सुनेचे डोहाळे पूरवु लागली. तिला जे जे हवे ते सर्व काही तिला खाऊ घालत होती. सुनेला खूप जपत होती. कोणतीही दगदग नाही किंवा तिला साधे माहेरपणाला देखील पाठवले नाही. इतकी ती काळजी घेत होती. आपल्या सुनेचे डोहाळे जेवण अगदी थाटामाटात करायचे तिने ठरवले होते. डोहाळे जेवण करून तिची डिलिव्हरी करून माहेरी पाठवून देणार होती.नवव्या महिन्यात अगदी थाटामाटात डोहाळे जेवण करायचे ठरवले होते. कारण ,सवँजण वांझोटी म्हणत होते. त्यांना सर्वांना तिला दाखवून द्यायचे होते तोपर्यंत तसे काही झालेच नाही .अचानकच सुनीताला काळा चालू झाल्या डोहळा जेवणाआधी सुनिताची डिलेवरी झाली आणि सुनीताला मुलगी झाली.

मुलगी झाली म्हटल्यावर सगळीकडे आनंद झाला आणि आणि ती मुलगी हळूहळू मोठी होत होती .मुलीचे मंजूश्री ठेवण्यात आले . सर्वजण लाडाने मंजू म्हणून बोलत होते. मंजू दिसाय खूप देखणी होती .अगदी आई सारखी झाली होती. आणि अगदी उठावदार होती. मंजू कडे बघितल्यानंतर तिचे हालचाल आणि तिचा ऍक्टिव्हपणा बघून सर्वजण दिला घेत होते.

मंजूला घेऊन सुनीता सासरी आली.दोघिंचे स्वागत अगदी थाटामाटात करण्यात आले होते. मंजू सर्वांची अगदी लाडकी होती. आता मंजु हळूहळू मोठी झाली, शाळेला जाऊ लागली .शाळेत देखील खूप हुशार होती. मंजू उत्तम चित्र काढत होती .तिला चित्रकलेची खूप आवड होती .मंजू सर्वांशी अगदी मायेनी नम्रतेने वागत होती . त्यामुळे मंजू बद्दल सर्वांना आपुलकी होती. ती सर्वाना आपल्या गोड स्वभावनेे आपलेसे करून घेत होती.

मंजू मोठी झाली . पण इतर मुलींप्रमाणे तिच्यामध्ये जे बदल पाहिजे ते बदल दिसत नव्हते . तिच्या वागण्या आणि दिसण्यात काही बदल झाले नव्हते.आईला ते जाणवत होते .तेव्हा तिने घरातल्यांशी बोलून बघितले .पण घरातल्या सर्वांनी आपण अजून थोडा वेळ वाट पाहू या असे म्हणून सुनीताला थांबवले.

बर म्हणून सुनीताने दुर्लक्ष केले. पावसाळ्याचे दिवस होते मंजू अचानक आजारी पडली .तिला ताप आला होता तिला तिथल्या तिथे का हॉस्पिटलमध्ये दाखवले. पण काही केल्या ताप कमी झाला नाही .तिला सर्दी खोकला सुद्धा झाला होता . मग तिला मोठा हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी निमोनिया झाले म्हणून सांगितले .मंजूला एँडमिट केले.मंजूला बरे वाटु लागले होते. तेव्हा सुनीताने डॉक्टरांना सांगितले की,मंजूची अजून मासिक पाळी आली नाही. तेव्हा डॉक्टरांनी एका लेडीज स्पेशालिस्टकडे जाण्यास सांगितले .

सुनीताने मंजूला लेडीज स्पेशालिस्टकडे नेले. आणि मंजू ची सर्व हकीकत सांगितली. तेव्हा डॉक्टरांनी मंजूची सोनोग्राफी करायला सांगितली.जेव्हा सोनोग्राफी करून रिपोर्ट आले तेव्हा प्रमोद आणि सुनिता दाखवायला गेले. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की मंजूच्या गर्भाशयला जन्मतः दोष आहे .याच्यावर काही इलाज चालत होत नाही .आणि किती देखील प्रयत्न केले तरी आपण काहीही करू शकत नाही .असे डॉक्टरांनी सांगितले.

ही गोष्ट ऐकल्यानंतर प्रमोद आणि सुनीताच्या पायाखालची जमीन सरकली. सुनिताला करमेनासे झाले होते ती रडू लागली . सुनीताने एकाच डॉक्टरांना न दाखवता भरपूर डॉक्टरांकडे घेऊन गेली .पण सगळ्या डॉक्टरांनी तेच सांगितले की ,मंजूच्या गर्भाशयाला दोष आहे आणि मंजू आई देखील बनू शकत नाही... हे ऐकताच सुनीताला खूप खूप वाईट वाटले .आपण आपल्या लेकीला कसे सांगावे ? तिला आपणआधार कसा द्यावा ?आपल्या मुलीला हे कळाल्यावर तिला किती वाईट वाटेल याचाच सुनिता विचार करत होती.

जेव्हा ही बातमी मंजुला कळाली मंजूला खूप वाईट वाटले .आपण पण काय गुन्हा केला आहे ?आपल्यावर अशी वेळ आली आहे. असे वाटून तिला खूप रडू येत होते. आईसमोर बसून मंजू मोठमोठ्याने रडत होती.

"आई माझ्याच वाट्याला का बरे असे दुःख यावे ?मंजू म्हणाली.

"नाही बाळा आपण तुला वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवूया. तिथे काहीतरी मार्ग निघेल" सुनिता म्हणाली.

"आई पण आता एवढ्या डॉक्टरला दाखवले त्यांनी काहीही फरक होणार नाही म्हटले मग कसं ग?" मंजू म्हणाली.

"बाळा यातून काही तरी मार्ग निघेल ".सुनिता म्हणाली.

"आई मी काय गुन्हा केला असेल ग माझ्या बाबतीत असे का झाले असेल ?"मंजू म्हणाली.

"तसे काही नाही बाळा आपण दुसऱ्या डॉक्टरला दाखवायचे आहे "आई म्हणाली.

"बरं आई त्या एकच डॉक्टरांची मला अशा आहे बघू काय होते?" मंजू म्हणाली.

आई मंजूला घेऊन मोठ्या दवाखान्यात शेवटचा पर्याय म्हणून दाखवायला गेली होती. तेथेही डॉक्टरांनी सर्व तपासणी केली .पण याच्यावर काहीच पर्याय नाही असे सांगितले .मग तर सुनीताला खूप वाईट वाटले .आपण आपल्या मुलीला काय सांगावे असे विचार करत होती. पण तिने डॉक्टरांनी जे काही सांगितले ते मंजूला सांगितलं.

मंजूने देखील विचार केला जे आहे ते आहे .ते आता कोणीही बदलू शकत नाही .म्हणून मंजू ठाम राहिली. आईने देखील विचार केला आपण मंजूला खूप शिकवायचे आणि स्वतःच्या पायावर उभे करायचे .मंजू थोडीदेखील खचली नाही. उलट उत्साहाने आणि आनंदाने आपल्या कामाला लागली .पण आईला इतर मुलींकडे पाहून थोडेफार तिच्या मनात दुःख येत होते . मंजू देखील रडत होती.

मंजू शाळा शिकून खूप मोठी झाली होती . चांगली नोकरी देखील लागली होती .पण इतर मुलींप्रमाणे आपल्या पण मुलीचे लग्न व्हावे असे आईला वाटत होते .आई मंजुला सतत म्हणून दाखवत होती. बघ बाळा इतर मुलींप्रमाणे तुझे देखील लग्न करायला पाहिजे .मंजू तयार नव्हती. तिने तिला जबरदस्ती केली नाही .आणि मंजू स्वतः नोकरी करत करत आपल्या आई बाबांचा सांभाळ करू लागली.पण तिच्या मनात सतत एक गोष्ट खात होती माझा काय दोष? माझ्या वाटेला का असे दु:ख आले असेल ?अशी एकच गोष्ट मनात सतत टोचत होती.

मंजू लग्न न करता स्वतःच आयुष्य अगदी आनंदाने जगत होती.



धन्यवाद