माझा जीवनसाथी

this is about husband and wife

                   माझा जीवनसाथी

बायको , पत्नी, अर्धांगिनी, सहचारिणी, जीवनसाथी , लाईफ पार्टनर  हे सगळे समानार्थी शब्द असले तरी त्यांच्या अर्थ समजण्यासाठी एक वैचारिक पातळी लागते . स्त्री हि जीवनाचा खरा आधार आहे . एक स्त्री आई असते , बहीण असते , मुलगी असते आणि तीच स्त्री एक जीवन साथी  असते.

संसाराच्या गाडीला दोन चाकं असतात . ती दोन चाकं म्हणजे पती पत्नी. हे पती पत्नी खरोखर एकमेकांचे जीवनसाथी असतील तर आणि तरच हि गाडी रुळावर चालते . जरी एक चाक थांबलं तरी गाडी रुळावरून घसरतेआणि मग रेटारेटी सुरू होते.

पतीपत्नीच्या नात्याची घट्ट वीण ही सप्तपदीपासून सुरू होते. कारण तेव्हापासून खऱ्या अर्थाने त्याचे सहचरण सुरूकरतात. आजकालचे लिव्ह इन रिलेशन, सिक्स इयर्सअफेअर हे वगैरे सहचरण नव्हेच. (विषयाला सुरुवात तर पण तिथपर्यंत कसं पोचायचं तेच कळत नाहीये.)

माझ्या जीवनसाथीला मी रोज बघते. अनुभवतेच पण त्याच्याविषयी लिहिताना विचारांची चढाओढ झालीय. आधी हे लिह की ते, हे सांगू की ते असं झालंय. आमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे येथून सुरुवात करते .

एवढंच सांगते. शोधायचं काम आईवडिलांनी केलं आणि पुढे निभावण्याचं काम आम्ही दोघं करतोय. आता निभवायचं म्हटल्यावर तुम्हाला वाटेल इथे पण रेटारेटी की काय ? तर तसं नाही. घर दोघांचं असतं. थोडंसं तुझं थोडसं माझं." त्यांनी सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीला विरोध नसतो. असायचं मुळात कारणच नसतं. अत्यंत सखोल विचारांती घेतलेला तो निर्णय असतो. आणि माझा त्याला दुजोरा असतो. कारण चूक ते चूक आणि बरोबर ते  बरोबर या विचारांची मी आहे. आणि तो कधी चुकीचा नसतोच नसतोच, (गमतीचा भाग त्याच्या चुकीच्या गोष्टी पण मलाबरोबरच वाटतात; कारण आय एम इन लव्ह ना!)

जेव्हा तो मला भेटला तेव्हा माझ्या मनात उकळ्या फुटतहोत्या. वरून खाली पडताना कसं धस्सं होतं; तसंच काहीसं होतं. मन पाखरू झाले अन् हलकं हलकं झाले. आनंदानेबागडू लागलं. 'दिल तो पागल है'मध्ये माधुरी दीक्षित सांगते ना तसंच मला देवाने काहीसा इशारा दिला होता. नाहीतर आठ ते दहा स्थळं बघितल्यानंतरचा हाच का बरं माझा जीवनसाथी झाला.' खरंच! 'लग्राच्या गाठी देवाच्या हाती'

यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे बुवा. जेव्हा दोघं भेटलो तेव्हा दोघांनी 'नाही' असं सांगितलं आणि दोनदा नाही' म्हणजे... काय असतं माहितेय ना! तेच मन में लड्डु.

अॅक्च्युली वुइ आर मेड फॉर इच अदर. लग्नात अगदी भटजीसुद्धा सारखे म्हणत होते 'लक्ष्मी-नारायण' जोडी आहे. माझ्यातल्या कमतरता त्याच्या चांगुलपणाने भरून निघाल्या.त्याच्यातला अधुरतेला पूर्णत्व माझ्या स्वभावाने आलं असं म्हणता येईल. वयात फारसं अंतर नाही. शरीरयष्टीत फारसा फरक नाही. हे सगळं लोक बोलतात; पण खरं ह्या नात्यामधला रेशमी बंध आहे तो म्हणजे 'प्रेम, आदर आणि विश्वास', जो आम्हा दोघांना एकमेकांबद्दल आहे, वाटतोआणि सदैव राहील. चर्चा, वाद-विवाद आणि तिसरा म्हणजे'संवाद' त्याहीपलीकडे जो असतो. तो 'सुसंवाद'. अगदी सुसंवाद नसला तरी वाद-विवाद हा कधीच होत नाही.

मुळात दोघांमध्ये दुमत होतच नाही ना. कधी शॉपिंगला गेलो तर एकच वस्तू दोघांना आवडते. फिरायला गेलो तर एक डिन्स्टिन्शन फायनल होते. मनकवडा आहे की काय,काय माहीत, पण माझ्या मनातले विचार त्याला आधी पोचतात. लग्नानंतर खरे सप्तगुण बाहेर पडतात, असं आपण म्हणतो. पण तो जसा लग्नाआधी होता तसाच लग्नानंतरही आहे. मी बदलले आहे खरी; पण तो बदल त्याच्यासाठीच केलेला आहे.

अंदाज येत नाही

 अपुलाच आपल्याला

लाटांचा धरूनी हात

ते कधी धावतो किनारा....

अशी ही आमची रेशीम गाठ. दिवसेंदिवस घट्ट, मजबूत बनतेय. रोज मला तो नवीन कळतो आणि मी नव्याने प्रेमात पडते. माझ्या सुखात, माझ्या दु:खात, माझ्या स्वप्नात तो माझ्या बरोबर असतो. दोन वेळा मरणाच्या दारातून परत आले किंबहुना त्याने आणले. लग्नानंतर सहासात वर्षाच्या करियरमधली गॅप भरण्यासाठी शिकायची इच्छा होती. त्याने माझी इच्छा सत्यात उतरवली. मॉरल सपोर्ट तर होताच इकोनॉमिक सपोर्ट तर असतोच (तो माझा म्हणजे त्याचं सगळं माझंच ना!) पण दोन वर्षे नऊ ते पाच बायकोला कॉलेजला पाठवून मला एमबीए बनवणारा माझा हिरो, माझा जीवनासाधी म्हणजे माझा नवरा!

व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने प्रेम व्यक्त केले . तसे प्रेम व्यक्त करायला हाच दिवस असावा  असे नाही ..तो रोजच  असावा याविचारांची मी आहे पण हा दिवस अख्या जगाने  प्रेमिकांचा  दिवस म्हणून त्याला मान्यता दिलीय तर का सेलिब्रेट करू नये ..