Oct 22, 2020
स्पर्धा

माझा होशील ना भाग 13

Read Later
माझा होशील ना भाग 13

आपण मागील भागात पाहिले की प्रणालीच्या बहिणीच लग्न झालं.. नमन लग्नात भरपूर मदत करतो.. प्रणालीला खूप छान वाटले.. पण प्रणाली त्याच्याशी बोलली नाही.. लग्न झाल्यावर प्रणालीचे सासरे जायला निघाले.. मग प्रणालीची आई ती राहण्याबद्दल विचारते.. आता पुढे..

नमनचे बाबा नमनला राहायला सांगतात.. "नमन तू आज रहा.. आणि येताना सुनबाईला घेऊन ये.." नमनचे बाबा

"बर बाबा.." नमन

नमन खूप खूश होतो.. कारण जर आज तो तसाच गेला असता.. तर त्याला करमलेच नसते.. आणि तो खूप नाराज झाला असता.. प्रणाली येईलच की नाही याची खात्री वाटत नव्हती.. म्हणून त्याला रहायचे होते..

"आता कसे तिला मनवून मनातलं सांगून जाता येईल.." असे मनात म्हणून तो खूप खूश होता..

याउलट प्रणालीचे असते.. ती थोडी नाराज होते.. "आता हे राहिले म्हटल्यावर मला जावे लागणार.. हे काही मनातल बोलणार नाहीत.. पण मी माझ्या मनावर ठाम राहणार आहे.. यांनी मनातलं बोलल्याशिवाय मी जाणार नाही.. का बर जायचं मी तिथे?? जिथे नवरा असूनही नसल्यासारखा आहे.. मी इतक करते तरी त्याला माझी किंमत नाही.. मग मीच का माघार घ्यायची?? बरं माझं काही चुकलं असेल तर ठीक.. पण माझं काहीच चुकलेले नाही.. फकत माझा रंग सावळा म्हणून.. तेच जर मी सुंदर, गोरी गोरी असते तर.. हे माझ्या मागेपुढे करत बसले असते.. असे का? सावळ्या रंगाच्या मुलींना मन नसतं का?? त्यांना काहीच भावना नसतात का??" प्रणाली मनातच बडबडत असते..

खरंय आजच्या जगातही नुसता रंग, रुप बघून मुलींना पसंत करणारे बरेच जण आहेत.. ज्या उच्चशिक्षित किंवा उत्तम सुगरण असतात.. ज्यांच्याकडे एखादी चांगली कला असते.. किंवा त्या उत्तम प्रकारे घर सांभाळू शकतात.. तर अशा मुलीचा फक्त रंग सावळा आहे म्हणून त्यांनी नकार द्यायचा का??

सावळ्या रंगाच्या मुली कोणावर प्रेम करू शकत नाहीत का?? त्या प्रेम केल्याच तरी समोरचा तिच्यावर प्रेम करतो का?? प्रत्येक जण आपल्या नशिबानुसार, प्रारब्धानुसार रंग, रुप घेऊन येत असतो.. त्यात त्या व्यक्तीची काय चूक??

"सुनबाई तुला जास्त दिवस राहायचे असेल तर तू रहा.. आम्हाला काही अडचण नाही.. तुमचं माहेरच आहे.. पण आणखी तुमची बहिण आल्या की भेटायला याल.. म्हणून मी चला म्हणालो.." प्रणालीचे सासरे..

"हो हो.. ती उद्या येईलच.. परत बहिण आल्यावर येईलच ना.." प्रणालीची आई

"बरं.. आम्ही निघतो आता.." नमनचे बाबा

"बरं.." प्रणाली

सगळे पाहुणे गेले.. फक्त प्रणाली आणि नमन तेवढेच होते.. नमनला काही करमत नव्हते.. म्हणून तो बाहेर बसला होता.. तिथे प्रणालीचे बाबा येतात.. आणि ते नमनसोबत बोलत बसलेले होते..

"काय नमन.. आमच्या प्रणालीची काही तक्रार नाही ना.." प्रणालीचे बाबा

"नाही ओ बाबा.. उलट ती सगळ्यांशी प्रेमानेच वागते.." नमन

"होय.. अगदी गुणाची पोरं आहे आमची.." नमनचे बाबा

"बाबा माझं एक काम होत.." नमन हळूच बोलला..

"काय?? फक्त सांग.. झालंच म्हणून समजा.." प्रणालीचे बाबा

"मला तुमचं शेत बघायचं होतं.." नमन

"अरे.. एवढंच होय.. चला की आता.. फिरून येऊया.. जवळच तर आहे.." प्रणालीचे बाबा

"नाही.. तुम्ही नको.. प्रणाली येईल का माझ्यासोबत??" नमन थोडं दचकतच म्हणाला

"अरे चालतंय की.. त्यात काय एवढं??" प्रणालीचे बाबा.. त्यांनी ओळखले होते की त्या दोघांना एकांत हवा असेल.. दोघेही कामात असताना एकमेकांशी बोलले देखील नाहीत.. जाऊ देत.. तेवढाच एकांत.. म्हणून ते प्रणालीला हाक मारले..

"काय बाबा.. बोलावलंत मला.." प्रणाली

"अगं.. नमनला आपलं शेत दाखवून आण की.. घरात बसून कंटाळला आहे तो.." प्रणालीचे बाबा

"बाबा तुम्ही जा ना.. मला खूप कंटाळा आलाय.." प्रणाली.. कारण तिला नमनसोबत जायचं नव्हतं..

"अगं बाळा.. आपले रामा काका (शेतात काम करणारा गडी) तुझी सारखी आठवण काढत असतो.. त्याला भेटून.. थोडं शिवारात फिरून ये जा की.. मन प्रसन्न आणि शांत होईल.." प्रणालीचे बाबा

"बरं बाबा.." प्रणाली

असे म्हणून प्रणाली नमनसोबत जायला तयार होते.. नमन खूप खूश होतो.. दोघेही जाताना गावातली लोकं प्रणालीसोबत बोलत होते.. कारण ते दोघे चालतच जात होते.. मग त्या लोकांसोबत प्रणाली बोलत असल्यामुळे ते दोघे एकमेकांशी बोललेच नाहीत..

"काय यार मी पण?? उगाच चालत आलो.. गाडीवरून आलो असतो तर आता पोहोचलो असतो.. आणि मी हिच्याशी बोललो पण असतो.. आता काय?? धड ही माझ्याकडे बघेना.. नमनशेठ कसं काय करणार?? अवघड आहे.. राडा केलाय.. निस्तरायला तर लागणारच.." नमन स्वतःशीच बोलत होता..

अशाप्रकारे फायनली ते शेतात पोहोचले.. शेतात गेल्यावर नमनला ठेच लागून तो प्रणालीच्या मिठीत जातो.. तसे ते दोघे अंतर राखूनच चालत होते.. पण नमनला ठेच लागली.. तो पहिल्यांदाच शेतात आला होता.. त्यामुळे त्याला अंदाज आला नाही.. शेतात नांगर फिरवला होता.. म्हणून जमीन थोडी खडबडीत होती.. त्यामुळे त्याला ठेच लागली..

असा अचानक नमन आल्यावर प्रणालीला काहीच कळेना.. पण तिला खूप अवघडल्यासारख वाटतं होत.. पहिल्यांदाच असे कोणीतरी तिच्या इतकं जवळ आलेलं होतं.. तिच्या अंगावर शहारे आले होते.. नमनला पण खूप छान वाटतं होत.. मग ते दोघे सावरले.. आणि व्यवस्थित झाले..

इतक्यात तेथे रामा काका येतात..
"काय ताई.. सगळं बरं हाय नव्ह.." रामा काका

"हो काका.. तुम्ही कसे आहात??" प्रणाली

"मी बरा हाय.. राम राम मालक.. ताई तुमचं धनी लई भारी हाईत.." रामा

"नमस्कार.." नमन

"बरं तुमी व्हिरी पाशी जावा.. मी तुमास्नी कणसं भाजून आणतो.. तित लई भारी वाटतंय.. तुमाला सांगतो मालक.. परणाली ताई सारखं त्या व्हिरीवर जाऊन बसायच्या.. तेनला लई आवडतय तित बसायला.." रामा

"हो.. बरं मग आपण तिथेच जाऊन बसू.." नमन

"बरं जावा.. मी कणसं आणतो.." म्हणून रामा जातो..

नमन आणि प्रणाली विहिरीकडे जातात.. शेतातील वातावरण नमनला खूपच आवडत.. अगदी मन प्रसन्न होतं त्याच.. ते दोघे विहिरीपाशी जातात.. विहिरीला कठडा बांधलेला होता.. दोघेही थोडा वेळ शांत उभा राहून आत बघू लागले.. मग दोघेही कठड्यावर बसले..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मी काही प्रोफ़ेशनल लेखिका नाही.. मनात जे काही येतं ते लिहिते..