Oct 25, 2020
स्पर्धा

माझा होशील ना भाग अंतिम

Read Later
माझा होशील ना भाग अंतिम

आपण मागील भागात पाहिले की नमनच्या ऑफिसमधून त्याला प्रोजेक्टसाठी गोव्याला पाठवण्यात आले.. नमन प्रणालीला पण घेऊन जाणार होता.. प्रणालीने सगळी तयारी केली.. आता पुढे..

नमन आणि प्रणाली गोव्याला जातात.. तिथे त्यांना पोहचायला खूप उशीर झाला.. दोघेही खूप दमले होते.. म्हणून ते लगेच झोपी गेले..

सकाळी प्रणालीला उशीराच जाग आली.. ती उठली तर नमन बाजूलाच झोपला होता.. ती नमनच्या केसांमधून हात फिरवणार असते.. पण तो जागा होईल म्हणून गप्प बसते..

प्रणाली तिचं सगळं आवरून तिच्या आणि नमनच्या आई बाबांना पोहोचल्याचे कळवते.. ती फोनवर बोलत असतानाच नमनला जाग आली..

तो उठला आणि प्रणाली फोनवर बोलत होती तोपर्यंत आवरून आला.. मग दोघेही नाष्टा करतात.. नमन अकरा वाजता मिटिंगसाठी जातो.. मिटींग एक तास चालू असते.. मिटींग झाल्यावर नमन आणि प्रणाली दोेघेही जेवण करून फिरायला जातात..

मस्त समुद्र बघायला जातात.. समुद्रकिनारी बिचवर दोघे थोडे फिरून एका जागी बसतात.. प्रणाली वाळूत काहीतरी करत बसते.. आणि नमन समुद्र बघत होता..

"कसं आहे ना.. समुद्र त्याच हृदय इतकं विशाल असतं की तो नदीला आपल्यात सामावून घेतो.." नमन

"हो आणि नदी त्याच्यात विलीन होऊन त्याचीच तर होते.. कायमची.. तिचं अस्तित्व विसरून.." प्रणाली

"होय.. नवरा बायकोच नातं अगदी सेम आहे.. एकमेकात मिसळून जायचं.." नमन

"हं.." प्रणाली

"बोल ना.." नमन

"मी काय बोलू??" प्रणाली

"मला वाटलं नव्हतं तू इतक्या सहज मला माफ करशील.. माहेरी गेल्यावर लगेच येशील.. खरंच तू खूप ग्रेट आहेस ग.." नमन

"मी येणारच नव्हते.. खूप दुखावले होते.. मी तुम्हाला माफ करणारच नव्हते .. कारण माझा स्वाभिमान दुखावला होता.. पण माझ्या आईबाबांना त्रास नको.. आणि तुमचे आईबाबा माझ्यावर करतात ते प्रेम बघून मी माघार घेतली.. कधीही तोडण्यापेक्षा जोडणे मला जास्त आवडते..

मी तुमच्यावर मनापासून प्रेम केल होत.. त्या प्रेमापुढे मी स्वाभिमान इगो सगळं बाजूला ठेवून मी तुमच्याकडे आले.. आयुष्यभराची साथ देण्यासाठी. . तुम्हाला तुमची चूक समजली पश्चात्ताप झाला बास ना.. आता मी आढेवेढे घेतले तर दोन्ही कडच्या कुटुंबाला त्रास होणार.. त्यात बाबांची तब्येत बिघडलेली असते.. माझ्यामुळे कुणाला त्रास झालेला मला आवडत नाही.. म्हणून मी माघार घेतली.." प्रणाली

"खरंच तू चांगली आहेस. . तुझ्या रूपात मला योग्य जीवनसाथी मिळाली मी खूप लकी आहे.. आता इथून पुढे मी तुला कसलाच त्रास देणार नाही.." नमन

"हं.." प्रणाली

थोडा वेळ बसून संध्याकाळी दोघेही पाण्यात खूप खेळतात.. दंगामस्ती करतात.. आणि मग रूमवर जातात. . रूमवर जाऊन सगळं आवरून जेवायला जातात..

गोव्यात चार दिवस दोघेही खूप एन्जॉय करतात.. जगातील सगळी सुखं पायाशी लोळण घालत आहेत की काय असे त्यांना वाटत होते..

त्या चार दिवसात ते दोघे खर्या अर्थाने नवरा बायको बनले होते.. दंगामस्ती आणि एकांत यामुळे ते एकमेकांच्या खूप जवळ आले होते.. . प्रणालीला हे सगळं स्वप्न वाटत होते..

"खरंच हा दिवस आहे की माझे स्वप्न आहे.. लग्नाच्या पहिल्या दिवशी मला वाटल देखील नव्हतं की हा दिवस माझ्या आयुष्यात येईल.. पण खरंच.. आलाय तो दिवस.. मी खूप खूश आहे ." प्रणाली मनातच विचार करत होती..

चार दिवस संपले.. नमनचे प्रोजेक्टचे कामही पूर्ण झाले.. मग ते परतीच्या प्रवासाला निघाले.. सगळे सामान आवरून ते परत येत होते.. त्यांना
रात्री दोन वाजले घरी यायला.. येऊन दोघे लगेच झोपी गेले...

गोव्याला गेल्यामुळे दोघांचे नाते अधिकच खुलले.. पण परत आल्यावर नमन त्याच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त राहिला.. आणि प्रणाली तिच्या कामात.. नमन सकाळी लवकरच जायचा ऑफिसला.. आणि उशीरा यायचा.. प्रणाली सुध्दा घरकाम, गाण्याचा क्लास यात गुंतली होती..

एक दिवस सगळे एकत्र जेवत असताना प्रणालीना अचानक उलटी येऊ लागली.. आणि गरगरू लागलं.. नमन खूप घाबरला.. "अगं तुला काय होतंय.." म्हणून तो तिच्या जवळ जातो..

"डाॅक्टरांकडे जाऊन या.." नमनचे बाबा

"अहो त्याची काहीच गरज नाही.." नमनची आई

"का??" नमन आणि त्याचे बाबा एकदमच म्हणाले..

"अहो आता घरात नविन पाहुणा येणार आहे.." नमनची आई

"कोण आणि त्याचा डाॅक्टरांकडे जाण्याचा काय संबंध.. चल ग प्रणा आपण जाऊ डाॅक्टरांकडे.. आवर.." नमन

"अरे ऐक तर माझं.." नमनची आई

"आई नको ग.. मी तिला डाॅक्टरांकडे घेऊन जाणारच.." नमन

"अरे जा.. खरं माझं एकदा ऐकून तर घे.." नमनची आई

"बरं बोल.." नमन

"अरे आपल्या घरी पाहुणा येणार म्हणजे.." ती पुढे बोलणार इतक्यात..

"आणि परत तेच काय तुझं आई.. नंतर सांग.. चल ग प्रणा.." नमन उठून प्रणालीचा हात पकडून नेत असतो..

"आधी आई काय म्हणतात ते तर बघा.." प्रणाली

"ती काय पाहुणा सांगत आहे.. कोण हा पाहुणा.." असे नमन म्हणाला.. प्रणालीने त्याला खुणेनेच बसायला सांगितले.. मग नमन बसला..

"बरं सांग आई.. कोण येणार आहे पाहुणा.." नमन

"अरे पाहुणा म्हणजे तुझ मुलं.." नमनची आई

"बरं.. माझं मुलं म्हणे.. चल आता लवकर.." नमन असे म्हणून प्रणालीचा हात पकडतो आणि दोन पाऊले पुढे गेल्यावर त्याला समजतं..

"काय????? माझं मुलं.. म्हणजे मी आणि प्रणाली.. वाव मला खूप आनंद झालाय.. अगं आई मी बाबा होणार आहे.." नमन

घरात अगदी आनंदाचे वातावरण पसरले होते.. सगळे खूप खूश होते..

आता खर्या अर्थाने प्रणाली आणि नमन एक झाले होते.. त्यांच्या प्रेमाला मस्त अंकूर फुटला होता.. सगळी सुखं मिळत होती.. सुरुवातीला कष्ट आले तरी शेवट गोड झाला.. दोघेही संसारात मस्त रमले.. त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला..

तर या कथेवरून एखाद्याला त्याच्या रंग रूपावरून कधीच हिणवू नये.. रंग रूप जन्मतःच मिळते.. त्यात त्या व्यक्तिचा काय दोष?? सौंदर्य चेहर्यावर नसते तर मनात असते.. मनाचे सौंदर्य सर्वात श्रेष्ठ सौंदर्य असते..

धन्यवाद
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..
समाप्त..


Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मी काही प्रोफ़ेशनल लेखिका नाही.. मनात जे काही येतं ते लिहिते..