माझा होशील ना भाग 9

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की नमनला खूप ताप आला होता.. प्रणाली रात्रभर जागून त्याच्या कपाळावर घड्या ठेवली होती.. नमन पण प्रणालीला गाण्याच्या क्लासमध्ये अॅडमिशन घेऊन येतो.. आता पुढे..

नमन प्रणालीला गाण्याच्या क्लासला घातलेला असतो.. प्रणाली पण खूप खूश झालेली असते.. तिच्या कलेला वाव मिळालेला असतो.. लग्नाआधी घरची परिस्थिती नसते.. त्यामुळे तिच्या कलागुणांना वाव मिळाला नाही..

आता लग्न झाले.. पण नवरा अजूनही साधा मित्र बनलेला नव्हता.. आता सगळं संपले असे वाटत असतानाच नमनने तिच्या कलागुणांना योग्य वाव दिला होता..

"हे वाटतात तसे नाहीत.. पण यांना मी पसंत नव्हते.. तरिही यांनी मला माझ्या कलागुणांना जोपासण्यासाठी मला मदत केली.. ही उपकार किंवा मी केलेल्या मदतीची परतफेड तर नाही ना.. की कोणतीही अपेक्षा न ठेवता हे मला मदत करत आहेत.." प्रणाली मनात विचार करत असते..

पण तसे काही नसेल असे विचार करून ती रोजच्या रोज गाण्याच्या क्लासला जाऊ लागते. तिचा छंद तिची आवड जोपासू लागते.. मनाप्रमाणे करायला मिळत आहे म्हणून ती खूश असते..

पण लग्न होऊनही नमन अजूनही आपला होऊ शकला नाही.. ही खंत कोठेतरी तिच्या मनात असते.. जेव्हा ही गोष्ट मनात येते तेव्हा ती खूप दुःखी होते..

पण अजून बहिणीच लग्न झालेेल नसत म्हणून ती आईवडीलांकडे जाऊ शकत नाही.. असेच अनोळखी होऊन दोघेही आयुष्य जगत असतात..

नमनला तर काहीच कळत नाही नक्की माझ प्रेम आहे की नाही.. मला ही आवडते की नाही.. माझे मलाच कळेना.. नक्की प्रेम म्हणजे काय हेच त्याला समजले नाही.. पण असे अनोळखी किती दिवस रहायचं..

प्रणाली गाण्यावर फोकस करून गाणं मनापासून शिकत होती.. तिला गाण्यावरच फोकस करायच असत.. ती गाण्याच्या परिक्षा देत होती.. तिला आता योग्य मार्गदर्शन मिळत होत..

आता दिवसामागून दिवस जात होते.. नमन प्रणालीला प्रेमाची कबुली दिला नाही.. आणि मग प्रणालीने पण त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा करायचं सोडून दिलं होतं.. तिने फायनली ठरवलच की बहिणीच लग्न झालं की आईबाबांकडे जायचं..

अखेर तो दिवस उजाडला.. नमन ऑफिसला गेला होता.. प्रणाली सुध्दा सगळं काम आवरून बसली होती.. इतक्यात प्रणालीचे बाबा येतात..

"अरे बाबा तुम्ही असे अचानक कसे आलात?? काही फोन नाही आणि आई सुद्धा काही बोलली नाही.." प्रणाली

"होय ग.. गडबडीत राहिलंच.." प्रणालीचे बाबा

"बरं.." प्रणाली

"अगं मी तुला घेऊन जायला आलो आहे.." प्रणालीचे बाबा

"का?? असे काय झालंय?? अचानक का??" प्रणाली घाबरून म्हणाली

"अगं बाळा तू घाबरू नकोस.. घाबरण्यासारख काही नाही.. आनंदाची बातमी आहे.." प्रणालीचे बाबा

"आनंदाची बातमी आहे.. अरे वा.. काय बातमी आहे बाबा.." प्रणाली

"अगं तुझ्या बहिणीच लग्न ठरलं आहे.. दोन दिवसांनी लग्न आहे.. सगळ्यांना आमंत्रण देऊन तुला घेऊन जायला आलो आहे.." प्रणालीचे बाबा

"हे काय बाबा.. एवढ्या लवकर का लग्न ठेवलं आहे.. थोड्या दिवसांनी ठेवायचं ना.." प्रणाली

"अगं बाळा जास्त दिवसांनी ठेवले की खर्च जास्त करावा लागतो.. गडबडीत केल की खर्च कमी होतो.." प्रणालीचे बाबा

"हो बाबा.. बर मी आवरून येते.." प्रणाली

प्रणाली आवरायला गेल्यावर तिचे बाबा नमनच्या आईबाबांसोबत बोलत बसतात.. प्रणाली बाबांना चहा नाष्टा देते आणि आवरायला जाते..

ती खोलीत गेल्यावर तिच्या डोळ्यातून आपोआप पाणी येत असत.. अर्थातच ते दुःखाचे अश्रू असतात.. कारण ती बहिणीच्या लग्नानंतर नमनपासून विभक्त होणार होती.. ती माहेराला जाणार होती कायमचीच.. इतक्या दिवसांत नमन सोबत राहून त्याची सवय झाली होती.. या घराची घरातल्या माणसांची सवय झाली होती.. ती खूप रडत होती.. रडत रडतच बॅग भरते..

बॅग भरून झाल्यावर नमनसाठी एक चिठ्ठी लिहायला बसते.. कारण यावेळी ती त्याला सगळं सांगूनच जाणार असते..

प्रिय........ काय म्हणू तुम्हाला.. तुम्ही माझे मित्रही नाही आणि नवराही.. इतके दिवस एकत्र राहूनही आपल्यात कोणतच नातं निर्माण झालं नाही.. खरतर हे माझं दुर्दैव..

मी खूप प्रयत्न केले.. पण मला तुमचं मन कधीच समजू शकले नाही.. तुमच्या मनात काय आहे याची पुसटशी कल्पनाही मला माहित नाही.. मग मी काय समजावे..

तुम्हाला मी आवडले नाही.. मग सोबत राहून तरी काय उपयोग?? आपला संसारही होणार नाही.. आणि आपण सुखी राहणार नाही.. म्हणून मी एक निर्णय घेतला आहे.. की मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जात आहे.. तुम्ही तुमच्या आवडीच्या मुलीशी लग्न करा.. आणि सुखी रहा..

तुम्ही माझ्या कलागुणांना वाव दिलात.. त्याबद्दल मी तुमची ॠणी राहीन..
तुमची.. असे म्हणणार नाही.. कारण तुमची कधी झालेच नाही..

अशी चिठ्ठी लिहून ती त्याच्या उद्या घालायच्या ड्रेसवर ठेवते.. जेणेकरून त्याला ते दिसेल..

हे लिहित असताना प्रणालीच्या डोळ्यातील पाणी कागदावर पडते.. ती डोळे पुसून बॅग घेऊन बाहेर जाते.. सासूसासर्यांना नमस्कार करून ती निघून जाते.. कायमची..

नमन संध्याकाळी ऑफिसमधून आला.. त्याला प्रणालीच्या बाबांनी आमंत्रण दिले होते.. त्यामुळे त्याला प्रणाली माहेरी गेल्याबद्दल माहित असतं.. तो नेहमीप्रमाणे येऊन आवरून जेवण करून बसला.. त्याचं काम करून रात्री झोपला.. त्याला चिठ्ठीबद्दल काहीच कल्पना नव्हती..

"आता प्रणाली आल्यावर मी तिला मनातलं सगळं सांगणार आहे.. किती दिवस असे अनोळखी बनून रहायचं.. नात्याला काहीतरी नाव असायलाच पाहिजे ना.." नमन असा मनात विचार करत होता..

पण त्याला काय माहित त्याच्यापुढे काय वाढून ठेवले आहे..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..





🎭 Series Post

View all