Login

माझा होशील ना भाग 8

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की नमन आणि प्रणाली फेस्टिवल बघून घरी येत होते.. तेव्हा अचानक पाऊस आला..प्रणाली नको म्हणत असताना नमन तिला पावसात भिजायला बोलवतो.. दोघेही मनसोक्त पावसात भिजले.. मग घरी गेले.. आता पुढे..

नमन आणि प्रणाली पावसात मनसोक्त भिजतात.. आणि नंतर घरी जातात.. घरी गेल्यावर..

"अरे किती भिजलात तुम्ही?.." नमनची आई

"हो ग आई.. अचानक पाऊस आला.." नमन

"अरे मग कुठेतरी थांबायच ना.." नमनची आई

"मग उशीर होईल म्हणून लगेच आलो.." नमन

"अरे पण तुला लगेच सर्दी होते ना.." नमनची आई

"आई असु दे ना.. आता.." नमन

"बरं जा.. लवकर कपडे बदला नाहीतर अजूनच सर्दी येईल.." नमनची आई

"हो.." म्हणून दोघेही कपडे बदलायला जातात..

प्रणाली बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलून बाहेर येते.. बघते तर नमनला थंडी भरून आली होती..

प्रणाली नमनला लगेच गरम पाणी देते.. त्याला हात पाय धुवायला सांगते.. गरम पाण्याने नमन हात पाय धुवून येतो आणि स्वेटर टोपी घालून गरम गरम शेकून घेतो.. तरिही त्याची थंडी कमी होईना..

मग प्रणालीने गरमागरम चहा केला.. चहा पिऊन नमनला थोडं बरं वाटलं.. आणि मग नमन बेडवर झोपला..

पावसात भिजलं की नमनला लगेच सर्दी खोकला सुरु होई.. लगेच त्याची तब्बेत बिघडत असे.. प्रणालीचे तसे नव्हते.. तिला सगळं सोसायच.. गावाकडे असल्यामुळे तिला सगळ्याची सवय होती.. त्यामुळे तिला सर्दी वगैरे झाली नाही..

नमनला झोप लागली.. मग प्रणाली पण तिचे अंथरूण करून खाली झोपली.. प्रणालीला झोप लागली.. मध्यरात्री एकदम आवाज झाला.. म्हणून प्रणाली दचकून उठली.. झोपेतून उठल्यावर ती इकडे तिकडे पाहत होती.. तिला काहीच दिसलं नाही..

नंतर तिने खाली पाहिले आणि ती हसू लागली.. कारण नमन झोपेत बेडवरून खाली पडलेला असतो.. प्रणाली खूप हसते आणि "असा काय हा.. याला धड बेडवर व्यवस्थित झोपता येत नाही.. कसा आहे हा.."

नंतर प्रणालीने त्याला उठवण्यासाठी हाक मारली.. पण तो काही उठलाच नाही.. मग ती त्याला सरळ करण्यासाठी हात लावते.. तर तिला चटका बसतो.. अर्थातच नमन तापाने फणफणत असतो..

"अरे बापरे यांना तर खूपच ताप आहे.. इतक्या रात्री डाॅक्टर पण नसणार.. आता काय करू.." प्रणाली मनातच म्हणाली..

मग तिला आठवत की तिची आई आजी लहानपणी ताप आला की पाण्याच्या घड्या कपाळावर ठेवत असत.. मग ती कापड आणि पाणी आणायला काचनमध्ये जाते.. इतक्यात नमनची आई पाणी पिण्यासाठी उठलेली होती..

"अगं प्रणाली काही हवे आहे का??" नमनची आई

"हो.." प्रणाली

"काय ग??" नमनची आई

"अहो आई.. यांना खूपच ताप आला आहे.. आता डाॅक्टरही नसतील.. म्हणून पाण्याच्या घड्या कपाळावर ठेवण्यासाठी कापड आणि पाणी घेऊन जायला आले आहे.." प्रणाली

"अरे बापरे.. मग मी ठेवू काय ग पाण्याच्या घड्या.. तू झोप.. तुझी खूपच धावपळ झाली आहे सकाळपासून.." नमनची आई

"नको आई.. मी करेन.. तुम्हाला पण जास्त वेळ बसायचं होतं नाही ना.." प्रणाली

"बरं.. मग उद्या निवांत उठ ग.. लवकर उठायची काही गरज नाही.. तुझीपण झोप गरजेची आहे ग.." नमनची आई

"हो आई.." प्रणाली

मग प्रणाली कापड आणि पाणी घेऊन जाते.. रात्रभर ती पाण्याच्या घड्या नमनच्या कपाळावर ठेवत होती.. तरीसुद्धा लवकर त्याचा ताप उतरला नाही.. पहाटे त्याचं अंग गार झाल्यावर मग प्रणाली झोपते.. त्यामुळे तिला उठायला उशीर होतो..

नमन सकाळी उठून बाहेर आला..
"बरं आहे का आता तुला??" नमनची आई

"हो आहे.." नमन

"ताप कमी झाला ना आता.." नमनची आई

"मला कुठे ताप होता.." नमन

"अरे रात्री तुला खूप ताप होता.. प्रणालीने तुझ्या कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवल्या होत्या.. बिचारी रात्रभर जागून तुझ्यासाठी राहिली.. म्हणून तर तू आता फ्रेश आहेस.." नमनची आई

"काय?? आणि मला कसे माहित नाही??" नमन

"तुला ग्लानी होती.. तू झोपेत होतास.. त्यामुळे तुला माहित नाही.." नमनची आई

"अच्छा.." नमन

"प्रणालीने माझ्यासाठी खूप काही केलंय.. आणि मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही.. मी धड तिच्याशी व्यवस्थित वागत नाही.. मी साधं मैत्रीला पण नकार दिला.. आणि ती किती चांगल्या प्रकारे मला सांभाळत आहे.. मी आता तिला फक्त थॅन्क्यू कसे म्हणू.. सरळ तिच्यासाठी काहीतरी करायलाच हवं.." नमन मनातच बडबडत असतो.. इतक्यात प्रणाली येते..

प्रणाली आल्यावर तो फक्त तिच्याकडे बघून एक स्माईल देतो.. ती पण हळूच हसते.. "कसा आहे हा.. साधं थॅन्क्यू पण म्हणत नाही.. मी मात्र त्याचं सगळं करते.. राहू दे.. मी पण अपेक्षा कुणाकडून करत आहे.." असे प्रणाली मनातच म्हणाली..

नमन आवरून काही काम आहे म्हणून बाहेर जातो.. रविवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती..

थोड्या वेळाने नमन येतो.. प्रणाली आणि नमनचे आई बाबा हाॅलमध्येच असतात.. नमन एक कागद प्रणालीच्या समोर करतो.. प्रणालीला धस्स होतं..

"हा घटस्फ़ोट तर देत नाही ना.. हा कागद कसला आहे.." प्रणाली मनातच म्हणाली

"काय रा हे.." नमनचे बाबा

"सांगतो.. पण आधी प्रणाली हा कागद धर.." नमन
प्रणाली कागद हातात धरते..
"आता ऐका.. तर मी आज प्रणालीचे गाण्याच्या क्लासमध्ये अॅडमिशन घेऊन आलो आहे.. उद्यापासून ती क्लासला जाणार आहे.." नमन

"काय??" सगळे एकदमच म्हणाला

"हो.. आमच्या ऑफिसच्या पार्टीमध्ये हिचे गाणं ऐकून माझ्या बाॅसने ह्या क्लासचा पत्ता दिला होता.. म्हणून मी आज तिथे प्रणालीचे अॅडमिशन घेऊन आलो आहे.." नमनचे हे बोलणे ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला.. प्रणालीला पण खूप आनंद झाला..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..




🎭 Series Post

View all