Login

माझा होशील ना भाग 6

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की प्रणाली नमनला न सांगताच माहेरी गेली.. नमनला जेव्हा हे कळाले तेव्हा त्याला खूप वाईट वाटले.. ऑफिसमध्ये केदारने पण त्याला समजावून सांगितलं की खरं प्रेम म्हणजे चेहर्याचे सौंदर्य नसून मनाचे सौंदर्य असते.. आता पुढे..

नमन ऑफिसमधून घरी आला.. घरी आल्यावर त्याला काहीच करमेना.. फोन करावे तर इगो आडवा येतो.. "ती मला न सांगता गेली मग मी का तिला फोन करु.. " असे विचार त्याच्या मनात घोळत होता.. म्हणूज नमनने प्रणालीला फोन केला नाही..

तो सगळं आवरून रात्री जेवण्यासाठी आला.. आता आईसमोर विषय काढावा म्हणून..

" आई प्रणाली कधी येणार आहे गं??" नमन

"माहित नाही रे.. तिला फोन करून विचार ना.." नमनची आई

"नको राहू दे.. " नमन

"अरे बायकोला फोन करायला का नको म्हणतोस.. कर ना उलट तिला आनंदच होईल.." नमनची आई

"नको राहू दे ग आई.." नमन

"बर मग मी विचारू का?" नमनची आई

"हो विचार.." नमन

"मग तू तिला आणायला तिच्या माहरी जाशील का?" नमनची आई

"मी कसा जाऊ.." नमन

"हो त्यात काय? जवळच तर आहे.. जा रे तेवढाच बदल होईल.." नमनची आई

"बरं.." नमन

मग नमनच्या आईने प्रणालीला फोन केला..

"हॅलो प्रणाली.." आई

"बोला ना आई.. जेवण झालं का ?" प्रणाली

"हो आताच झालं.. तुझं झाल का?" नमनची आई .

"हो झालं आई.." प्रणाली

"बरं मला सांग.. तू कधी येणार आहेस?" नमनची आई

"का ओ आई?" प्रणाली

"अगं तसं नाही.. आम्हाला म्हणजे आम्हा तिघांना इकडे करमेना.." नमनची आई मुद्दामच म्हणाली.. तेव्हाच नमनला ठसका येतो..

हे ऐकून प्रणालीला खूप आनंद झाला.. तिला काय करावे तेच कळेना..

"काय ग प्रणाली? " आई

"काही नाही आई.." प्रणाली

"अग मी सहजच म्हणाले.. तुला रहायचं असेल तर तू रहा.." नमनची आई

हे ऐकून नमन चेहराच पडला.. आणि प्रणाली पण नाराज झाली..

"नाही आई बाबांना सांगून उद्या येते.. त्यांचे काही काम नसेल तर ते येतील सोडायला.." प्रणाली

"अगं बाबांना का त्रास देतीस? नमन येईल तुला आणायला.." नमनची आई

"काय??" प्रणाली एकदम म्हणाली

"का नको यायला का ग.." आई

"तसे नाही आई त्यांच ऑफिस.. " प्रणाली

"अग तोच तर मला म्हणाला.." नमनची आईचे बोलण्याने नमनला आणखी जोरात ठसका आला..

"बरं मग येऊ देत.. येईन मी उद्या.." प्रणाली

"बरं मग मी त्याला सांगते.." नमनची आई

फोन ठेवल्यानंतर प्रणालीने ही गोष्ट आईला सांगितली.. तिच्या चेहर्यावरील आनंद बघून आईला समाधान वाटले.. कारण प्रणाली जेव्हा माहेरी आली तेव्हा तिचा चेहरा उदास होता.. चेहर्यावर तेज नव्हतेच.. आता सासरी जाणार म्हटल्यावर चेहरा खुलला.. मुलगी तिच्या संसारात सुखी आहे हे बघून प्रणालीच्या आईवडीलांना समाधान वाटले..

सकाळी लवकरच नमन प्रणालीला आणायला गेला.. ऑफिसमध्ये त्याने हाफ डे घेतलेला होता.. त्यामुळे त्याला लवकरच यायचं होत.. तो तिथे जास्त वेळ बसला नाही.. दोघेही लगेच घरी आले.. घरी आल्यावर नमन परत ऑफिसला गेला..

नमन आज खूप खूश होता.. त्याला इतका आनंद का झाला होता त्याचे त्यालाच कळत नव्हते.. तो ऑफिसमधून आल्यावर सगळं आवरून जेवायला बसला..

"आज कोणीतरी खूप खूश आहे.." नमनची आई

"कोण ग आई.." नमन मुद्दामच म्हणाला

"मीच की.." नमनची आई

"का ग??" नमन

"माझी बायको आली आहे म्हणून.." नमनची आई

"काय आई तू पण.." नमन

"मग मी तुम्हाला चिडवू शकत नाही.." नमनची आई

"बरं बाई.." नमन

"बाई नाही मी तुझी आई आहे.." नमनची आई

"बरं माझी आई.." नमन हसत म्हणाला

"बरं आता माझं ऐकायचं.." नमनची आई

"काय??" नमन

"जेवण झाल्यावर तुम्ही तुम्ही दोघे कोठेतरी फिरून या.. अर्थातच लाॅग ड्राईव्हला.." नमनची आई

"नको ग आई.. सकाळीच तर आलोय ना.." नमन

"मग चालत नाक्यावर तर जाऊन या.." नमनची आई

"बरं आई जातो.. झालं समाधान.." नमन

"नाही अजून.." नमनची आई

"अजून काय बाकी आहे.." नमन

"मला एक गोड नात आल्यावरच माझं समाधान होणार.." नमनची आई

"आई तुझं कायपण असतय बघ.." नमन

"अर्थातच शेवटी तुमचा निर्णय आहे तो.. मी फक्त माझी इच्छा बोलून दाखवली.." नमनची आई

"बरं आई आम्ही नाक्यावर जाऊन येतो बाय.." नमन आणि प्रणाली फिरायला जातात..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

🎭 Series Post

View all