Login

माझा होशील ना भाग 5

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की नमन प्रणालीला घेऊन पार्टीसाठी जातो.. पार्टीत थोडी चर्चा होते.. मग एका गेममध्ये प्रणालीला गाणे म्हणायचे असते.. ती खूप छान गाणं म्हणते.. गाणं संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.. नमनच्या मनात थोडं परिवर्तन झाल.. आता पुढे..

प्रणालीने खूपच सुंदर गाणे म्हटले.. नमनला तर काहीच कळेना.. तो भारावून गेला.. "ही किती छान गाणं म्हणते.. मला कधी सांगितलं नाही.. तसं मी किती बोलतो हिच्याशी.." नमन मनातच म्हणाला..

नमन आज खूपच खूश होता.. प्रणालीने त्याची इज्जत वाचवली होती.. होय इज्जतच.. कारण गाणं खराब झालं असत तर त्याला लाजेने मान खाली घालाव लागल असतं..

"मॅडम खूप छान गाणं म्हटलातं.." सगळेजन प्रणालीला म्हणत होते..

प्रणाली खूपच भारावून गेली होती.. कारण पहिल्यांदाच इतक्या लोकांसमोर स्टेजवर तिने गाणं म्हटलं होतं..

"मिस्टर नमन तुमच्या मिसेस खूप छान गातात.. तुम्ही त्यांना सपोर्ट करता ना.." नमनचे बॉस म्हणाले..

"हो सर, पण मला माहित नव्हते.. ही इतकी छान गाते म्हणून.." नमन

"आता कळाले ना.." बॉस

"हो.." नमन

"माझ्या ओळखीत एकजण आहेत.. त्यांना तुम्ही भेटा.. ते गाण्याचे क्लास घेतात.." सर

"हो सर.." नमन

सर नमनला पत्ता आणि नंबर देऊन जातात.. कार्यक्रम संपला आणि सगळे घरी जातात.. नमन प्रणाली खूश असतात.. ते घरी जाऊन आवरून झोपतात.. पण प्रणाली झोपच येत नाही.. आनंदाच्या भरात ती हळूच गालातच हसत होती.. तिला भारीच वाटत होते.. नंतर पहाटे तिचा डोळा लागला..

सकाळी नेहमीप्रमाणे कामे सुरू झाली.. नमन ऑफिसला गेला.. नंतर प्रणालीच्या आईचा फोन आला..

"खूप दिवस झाले.. प्रणाली माहेरपणासाठी आलीच नाही.. तर तिच्या बाबांना तिला आणायला पाठवू का?" प्रणालीची आई नमनच्या आईला म्हणाली

"हो चालेल.. पाठवा खरंच.. आम्हाला काहीच अडचण नाही.." नमनची आई

मग प्रणाली तिची बॅग भरायला गेली.. बॅग भरुन झाल्यावर थोड्या वेळाने तिचे बाबा येतात... ते आल्यावर सासू सासर्यांना सांगून प्रणाली जाते.. पण एका गोष्टीनेही तिने नमनला विचारले नाही.. तशी तिला गरज वाटली नाही.. कारण असं होत की नमनची इच्छा काय असते?? ती गेल्यावर तो कसा रिएक्ट होतो?? त्याला तिची कमी जाणवते का??" हे पाहायचं होत म्हणून ती नमनला न सांगताच जाते..

नमन संध्याकाळी ऑफिसमधून येतो.. नेहमीप्रमाणे हातपाय धुवून कपडे चेंज करतो.. पण त्याला प्रणाली दिसत नाही.. काहीतरी कामात असेल म्हणून तो त्याचे काम करतो..

रात्री जेवायला जेव्हा जातो तेव्हा आई वाढत असताना बघून

"प्रणाली कुठे आहे?? " असे नमन विचारला..

"ती माहेरी गेली आहे .." नमनची आई

"काय??" नमनला दोन मिनिटे काही कळालेच नाही.. त्याच्या छातीत धस्स झाले..

"तुला सांगितले नाही का तिने?? " नमनची आई

"नाही.." नमन

"गडबडीत राहिले असेल.." नमनची आई

"आता का गेली??" नमन

"खूप दिवस झाले गेली नाही.. तिच्या आई बाबांना तिची आठवण येत होती.. म्हणून गेली रे.. जाऊ दे.. दोन दिवस तिला पण चेंज वाटत असेल मग.." नमनची आई

मग तो जेवण आटोपून खोलीत गेला.. पण त्याला आज काही करमत नव्हते.. मन उगाचच बेचैन झालं होत..

"मला ती आवडली नाही.. ती जावं असं मला सारखं वाटायचं.. पण आज ती गेली आहे तर मला असं का वाटतं आहे.. माझं मनच कशात लागतं नाही.. का मी तिच्या प्रेमात.. नाही नाही नको हं.. हा ब्लॉग पेजवर द्यायचा आहे काय खेळ आहे का?? " नमन मनातच बडबडत असतो.. पण त्याला झोप लागली नाही.. तो तसाच पडून राहिला.. नंतर आपोआप त्याला झोप लागली..

सकाळी आवरून तो नेहमी प्रमाणे ऑफिसला गेला..थोड्या वेळाने केदार त्याच्या डेस्कजवळ आला..

"अरे त्या सीमा आणि संस्कारच काय झालं रे.. तो इतका का वैतागला आहे??" नमन

"अरे प्रेमात असंच होत.." केदार

"म्हणजे??" नमन

"अरे ती सीमा गेली ना.. दुसरा जास्त पैसेवाला मिळाला तिला.. दिसायला पण रूबाबदार आहे म्हणे.." केदार

"काय?? अरे हा संस्कार पण काय कमी छान आहे का रे??" नमन

"या देखण्या मुलींच काही सांगता येत नाही रे.. म्हणून चेहरा बघून नाही तर मन बघून लग्न करावं.. याचा अर्थ सगळ्याच देखण्या मुली अशा असतात असे नाही.. काही संस्कारी पण असतात.." केदार

"बापरे अवघड आहे की मग.." नमन

"होय रे.. म्हणून तुला मी म्हणालो की तू वहिनी बद्दल विचार कर.." केदार

"हा म्हणतोय ते खरं आहे.. मी इतके दिवस प्रणालीशी कसाही वागतोय.. ती एका गोष्टीने काही बोलली नाही.. मला सोडून गेली नाही.. माझं सगळं करायची.. अगदी आवडीने.. आणि मी तिच्याशी साधं बोललो पण नाही.. किती मोठा मूर्खपणा केलाय मी.. खरंच मी चुकलोय का?? मी तिच्याशी चुकीचेच वागलोय.." नमन मनातच बडबडत असतो..

"काय रे काय झालं??" केदार

"तुझं पटतय रे मला.." नमन

"पटायलाच पाहिजे आणि.. वेडा तुला समोर इतकं छान वाढलय ते सोडून दुसरी ताटं चांगली वाटत आहेत.. पण दुसरीकडे पाहण्यापेक्षा स्वतःच्या ताटात बघ ना.. पोटभर जेवशील.. " केदार

"जी सरकार.." नमन

"आता कसं बोललास.. गुड बाॅय.." केदार

नमनला प्रणालीला फोन करावस वाटल पण तो फोन करत नाही.. "तिने मैत्रीचा हात पुढे केला.. आणि मी त्यालाही नकार दिला.. किती दुष्ट आहे मी.." नमन मनातच म्हणाला

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.


🎭 Series Post

View all