Oct 26, 2020
स्पर्धा

माझा होशील ना भाग 4

Read Later
माझा होशील ना भाग 4

आपण मागील भागात पाहिले की नमन प्रणालीचे आभार मानतो.. कारण ती नमनच्या आईबाबांना काही सांगितलेली नसते.. आता नमनच्या ऑफिसमध्ये एक पार्टी असते.. आणि त्या पार्टीसाठी जोडीदाराला घेऊन यायच होतं.. आता नमन काय करावे या विचारात होता.. आता पुढे.

नमन घरी येतो.. आणि बसतो.. त्याला प्रणालीला रात्री पार्टीला न्यायचं नसतं.. पण नाईलाज असतो..

"काय झालंय.." प्रणाली

"काही नाही.." नमन

"मग असे का बसलाय??" प्रणाली

"काही नाही.." नमन

"हं.." प्रणाली

"संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे.." नमन

"बरं मग तुमचं जेवण बनवत नाही.." प्रणाली

"पार्टनरला पण घेऊन जायचं आहे.." नमन

"काय?? मग.." प्रणाली

"काय करणार.." नमन

"तुम्हाला चालेल का?? मी आले तर.." प्रणाली

"त्यावर काहीच इलाज नाही.. यावच लागेल.." नमन

"तुमच्या मनात नसेल तर मग येत नाही.. तुमचं तुम्ही जा.. " प्रणाली

"मग बाॅसला काय सागू??" नमन

"तब्बेत बरी नाही म्हणून सांगा.. " प्रणाली

"सांगितलं असतं पण तो केदार आहे ना.. तिथेच पचकला तर.. काय यार मित्र आहे की वैरी कळत नाही.." नमन

"मग मी सांगू का त्यांना.. " प्रणाली

"नको बाई.. मग तर जास्तच होईल.." नमन

"बरं.." प्रणाली

"तू संध्याकाळी छान आवर.. आज पार्टीत तू सुंदर दिसायला हवीस.. पार्लरमध्ये जाऊन ये.. थोडासा मेकअप कर.." नमन

"मला जमेल तसे मी करणार.. मला जास्त नटायला आवडत नाही.." प्रणाली

"मला जस आवरायचं.. तसेच मी आवरणार.. चालेल का तुम्हाला??" प्रणाली

"बरं माझी आई.. आवर तुला हवं तस.." नमन

"मी तुमची आई नाही " प्रणाली

"हा जोक होता.. " नमन

"हो.." प्रणाली

"हा हा हा.. बर मला चहा कर.. आपल्याला लवकर निघावे लागेल.. तू आवरून घे.." नमन

"बर मी आई बाबांचा स्वयंपाक करते.. मग आवरायला घेते.." प्रणाली

"पण लवकर आवर हं.." नमन

"बरं आवरते.. " प्रणाली असे म्हणून प्रणाली स्वयंपाकाच्या तयारीला लागते..

सासू सासर्यांचा स्वयंपाक करून बाकीचे आवरून ती स्वतःचे आवरायला गेली.. प्रणालीने आज पार्टीसाठी फेंट पिंक कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता.. केस मोकळे सोडून फक्त लहानशी क्लिप लावली होती.. ओठावर लिपस्टिक लावली होती.. आणि हलकासा मेकअप केलेली होता.. ती जणू ब्लॅक ब्युटीच दिसत होती..

ती कितीही सुंदर असली तरी तिचा रंग तिच्या आडवा यायचा.. रंगाने ती सावळी असल्याने चारचौघींच्यात ती उठून दिसायची नाही.. पण यात तिचा काय दोष?

परमेश्वरने जन्माला घालताना जो रंग दिलाय त्याला कोण काय करणार?? प्रणाली तयार होऊन बाहेर झाली.. नमन फक्त तिच्याकडे पाहिला.. तशी तिने कौतुकाची अपेक्षा केली नव्हती..

" छान दिसत आहेस.." नमन

"खरंच की असंच म्हणत आहेस.." प्रणाली

"नाही खरंच सांगतोय.." नमन

नमन आणि प्रणाली पार्टीला जातात.. त्यांची जशी एण्ट्री झाली तसे सगळे त्यांच्याकडेच बघू लागले.. दोघांनाही खूपच ऑकवर्ड वाटत होते..
"हा इतका हॅण्डसम आहे.. आणि याची बायको बघ.." एक मुलगी

"हो ना.. शोभतच नाही त्याला.. तो किती क्युट आणि हुशार आहे.. काय म्हणून तिला पसंत केले काय माहित.." दुसरी

"त्यापेक्षा मला विचारले असते तर.. मी नक्कीच तिच्यापेक्षा सुंदर आहे.." तिसरी

असे सगळेजण जणू चर्चाच करत होते.. प्रणालीला अवघडल्यासारख वाटतं होत.. ती थोडी नाराजच होती.. नमन त्याच्या मित्रांबरोबर गप्पा मारायला गेला.. आणि प्रणाली एकटीच खुर्चीत बसली.. इतक्यात केदार आणि त्याची बायको येतात.. मग प्रणाली सोबत ते बोलत बसले..

सर्वजण मिळून एक गेम खेळू लागले.. केदारची पत्नी प्रणालीला पण घेऊन गेली.. गेममध्ये कोणावर नंबर येईल त्याने चिठ्ठी उचलून त्यात काय असेल ते करून दाखवायचे होते..

आता प्रणालीचा नंबर आला.. सगळे हसायला लागले.. प्रणालीने चिठ्ठी उघडली तर त्यात गाणं म्हणायचं असत.. सगळे आणखीच हसू लागतात.. नमनला खूप टेन्शन येतं .. आणि प्रणाली गाणं म्हणायला सुरुवात करते.. तशी शांतता पसरली..

वेड्या सांग ना

खुणावती का खुना

माझे मला आले हसू

प्रेमात फसणे नाही रे .......

गाणं संपलं तरी शांतता तशीच राहते.. थोड्या वेळाने टाळ्यांचा कडकडाट झाला.. आणि नमनचा प्रणालीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मी काही प्रोफ़ेशनल लेखिका नाही.. मनात जे काही येतं ते लिहिते..