माझा होशील ना भाग 3

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की नमन मित्राला सगळं सांगतो.. एकदा तो मित्रांबरोबर जाऊन दारू पिऊन आलेला असतो.. आता त्याला भीती होती की प्रणालीने आईबाबांना सांगितले की काय?? आता पुढे..

नमन त्याचे सगळं आवरून बाहेर आला.. आणि खुर्चीत बसला..

"आई आज डोकं खूप दुखत आहे ग.." म्हणाला..

"लिंबू पाणी देऊ का??" प्रणाली

"अग त्याच डोकं दुखत आहे.. आणि तू लिंबू पाणी देऊ म्हणून काय विचारतेस??" नमनची आई

"अहो आई.. पित्त झाले असेल तर ते कमी होईल.. म्हणून मी विचारत आहे.." प्रणाली

"अच्छा.. करून दे मग त्याला लिंबू पाणी.." नमनची आई

लिंबू पाणी म्हटल्यावर नमनच्या छातीत धस्स झाल.. तेही बाबा असताना ही विचारत आहे..

"कोणाला हवं आहे लिंबू पाणी.." नमनचे बाबा

"अहो ते नमनला थोडं पित्त झालंय.. तर प्रणाली म्हणाली लिंबू पाणी देऊ का??" नमनची आई

नमनला प्रणालीचा खूप राग येतो.. आणि तो रूममध्ये निघुन जातो

"समजते कोण ही स्वतःला.. माझ्या घरात येऊन मला ही शिकवते.. हिने नक्की आई बाबांना सांगितले असणार.. ही दिसते तशी मुळीच नाही.." नमन मनातच बडबडत असतो..

इतक्यात प्रणाली येते.. ती लिंबू पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि त्याच्या समोर करते..

"तुला काय गरज होती आईबाबांच्या समोर विषय
काढायची.." नमन

"मी कुठे विषय काढलाय??" प्रणाली

"लिंबू पाणी देऊ अस कशाला म्हणायचे??" नमन

"मग काय म्हणू??" प्रणाली

"काही म्हणायच नाही.." नमन

"बरं.. नाही म्हणत.. पण तुमच डोक दुखत होत म्हणून.." प्रणाली

"मी बघितल असत ना काय करायचं ते.." नमन

"बरं.." म्हणून प्रणाली जात असते..

इतक्यात नमन "बाय द वे" म्हणतो

प्रणाली थांबते..

"थॅन्क्यू.." नमन

"कशासाठी?" प्रणाली

"ते तू आई बाबांना काही सांगितलं नाहीस म्हणून.." नमन

"घरात उगाच वाद नको.. म्हणून मी काही सांगितले नाही.." प्रणाली

प्रणालीच्या या बोलण्यावर नमन खूपच प्रभावित होतो.. त्याला तिच्याबद्दल आदर वाटतो..

"मग काय निर्णय घेतला आहेस.." नमन प्रणालीला म्हणतो..

"कशाबद्दल??" प्रणाली

"माहेरी जाण्याबद्दल.." नमन

"मी माहेरी जाऊ शकत नाही.. तिथली परिस्थिती तुम्हाला माहितच आहे.. आणि भाऊ बहिणीच अजून लग्न होणार आहे.. माझ्यामुळे त्यांना त्रास झालेला मला चालणार नाही.." प्रणाली

"मग??" नमन

"मला सांगा.. तुमच्या मनात दुसरं कोणी आहे का?" प्रणाली

"नाही.. का??" नमन

"असच.." प्रणाली

"आपण एकमेकांचे मित्र बनू शकतो का?" प्रणाली

"नको.. आपण आता आहोत तेच ठिक आहे.. मला कोणत्याही नात्यात अडकून रहायचं नाही.." नमन

"बरं.." प्रणाली

"एक विचारू.. " नमन

"विचारा की.." प्रणाली

"तू इतकी शांत कशी??" नमन

"म्हणजे ??" प्रणाली

"मी कसाही वागलो तरी तू शांतपणे सगळं छान
हाताळतीस.. कधीच उलट बोलत नाहीस.." नमन

"आईबाबांसाठी.. " प्रणाली

"हमम.. कुणाच्या.." नमन

"दोघांच्याही.. त्याचे कारण असे की त्यांचे माझ्यावर खूप प्रेम करतात.. या जन्मात मी त्यांना कधीच दुखावणार नाही.." प्रणाली

"किती सुंदर विचार आहेत हिचे आणि मी.." नमन मनात म्हणतो

"बरं मी डबा भरून ठेवलाय.. जाताना घेऊन जा.." प्रणाली

"बर.." नमन

मग नमन ऑफिसला जातो.. ऑफिस मध्ये काम चालू असतानाच सर येतात..

"एक अनाउन्समेंट आहे.. सगळे ऐका.. आज रात्री ऑफिसची एक पार्टी अरेंजमेंट केली आहे.. सगळेजण आपापल्या फॅमिली सोबत नक्की यायचं आहे.. कोणी येणार नाही त्याला फाइन लागू होईल.. त्यामुळे सगळ्यांना कंपलसरी आहे.. सो आता तुम्ही जाऊ शकता.. एन्जाॅय पार्टी.." सर असे बोलून निघून जातात..

आता नमनला टेन्शन येत.. "पार्टीसाठी प्रणालीला आणायचं कस?? तिला बघून ऑफिसमधले काय म्हणतील?? हा इतका देखना आणि याची बायको अशी कशी?? किंवा याला दुसरं कोणी मिळालं नाही का??

बापरे मी आता काय करू.. मी पार्टीला येतच नाही राहू दे.. पण फाइन भरावं लागणार.. मग ते काय असेल काय माहित?? त्यापेक्षा आलेलेच बर.. पण ती येईल का?? आधीच मी काहीबाही बोललोय तिला.. पण तिला यावं तर लागणारच.. बघू काय होईल ते होईल.." असा विचार करत नमन बसलेला असतो..

त्यादिवशी ऑफिस लवकरच सुटते.. कारण नंतर पार्टी असते ना.. सगळ्यांना तयारीला वेळ तर लागणारच..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..





🎭 Series Post

View all