माझा होशील ना भाग 2

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की.. नमन आणि प्रणालीचे लग्न झाले.. पण नमनला प्रणाली पसंत नव्हती.. त्याने तिला तसे सांगितले होते... तो जेव्हा ऑफिसला गेला तेव्हा सगळे त्याला प्रश्न विचारून भंडावून सोडले होते.. आता पुढे..

नमन मनातच बडबडत असतो.. तेवढ्यात त्याचा मित्र केदार येतो..

"काय नमन शेठ.. मग काय खूश.." केदार

"कसला खूश आणि कसले काय??" नमन

"म्हणजे काय?? काय झालं??" केदार

"काय सांगू तुला?? बापान मुलगी पसंत केली.. आणि ती पण काळी निघाली ना.. " नमन वैतागून म्हणतो..

"काळी.. म्हणजे??" केदार

"हो ना.. बघ ऐकूनच तुला कस होतय.. सगळे तिला बघितले तर काय म्हणतील.." नमन

"सगळ्यांच सोड तुझ सांग.. तुला काय वाटतय.." केदार

"मी कालच तिला सांगितले.. तू मला पसंत नाहीस म्हणून.." नमन

"वेडा आहेस का तू.. असे पटकन कोणी बोलत का?? तिच्या मनाचा तर विचार करायचा रे.." केदार

"तिच्या मनाचा तर विचार करून म्हणालो.." नमन

"यात कसला तिचा विचार केलास.." केदार

"अरे ती माझ्यात गुंतू नये.. म्हणून तिला खरं काय ते सांगितलो.." नमन

"धन्य आहेस तू.." केदार

"हमम.. अरे ती सीमा आणि संस्कार बघ ना.. कसे दोघेही छान दिसतात.. आणि दोघांचे किती प्रेम आहे एकमेकांवर.. तसेच मलाही हवे होते रे.. इतकीच इच्छा होती माझी.. पण काय मिळाले आता.." असे म्हणून नमन नाराज होतो.

"हे बघ नमन.. लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बनतात.. त्यामुळे आपण जे आहे ते एक्सेप्ट करावं लागतं.." केदार

"पण मला जमत नाही.." नमन

"पण कधी कधी जमवून घ्यावं लागतं.." केदार

"बघू बाबा.. आता माझं डोकं ठिकाणावर नाही.. तू जा.." असे नमन म्हटल्यावर केदार निघून जातो..

लग्न झाल्यापासून नमन लवकरच ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा यायचा.. जाताना फक्त प्रणालीने बनवलेला डबा घेऊन जाई.. तो रात्री कितीही उशीरा आला तरी प्रणाली जागीच असायची.. नमन जेवणार आहे की नाही ते बघून मग झोपायची.. नमन कधीकधी बाहेरून जेवण करून यायचा.. त्या दोघांच्या नात्याला नवरा बायको फक्त नाव होत.. पण त्यांच्या मनातून कोणतच नात नव्हतं..

ते दोघे फक्त रात्री समोरासमोर भेटायचे.. ते ही एका रूममध्ये झोपायचे म्हणून.. तेव्हा पण नमन खाली आणि प्रणाली वर झोपत होते.. बरेच दिवस झाले.. दोघांमध्ये काहीच संवाद नाही.. नमनला आता या खोट्या नात्याचा कंटाळा आला होता.. पण तो कोणाला सांगूही शकत नव्हता..

प्रणालीची स्थिती तर त्याहून वाईट.. बिचारी आतल्याआत झुरत होती.. पण काय करणार?? माहेरी जाऊ शकत नव्हती.. तिचं माहेर एक लहानसं खेडेगाव होत.. त्यात त्यांची परिस्थिती गरीब होती.. आईवडील टेन्शन घेतील.. अजून बहिण भावाचं लग्न होणार होते.. त्यात ही अजून गेली की ते काय करणार.. या काळजीपोटी ती माहेरी जाऊ शकत नव्हती..

नमनला ते सर्व बघून कंटाळा आला होता.. काही नको होतं त्याला.. एकदम टेन्शन आल्यासारखे वाटले होते.. सारखं तेच तेच विचार करून दमला होता..

आज त्याच्या ऑफिसमधल्या एकाने बॅचलर पार्टी ठेवली होती.. नमन तिकडे जाणार होता..

तो त्याच्या आईला फोन करून म्हणाला, "आई अगं माझ्या मित्राने पार्टी ठेवली आहे.. म्हणून आज मी त्याच्या पार्टीला जाणार आहे.."

"ठीक आहे. पण घरी लवकर ये.." आई.

नमन "ठीक आहे.." असे म्हणतो.

रात्रीचे जेवण झाले.. आणि सगळं आवरून झाल्यावर नमनच्या आई आणि प्रणाली दोघीजणी नमनची वाट बघत थांबलेले असतात.. रात्रीचे अकरा वाजतात.. नमन अजून आलेला नसतो..

प्रणाली नमनच्या आईला म्हणते.. "आई तुम्ही झोपा आता.. मी आहे.. हे आल्यानंतर मी दार उघडते.."

मग नमनची आई "ठिक आहे.." असे म्हणून झोपायला जाते..

रात्रीचे बारा वाजतात.. मग नमन येतो.. नमनचा मित्र त्याला दारात सोडतो आणि निघून जातो.. नमन खूप दारू प्यायलेला असतो.. तसा तो कधीही दारू पीत नाही.. परंतु त्याला मित्रांनी जबरदस्तीने कोल्ड्रिंगमध्ये दारू मिक्स करून पाजली होती.. असं तो सोडायला आलेला मित्र सांगून लगेच निघून गेला..

प्रणाली नमनला कशीबशी घेऊन रूममध्ये जाते.. आणि बेडवर झोपवते.. मग त्याच्या पायातील शूज काढते.. त्याचे कपडे काढण्याचा प्रयत्न करते पण ते काही तिला निघत नाहीत.. मग तशीच ती त्याला पांघरते..

"हा कधीच पित नाही.. आता का प्यायला.. खरंच मित्रांनी पाजल की आणखी काही.. ह्यांना माझ्यामुळे टेन्शन तर आलेले नसेल ना.. तसे असेल तर मला काहीतरी करावे लागेल.. माझ्यामुळे कुणाला त्रास झालेला मला चालणार नाही.." असा विचार करत प्रणाली बसलेली असते..

नंतर त्या विचारातच ती झोपते.. मग सकाळी लवकर उठून सगळं आवरून तिच्या कामाला लागते..

नमनला उठायला आज उशीर झाला होता.. तो उठला आणि त्याचे डोके खूप जड झाले होते.. त्याला कळेना आज डोकं इतकं जड का वाटतं आहे.. तेवढ्यात केदारचा फोन येतो..

"काय नमनशेठ?? उतरली की नाही अजून कालची.." केदार

"म्हणजे?? तू काय बडबडतोस मला काहीच कळेना.. आधीच डोकं जड झालंय.. त्यात तुझी बडबड.. काय ते सरळ सरळ बोल.." नमन

"ए नम्या.. तू काल दारू पिला होतास.. म्हणून तुझं डोकं जड झालंय.. कळाल काय साहेब.." केदार

"काय???? कसे काय?? आणि घरी.. बापरे!!" नमन

"हो.. आणि घरी तुला मीच सोडलो.. वहिनी होत्या.. त्यांनीच तर तुला आत नेले.." केदार

"काय??" नमन

"हो वाटल्यास विचारून बघ.." केदार

"बरं.. बाय.." नमन

"अरे बापरे!! बाबांनी बघितलं असेल तर.. या प्रणालीवर पण काय भरोसा नाही.. जाऊन आईबाबांना सांगितली असली तर.. आता माझी काही खैर नाही.. मला खूप भीती वाटत आहे.. बाहेर कसा जाऊ.. बाबा असतील ते काय म्हणतील.." नमन मनातच बडबडत असतो..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

🎭 Series Post

View all